आजकाल चित्रपटसंगीताचा दर्जा घसरत चालला आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 December, 2016 - 03:57

मायबोली सभासद गमभन यांना बसमध्ये भेटलेल्या आजोबांनी चालत्या बसमध्येच एक स्फोटक विधान केले, "आजकालच्या लोकांना चांगल्या संगीताची चाड नाही नी यव नी त्यव ..."
आणि ते मलाही पटले.
तसेच मायबोली सभासद रश्मी यांनीही हे उचलून धरल्याने हा विषय वेगळा धाग्यात आणतोय.

माझ्या आईवडिलांच्या पिढीपासून ऐकतोय, काय तुमची ती आजची गाणी. नुसते कानठळ्या बसवणारे संगीत, ना त्या शब्दांना काही अर्थ? काय तर म्हणे तेरी शर्ट भी सेक्सी मेरी पॅण्ट भी सेक्सी..
पण हल्ली मलाही बरेचदा असेच काहीसे म्हणावेसे वाटतंय. अकाली प्रौढत्व तर नाही ना आले मला Wink
पण खरेच, माझ्या लहानपणी जेव्हा आईबाबा आजच्या संगीतावर हल्लाबोल करायचे तेव्हा त्यांना प्रत्युत्तर म्हणून माझ्याकडेही चार चांगली गाणी असायची. पण हल्ली मात्र संगीताचा दर्जा ईतका गंडलाय की चालू वर्षातील सुमधुर श्रवणीय गाणी कोणती हे आठवावी लागतात. तेच गेल्या वर्षातील आठवूनही आठवत नाहीत कारण ती ईतकी अल्पायुषी असतात.

माझ्यामते एखाद्या चांगल्या गाण्यातही मेलोडी जितकी कमी त्याच प्रमाणात त्याचे आयुष्यही कमी होते. आणि मेलोडी तर हल्ली चवीलाही सापडत नाही. यावरून आठवले, काही दिवसांपूर्वी कधी नव्हे ते एक म्युजिक चॅनेल लावून बसलो होतो. माझ्याच्याने ती ट्रेलरमधील तुकड्यातुकड्यात दाखवली जाणारी गाणी बघवत नाही. म्हणून मी जिथे पुर्ण गाणी लागतात असा एखादा कार्यक्रम / चॅनेल लावतो. तर एका चॅनेलवर मेलोडियस सॉंग्ज नावाचा कार्यक्रम चालू होता. टायटल वाचून काहीतरी चांगले दर्जेदार ईथे बघायला मिळेल असे वाटले. पण तिथे चक्क हिमेश रेशमियाने गायलेली, इम्रान हाशमीवर चित्रित झालेली गाणी मेलोडियस गाण्यांच्या सदराखाली खपवत होते. असे वाटले टीव्हीत हात घालून त्या हिमेशची कॉलर धरून त्याला गदागदा हलवत विचारावे, ये मेलोडी ईतनी कर्णकर्कश्य क्यू होती है?

जे संगीताबाबत झालेय तेच गायकांबाबतही झालेय. कोणाचा आवाज हल्ली फारसा आनंद देत नाही. नुसते गायकीसाठी ऐकावे असे काही वाटत नाही. एक त्या सोनू निगम नंतर गायकीतला सूर हरवल्यासारखे वाटते, की हा माझाच भास आणि यालाही जबाबदार दर्जा घसरलेले संगीत आहे? तसे अरिजित सिंग नावाची हल्ली फार चलती आहे. त्यावरून घडलेला एक मागचा किस्सा आठवला,
गर्लफ्रेंडसोबत पिक्चरला गेलो होतो. पिक्चरचे नाव एअरलिफ्ट. गाणे सुरू झाले. चांगले वाटले. मोजून बाराव्या सेकंदाला माझी गर्लफ्रेंड म्हणाली, "हा अरिजित सिंग आहे"
मी म्हणालो, "नाही ग्ग अक्षय कुमार आहे"
"मी सिंगर बद्दल बोलतेय ...."
"बरं मग?"
"मी ओळखते त्याचा आवाज"
"ओके, मग तो प्लेबॅक सिंगर म्हणून फेल आहे. पडद्यावर कोणीही असला तरी हा सेम सेम आवाज देणार. याला काय अर्थ आहे?"
"मग तुझा आतिफ अस्लम दर गाण्याला वेगळा आवाज देतो का?"
"शूऽऽ... पिक्चर बघा रे" .. कोणीतरी मागून ओरडले आणि आमची चर्चा थांबली.

आतिफ मला आवडत असला तरी सूरांबाबत तो नेहमीच कच्चा होता हे मी मान्य करतो. पण एकंदरीतच आजकाल सूरात गाण्याचे महत्वही पहिल्यापेक्षा कमी झालेय असे वाटते.

शब्दांबद्दल विचारायलाच नको. काही सन्माननीय अपवाद वगळता कसेबसे जुळवलेले यमक हेच यशाचे गमक समजून गाणी लिहिली असतात. चालीत भरायचे म्हणून काहीही शब्द घुसडले असतात. एक काव्य म्हणून वाचायला गेल्यास त्यातून काही अर्थ निघत नाही. गुणगुणावीशी वाटावी अश्या गाण्यांची संख्याही यामुळे कमालीची रोडावली आहे. खास गूगाळून शेवटचे लेटेस्ट गाणे मी कधी डाऊनलोड केलेय हे देखील मला आठवत नाहीये.

मुळात हा दर्जा घसरला आहे असे तुम्हालाही खरेच वाटते का? की माझ्याच अपेक्षा जरा जास्त आहेत?
आणि घसरला असल्यास त्यामागची कारणे काय आहेत?
चांगले संगीत हे चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर देखील मदत करते असे म्हणतात, पण त्याची गरज आजकालच्या दिग्दर्शकांना वाटत नाही का? चित्रपटात कमीत कमी गाणी ठेवायची, त्यातही एखादे आयटम सॉंगच बनवायचे असा ट्रेंड आजकाल प्रचलित होत आहे. तर संगीतासाठी पुरेसे बजेट ठेवले जात नाहीये का? मोठ्या बॅनरचे चित्रपट देखील हल्ली याबाबत निराशा करू लागले आहेत. एखादा संपुर्ण अल्बम श्रवणीय गाण्यांनी भरलेला असणे हे तर फार दुर्मिळ होऊ लागलेय. गाणी श्रवणीय आहेत की नाही यापेक्षा प्रेक्षणीय आहेत की नाही याचा जास्त विचार होताना दिसतोय. संगीताचे घटलेले बजेट कोरीओग्राफीवर वाढवलेले दिसते. जशी मागणी तसा पुरवठा, तर लोकांचीही मागणी हीच आहे का? माझी तरी नाही ... आपले मत काय आहे?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या काळातल्या हिमेशची गाणी पण किती मस्त होती. क्लासिक अगदी...

हल्ली पण
अच्छा चलता हू, दुआओ मे याद रखना!
दिल पर पत्थर रखके मैने ये सब कर लिया
अशी किती तरी चांगली गाणी बनत आहेतच की सध्या!

होय ऋन्मेष सर तुमचं वय खूप जास्त वाढलंय. चाळीशी- पन्नाशीच्या दरम्यान नक्कीच !

ऋन्मेष 'darza is a state of mind!'

कुणाला काय दर्जेदार वाटावं हे कोण सांगणार?

पूर्वी थोडीच गाणी बनत आणि जी बनत ती बहुसंख्यांना सुश्राव्य वाटावी अशी बनत.

आजकाल बनवणारेही खूप आहेत आणि ऐकणारेही.
त्यामुळे त्या त्या ऑडियन्सला अपिल करणारी गाणी बनतात.
कुणाला ती दर्जेदार वाटतात तर कुणाला नाही.

ऐकणार्‍या कानांना हे पण गोड वाटतं.
माझी भाचेकंपनी आजकालचं संगीत, म्युझिक एन्जॉय करतात. आम्ही भावंड कुमार सानु, अल्का याद्निक, अनुराधा पौडवाल, आशिकी, सडक वैगेरे वैगेरे खुप काही त्यावेळचं ऐकलं की नॉस्टल्जिक मोडमधे, तर आई-पप्पा आवाज दे कहा है, आणि काहीतरी एक रात्री जुन्या गाण्यांचा कार्यक्रम ऐकतात.

जशी मागणी तसा पुरवठा, तर लोकांचीही मागणी हीच आहे का? माझी तरी नाही ... आपले मत काय आहे? >>>> आपल्याकडे एक प्रकारची कमोडिटी आहे पण त्याची मागणी नसेल तर ती कमोडिटी लोकांच्या डोक्यावर इतकी आदळायची की आपोआप मागणी बदलत जाते. एक प्रकारचे मार्केटींग गिमिक आहे हे!! आपल्या आवडीचे काही मिळत नाही म्हट्ल्यावर जे मिळतय ते लोकांना आवडायला लागते!!

बाकी गाण्यांचा दर्जा घसरला आहे पेक्षा गाण्यांना (ह्यात काव्य, संगीत, गायन सगळंच आलं) काही दर्जा रहिलेलाच नाही असं म्हणायला हरकत नाही!!

पुर्वी इवळगीते होती,बाबुजी अप्पा अण्णा बुवा इवळगीते करायचे.लोकांना पर्याय नसल्याने त्येच आवडायचे.आज काल जबर गाणी येतात ,खासकरुन अजय अतुलची

तुझ्या नवीन धाग्याला मी निमित्त झालो.
अाता किती लोकांच्या शिव्या खाव्या लागणार देव जाणे! Wink

टीप: या प्रतिसादावर ऋ ने धागा काढल्यास मी जबाबदार नाही. Proud

टीप: या प्रतिसादावर ऋ ने धागा काढल्यास मी जबाबदार नाही. >>>आसं कसं, आसं कसं? तुमी सुपारी दिली तर तुमाला पन हाननार. Wink Lol

पुर्वी इवळगीते होती,बाबुजी अप्पा अण्णा बुवा इवळगीते करायचे.लोकांना पर्याय नसल्याने त्येच आवडायचे>>>>>>ये इवळगीते क्या है ये इवळगीते?

इवळगीते म्हणजे विरह गीते? की उदास गीते? की दर्दभरी गीते?

'हम्म'वर धागा काढणे अगदी सोपे आहे, गिरीकंद. ते करण्याची जबाबदारी घेण्याची विनंती मी ऋन्मेऽऽषजींना नम्रपणे करतो. त्यांनी पुढच्या १ आठवड्यात धागा काढला नाही, तर त्यांच्या वतीने मी धागा काढतो. Proud

पुर्वी इवळगीते होती,बाबुजी अप्पा अण्णा बुवा इवळगीते करायचे.लोकांना पर्याय नसल्याने त्येच आवडायचे.आज काल जबर गाणी येतात ,खासकरुन अजय अतुलची>>>>>>एकदम बरोबर ! ! !
मिका सिंग ,हनी सिंग ,विशाल-शेखर,साजिद-वाजिद,वगैरे वगैरे .....
अहो आजकाल हेच चाललंय कारण लोकांना तेच आवडत ,आणि राहिला प्रश्न मेलोडी गाण्यांचा तर तेही आहेच कि,तुम्ही श्रेया घोषाल,अरिजित सिंग ,अरमान मलिक...यांची गाणी ऐकू शकता.

चेष्टेचा भाग सोडा, जी गाणी ऐकुन आपण सहज येताजाता गुणगुणु शकतो ती चांगली, अशी मी माझ्यापुरती केलेली व्याख्या आहे.
दुर्दैवाचा भाग म्हणजे आजकालची फार कमी गाण्यांमधील शब्द नीट कळतात, मग ती लक्षात राहणे लांबच राहिले.

हय्यो या कय्युम>>>>> ऑ? Uhoh मी ऐकणार होते ती लिंक. पण हे शब्द वाचुन सोडुन दिलं Lol

दुर्दैवाचा भाग म्हणजे आजकालची फार कमी गाण्यांमधील शब्द नीट कळतात,>>>>>>>> असं कसं?

अगदी सोपे रोजच्या वापरातले शब्द असतात

चार बोतल वोडका
काम मेरा रोजका

दरवाजेको कुंडी मारो
कोइ ना बाहर जाने पाये

लग गये चारसो चालीस वोल्ट छुनेसे तेरे

सस्मित शब्द ऐकुन सोडु नकोस, पूर्ण कव्वाली ऐक.:स्मित: सुरेख चाली असलेली अल्ला वा देव अशा नावाने कुठलीही प्रार्थना ( भजन, कव्वाली ) मला भावते. बाकी जसपिंदरचा आवाज दणका आहे.

आपल्या आवडीचे काही मिळत नाही म्हट्ल्यावर जे मिळतय ते लोकांना आवडायला लागते!!>>>> खरंतर हेच कारण आहे. आजच्या तरूण पिढीला जर ते अपील होत असेल तर चित्रपट निर्माते त्याच प्रकारच्या संगीताला प्राधान्य देणार.

'darza is a state of mind!'
कुणाला काय दर्जेदार वाटावं हे कोण सांगणार?
>>>>>

आवड व्यक्तीसापेक्ष असते. किंबहुना त्या शब्दाचा अर्थच तसा आहे. तो कर्त्याशी संबंधित आहे. म्हणजे अमुक तमुकच्या आवडीचे वा नावडीचे.

पण दर्जा हा शब्द वस्तूशी संबंधित आहे. अमुकतमुक गोष्ट दर्जेदार असणे वा नसणे.

एखादी गोष्ट वा कला दर्जेदार आहे पण एखाद्याला आवडली नाही म्हणून तिचा दर्जा कमी जास्त होत नाही. किंवा कोणाला खूप आवडली म्हणून तिचा दर्जा अचानक वाढतही नाही.

असे मला वाटते.

वरचे सुमुक्ता यांचे एक मत विचारात घेण्याजोगे आहे,
<<<<<< आपल्याकडे एक प्रकारची कमोडिटी आहे पण त्याची मागणी नसेल तर ती कमोडिटी लोकांच्या डोक्यावर इतकी आदळायची की आपोआप मागणी बदलत जाते. एक प्रकारचे मार्केटींग गिमिक आहे हे!! आपल्या आवडीचे काही मिळत नाही म्हट्ल्यावर जे मिळतय ते लोकांना आवडायला लागते!!>>>>>>

हे असे होते. काही गाणी ईतकी आदळली जातात आपल्या कानांवर की सवयीने ऐकली जातात. हा फंडा डेलीसोपलाही लागू. जेमतेम दर्जा असलेली मालिकाही रोज बघावीशी वाटणे हे त्यामुळे होते. पण जेव्हा त्यापेक्षा दर्जेदार मिळते तेव्हा आपण कुठे टाईम वेस्ट करत होतो हे उमगते.

Pages