साहित्य:
पाव किलो वांगी
अर्धा इंच आल्याचा तुकडा
तीन लसूण पाकळ्या
एक टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ
चार पाच पाने कढीलिंब (पानांचे तुकडे करा)
एक टेबलस्पून लाल तिखट पावडर (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)
एक टीस्पून हळद
अर्धा टेबलस्पून काळ्या मोहरीची पूड
पाव टेबलस्पून भाजलेल्या मेथीची पूड
एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड
पाव कप मीठ (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)
अर्धा कप साखर
एक कप मोहोरीचे तेल/ गोडेतेल
पाऊण कप व्हिनेगर
कृती:
१. वांग्याचे बारीक तुकडे करून, ताटलीत वांग्याचे तुकडे त्यावर मीठ पुन्हा वांग्याचे तुकडे, मीठ असे थर लावून चार तास ठेवा. ताटलीत पाणी जमायला हवे.
२. वांग्याचे तुकडे पिळून, साध्या पाण्यात बुडवून, पुन्हा पिळून एका भांड्यात वेगळे ठेवा.
३. मिक्सरमध्ये थोडं व्हिनेगर घालून आले लसणाची पेस्ट करा. मोहरी, मेथी आणि जिऱ्याची पूड शक्यतो दगडीमध्ये करा म्हणजे फ्लेवर खूप छान येतो.
४. एका कढईत तेल गरम करा, थोडा धूर दिसला की वांग्याचे तुकडे थोडे थोडे टाकून तळून बाजूला ठेवा. (एक लॉट तळल्यावर तेलातले बुडबुडे नाहीसे झाले की दुसरा लॉट तळा.)
५. आता आलं लसूण पेस्ट घालून सॉते करा, त्यात सगळे मसाले घालून दोन मिनिटे ढवळा, उरलेले व्हिनेगर आणि चिंचेचा कोळ मिसळा.
६. कढीलिंब आणि साखर घालून नीट ढवळा. लगेच वांग्याचे तुकडे घालून दोन मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या.
७. वांगी शिजल्यावर गॅस बंद करा. लोणचं गार झाल्यावर काचेच्या हवाबंद बाटलीत ठेवा. हे लोणचे फ्रीजमध्ये १ महिना टिकते. (त्याच्यावर कधी शिल्लक राहिले नाही)
टीपः हे लोणचं ब्रेड आणि चीज बरोबर सँडविच करून मस्त लागतं, भात, पोळीबरोबर तोंडी लावणं म्हणूनही छान आहे.
माहितीचा स्रोत: इंटरनेट आणि माझे प्रयोग
वाचतानाच तों पा सू! करून
वाचतानाच तों पा सू!
करून खाणार!
मस्तच येत असेल चव ह्याची .
मस्तच येत असेल चव ह्याची . तसं ही वांग खूप आवडतं त्यामुळे नक्की पाहीन करून .
मस्त वाटत्येय पाकृ! एक भाप्र:
मस्त वाटत्येय पाकृ! एक भाप्र: कोणती वांगी घ्यायची? भरताची की छोटी?
धन्यवाद साती, ममो, जिज्ञासा
धन्यवाद साती, ममो, जिज्ञासा
मी जांभळी लांबट वांगी घेतली होती, पण ती मिळत नसल्यास शक्यतो भरताची कोवळी बघून घ्या म्हणजे त्यात बिया कमी असतील.
मस्त प्रकार आहे हा !
मस्त प्रकार आहे हा !
मस्तच!
मस्तच!
मस्तच.
मस्तच.
आहा.. वांग आवडतं खुप .. नक्की
आहा..
वांग आवडतं खुप .. नक्की करुन पाहणार..
मॅगे फटू टाक ना जरा.. त्याशिवाय किक नाही बसत..
टीना, फोटो नाही आत्ता.
टीना, फोटो नाही आत्ता. पुढच्यावेळी केलं की नक्की टाकते.
धन्यवाद दिनेशदा, स्वाती२, अंजू, टीना.
Maggy are you a govan?
Maggy are you a govan?
अभिषेक, नाही. इंटरनेटवर शोधून
अभिषेक, नाही. इंटरनेटवर शोधून केलेली पाकृ आहे.