मायबोलीकर एकत्र भेटतात का?

Submitted by पद्म on 23 November, 2016 - 04:29

मला माबोवरील सर्वांना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे. हे जर शक्य असेल तर जरूर कळवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं सीट बूक करायचंय..>>>
कशाला हो ? नावडत्या आयडींना प्रत्यक्षात भेटून 'बुक'लून काढायला ? Proud

मागच्या वर्षीच्या वविची अवस्था पाहता या वर्षी आम्ही पुढाकार घेतला नाहिये.
वेबमास्टरना/ अ‍ॅडमिनना विपु करा.

मी व्यक्तिगत कोणाला ओळखत नाही मायबोलीवर. जर मी आलो तर माझा अनुभव कसा असेल?

<< मी व्यक्तिगत कोणाला ओळखत नाही मायबोलीवर. जर मी आलो तर माझा अनुभव कसा असेल? >>
------- अद्वितीय म्हणजे मराठीत युनिक Happy

>मी व्यक्तिगत कोणाला ओळखत नाही मायबोलीवर. जर मी आलो तर माझा अनुभव कसा असेल?
चांगलाच असेल. मीही कुणाला ओळखत नव्हतो पहिल्या गेट टुगेदर ला. चुकवू नये असा अनुभव.

मीही कुणाला ओळखत नव्हतो पहिल्या गेट टुगेदर ला. चुकवू नये असा अनुभव.
<<
हो.
पण विकु, आता "पहिला गेटटुगेदर" होणार नाहिये. आजकाल जे होतात ते कसे होतात ते सुश्री दक्षिणा यांनी लिवलंय वर्ती.

मी हा प्रश्न विचारण्यामागे खूप मोठा उद्देश होता...
२०१५ & २०१६ साली माझ्या आयुष्यात खूप वाईट घटना घडत गेल्या, आणि त्यामुळे माझी मानसिक स्थिती खूप खालावली होती. त्या काळात मला नॉर्मल होण्यासाठी मायबोली खूप महत्त्वाची ठरली होती, म्हणजे माबोवर अनेक पॉझिटिव्ह कथा, लेख, ई. मुळे मला खरंच खूप आधार मिळाला होता. अनेक लोकांचे जसे वेगवेगळे हिरो असतात, तसेच अनेक लेखक माझ्यासाठी हिरो बनले होते. आणि माझ्यासाठी सर्वांत आनंदाची गोष्ट होती की मी त्यांच्याशी संवाद करू शकत होतो. आणि तेंव्हाच माझ्या मनात सर्वांना भेटण्याची इच्छा झाली.
मागच्या वर्षी काही खूप महत्त्वाच्या कारणांमुळे मी वविला जाऊ शकलो नव्हतो, आणि नंतर कळलं की भरपूर माबोकर आलेच नव्हते. या वर्षी तर वविच रद्द झाला.
माबोवरील लेखकांना भेटण्यासाठी ववि एकमेव मार्ग नाहीये हे थोडंथोडं कळतंय, पण बाकी मार्गांना मी कोणत्या प्रकारे अ‍ॅक्सेस करु शकतो?
कृपया खरंच कळवा.......

परेश बोरसे.

नाय बुवा!
हे खरंच विचित्र आहे, लोक कुठलीही लिंक कुठेही जोडतात.
शेरलॉक चा आदर्श घेतात वाटतं?

>> या वर्षी तर वविच रद्द झाला.

झाला का रद्द? तरीच म्हटलं गेल्या तेरा वर्षात यावर्षीच यायची इच्छा मला का झाली असावी Biggrin

लॉकडाउन संपला कि गेट टुगेदर .? मास्क आणि ग्लोव्स घालून भेटा रे .
बाई दवे मी कोरोना काळात अशा गेट टुगेदर चे समर्थन बिलकुल करत नाही .

Pages