मायबोलीवरील माझा धागा वाचून मला भेटलेल्या "त्या अनामिक" व्यक्तीस...

Submitted by Parichit on 12 June, 2018 - 00:38

नमस्कार. हा माझा दुसरा आयडी आहे. आधीच्या आयडी वरून मी पूर्वी एक धागा पोष्ट केला होता. त्यात मी मला भेडसावणाऱ्या एका वैयक्तिक समस्येबाबत लिहिले होते. कोणाकडे त्यावर काही उपाय आहे का विचारले होते. तो धागा पोष्ट केल्यानंतर काही महिन्यांनी एका व्यक्तीचा मला इमेल आला (मायबोलीवरील संपर्क सुविधेच्या माध्यमातून). आपण सुद्धा त्या समस्येतून जात आहोत असे त्या व्यक्तीने त्यात लिहिले होते. आणि शेवटी मी काय उपाय केले व त्या समस्येतून बाहेर पडलो का अशी विचारणा सुद्धा केली होती. मी त्या व्यक्तीला उत्तर देऊन मला अजूनही ती समस्या ग्रासते आहे असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीशी आधी इमेल वर, नंतर चाट वर व नंतर फोन वर आमचे बरेच संभाषण झाले. व एक कम्फर्ट लेवल डेवलप झाल्यावर फोनवर वगैरे वेळ घालवण्यापेक्षा आम्ही भेटूनच यावर बोलायचे ठरवले. त्यानुसार मागच्या वर्षी (बहुधा ऑगस्ट महिन्यात असेल) एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही भेटलो. आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. आपण मायबोलीवर फारसे नाही आहोत पण अधूनमधून इथले धागे वाचत असतो असे त्या व्यक्तीने मला सांगितले. याव्यतिरिक्त सुद्धा खूप गप्पा झाल्या. त्या समस्येविषयी सुद्धा बोललो. पण तरीही आम्ही आमचे नाव अथवा इतर व्यक्तिगत तपशील एकमेकांना सांगितला नाही.

पण त्या भेटीनंतर मात्र आमच्यात फारसे संभाषण झाले नाही (इमेल, चाट अथवा फोनवर सुद्धा नाही). मी सुद्धा कामात व्यस्त राहिलो. त्या व्यक्तीने सुद्धा फारसे मेसेज अथवा इमेल केले नाहीत. मीच क्वचित एखादा मेसेज टाकला कि दुसऱ्या दिवशी वगैरे उत्तर येत असे. बहुधा ती व्यक्ती सुद्धा कामात व्यस्त असावी असा माझा समज झाला होता. तरीही मला हे थोडे खटकले. कारण हीच व्यक्ती पूर्वी मात्र माझ्या मेसेजला पट्कन उत्तर देत असे. म्हणून मी एकदोनदा त्या व्यक्तीला याबाबत मेसेज पाठवून विचारले. तर कधी आपण शहराबाहेर आहोत तर कधी कामात व्यस्त आहोत अशी उत्तरे मला मिळाली. आपण चाट वर बोलू. वेळ मिळेल तसे मी रिप्लाय करेन. असे त्या व्यक्तीने मला सांगितले.

पण मला नक्की कळत नव्हते. हा मला टाळायचा प्रयत्न आहे कि काय असे वाटू लागले. मी तसे विचारताच आपण चाट वरच बोलत राहू असे त्या व्यक्तीने मला सांगितले. पण एकदा भेटल्यानंतर पुन्हा चाट वर ऑफिसमधला वेळ घालवण्यापेक्षा पुन्हा कधीतरी भेटूनच गप्पा मारणे हेच सोयीचे असा माझा विचार होता. त्यानुसार मी त्या व्यक्तीला स्पष्ट सांगितले कि आता चाट किंवा मेल वर बोलायला मला रस नाही आपण भेटूनच बोलू. असे सांगताच मला भेटण्यात फार रस नाही आणि वेळही नाही असे उत्तर आले.

नंतर काही दिवसांनी एकदा मी सहज मेसेज केला. त्या व्यक्तीला मला काही सांगायचे होते. पण तो मेसेज गेलाच नाही. शंका आली म्हणून मेल केला. तो बाऊन्स झाला. मग लक्षात आले त्या व्यक्तीने ते इमेल अकाऊन्टच डिलीट करून टाकले होते. मला हे कळले नाही कि अकाऊन्ट का डिलीट केले? संपर्क का तोडला असेल?

आता हे सगळे इथे लिहायचे कारण कि जर ती व्यक्ती हे वाचत असेल तर त्या व्यक्तीने मला संपर्क करावा. काहीतरी शेअर करायचे आहे. काही बोलायचे आहे. काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करायचे आहेत. इतकेच. अन्य वाचकांना क्षमस्व. पण तुम्ही प्रतिसाद लिहिलेत तरी माझी काही हरकत नाही. आपल्याला पण अशा प्रकारचे कुठे काही अनुभव आले असतील व ते शेअर केले तरी चालेल. अन्य काहीही सल्ले दिलेत गंभीर अथवा गम्मत करणारे, तरीही चालेल. मला वाईट वाटणार नाही. संबंधित असेल तर मी प्रतिसाद देईन. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिन्नलिंगी असण्याची जास्त शक्यता वाटते आहे.
गैरसमज लवकर दूर होवोत.आणि दोघांच्याही कम्फर्ट लेव्हल नुसार परत संपर्क होऊदेत.

ईतर काही कारणामुळे अकांउट बंद केले असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट करतील.
तुमच्यामुळे बंद केल असेल तर प्रश्नच नाही , बेटर मुव्ह ऑन..

अश्यापण समस्या असतात का ?
ज्या व्यक्तीला तुमच्याशी साधा संपर्कच ठेवायचा नाहीय तर तुम्ही का उर फुटेस्तोवर त्याच्या मागे पळताय ...?

काही वेळा भावनेच्या भरात बोलले भेटले जाते पण नंतर याचा पश्चात्ताप होतो.आपल्या भावनेचा गैरफायदा घेतला जाईल किंवा या प्रश्वावर काही उपाय नाही बोलून काय उपयोग असेही वाटू शकते असे काही झालंय का ते बघा

< मी तसे विचारताच आपण चाट वरच बोलत राहू असे त्या व्यक्तीने मला सांगितले. >
-------- विचारान्ची देवाण घेवाण/ मैत्री व्हायला हवी असे दोन्ही बाजूला वाटायला हवे. समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करणे महत्वाचे आहे.

असू शकतात अनेक शक्यता. मी नाकारत नाही. माझा स्वभाव थोडा फटकळ आहे. बोलताना फार विचार करत नाही. नकळत काहीही बडबडून जातो एखादा शब्द, माझ्या ध्यानीमनी पण नसते. जे अनेक वर्षे ओळखतात त्यांना माहित आहे. एका भेटीत आपण एकमेकाला पूर्ण कळत नसतो. अंदाज बांधू नयेत. इतकेच कळवायचे आहे मला त्यांना.

अहो, इतके काय मागे लागताय कुणाच्या. त्यांनी इमेल रद्द केला म्हणजे तुम्हाला भेटायची इच्छा नसेल त्यांची.
हे तुमच्यासारखे लोक असतात, म्हणून मी आंतरजालावरील कुणालाही कधी भेटलो नाही आणि भेटण्याची शक्यतापण नाही.

तुम्ही एक पुरुष असाल आणि त्या एक स्त्री असतील तर थांबा ईथेच !
जड जाते, कल्पना आहे, स्वानुभव आहेत. पण यावर रामबाण उपाय म्हणजे दुसरीत मन गुंतवा. पण समोरून ईच्छा नाही तिथे त्रास देऊ नका वा करून घेऊ नका. शुभेच्छा !

तुमच्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात आणि काही गैरसमज असतील तर ते दूर व्हावेत ह्यासाठी शुभेच्छा ..
तोपर्यंत तुम्ही घराला रंग द्यायला काढा म्हणजे वेळ पटकन निघून जाईल आणि मनाची घालमेल कमी होईल ...
आणि स्वहस्तेच रंग द्यायचा ठरवलात तर क्या बात !!!
म्हणजे नंतर तुम्ही त्या अनामिक व्यक्तीपेक्षा रंगारीचीच वाट जास्त पाह्ताल !!!

दुसरीत मन गुंतवा >> दुसरीत कशाला उगाच अजून? दुसऱ्या कशाततरी गुंतवा मन. काहीतरी छंद शोधा.

घराला रंग द्यायला काढलात तरी चालेल Wink

दुसरीत मन गुंतवा >> दुसरीत कशाला उगाच अजून? दुसऱ्या कशाततरी गुंतवा मन. काहीतरी छंद शोधा.

घराला रंग द्यायला काढलात तरी चालेल >>> हे भारी आहे.

तुमच्या प्रश्नाचे गांभिर्य आहेच मला. पण ही कल्पना मला फारच आवडली बुवा. फारच टेंशन आले तर घर नाही पण घराची एखादी भिंत, खास करुन बेडरुमची नक्कीच रंगवायला काढणार आता. तो पसारा, धुळ, वैताग यापुढे इतर टेंशनची काय बिशाद आहे ऊभे रहायची. मस्त.
धन्यवाद हो सच६४८६!

तोपर्यंत तुम्ही घराला रंग द्यायला काढा >>>>>>> Lol

मी इथे प्रतिसाद द्यायचे टाळत होते पण हे वाचुन फुटलेच Lol

त्या अनामिक व्यक्तीशी संपर्क करणे सोडून द्या आणि दुसऱ्या अनामिक व्यक्तीतसुद्धा गुंतू नका. वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचा स्वभाव फटकळ आहे आणि तुम्ही बोलताना विचार करत नाही. तर त्यामध्ये सुधारणा करा.

तोपर्यंत तुम्ही घराला रंग द्यायला काढा म्हणजे वेळ पटकन निघून जाईल आणि मनाची घालमेल कमी होईल .
म्हणजे नंतर तुम्ही त्या अनामिक व्यक्तीपेक्षा रंगारीचीच वाट जास्त पाह्ताल !!!.>>>
कोणाला तरी पैसे उसने दिलेत तरी चालतील, म्हणजे ह्या व्यक्तिच्या जागी तुम्हाला त्या व्यक्तिशी भेटायची ओढ लागेल Wink