मायबोलीकर एकत्र भेटतात का?

Submitted by पद्म on 23 November, 2016 - 04:29

मला माबोवरील सर्वांना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे. हे जर शक्य असेल तर जरूर कळवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईतके सिरीयस नका होऊ हो! कधी कधी काहीतरी कारण शोधून उगाच रूसायची इच्छा होते. आणि कोणीतरी सांत्वन केल्यावर बरं वाटतं.....
माफ करा पण मला असं कधीतरी लहान मुलांसारखं वागायची इच्छा होते.
परिवारात असं एखादं शेंडेफळ असणं चांगलं असतं...

@कावेरी. लेख नक्कीच लिहीन.....पण थोडा वेळ लागेल
@Dakshina. You are one of the most understanding and mature lady I've ever seen.

jamal ki rao marathit,aamhala kadhi jamel dev jaane????????jamalach tr comedy story liha....

>>tumhla jya language madhe comfertable vatat tyach lang.madhe liha....shevti bhavana pochalya pahijet

नाही चालणार इतर कोणत्याही भाषेत लिहिलेले, संदर्भ देण्यापुरते असेल तर ठीक आहे, आणि ते सुद्धा मर्यादित. नाही तर माबोचे फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप व्हायला वेळ लागणार नाही.
आणि देवनागरीत कसे लिहावे, याची मदत उपलब्ध आहेच की.

>>>>>नाही चालणार इतर कोणत्याही भाषेत लिहिलेले, संदर्भ देण्यापुरते असेल तर ठीक आहे, आणि ते सुद्धा मर्यादित. नाही तर माबोचे फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप व्हायला वेळ लागणार नाही.
आणि देवनागरीत कसे लिहावे, याची मदत उपलब्ध आहेच की.

Sir,tumcha point samajala aani marathivaril premhi..............pan aamha navin lekaranna khya thod sambhalun manapasun vinanti,4ch divas jhalet ho maybolivr yeun pn aata tumchi bhiti vatayala lagaliy.....

साती नशिब तु पुण्यात नाहिस Proud
नाहितर करेला उपर से नीम चढा ही म्हण तुला लैच्च लागू पडली असती.
गब्बस की जरा Lol

बेफिकीर सरांनी माझ्या प्रश्नावर प्रतिसाद दिला .............
माझे जीवन धन्य झाले .........
सर, मी तुमचा पवनचक्कीपेक्षा मोठा पंखा आहे.....

तुमच्या(मायबोलीवरील सर्वांच्या) आशीर्वादाने मराठी लिहायला शिकलो........आता मराठीतंच लिहीन .......

@पद्म जी , तुमच्या धाग्याची जागा बदला की ...
तुम्ही "गप्पागोष्टी " मध्ये शामिल होऊन ह्याची चर्चा करू शकाल .

करेला उपर से नीम चढा >>> Lol

बर्‍याच बाळ आयडी ह्या धाग्याच्या निमित्ताने गोळा झाल्यायत . Proud

>>>>बेफिकीर सरांनी माझ्या प्रश्नावर प्रतिसाद दिला .............
माझे जीवन धन्य झाले ..<<<<

इतक्या उघडपणे आपण कोण आहोत हे सांगू नये पद्म!

girisir ethe sglechjan marathitch boltat fkt nvin lok ajun aaplya marathichya devnagri script shi (mobile vril) jullele nhit tyamule thoda trs hotoy... thode samjun ghya.... fkt script badltey pn boltoy tr marathitch na....

रोमन स्क्रीप्ट (लिपीमध्ये) लिहीलेला यच्चयावत मजकुर मी "इग्नोर मारतो" म्हणजे दुर्लक्षित करतो.

विशेषतः , महेश यांच्या "महेश | 24 November, 2016 - 14:06" या पोस्ट नंतर तर, देवनागरीमधे राहुदेच, रोमनमधुन मराठी देखिल नाही, तर धागाकर्ता चक्क इंग्रजी भाषेत रोमन लिपीत पोस्टत असेल, तर हा धागा "इग्नोर करण्यास -झटकुन टाकण्यास" सुयोग्य आहे. असे माझे मत.

रोमन स्क्रीप्ट (लिपीमध्ये) लिहीलेला यच्चयावत मजकुर मी "इग्नोर मारतो" म्हणजे दुर्लक्षित करतो.>>>>>>>. सर, तुम्ही तुमचा id रोमन लिपीतच बनवला आहे. limbutimbu..........
माफ करा, पण तुम्ही रोमन वापरतात, आणि आमच्यावर बंदी....

>>>> सर, तुम्ही तुमचा id रोमन लिपीतच बनवला आहे. limbutimbu..........
माफ करा, पण तुम्ही रोमन वापरतात, आणि आमच्यावर बंदी.... <<<<
अचूक आक्षेप....
फक्त देवनागरीतुन आयडी घेतला, तर तत्सम कानामात्रावेलांटीमधे किरकोळ फरक करुन अनेक ड्यु आयडी तयार होऊन गोंधळ घालतात असा अनुभव असल्याने केवळ तांत्रिक कारणामुळे ही आयडी "देवनागरीमधे" करता आली नाही.
मात्र , "रोमन स्क्रिप्ट्मधिल" आयडीमुळे तुम्ही जर माझ्या लिखाणास इग्नोर मारण्याचे ठरवणार असाल, /ठरविलेत, तर त्याचेही मी स्वागतच करेन. Wink

जाऊ द्या यार .....मी सगळ्यांना भेटण्यासाठी धागा काढला, इथे तर वेगळेच महाभारत चालू झाले ....
मी नाही खेळत जा......

हो आठवलं, माझी आईपण लहानपणी कधीकधी झाडूने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायची.....
हेसुद्धा त्याच प्रकारचे प्रेम.......हो ना ?

झाडूने प्रेमाचा वर्षाव ??
तुम्हाला झाडून असे लिहायचे होते का ?
झाडू या आयडीला कळले तर काय होईल, तोबा तोबा ! Wink

नाही झाडुनेच......
>>>>>>>झाडू या आयडीला कळले तर काय होईल, तोबा तोबा ! <<<<<<<< ते पण त्यांचे प्रेम दाखवतील

@ श्री, बर्‍याच बाळ आयडी ह्या धाग्याच्या निमित्ताने गोळा झाल्यायत .>>> बाळ आयडी शब्द आवडला. वाचायला किती गोड वाटतोय हो! Happy

जे सभासद लिहित नाहित ... फक्त वाचन करतात .... शिवाय लिखानावर प्रतिकियापन देत नाहित ... त्या सभासदान्ना पन परवानगी आहे का गटग किंवा ववी किंवा हिवा मध्ये सामील होण्याची ??

जे सभासद लिहित नाहित ... फक्त वाचन करतात .... शिवाय लिखानावर प्रतिकियापन देत नाहित ... त्या सभासदान्ना पन परवानगी आहे का गटग किंवा ववी किंवा हिवा मध्ये सामील होण्याची ??>>>

अगदी त्यांचे कुटुंबिय, बायका, पोरे, मित्र, मैत्रीणी, सर्वांना परवानगी मिळते...

फक्त त्यावर हरभर्‍याच्या झाडावर बसलेल्या मॅडम आहेत ना त्यांना फक्त सांगावे लागते आगाऊ! Happy

फक्त त्यावर हरभर्‍याच्या झाडावर बसलेल्या मॅडम आहेत ना त्यांना फक्त सांगावे लागते आगाऊ! स्मित
>>>
अच्छा ... पन आगाऊपणा करायचा नाही फक्त...

फक्त त्यावर हरभर्‍याच्या झाडावर बसलेल्या मॅडम आहेत ना त्यांना फक्त सांगावे लागते आगाऊ! स्मित
>>> कोणेत ह्या मॅडम??? आम्ही पण संपर्क करु त्यांना. आम्हाला पण भेटायच आहे माबोकरांना

गटग बद्दल कोणीतरी निर्णय घ्या. त्याला पद्मश्रीच काय, भारतरत्न देईल.
(जास्त तर होत नाहीये ना?)
ऋन्मेष सर, तुम्ही घ्या ना पुढाकार....

Proud
मलाही ते सर म्हणजे आधी बाजूला सर (सरक) असे वाटले.. एवढ्या ईज्जतीची सवय नाहीये ना.. पण मग त्यापुढचे वाक्य पुढाकार घ्या हे सर बाजूलाच्या विरुद्धार्थी असल्याने समजले..

ऋन्मेष सर, तुम्ही घ्या ना पुढाकार....>>>>>>> ऋन्मेष सर माबोकरांना भेटायला पुढाकार घेणार नाहीत

Pages