मायबोलीकर एकत्र भेटतात का?

Submitted by पद्म on 23 November, 2016 - 04:29

मला माबोवरील सर्वांना भेटण्याची तीव्र ईच्छा आहे. हे जर शक्य असेल तर जरूर कळवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही इथे पुनः पुनः येत रहाल तर होतील ओळखी लोकांशी आणि तुम्ही गटग ला जाऊ शकाल त्यांच्याबरोबर तिथे भेटतील तुम्हाला इथले लेखक मंडळ

गटग म्हणजे गेट टुगेदर च मराठी संक्षिप्त रुप

ववि म्हणजे काय ते पण सांगा हो हाताबरोबर.
कशाला एका अश्राप जीवाला संभ्रमात पाडता.>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हो हो बरोबर
चल दक्षे तुझी ड्युटी सुरु कर.

ते 'ववि' सारखा 'हिवि' करावा लागेल नीट समजवायला!>>>>:हाहा: पन त्यास्नी हिव भरलं तर काय करतील वो ते?

तुम्ही लोक माबो वर ragging घेता का?>>>>> नाय अज्याबात नाय. ववि म्हणजे वर्षाविहार, जो दर वर्षी जुलै महिन्या अखेर कुठेतरी पिकनीक स्पॉट ठरवुन केला जातो. त्यात सगळे लहान-थोर माबोकर एकमेकांशी हितगुज करतात. नव्या लोकांची ओळख होते. बाकी दक्षु सांगेलच.

http://www.maayboli.com/node/35373 इथे बघा, वाचा.

मयबोलीकर भेटत असावेत मयखान्यात Wink
एकाच वाक्याचा धागा ?? तो सुद्धा गुलमोहर - कथा कादंबरी विभागात ??
आणि ते वाक्य सुद्धा पुरते अंग्रेजी ?? धन्यवाद !

लेखकु अतिशय चाणाक्ष आहे. शिर्षक नीट वाचल्यास त्यांनी मायबोली तल्या मा चा एक काना वगळला असल्याने त्या शब्दाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला असून त्या निमित्ताने मायबोलीतील अंतर्गत गटाविषयी विचारणा आपोआप होतेय हे आपल्या ध्यानात येतेय का? Proud

@ दक्षिणा. शिर्षकात बदल केला आहे..
तुम्ही लोक माबो वर ragging घेता का?>>>>> नाय अज्याबात नाय>>>>>>>>>>>>>>>> तुम्ही लोक इतके धडकी भरवनारे प्रतिसाद दिले, जे माझ्यासारख्या नविन माणसासाठी समजायला कठीण आहेत म्हणून विचारलं.........
सगळे "siniors" कबाब में हड्डी आल्यासारखं बोलताहेत.....

पद्म,

सगळे "siniors" कबाब में हड्डी आल्यासारखं बोलताहेत..... >>> असं अजिबात काही नाही. उगाच म्हणतायत सगळे.
मायबोलीवर स्वागत तुमचं. हो; मायबोलीकर्स एकत्र भेटतात; धमाल करतात. सर्वसाधारणपणे, पावसाळ्यात (ज्यावेळेला सर्वदूर व्यवस्थित पाऊस असेल) वर्षाविहाराचा कार्यक्रम असतो. वर दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही फोटोज आणि बाकी सगळी माहीती वाचू शकाल.
तुमची इथल्या आयडीज बद्दलची आताची मतं, ते ते आयडीज प्रत्यक्ष भेटल्यावर नक्कीच बदलतील- पॉझिटिव्हली. हा अनुभव मी घेतलेला आहे. सो, उगीच बाऊ करू नका. एंजॉय माबो! Happy

असा प्रश्न पडलाच कसा?
जर शरद पवार आणि मोदी भेटू शकतात तर मायबोलीकर का नाही Happy

अवांतर - हल्ली तर म्हणे शाहरूख आणि सलमानही पुन्हा भेटू लागलेत

जर शरद पवार आणि मोदी भेटू शकतात तर मायबोलीकरका नाहीअवांतर - हल्ली तर म्हणे शाहरूख आणि सलमानही पुन्हा भेटू लागलेत>>:G Biggrin Biggrin

mhnje mabo chi jatra july mdhye bhrte tr.... fkt sanga mhnje yayla bre.... nvin mabo krana VIVI baddal mahit nhi o senior members

पद्म,

मायबोलीवर स्वागत! Happy
कृपया इथल्या पोस्ट्स मनावर घेऊ नका. इथे कुणीही कुणाचे रॅगिंग करत नाही.
मायबोली कर नक्की भेटतात एकमेकांना. वेगवेगळे ग्रुप आहेत. वर्षाविहार म्हणजे दर पावसाळ्यात मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागात एक सहल आयोजित केली जाते. त्याला पुणे आणि मुंबईचे बरेचसे मेम्बर उपस्थित असतात. आता तुम्ही म्हणाल मुम्बई पुण्याच्या मध्येच का? तर त्याला एकाच उत्तर. 'अती उत्साह' Proud
जोक्स अपार्ट. इतर ठिकाणाजवळ फारसा प्रतिसाद मिळाला नाही. (एकदा सहल नाशिकजवळ आयोजित केली होती) वर्षाविहार सोडून ज्या त्या ग्रुपचे त्यांच्या सोयीनुसार भेटणे सुरू असते.

तुम्ही कुठे असता? पुणे मुंबई की अजून कुठे?

हो आणि तिचे अ‍ॅप्रुव्हल (NOC) लागते ववि मध्ये सहभागासाठी! >> किस्ना कशाला घाबारावातोयास बिचार्या नव्या आयडीला?

मी तर पुण्यातच आहे सद्ध्या.....पण जुलैत मुंबईला असेन.......
Thanx to Yoku & Dakshina.....But pls convey as soon as plan is fixed

आणि एक प्रश्न होता, माबोकर एकमेकांना id म्हणून ओळखतात की व्यक्ती म्हणून?

पद्म तुम्ही धाग्याचे नाव मराठीत आणि खालचा मजकूर इंग्रजीत का लिहिता आहात?? तुमचे दोन तीन धागे पाहिले सगळीकडे इंग्रजीतच लिहिलय तुम्ही?? मराठी लिहायला काही अडचण असल्यात माबोवर मदत समिती आहे.
कृपया मराठीत लिहा

@ शुभांगी. येथे मराठीत लिहीण्यची सक्ती आहे का? (asking genuinely not sarcastically) असेल, तर मी प्रयत्न करेल....कारण मला मराठी लिहायला कठीण जातंय

पद्म तुम्ही धाग्याचे नाव मराठीत आणि खालचा मजकूर इंग्रजीत का लिहिता आहात?? >>शुभांगी यालाच म्हणतात रॅगिंग ( हलके घेणे ) . इतका कडक अप्रोच घेऊन नको बाई. त्यांना थोडं रुळू दे. Wink
या धाग्याच्या निमित्ताने बऱ्याच नवीन आयडींनी मायबोलीकरांना भेटण्याची ईछा व्यक्त केल्येय Happy

आपण सगळे मिळुन एक मेळावा घेउया.. मायबोलीवर असलेल्या लेखकान्चा आणि वाचकान्चा...!! तयार आहात का सगळे....??? त्यासाठी मायबोली वर असलेल्या जुन्या सदस्यानी पुढाकार घ्यावा..!! आम्ही तुमच्या पाठीशी राहु...!!! Wink

सुजा, रॅगिंग आणि मी घेणार??? नाही ग बाई. अजुन आम्हीच पुरते रुळलो नाही मायबोलीवर. रॅगिंग काय डोंबल घेणार कुणाच.
मलाही सगळ्या मायबोलीकरांना भेटायला आवडेल. वाचक-लेखक असा काहीही शिक्का नसला तरीही.

@ शुभांगी. येथे मराठीत लिहीण्यची सक्ती आहे का? (asking genuinely not sarcastically) असेल
>>> नाही हो तुम्हाला आवडेल त्या भाषेत लिहा की. मी सहजच विचारल होत रादर सुचवल होत. तुम्हाला राग आला असेल तर क्षमस्व.

मी २ वर्षापासुन माबो ची वाचक फक्त होते, नुसतं वाचून जेवढा आनंद मिळतो तेवढाच आपण सुद्धा माबोचे सदस्य आहे याचा मिळाला.
या वर्षीचा ववि चा वृत्तांत आणि दक्षिणानी या साठी केलेली धडपड आणि मेहनत भारीच.
दिनेश दादांच्या नव्या नव्या रेसिपीज, बेफिक्रीनच्या , मिरिंडांच्या जबरदस्त कथा , आशुचॅम्प यांचे सायकल वरून फिरवून आणणारे लेख, टन्या यांची अर्धवट वारी ( सॉरी) , यो रॉक्स, जिप्सी यांची अप्रतिम फोटोग्राफी, जागु यांची बहरलेली बाग, आत्माबंध, सायु यांच्या सुंदर रांगोळ्या, ऋन्मेष यांचे विणलेले कधी गुंतणारे तर कधी सुटणारे धागे, अमा, विद्या भुतकर, मामी, मुंगेरीलाल, साती, अशोक मामा, गोष्टीगावचे आणि बरेच जे फक्त या मायबोलीवर भेटले आणि ओळखीचे वाटू लागले.
नक्कीच या सार्यांना प्रत्यक्षात भेटायला आवडेल. ( या वर्षी इच्छा असून वविला यायला नाही जमले पण पुढच्या वर्षी नक्की येईन. )

आता एखादा गटग, व्हीडीओ कॉन्फरन्सींग ने व्हायला हवा !>>>>>>>>> सगळेच तैयार आहेत तर प्रोब्लेम काय आहे? चला होऊनच जाऊ द्या... मी नविन आहे, नाहीतर पुढाकार घेतला असता....

इतका प्रतिसाद बघुन आता 'मायबोली टीम' ने मायबोलीकराचा एक मेळावा घ्यावाच...!! एक चान्गला दिवस बघुन त्या वेळी 'पेपरात' जाहिरात द्यावी... आणि मायबोलीवर ही जाहिरात करावी...!!!

>>शुभांगी. येथे मराठीत लिहीण्यची सक्ती आहे का?
जोरदार आग्रह आहे बराचसा सक्तीच्या जवळ जाणारा,
कारण इंग्रजीत लिहायचे तर अन्य संकेतस्थळे आहेत,
मायबोलीवर मायबोलीतच लिहावे ही अपेक्षा, क.लो.अ.

I thought Maayboli is like a family, and others will understand the shortcomings in the members of it.........But you are showing exit, by claiming to go to other sites. I didn't come here only as a reader but to be a part of this family.
But according to your statement, it seems that this is just a readers' point not like a family.
If is it so, I can move on.......

Thanx!

पद्म
महेश ला तसं म्हणायचं नाहीये कृपया गैरसमज करून घेऊ नका.
बाकी सर्व वेब साईट वर लोक इंग्रजीच लिहितात त्यामुळे इथे शक्यतो मराठीच टाईप करावे असा आग्रह आहे आणि तशी सोय पण आहे.

राहिला प्रश्न मायबोली family असण्याचा. मी गेली दहा की बारा पेक्षा जास्त वर्षं माबोवर आहे. आणि मी मला कुटुंबा सारखीच आहे. पण असे बंध तयार व्हायला थोडा अवधी लागतोच ना?

@Padma sir..,sir tumhla jya language madhe comfortable vatat tyach lang.madhe liha....shevti bhavana pochalya pahijet.sir tumhi lagech ragau naka ho...tumcha lekh aala tr khup hhan vatel....keep writing whether in english or marathi choice is totally yours......best of luck!!!!!!!!!!!!

,sir tumhla jya language madhe comfertable vatat tyach lang.madhe liha....shevti bhavana pochalya pahijet.s >>> माफ करा, पण हे असे इंग्रजीत मराठीत लिहीले तर वाचायला खुप त्रास होतो आणी भावना नीट पोचत नाहीत हो. आणी मायबोली म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप नव्हे.
आणी शेवटी मायबोली म्हणजे आपली मदरटंगच ना? मग आपल्याच मदरटंगमधे फिलिंग्ज एक्स्प्रेस करण्यात शेम कसली? Uhoh

me tumchyashi sahamat aahe...,pan aamhi lok navin aahot marathi typing madhe thoda problem yetoy,aani padma siranni varati mention kelach aahe ki te marathimadhe lihinyacha prayatna karin mhanun........aani aplyach matrubhashet bolayachi kinva lihinyinyachi laaj kasali?????????????????prayatna nakki karu.....thankx for sussesion...............

Pages