मदत हवी आहे- कोंकण पर्यटना बद्दल(सिंधुदुर्ग)

Submitted by काउन्ट ऑफ मोन्ट... on 20 November, 2016 - 00:28

नमस्कार मित्रांनो,
मी शिवम काटे, थोडेच दिवस झाले मला मायबोली वर येऊन. असाच नेट वर surfing करत असताना मायबोली वर आगमन झाले आणि लव्ह at फर्स्ट साईट काय असते हे मला त्या दिवशी कळले.
जर विषयांतर झालं, माफ करा. मी FE civil ला असून पुढच्या महिन्यात ट्रिप ला जाण्याचा प्लॅन आहे. पर्यटन बद्दल दोन तीन लेख वाचले होते, त्यामुळेच मी तुम्हाला मोकळ्या मनाने मदत मागत आहे. आम्ही आंबेगाव, पुणे येथून निघू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहायचे ठरवले आहे. अजून ठिकाणे नक्की नसले तरी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग ह्या पट्ट्यात फिरण्याचा प्लॅन आहे. मला ह्या भागाची जास्त माहिती नसली तर प्राथमिक तयारी झाली आहे पण आपल्या सारख्या जाणकारांचे मार्गदर्शन व्हावे हि विनंती. जर कुणाला ह्या भागाबद्दल माहिती असल्यास कोणती ठिकाणे कोणत्या वेळेत पहावी ह्या बद्दल सन्गितल्यास बरे होईल. आम्ही मंचर वरून निघणार असल्यास वरील ठिकाणे कोणत्या क्रमाने पहावीत ह्याबद्दल जास्त मार्गदर्शन व्हावे. तसेच या आधी कोणी जाऊन आलेले असल्यास सिंधूदुर्ग- विजयदुर्ग पट्ट्यातील प्रेक्षणीय ठिकाने सुचवावीत. ट्रिप दोन दिवसांची असल्यामुळे मुक्कामाची ठिकाणे, जेवणाची ठिकाणे ह्याबद्दलही मार्गदर्शन व्हावे.
तरी वरील विषयावर मला आपला लहान भाऊ समजून कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे. सर्व सूचनांचे स्वागत आहे.
ता. क. बरोबर २०-२५ जणांचा ग्रुप आहे

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रश्मी,
तुम्ही दिलेले दुवे खूपच छान आहेत आणि त्यावरील माहितीही. आत्ता जरा मनावरचं ओझ उतरल्यासारखं वाटायला खरच मनापासून धन्यवाद.

आशु
दिवाळीच्या पिरियेड मद्ये २ ३ लेख वाचले होते. परंतु नंतर काही सापडलेच नाही. आणि त्यात मायबोलीवर नवीन असल्यामुळे सापड्ताना जरा गोची होतेच

नाही मला म्हणायचं होत की इथे माहिती कशा शब्दात मागितली जाती ते वाचलं का? नुसतं मला माहिती हवी आहे असं म्हणलं तरी चालतं,
जाणकारांचे मार्गदर्शन, लहान भाऊ वगैरे नाही लिहिलं तरी देतात माहिती हो

मालवणीमाणूस वरील लिंक दिल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार. (मला ही उपयोगी पडेल, मी पण असचं काहीतरी शोधत होते.)