मुलाचे नाव

Submitted by Shivmahesh on 18 November, 2016 - 04:52

माझ्या मुलाचे नाव ठेवायचे आहे
कृपया दोन अक्षरी नवीन नाव सुचवा
कोणत्याही अक्षराावरून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉन

रूद्र, भद्र, प्राण, जय, गंध, स्वयं, नाद, शेष, शस्त्र, क्षेम, सुक्ष्म, योग, तेज, व्रत,दीर्घ, सूर्य, वंश, वंशी, स्मित

भद्र, गंध, स्वयं, नाद, शेष, शस्त्र, क्षेम, सुक्ष्म, योग, तेज, व्रत,दीर्घ, वंशी, स्मित
>>
सिरिअसली? Uhoh

सव्यसाची, सर्वजीत, यशवर्धन, अत्रेय, आत्मज, स्वधा, धात्री, महालसा,अपराजिता, कात्यायनी.
>>>
हे राम Uhoh

आधी मला वाटलं अमितवनी मानव हे नाव सुचवले. Happy
माझ्या एका मैत्रीणीच्या मुलांची नावे श्लोक आणि शौर्य अशी आहेत. शर्व , शर्विल हे नाव एकदा प्रवासात ओळख झालेल्या बाळांचे होते.

अरे..हा धागा अधी कसा पाहिला नाही...

>>माझ्या एका मैत्रीणीच्या ताईने आपल्या मुलाचे नाव ढग ठेवले आहे Happy

त्या ढग च्या मोठ्या ताईचे नाव, म्हणजे पहिल्या मुलीचे नाव मुंबा की मुम्बा आहे Happy >>

ढग ?????????? खरं की काय..आता तो मुलगा केवढा आहे..आणि नावाबद्दल त्याचं काय मत आहे ..जस्ट एक कुतुहल म्हणुन.. Happy

>>माझ्या ओळखीत जुळ्या मुलांची नावं "थेंब" आणि "ठिपका" हि आहेत. >>

हा हा हा

काहीकाही नावं एकदम भारीच आहेत Happy

शर्विल म्हणजे काय? शर्विलक म्हणजे चोर ना? >>>>>
शर्विल हे श्रीकृष्णाचे नाव आहे.
आणि शर्विलक म्हणजे चोरच. Happy

नावं ठेवताना / सुचवताना त्याचं इंग्रजी स्पेलिंग आणि त्यातून निघणारे उच्चार पण विचारात घ्या हो.
एक जण जोडाक्षरविरहीत नाव सुचवेल तर शपथ!

हो ना.
उदा. हर्ष. नाव खूप छान, पण स्पेलिंग एकदम Harsh.

@ रीया >> +१
साधे, सरळ-सोपे, जोडाक्षर नसलेले नाव ठेवावे, क्लिष्ट नको.

Pages