मुलाचे नाव

Submitted by Shivmahesh on 18 November, 2016 - 04:52

माझ्या मुलाचे नाव ठेवायचे आहे
कृपया दोन अक्षरी नवीन नाव सुचवा
कोणत्याही अक्षराावरून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉन

रूद्र, भद्र, प्राण, जय, गंध, स्वयं, नाद, शेष, शस्त्र, क्षेम, सुक्ष्म, योग, तेज, व्रत,दीर्घ, सूर्य, वंश, वंशी, स्मित

भद्र, गंध, स्वयं, नाद, शेष, शस्त्र, क्षेम, सुक्ष्म, योग, तेज, व्रत,दीर्घ, वंशी, स्मित
>>
सिरिअसली? Uhoh

सव्यसाची, सर्वजीत, यशवर्धन, अत्रेय, आत्मज, स्वधा, धात्री, महालसा,अपराजिता, कात्यायनी.
>>>
हे राम Uhoh

आधी मला वाटलं अमितवनी मानव हे नाव सुचवले. Happy
माझ्या एका मैत्रीणीच्या मुलांची नावे श्लोक आणि शौर्य अशी आहेत. शर्व , शर्विल हे नाव एकदा प्रवासात ओळख झालेल्या बाळांचे होते.

अरे..हा धागा अधी कसा पाहिला नाही...

>>माझ्या एका मैत्रीणीच्या ताईने आपल्या मुलाचे नाव ढग ठेवले आहे Happy

त्या ढग च्या मोठ्या ताईचे नाव, म्हणजे पहिल्या मुलीचे नाव मुंबा की मुम्बा आहे Happy >>

ढग ?????????? खरं की काय..आता तो मुलगा केवढा आहे..आणि नावाबद्दल त्याचं काय मत आहे ..जस्ट एक कुतुहल म्हणुन.. Happy

>>माझ्या ओळखीत जुळ्या मुलांची नावं "थेंब" आणि "ठिपका" हि आहेत. >>

हा हा हा

काहीकाही नावं एकदम भारीच आहेत Happy

शर्विल म्हणजे काय? शर्विलक म्हणजे चोर ना? >>>>>
शर्विल हे श्रीकृष्णाचे नाव आहे.
आणि शर्विलक म्हणजे चोरच. Happy

नावं ठेवताना / सुचवताना त्याचं इंग्रजी स्पेलिंग आणि त्यातून निघणारे उच्चार पण विचारात घ्या हो.
एक जण जोडाक्षरविरहीत नाव सुचवेल तर शपथ!

हो ना.
उदा. हर्ष. नाव खूप छान, पण स्पेलिंग एकदम Harsh.

@ रीया >> +१
साधे, सरळ-सोपे, जोडाक्षर नसलेले नाव ठेवावे, क्लिष्ट नको.

कोणाला अर्निक /आर्निक नावाचा अर्थ माहीत आहे काय? असा शब्द तरी आहे का? नेट वर अर्थ मिळतोय पण काही ताळमेळ लागत नाही.
मुलीचं नाव अपूर्वा आहे, मुलाचं नाव अशाच अर्थी काही सुचतंय का?

अर्निका सूर्यफूल जातीतील वनस्पतीचे नाव आहे. होमिओपॅथी मध्ये याचा औषधी वापर करतात. यावरून तर अर्निक घेतले नसावे ना?

अ वरून एक नाव: अद्वय
अर्थ: वि. द्वैतविरहित; एकरूप; अभेद. 'तें आपणचि अद्वय ब्रह्मा ।

अद्वैत
अर्चित
अर्पण
अर्पित
अनिश अर्थ सर्वज्ञ
अनिष महादेव (श आणि ष फरक) असे ऐकलं होतं.
अव्युक्त अर्थ विष्णु
अर्णव अर्थ समुद्र
अनिमिष
अनुराग
अबीर
अभिर क्रुष्ण .. अभिरभानु यांचा वंशज म्हणून ... खात्री नाही.

मुलीचं नाव अपूर्वा आहे, मुलाचं नाव अशाच अर्थी काही सुचतंय का? >>> अभिनंदन (हे नाव नाही, congrats ह्या अर्थी Lol )

तसे हे नाव पण ऐकलं आहे एकाचे पण ते तुम्हाला सुचवत नाहीये.

माझ्या मुलाचं नाव श्लोक आहे..पण इथे अमेरिकेत त्याचं नाव उच्चरताना तीन तेरा वाजतात त्या नावाचे..माझ्या एका भावाच्या मुलाचे नाव ' युरी' ठेवले आहे. अर्थ माहीत नाही पण सगळीकडे उच्चरायला सोपे म्हणून ठेवले आहे..

' युरी' ठेवले आहे. अर्थ माहीत नाही पण सगळीकडे उच्चरायला सोपे म्हणून ठेवले आहे..>>> युक्रेनीयन, रशियन नाव आहे. ग्रीक, हिब्रू, जापनीज आणि कोरियन मधे सुद्धा हे नाव ठेवतात.

मुलीचं नाव अपूर्वा आहे, मुलाचं नाव अशाच अर्थी काही सुचतंय का?
>>> अभूतपूर्व कसे राहील...

अर्निका सूर्यफूल जातीतील वनस्पतीचे नाव आहे. होमिओपॅथी मध्ये याचा औषधी वापर करतात. यावरून तर अर्निक घेतले नसावे ना? >> मानव, असू शकते. नेटवर अर्थ भलताच दाखवत आहे. अद्वय नाव आहे यादीत. धन्यवाद.

अमोघ
अक्षय

जतीन, जगन्नाथ, जमशेद, जयेश्, जय, जयेन्द्र्, जिनेन्द्र, जीवा, ज्योतिरादित्य, ज्योतिर्मय, जेम्स, जॉर्ज, जॉन

जागृत, ज्योतिष, जगत, जय, जैमिष, जैनील, जीत, जितुष, ज्योतिक, ज्योतिर्मय

मुलीचं नाव अपूर्वा आहे, मुलाचं नाव अशाच अर्थी काही सुचतंय का? >>> अनुपम (तेजो +१), अनुप, अनीश, अनीष (अस्मिता +१), अरिजित, आराद्ध्य, अंश, अधोक्षज

आसा, जसराज, जय, मल्हार, अन्वय, जयवंत, निहाल, तेज, समर

Pages