मुलाचे नाव

Submitted by Shivmahesh on 18 November, 2016 - 04:52

माझ्या मुलाचे नाव ठेवायचे आहे
कृपया दोन अक्षरी नवीन नाव सुचवा
कोणत्याही अक्षराावरून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थ, सार्थ, पार्थ, शुभ, अंशु, यश, वेद, क्रतु, ऋतु, साम, यजु, चित्त, तेज, ओज, मन, याग, गीत, आर्त, मुनी,ऋषि
अलीकडे श्याम, राम, विष्णु, जिष्णु, या नावांचीही चलती आहे.

स्वर्ण

कठीण नाव हवे असेल तर,
ऋश्री

माझ्या एका मित्राच्या बहिणीचे नाव आहे असे श्रीक्ष्मी

पृथा हे माझ्या एक आवडीचे नाव.
पण ते मुलीचे आहे.
मुलासाठी पृथ्वी वापरू शकतात.
पुढे मुलीसाठी पृथा.
म्हणजे पृथ्वी आणि पृथा, छान वाटेल.
पुन्हा मुलगाच झाला तर त्याचे नाव राज ठेवून शकता. ते आणखी छान वाटेल Happy

राहु, केतु!!

राहुल आणि केतन असे दोन भाऊ आहेत आमच्या नात्यात. त्यांना सगळे राहु आणि केतु म्हणतात.

शर्व

ऋन्मेष, पृथा हे कुंतीचे नाव आहे. ती थोडी स्थूल होती म्हणून. पृथेचा मुलगा तो पार्थ.
आणखी काही : हेम, क्षेम, हेतु, सिद्ध, कर्ण, आशु, नभ, इन्द्र, रवि, शशि, राज, प्रेम, मित, मैत्र, चैत, लाभ, जिन, युग, जप, मन, मेघ/मेह, नाम, नम्र, नित्य, पर्ण, प्रिय, अंक, लेख, गीत, कान्हा, शिव, हंस, हर्ष, ...

माझ्या एका मैत्रीणीच्या ताईने आपल्या मुलाचे नाव ढग ठेवले आहे Happy

त्या ढग च्या मोठ्या ताईचे नाव, म्हणजे पहिल्या मुलीचे नाव मुंबा की मुम्बा आहे Happy

मी तुम्हाला आर्य आणि पूर्व हे नाव सुचवते.

Krishna

ऋन्मेष, पृथा हे कुंतीचे नाव आहे. ती थोडी स्थूल होती म्हणून.
>>>
धन्यवाद हीरा, हे एक भारी सांगितलेत, पृथा या नावामागचे कारण, स्थूलनेस. आता माझी मैत्रीण गेली. ( एक आसूरी हास्य Wink )

खूप पुर्वी मी कुणाकडून तरी ऐकलं होतं की एका कुटुंबात ३ मुलं होती त्यांची नावं त्यांच्या आईवडिलांनी
'टिंब' 'ठिपका' आणि 'चांदोबा' अशी ठेवली होती म्हणे Uhoh

लाडाची नाही रागाची नावं असतील कदाचीत >>> अंधश्रद्धेतून आलेली नावेही असतात. मी वर उल्लेख केलेले ढग हे नाव देखील बहुधा याचाच प्रकार. 'ढ' आद्याक्षरावरूनच नाव हवे म्हणजे मुलगा हुशार निपजेल असे काही तरी

माझ्या भाच्याचे नाव ठेवताना आम्ही बाळांच्या नावांची पुस्तकं आणली होती. त्यातल्या एकात चक्क 'जंत' असे नाव सुचवलेले होते. Uhoh Proud

यक्ष, दक्ष, अक्ष .. या सिरीजमधील बघा, क्ष ने दोन अक्षरांतही एक वजन आल्यासारखे वाटतेय

याच सिरीजमध्ये जुळ्या भावांसाठी सोक्ष मोक्ष नावे छान जातील Happy

आता चक्क ४ अक्षरी आणि अवघड नावांची चलती आहे म्हणे.
आमच्या नात्यातल्या एका छोकऱ्याचं नाव 'हृदयांश' ,
फार पूर्वी एका मुलीचं जरा हटके नाव 'स्वर्दूनी' असंही ऐकलंय.
आमच्या एका मॅडमचे नाव रशिया होते तर त्यान्च्या मुलिचे 'प्रशिया' Proud

मला 'हे' वरुन मुलांची नावे सुचवा. हेरंब, हेम, हेमांशू ... इतकीच येतायत आता तरी

Pages