तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
बॅन्केतला ए टी म मधला त्रास
बॅन्केतला ए टी म मधला त्रास कमी करण्यासाठी हे करता येइल का ? काही माझे विचार
१) बॅन्केत जेवढी कॅश वाटपासाठी असेल त्याला अन्दाजे २००० ने भागून तेवढी टोकन वितरीत करावीत आणि त्याना टोकन प्रमाणे टाईम स्लॉट द्यावा जेणेकरून त्याना खोळन्बून रहावे लागणार नाही आणि गर्दीही कमी होईल आणि ते ईतर कामे करून ठरावीक वेळी येऊ शकतील
हीच टोकन सीस्टीम कॅश जमा करण्यासाठीही वापरली जाऊ शकेल
२) सीनीयर सीटीझन अपन्ग ह्याना घरपोच सेवा देण्याचा पर्याय उपल्ब्ध होऊ शकेल त्यासाठी नाममात्र शुल्क आकारता येइल (फक्त कॅश व्यवहार मोठ्या रकमेचा असेल तर योग्य ती काळजी घ्यावी लागेल)
३) एन पी ए अकाउन्ट मध्ये डाय्रेक्ट कॅश भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर कसे? (हे मूळ स्कीम्शी विसन्गत आहे खर पण करायला काय हरकत आहे)
४) काळे पैसे कचर्यात फेकण्यापेक्षा किन्वा कुजवून ठेवण्यापेक्षा जर ते अकाउन्ट मध्ये न भरता जर बॅन्केतल्या एखाद्या एस्क्रो अकाउन्ट मध्ये भरले ( with or without KYC) आणि ते पैसे prime Ministers National Defence Fund, Prime Ministers National Relief fund किन्वा तत्सम ठीकाणी भरले तर (अर्थात हे ही मूळ स्कीम्शी विसन्गत आहे पण प्रयत्न करता येइल ) आणि तसेही ते डोनेशन १०० टक्के डीडक्शन साठी eligible आहे
झेरॉक्सवर सही बरोबरच डेट ,
झेरॉक्सवर सही बरोबरच डेट , ब्यान्केचे नाव लिहावे. अर्थात तो पार्ट झाकूनही झेरॉक्स काढू शकतातच
ही लिन्क आधी कोणी टाकली असेल
ही लिन्क आधी कोणी टाकली असेल तर दुर्लक्श्य करा
http://bhautorsekar.in/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0...
आणखी एक मुद्दा असा कि आपल्या देशातल्या बहूसन्ख्य लोकान्चे उत्पन्न ४८ रुपये आहे त्यान्चे हजार रुपयाच्या नोटेच्या अभावी असे कितिसे अडणार आहे ?
हे ४८ रूपये त्यांना कसे
हे ४८ रूपये त्यांना कसे मिळतात? मालकाकडे जास्त पैसे आहेत तेच मालकलोक कामगारांना देतात ना! आता मालकाकडेच हातखर्चाला पैसे नाहीत तर मालक कामगारांना पगार देतील की आपल्या अडीअडचणीसाठी ठेवतील?
मी इतक्या दिवसात भाजी-मासे विकत घेतले नाहीत छोट्या नोटा संपतील म्हणून. ऑनलाईन जेवण मागवतेय किंवा घरी आधीच असलेली कडधान्य खातेय. माझ्यासारखे बरेच लोक आहेत. मग त्या छोट्या भाजी व मासे विक्रेत्यांना पैसे कुठून मिळत असतील? हे सगळं एकमेकांवर अवलंबून नाही का?
मी उद्या सकाळी ९ च्या लायनीत
मी उद्या सकाळी ९ च्या लायनीत उभी राहणार. कसे ही वीकांता पूर्वी मला ५००० रु. हातात हवे आहेत. पैसे हातात येइपरेन्त हाच उद्योग. नाहीच झाले सफल तर पुण्याला आजीकडे जावे लागेल.
अल्पना विभागा विभागांवर ते
अल्पना विभागा विभागांवर ते अवलंबुन असेल...घाटकोपरला तर इथल्या बँकात इतकी नाहिय गर्दि.. ऑफीसमधले इतरहि पटकन जाऊन आले..
बेफी... माझ्यामते तरी जे झालं
बेफी... माझ्यामते तरी जे झालं ते चांगलच झालय.. कोणतंहि नविन कार्य करताना सुरवातीला सगळाच त्रास होतो म्हणुन आपण काम करायच सोडुन देतो का?
आमच्या काळी आम्हि सत्राशेसाठ
आमच्या काळी आम्हि सत्राशेसाठ लायनीत उभे रहायचो.
सकाली उठले की टॉयलेट/संडासला लाईन ,
नंतर दुधाच्या बाटली करता लाईन
तिथुन परत आल्यावर चाळीतील बाथरुमकरता लाईन.
तितक्यात बातमी आली की रॉकेल आलय, की पळा तिकडे लायनीत उभे रहायला,
मग गहू आला,
मग तांदुळ आला,
मग साखर आली,
मग तेल तुप आले,
असे दरवेळेस काही आले रेशनवर की पळा लायनीला.... !
ब्यान्केत पैसे भरायचेत? पैसे काढायचेत? उभे रहा लायनीत, पहिल्यांदा टोकनच्या, मग वाट बघत कॅशियर, त्यातुन एखादी सही वगैरे हवि ऑफिसरची, तर त्याच्या टेबला पुढे....
पत्र टाकायचेय, मनिऑर्डर करायची आहे? टेलिग्राम वगैरे? मग उभे र्हावा लायनीत.....
करमणूक हवी? मग थेटरात लायनीत उभे र्हावा, नाईतर ब्लॅकमधे घ्या तिकीटे....
उपचार हवेत? मग सरकारी दवाखाने इस्पितळात लायनी लावा... हो हो, लायनी... अनेकवचन, आधी कार्ड-केसपेपर काढा, मग फी भरा, मग ओपीडीच्या डॉक्टर बाहेर लाईन लावा, मग औषधे घ्यायला तिकडे लाईन लावा, मधेच एक्सरे वगैरे असेल, तर तिकडेही लाइन लावा, पण त्या आधी पैसे भरायला लाईन लावा..... !
सकाळपासुन रात्रीपर्यंत आम्हि निम्मा वेळ लायनीतच उभे असायचो... यात अतिशयोक्ति नाहीये.
पण आता खरेच अच्छे दिन आलेत...
हल्ली लोकं फक्त "नोटांच्या लायनीत हुबारतात" अन तरी करवादतात...
लोकांचा तरी काय दोष हो? बिचार्यांना हल्ली लायनी माहितीच नाहीत.....
अन त्यातुन ते लाल बावटे अन कॉन्गी वाले त्यांना डोकी भडकावयाला सांगत रहातात, की बघाओ, तुम्हाला लायनीत उभे रहायला लावुन तुमच्यावर कसा कसा अन्य्याव होतोय... !
बरोबर आहे. फक्त कमी उत्पन्न
बरोबर आहे. फक्त कमी उत्पन्न गटातील लोकांचे खायचे प्यायचे हाल होताहेत, ऑनलाईन सेवा उपलब्ध असणाऱ्यांचे तुलनेने कमी. आता भारतात कुठल्या उत्पन्नगटाचे किती लोक राहतात?
कसलीही योजना आणा, काहीच म्हणणं नाही. फक्त पूर्वतसारी नीट करा. काय कुठे किती परीणाम होतील ते पहा. आरओआय काढा. आपण साध्य काय करू इच्छितोय नी काय होऊ शकेल ते पहा.
जेवढी तयारी करायला हवी होती त्याच्या कित्येक पट कमी तयारी झालीय हे दिसतच आहे पैसे स्विकारण्याची नी टोल फ्री करण्याची मुदत वाढवली जात आहे त्यावरून.
http://www.loksatta.com/samor
http://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/old-notes-for-new-is-not-...
आज पी. चिदंबरम यांचा वरील लेख वाचनात आला. इथे 'चिदंबरम' हे नाव अनेकांच्या काळया यादीत आहे हे माहीत असूनही निदान विरोधी विचार काय आहेत हे समजून तरी घ्यावेत, मतपरिवर्तन होणे शक्य नसले तरी, या हेतूने लिंक दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की हे 'डी-मॉनेटाय्ज़ेशन' असू शकत नाही. कारण नोटांचा अधिकृत चलन म्हणून वापर अनेक ठिकाणी चालू आहे.काळा पैसा उघड होण्याबाबतही त्यांचे भाष्य विचार करण्याजोगे आहे. शिवाय त्यांनी या सर्व ऑपरेशनचा खर्च १५ ते २० हजार कोटी अंदाजला आहे जो त्यांच्या मते आवश्यक नव्हता.
तर आता वास्तव म्हणजे काळा पैसा रद्द करण्याच्या अथवा बाहेर आणण्याच्या प्रक्रियेत पुन्हा काळा पैसा निर्माण होत आहे.
१)४०० रुपये देउन पाचशेची नोट आणि सातशे रुपये देउन एक हजाराची नोट विकत घेतली जात आहे.
२)घरातला दिवाळीचा फराळ संपून अनेक दिवस झाले. चहाबरोबर तोंडात टाकायला काही नाही म्हणून काल खाउच्या दुकानात गेल्यावर तिथे शुकशुकाट दिसला. (एरवी झुम्मड असते.) दुकानातले सगळे दिवेही लावलेले नव्हते. शेल्फ्सवर दिवाळीतला उरलेला मालच थोडाफार होता.
३)भाजी मार्केटात काल सकाळी एका ठिकाणी एक गोणीभर ओला वाटाणा १३० रुपये किलोने दिसला. पुन्हा संध्याकाळी उशीरा रात्री आठ वाजता तीच गोणी तशीच न उघडलेली दिसली. आजूबाजूचे भाजी विक्रेते रिकामटेकडेपणाने गप्पा मारत उभे होते. या बाजारात मॉलमध्ये जाणारे किंवा कार्डवर खरेदी करणारे येत नाहीत.पण एरवी अतिशय गर्दी असते.
४)घरी अनेक दिवसांची रद्दी साठली आहे. नेहमीचा रद्दीवाला येत नाहीय कारण त्याच्याकडे आम्हाला द्यायला सुटे पैसे नाहीत. नंतरच्या फेरीला द्या सांगितले तरी एका गिर्हाइकासाठी इतक्या लांब येणे परवडत नाही, शिवाय त्याच्याकडच्या रद्दीला मार्केटात गिर्हाइक नाही आणि महिन्याभराची रद्दी साठवून ठेवण्याइतकी जागा त्याच्याकडे नाही. एरवीही तो रद्दीचे आणि भंगाराचे दर खूप खाली आल्याचे, तांब्यापितळेच्या मोडीला उठाव नसल्याचे सांगत होता.
५)घरातल्या सर्वांचा औषधांचा महिन्याचा खर्च सुमारे पाच हजार रुपये होतो. त्यातील काही महत्त्वाची औषधे एका दूरच्या उपनगरात राहाणार्या सुप्रसिद्ध आणि भल्या डॉक्टरांनी लिहून दिलेली आहेत ती त्यांच्याच एरियात मिळतात. म्हणून आम्ही तिथल्याच एका औषधदुकानातून घरपोच मागवतो. त्याला रोकडच द्यावी लागते. सध्या आजूबाजूला जिथून मिळेल तिथून एकेक आठवड्याची आणत आहोत. काही अगदी संपत आली आहेत. दर तीन चार दिवसांनी एक दोन स्ट्रिप्स मिळतात. सुरुवातीला पाचशेच्या नोटा दुकानवाल्याने घेतल्या. पण खरेदीची किंमत ५०० रु. च्या आसपास करण्यासाठी काही वायफळ खरेदी नको असताना करावी लागली. त्याच वेळी किरकोळ खरेदी करणार्यांच्या नोटा नाकारतानाही पाहिले.
६) तयार कपड्यांच्या एका सुप्रसिद्ध दुकानात गेलो होतो. तिथे कार्ड चालते. पण तिथे अक्षरशः चिटपाखरू नव्हते. पण हे अन्य काही कारणाने असेल.
एकंदर मार्केट पडल्याचा फील येतो आहे पण लवकरच अतितेजी उसळेल, विशेषत: जीवनावश्यक वस्तूंमध्ये, असेही वाटते आहे.
वगैरे.
भारतातले सगळेच लोक एकाच वेळी
भारतातले सगळेच लोक एकाच वेळी एकाच प्रकारासाठी लायनी लावत होते का? जिओ साठी नी रोडीज साठी लाईन लावता तर इथे का नाही म्हणणाऱ्यांना असं वाटतय का की देशातले सगळे लोक एकदम असे उभे राहीले होते नी तसे न राहणे याशिवाय पर्याय नव्हता व नाही राहिल्यास भुकेने तडफडावे लागले असते? कुठे कसले फंडे वापरता? उद्या सरकारने फतवा काढला की केवळ जिओ सिम असलेल्यांनाच खरेदीचा अधिकार आहे तर देखील अख्खा देश तिथे लायनीत उभा राहून बोटे मोडणारच ना!
ते सैनिकांना मधे आणणारे, त्यांनी दिवाळी साजरी नाही का केली सैनिकांना साजरी करता येत नाहीय म्हणून? का झोपणे बंद केलेले सैनिकांना धड झोप मिळत नाही म्हणून.
डोन्टब्रिंगसोल्जर्सइनएव्हरीथिंग वाले मेमे मस्त आहेत एक एक. सैनिकांना हे करता येत नाही तर तुम्ही नाही केलं तर काय बिघडतं वाले. त्यात झोप, दिवाळी, फिरणे पासून सेक्स करणे पर्यंत सगळं आहे.
या नरेंद्र मोदींनी देशात
या नरेंद्र मोदींनी देशात अराजकासारखी परिस्थीती आणली आहे.काळे पैसेवाले आरामात आहेत व सामान्य माणसांचं पेकाट मोडायला आले आहे.नोटा बदलण्यात कीती मानवी तास वाया गेलेत याचा काही आकडा आहे का.? एकंदर इकॉनॉमी क्रॅश होणार तर.
लिंबूटिम्बू, आपल्या
लिंबूटिम्बू, आपल्या प्रतिसादावरून दिसते की गेल्या काही वर्षांत आपल्या सर्वांसारख्यांच्या आर्थिक स्तराचे उन्नयन झाले आहे. कारण आजही कामवाल्या बाया रेशनची रांग लावण्यासाठी दांडी मारतात. आमच्याइथे एकदोन ठिकाणी जैन समाजाकडून आर्थिक दुर्बलांसाठी मोफत किंवा अल्प दरात धान्य/वह्या/काही औषधे वाटतात. त्यासाठी भली मोठी रांग लागते. एका चर्चसमोर गुरुवारी दुपारचे अन्न मिळते. तिथेही खूप मोठी रांग असते. अन्न संपले तरी लोक रेंगाळत असतात. शेवटी त्यांना हाकलावे लागते. रेल्वेसाठी आजही लोक रांगेत उभे असतात. जे लोक कार्ड वापरतात किंवा एकदम पन्नास-शंभर रुपयांची कूपॉन्स घेउ शकत होते त्यांची गोष्ट वेगळी. आपण ठाणे, अंधेरी, कांदिवली इथल्या रांगा पाहिल्या आहेत का? ठाणे स्टेशनवर रिक्षासाठीची रांग पाहिली आहे का? बँकेत रोकड भरणा करायच्या मशीनसमोर नेहमीच मोठी रांग दिसते. अनेकविध सोयीसुविधा आणि डिजिटल्/इलेक्ट्रॉनिक सोयी होऊनही या रांगा काहींसाठी अजूनही कायम आहेत. फक्त इतकेच की काही लोक या रांगप्रकरणातून आधीच्या शासनाच्या योग्य धोरणांमुळे बाहेर पडू शकले आहेत.
<<एकंदर मार्केट पडल्याचा फील
<<एकंदर मार्केट पडल्याचा फील येतो आहे पण लवकरच अतितेजी उसळेल, विशेषत: जीवनावश्यक वस्तूंमध्ये, असेही वाटते आहे.>>
------ मागच्या आठवड्यात, आमच्या भुसावळात १२० रु किलो दराने मीठ मिळत होते असे घरी फोनवर बोलणे झाल्यावर कळाले... सर्वत्र मीठाची (कृत्रिम ?) टन्चाई होती. मीठाचे दर अजुन वाढत होते असे मला भावाने सान्गितले. मीठ खरेदीसाठी लोक रात्री झोपेतुन उठले... मीठासारख्या जिवनावश्यक वस्तुसाठी पण पळापळ ते पण भर मध्यरात्री ? अचम्बित आणि दु:खी झालो.
हीरा, तुम्ही कितीही लॉजिकली
हीरा,
तुम्ही कितीही लॉजिकली समजवलंत व ते सत्यही असलं, तरी ते महोदय मागचं सरकार वाईट होतं, व त्यामुळे देश खड्ड्यात गेला असंच म्हणणार.
आताचं सरकार देश खड्ड्यात घालताना दिसतही असलं, तरी ते त्याबद्दल चांगलंच बोलणार.
नाईलाज आहे.
आपल्या प्रतिसादावरून दिसते की
आपल्या प्रतिसादावरून दिसते की गेल्या काही वर्षांत आपल्यासारख्यांच्या आर्थिक स्तराचे उन्नयन झाले आहे. >> कसं शक्य आहे?? कॉण्ग्रेज चं राज्य होतं ना??
भरत., तुम्हाला ती पळवाट वाटत
भरत., तुम्हाला ती पळवाट वाटत असेल, मला सोय वाटते, दृष्टिकोनातला फरक असेल किंवा मला bigger picture माहिती नसेल. पण हे नक्की की, जर अशी तरतूद ठेवली नसती, तर बँक अकाउंट नसलेल्यांचे, म्हणजेच कमी उत्पन्न गटाचे जास्त हाल झाले असते.
मी नेहमी जिथून भाजी घेते, तिथे कार्ड चालत नाही त्यामुळे मी दुसरीकडून भाजी आणली एकदा. आज १०० च्या नोटा होत्या म्हणून परत नेहमीच्या दुकानात गेले. त्याला विचारलं, धंदा कमी झाला का? तो म्हणाला थोडा कमी झाला, पण फार काही नाही, आठवड्याभरात होईल परत normal.
आमच्या आॅफिसच्या बाहेर
आमच्या आॅफिसच्या बाहेर टपरींवर चहा, नाश्ता, सिगारेट घेणाऱ्या लोकांची नेहमीच गर्दी असायची. १०-२० रूपयाला मिळणाऱ्या हा गोष्टी, पण तिथे अजिबात गर्दी नाही. लोक जपून जपून कॅश वापरत आहेत, त्यामुळे या टपरीवाल्यांचा धंदाच चालत नाही.
मोदींच्या निर्णयामुळे एक
मोदींच्या निर्णयामुळे एक झाले, कि कितीतरी शेकडो हजारो लोकांना "गरीबांचा " एकदम कळवळा आलाय...

आता चौका चौकात उभारलेल्या भिकार्यांना गेले काही दिवस "भीक" मिळत नाहीये त्यामुळे त्यांचे हाल होताहेत याच्या "आकडेवारी सहितच्या" गळेकाढू पोस्टी/मजकुर फिरले तर मला नवल वाटणार नाही....
त्यामुळे या टपरीवाल्यांचा
त्यामुळे या टपरीवाल्यांचा धंदाच चालत नाही.
<<
जाऊ द्या हो. ८ दिवसात सगळं सुर्ळीत होईल तोपर्यंत ते टपरीवालं उपाशी राहिलं तर काय झालं?
राष्ट्र..
सीमेवर सैनिक....
:झेंडा: :झेंडा: :झेंडा: :झेंडा:
सुपरसे भी उपरssssssssssss
सुपरसे भी उपरssssssssssss आईडीया !!!
बँकांसमोरच्या रांगा अजूनही लांबलचक आहेत. याचे एक कारण म्हणजे काळा पैसा असलेले लोक स्वतः आणि इतरांना हाताशी धरून वारंवार अनेक बँकांना भेट देऊन रु४००० (आजपासून रु४५००) नवीन नोटांत बदलत आहेत असे दिसते.
याला उपाय म्हणून आता सरकारने न पुसणारी शाई (निवडणूकीत वापरली जाणारी) वापरण्याचे ठरवले आहे.
साडेतीन तास रांगेत उभे राहून
साडेतीन तास रांगेत उभे राहून बॅंकेची कॅश संपल्याने परत आले. दुपारी तीन नंतर परत कॅश येवू शकेल असं बॅंकेतून कळलं.
परतताना ईस्ट आणि वेस्ट पटेलनगरमधल्या मार्केटमध्ये गेले होते. एरवी यावेळी वेस्ट ध्ये जाताना हमखास ट्रॅफिकमध्ये अडकते. आज आरामात गेले. तिथली ४०% दुकानं बंद होती. आमच्या ईस्ट मधल्या मार्केटमध्ये बंद दुकानं कमी आहेत त्यामानाने.
१०-१२ ज्वेलर्सपैकी तीन फक्त बंद होती. दुकानं रिकामी होती, अगदी तुरळक गिऱ्हाईक . बऱ्याच दुकानांवर पेटीएम ची साइन दिसली.( ही कदाचित आधीपासून असेल, माझं आज लक्ष गेलं)
येताना रस्त्यात दिसलेली सगळी एटीएम मशीन्स बंद - शटर डाउन. बॅंकाच्या शाखांमध्ये मात्र भरपूर गर्दी. कॅनरा बॅंक, ॲक्सिस, महाराष्ट्र बॅंक, कर्णाटका, इलाहाबाद, युनियन, एचडीएफसी, सेंट्रल बॅंक आणि येस बॅंक यापैकी येस बॅंक ( तिथले पैसे संपले होते) सोडून बाकी सगळीकडे प्रत्येकी १५० -२०० लोकांच्या रांगा. पोस्टासमोर आणखीच मोठी रांग. यातल्या बऱ्याच ठिकाणी शटर बंद असूनही रांग होती. सगळीकडे १-२ पोलिस पण होते. पोलिसांची एक जीप मार्केटमध्ये गस्त घालतेय. २ वेळा क्रॉस झाली मला ती गाडी.
मला मुलाचे वॉर्मर्स घ्यायचे होते ते कार्ड वापरून घेता आले.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभु
रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचाही हात भार !
काही लोक लांब पल्ल्याच्या रेल्वेचे अप्पर क्लासचे मोठ्या रकमेची रिजर्वेशन करत होते. त्यांना रिजर्वेशन कँसल केल्यास पैसा चेक ने बँकेत डिपॉसिट होणार आहे !!
हे अस्थानी आहे. पण राहावत
हे अस्थानी आहे. पण राहावत नाही म्हणून इथेच टाकतोय.
http://hindutva.info/diamond-merchant-surrenders-6000-crores/
पर एक बात तो मानने वाली हैं
पर एक बात तो मानने वाली हैं कि अगर यह व्यापारी इतना बड़ा समर्पण कर सकता है तो कोई भी हिम्मत करके यह कदम उठा सकता है। अन्य व्यापारियों को भी सच्चाई का रास्ता अपनाते हुए, देश की भलाई के लिए आगे आना चाहिए, वरना जैसा मोदी जी ने कहा अंजाम अच्छा नहीं होगा!
<<
पण आधी इतकं महाभयंकर काळं धन जमवणारा हा माणूस अचानक सभ्य कसा काय झाला?
>>> हे अस्थानी आहे. पण राहावत
>>> हे अस्थानी आहे. पण राहावत नाही म्हणून इथेच टाकतोय. <<<
आमच्या काळी "छापिल" ते ते सर्व सत्य असे समजायचा "प्रघात " होता...
हल्ली "नेटवर आलय" ते ते सर्व सत्य असे समजायचा "भल्याभल्यां सुशिक्षितांचा" प्रघात आहे
नै नै, त्या साईटचे नाव पाहुन
नै नै, त्या साईटचे नाव पाहुन तिथे आलेल्ले ते सत्यच असा समज झाला असाव मयेकरांचा
Aho aatach koni taree
Aho aatach koni taree sangitale na? Manipulated story aahe mhanun?
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/india/india-news-india/black-money-inco...
http://www.indiatimes.com/news/india/surat-businessmen-declare-rs-2500-c...
४ ऑक्टोबर २०१६ ची बातमी आहे.
झी वाले म्हणतात की असं ऐकलय, खरं खोटं नाही माहीत.
http://zeenews.india.com/companies/did-this-indian-businessman-just-surr...
हे एक
http://www.financialexpress.com/india-news/businessman-surrenders-rs-600...
त्यांना रिजर्वेशन कँसल
त्यांना रिजर्वेशन कँसल केल्यास पैसा चेक ने बँकेत डिपॉसिट होणार आहे !! >> ओह म्हणजे सरकारच पैसा पांढरा करुन देतंय तर. नमो नमः
Pages