मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 November, 2016 - 11:15

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> बलात्कार करणारे सगळे जण ह्या फ्रस्ट्रेशन मधून बलात्कार करतात असे तुम्हाला का वाटते ? खैरलांजी सारखे प्रकरण आठवा.
सर्व बलात्कारान्मागे प्रत्यक्ष कारण एकच आहे असे मी म्हणत नाही. पण बहुतांश बलात्कारांमध्ये पॉलीगॅमीवर आलेली बंधने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कशी कारणीभूत असतात ते मी आधीच्या दीर्घ पोष्ट मध्ये स्पष्ट केले आहे.

>> विकसित देशांमधे मुक्त संबंध ठेवण्याची मुभा असतानाही बलात्कार का होतात ?
प्राण्यांइतकी मुभा आहे का? कशी असेल? लग्न पद्धती जिथे जिथे आहे तिथे तिथे पॉलीगॅमी (प्राणीशास्त्रीयदृष्ट्या) करिता मुभा नाही

>> फ्रस्ट्रेशन हा घटक मुख्य नसून त्यावर ताबा न ठेवता...
शरीराची कोणतीही नैसर्गिक गरज निर्माण झाल्यांनतर ती दीर्घ काळ नियंत्रित ठेवणे अयोग्यच

person's desire to have sex is most of the times the first major factor to push them toward that act. To dominate or put them down is something that gets attached later. >> It is more like urge to dominate or put them down is results in rape or sexual assaults riding on desire to have sex. डॉक्युमेंट्री बघणे मस्ट आहे.

ऑफिसा २०१३ मध्ये एक बायकांसाठी सेशन झालं होतं.त्यात हा 'औरत हम पे रौब जमायेगी' मुद्दा एक मुख्य कारण म्हणून आला होता.तुम्ही गरीब आहात.आयुष्यात बरेच इश्यूज आहेत.आणि त्यात तुम्हाला एक कॅब ड्रायव्हर म्हणून बाईच्या आज्ञा ऐकाव्या लागतात, वेटर किंवा बॉय बनून बाईला वाढावं लागतंय, हाऊस किपिंग म्हणून काचा पुसाव्या लागतात किंवा टॉयलेट साफ करावे लागतात हे रोल रिव्हर्सल आणि त्यात कस्टमर ने अगदी अपमानास्पद बोलणे वागवणे हे सर्व फ्रस्ट्रेशन आणि त्यांची एकंदर कमी बौद्धिक पातळी मिळून बलात्कार हे व्हेंट आऊट आणि पॉवर प्ले आणि रिव्हेन्ज टूल बनतं.हा त्यांचा स्वतःच्या गरिबीवर, लाचारीवर काही क्षण इगो मसाज किंवा श्रेष्ठत्वाची भावना मिळवायला केलेला अविचार असतो.आणि ते एका भरपूर लोकसंख्या असलेल्या देशात आहेत, जिथे त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत ते किमान ५ ते १० वर्ष समाजात आरामात जगू शकतात.

आपण सगळे (बाई आणि पुरुष दोन्ही वर्ग) काय करू शकतो?
अश्या घटकांना माणूस म्हणून वागवू शकतो.सलगी वाटणार नाही अश्या प्रकारे त्यांना शिक्षित आणि सुसंस्कृत व्हायला मदत करू शकतो.त्यांच्या कामाचा सेल्फ एस्टीम आणि प्रतिष्ठा वाढवू शकतो.त्यांना त्यांच्या लाचारी किंवा गरिबी मुळे गुन्हे करण्याचा हक्क मिळत नाही, बट टिल वी मेक द लॉ बेटर, वी कॅन स्टार्ट डुइंग धिस ऍज प्रोटेक्शन प्लॅन बी.
लहान मुलांना उद्धट वाटणार नाही पण दबून जाऊन काही गैर प्रकार सहन करणार नाही या प्रकारचं बॅलन्स वागणं शिकवू शकतो.
कोणतंही काम लो दर्जाचं नाही हे बिंबवण्यास घरात ही कामं पुरुष कधीकधी स्वतः करून मुलांसमोर आदर्श घालून देऊ शकतात.

It is more like urge to dominate or put them down is results in rape or sexual assaults riding>> असहमत.

निर्भया डॉक्युमेंटरीवर आरोपी आणि त्यांचे वकील यांनी "मुलीने मर्यादा ओलांडली आणि आम्ही तिला शिक्षा केली" अशा अर्थाचे पालुपद लावलेले दिसते.
साहजिक आहे, कोणता चोर कबूल करेल, की मला हवंहवंसं वाटलं म्हणून मी चोरी केली ? त्याउलट आपल्या संस्कृतीची चौकट तिने ओलांडली, अन आम्ही तिला धडा शिकवला, असे म्हटले की दोष आपसूक स्त्रीवर जातो. मग प्रश्न वासनेचा नाही, वर्चस्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनतो.
गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना हे असले लॉजिक अजूनही पचनी पडते; तिच्यावर बलात्कार झाला, म्हणजे तिनेच काहीतरी चूक केली असणार...
मग काय, टाका तिच्यावर बहिष्कार अन ठरवायची तिला चारित्र्यहीन. आणि बलात्कारी पुन्हा दुसरीकडे आपली वासना शमवायला मोकळे.

बलात्कार न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचला नाही, तर वरचेच चक्र अव्याहत सुरु राहते, अन निर्ढावलेले आपल्या वासनेला संस्कृतीरक्षणाचा मुलामा देऊन पुन्हा उजळ माथ्याने वावरणार.

अन तथाकथित शिक्षा करायला यांना बलात्काराचाच उपाय बरा सापडला? मारझोड नाही, तक्रार नाही, बदनामी नाही, बहिष्कार नाही, खून नाही; फक्त बलात्कारच. हे कसे?

मला एक कळत नाही, लहान मुलांवर, म्हाताऱ्यांवर इतकेच काय प्राण्यांवर सुद्धा जेव्हा बलात्कार होतात, तेव्हा असे कुठले वर्चस्व नराधमांना गाजवायचे असते?

मी_अनु, चांगली पोस्ट. कॅब ड्रायव्हर्सनी केलेले बलात्कार किंवा निर्भया प्रकरणात हा ' हमपे रौब जमायेगी' फॅक्टर नक्कीच जास्त महत्त्वाचा होता. पण त्याचा बेस मुळात परत स्त्री ही पुरुषापेक्षा खालच्या दर्जाची हा चुकीचा संस्कारच आहे, नाही का?
तुंबाडचे खोत किंवा निळू फुल्यांनी रंगवलेले असंख्य पाटील, यांची कसली उपाासमार होत होती? जसं रयतेकडून धान्य, पैसा लुटायचे, तशीच बायकांची अब्रूही लुटायचे.

बलात्कार हे कोणतेही वर्चस्व गाजवायला होत नाहीत,ते फक्त लैंगिक इच्छा शमवण्यासाठी होतात.वैद्यबुवा व इनामदार यांनी लिहीलेच लिहायला आलो होतो पण त्यांनी चांगले विस्तृत लिहिले आहे त्यामुळे लिहीत नाही.

तुंबाडचे खोत किंवा निळू फुल्यांनी रंगवलेले असंख्य पाटील, यांची कसली उपाासमार होत होती? जसं रयतेकडून धान्य, पैसा लुटायचे, तशीच बायकांची अब्रूही लुटायचे.>>
म्हणजे सत्ता आणि पैसा हाताशी आला म्हणून पॉलीगॅमीचा मूळ स्वभाव उफाळून आला, असे मानण्यास जागा नाही काय? इथे सरळसरळ दोन वर्ग पडलेले दिसतात, एका वर्गात असे लोक जे सत्तेच्या जीवावर अनेक संबंध, संमतीने वा जबरदस्तीने, ठेवतात व बऱ्याचदा सहीसलामत सुटतात ; व जे ठेवू शकत नाहीत ते विवाहबाह्य संबंध अथवा इतर मोक्याच्या संधीची वाट पाहत असतात.

मग एखादी अशी संधी मिळाली, की जबरदस्तीने असे संबंध ठेवले जातात. पुन्हा यात वासनेची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्नअसू शकते, पण ज्या हिशेबाने बलात्काराच्या घटना उघड होताहेत, त्यानुसार प्रत्येकाच्या मनात थोड्याफार फरकाने अनेक शारीरिक संबंधाची इच्छा घर करून आहे, असेच वाटते. फक्त ज्याची त्याची कुवत, सत्ता अन संधी यानुसार तो ती भागवण्याचा प्रयत्न करतोय. कधी ते संमतीने असेल विवाहबाह्य संबंध ठरतात, संमतीने नसेल तर बलात्कार.

>> ज्याची त्याची कुवत, सत्ता अन संधी यानुसार तो ती भागवण्याचा प्रयत्न करतोय. कधी ते संमतीने असेल विवाहबाह्य संबंध ठरतात, संमतीने नसेल तर बलात्कार.

नियम हे बलवान दुर्बलांसाठी बनवतात. प्राचीन भारतात राजे महाराजे या लोकांना विवाहाचे बंधन नव्हते. पण त्यांनी सामान्य जनतेसाठी मात्र लग्नाचा कायदा बनवला होता. ब्रिटीशांच्या इतिहासात तर लैगिक समागमासाठी चक्क राजाची परवानगी आवश्यक असे. म्हणूनच त्या कृतीला Fornication Under Consent of King असे म्हणत असत. याची आद्याक्षरे घेऊन आजही त्या कृतीसाठी हा शब्द जगभर प्रसिद्ध आहे.

दुबळे लोक एकमेकांविषयी तक्रार घेऊन राजाकडे/नेत्याकडे जातात (अगदी आजही). मग राजांना/नेत्यांना या दुर्बलांसाठी नियम वा कायदे बनवावेच लागतात. म्हणून त्याचे पालन दुर्बलांनी करायचे. राजांनी नव्हे. क्युबाचा अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रोने आपल्या आयुष्यात तब्बल पस्तीस हजार स्त्रियांबरोबर समागम केल्याचे रेकोर्ड आहे. नॉर्थ कोरियाचा किम जोंग किंवा आफ्रिकेतील हुकुमशहा इदी अमीन यांचे तर कुणी रेकॉर्डही ठेवले नसेल. त्यांच्यासाठी लागली तहान कि पी पाणी इतके सोपे. कोण ह्यांच्यावर बलात्काराची केस लावणार?

फिडेल कॅस्ट्रोचे माहीत होते,पण यात चंगेजखान सगळ्यांचा बाप म्हणाव असा आहे.तो शत्रु पक्षातल्या अनेक स्त्रीयांशी संबंध ठेवायचा ,इतका की आज जगातल्या ८℅ लोकांचा तो ancestor आहे

>>स्वेच्छेने १६८०० होतात .

>> ३५००० का नाहीत ?

१६८०० बायका होत्या असा उल्लेख आहे. म्हणजे लग्न केले असावे ना?
But no more comment on this. कारण चर्चा भलतीकडे जाण्याची शक्यता आहे...

>> सगळी लग्ने स्वेच्छेनेच होतात का ?

>> आणि लग्नाशिवायचे सगळे संबंध बलात्कारच असतात का ?

Good point.

याआधी एका पोष्ट मध्ये हा मुद्दा येऊन गेला आहे पण त्याची कुणी नोंद घेतलेली नाही. आपल्याकडे नवरा बायकोवर बलात्कार करतो हे मान्यच नाही. कायद्याने सुद्धा हा गुन्हा होऊ शकत नाही. फारफारतर घरगुती हिंसाचारच्या कायद्याखाली केस होईल पण बलात्कार नाही (please correct me if am wrong)

त्यामुळे हि संख्या घेतली तर बलात्कारांची सख्या प्रचंड पटीने वाढेल."इच्छेविरुद्ध संभोग" अशी बलात्काराची व्याख्या मानली तर ठरवून केलेले असंख्य विवाह बलात्कार होतात.

धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च ... एकत्र साथ देईन असे अंतर्भुत असल्याने तो बलात्कार होत नाही.

र्मे च अर्थे च कामे च मोक्षे च ... एकत्र साथ देईन >> हे मुलावर/मुलीवर जबरदस्तीने लादण्यात आलेल्या लग्नावर लागू होईल का?
मनाविरुद्ध लग्न हा तर उघड उघड बलात्कार आहे.

मुस्लिम धर्मात अनेक बायका करण्याची परवानगी आहे ना? मग मुस्लिम देशांमधे बलात्काराचे प्रमाण काय आहे? पॉलीगॅमी ही अट सॅटिस्फाय होते म्हणून हा मुद्दा. कुणालाही चिथवायचा हेतू नाही.

मनाविरुद्ध लग्न हा तर उघड उघड बलात्कार आहे.>>>>>> अनुमोदन ,माझ्यामते शेकडा ९० टक्के महीला असा बलात्कार सहन करतात,म्हणुन अरेंज मॅरेज हा प्रकार आपल्याकडे आहे त्याविषयी फॉरेनर्स आश्चर्य व्यक्त करतात,त्यात जातिव्यवस्थेमुळे मेट सिलेक्शनला मर्यादा येतात.

असामी यांच्या पोस्ट्स छान आहेत. बाकी आवरा.

वनवासी जमाती आणि ईस्टर्न सेव्हन सिस्टर स्टेट्स मधे मुलीच्या गर्भपाताचं आणि बलात्काराचं प्रमाण कमी आहे हे खरं आहे का ? यांच्याकडे मातृसत्ताक पद्धत असते का ?

निर्भया डॉक्युमेंटरीवर आरोपी आणि त्यांचे वकील यांनी "मुलीने मर्यादा ओलांडली आणि आम्ही तिला शिक्षा केली" अशा अर्थाचे पालुपद लावलेले दिसते.
साहजिक आहे, कोणता चोर कबूल करेल, की मला हवंहवंसं वाटलं म्हणून मी चोरी केली ? त्याउलट आपल्या संस्कृतीची चौकट तिने ओलांडली, अन आम्ही तिला धडा शिकवला, असे म्हटले की दोष आपसूक स्त्रीवर जातो. मग प्रश्न वासनेचा नाही, वर्चस्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनतो.
गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना हे असले लॉजिक अजूनही पचनी पडते; तिच्यावर बलात्कार झाला, म्हणजे तिनेच काहीतरी चूक केली असणार...
मग काय, टाका तिच्यावर बहिष्कार अन ठरवायची तिला चारित्र्यहीन. आणि बलात्कारी पुन्हा दुसरीकडे आपली वासना शमवायला मोकळे. >> तुम्ही आधी निष्कर्ष काढून त्याप्रमाणे पोस्ट बदलता आहात हे लक्षात येते आहे का ? Buck actually stops only at the statement "त्याउलट आपल्या संस्कृतीची चौकट तिने ओलांडली, अन आम्ही तिला धडा शिकवला, असे म्हटले की दोष आपसूक स्त्रीवर जातो. मग प्रश्न वासनेचा नाही, वर्चस्वाचा आणि प्रतिष्ठेचा बनतो.". स्त्रीने संस्कृतीची चौकट ओलांडली कि नाही हा शिवाय वर्च्स्वाची धडा शिकवण्याची मेंटॅलिटी आहे, ती आहेच. वर्चस्व गाजवण्याची प्रव्रुत्ती आहे म्हणून आरोपींनी हि स्टेप घेतली आहे हा ह्यातला मुख्य गाभा आहे. "गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना हे असले लॉजिक अजूनही पचनी पडते; " ह्याचा इथल्या मुद्द्यांशी काहीही संबंध नाही.

असो हे माझे ह्या टॉपिकवरचे शेवटचे पोस्ट. We can agree to disagree on this, at least I'm.

वनवासी जमाती आणि ईस्टर्न सेव्हन सिस्टर स्टेट्स मधे मुलीच्या गर्भपाताचं आणि बलात्काराचं प्रमाण कमी आहे हे खरं आहे का ? यांच्याकडे मातृसत्ताक पद्धत असते का ?

हो.... स्त्रीभ्रूणहत्येचे सर्वात कमी प्रमाण ख्रिस्चनांच्यात आहे... त्याखालोखाल ते मुस्लिमात आहे..

मनाविरुद्ध लग्न हा तर उघड उघड बलात्कार आहे.

मनाविरुद्ध लग्न ही एक पायरी झाली... पण त्यानंतर पुढची वचने त्या व्यक्तीनेच दिल्याने ती तिचीच जबाबदारी राहील ना? की दुसर्‍या व्यक्तीला रोज सांगत बसायचं माझ्या मनाविरुद्ध झाले असे?

जसे की कर्जासाठी इ एम आय देणार म्हणून एकदाच सही दिली.. की पुढचे हप्ते आपोआपच जातत ना? की माझी इच्छा नसताना कर्ज घेतले / आता द्यायची इच्छा नाही, म्हणून मधूनच सुटका होते?

म्हणूनच त्या कृतीला Fornication Under Consent of King असे म्हणत असत. याची आद्याक्षरे घेऊन आजही त्या कृतीसाठी हा शब्द जगभर प्रसिद्ध आहे. >> अधिकृत शब्द्कोशांनुसार ही व्यु त्पत्ती चूक आहे( oxford & American Heritage). fuck हा मूळ 'Germanic' शब्द आहे.
'विकी' ने सुद्धा वरील व्युत्पत्तीला 'False etymologies' टाकलेले आहे.

Still there is no conclusion obtained from this debate...
विकृती वा फँटसी ज्यावर दारु अंमल चढवते आणि मग असमाधानी व्यक्ती ज्याला ज्याप्रमाणात हवे असलेले लैंगिक सुख मिळत नाही तो बलात्कार करतो. क्राईम पेट्रोल मध्ये दाखवलेल्या बलात्काराच्या घटना पॉलिगॅमीच्या अभावामुळे झाल्या नसून त्या वरील व्याख्येत जास्त बसतात. जरा केस स्ट्डीज करा-
१- कोपर्डी केस
२- कोठेवाडी केस
३- कोकरुड्/शिराळा केस
४- तासगाव केस
५- कोकरे आश्रमशाळा केस
६- मिरज व्हायोलेशन केस
७- पुण्याच्या विविध केसेस.

या उपर पॉलिगॅमी च्या व्याख्येत मुलाने किंवा पुरुषाने लहान मुलावर केलेल्या बलात्काराच्या घटना धागाकर्ता कुठल्या कॅटेगरीत टाकणार आहेत.

Polygamy is now vanished as stepper evolution changed to so and now polygamy cant be said as complementary method or ritual or anything like that,to compensate or minimize rape cases or such a emotions that carries ill-thoughts of rape.

योग्य शासन व्यवस्था.
योग्य शिक्षण व्यवस्था.
योग्य संस्कार.

इतके जरी झा तरी समाजात सुधारणा होईल.
माझ्या मते.

योग्य शासन व्यवस्था.
योग्य शिक्षण व्यवस्था.
योग्य संस्कार. <<<

....स्वप्नच

Imbalanced Economical states and status... Please Do consider the gaps...

Pages