मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 November, 2016 - 11:15

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या क्षेत्रांत स्त्रियांचे वर्चस्व ठेवले तर बलात्कार कमी होतील. पुरषी महत्वाकांक्षेला आळा बसेल आणि त्यातून येणारी स्वामित्वाची भावनाही कमी होऊ शकेल.>>>> पुरुषी वर्चस्ववृत्ती हे काही बलात्कारांमधील प्रमुख कारण वाटते (विशेषतः विवाहांतर्गत व लिव्ह इन मध्ये झालेल्या बलात्काराबद्दल), तरी मूळ प्रश्न उरतोच. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी बलात्काराचाच मार्ग का?
माझ्या मते बलात्कारासारख्या कृत्याने जो मानसिक आघात एखादीला बसू शकतो, तो इतर कुठल्याही मार्गाने बसू शकत नाही. कारण एकच, योनिशुचिता आणि पावित्र्याच्या भंकस कल्पना.
स्वतःवर अत्याचार झालाय यापेक्षा समाजापासून संपूर्णपणे तोडले जाण्याची भीती पीडितेच्या मनावर खोलवर आघात करते. मग तिच्याकडून प्रतिवार होण्याची शक्यता जवळजवळ मावळते.

मुलांना/पुरुषांना स्त्रीदाक्षिण्याचे लाख धडे द्या, पण समाजातूनच शारीरिक संबंधाविषयी असणारी किळस निघून गेली नाही, तर याचा काहीच उपयोग नाही. सेक्स म्हणजे अपवित्र, त्यात जबरदस्तीचे संबंध म्हणजे महापातक, असल्या भाकड समजुतींमुळेच कित्येक जणींना मदत मिळत नाही , लढण्याचे निम्मे मनोबल इथेच नष्ट होते.

मुक्त लैंगिक समाजात फक्त सहज शारीरिक संबंध अपेक्षित नाहीत तर त्यासोबत बहुतेकांच्या मनात असलेली घृणा नष्ट होणे हेसुद्धा अभिप्रेत आहे.

मुक्त लैंगिक समाजात फक्त सहज शारीरिक संबंध अपेक्षित
नाहीत तर त्यासोबत बहुतेकांच्या मनात असलेली घृणा नष्ट
होणे हेसुद्धा अभिप्रेत आहे.>>>>>>>> अर्थात,मुक्त लैंगिक व्यवहार करणारे जे काही आदिम समाज आज अस्तित्वात आहेत त्यांच्यात बलात्काराचे प्रमाण अतिशय कमी आहे असे ऐकले आहे.लैंगिकतेच्या बाबतीत एखादा समाज मुक्त व्यवहार करु लागला की घृणा आपोआपच कमी होत जाते.

बलात्कार हे लैगिक भूक भागवण्यासाठी होतात. वर्चस्वासाठी नव्हे.

त्यामुळे, जसे अन्नाची भूक भागली नाही तर कोणताही प्राणी आक्रमक होऊन अन्न मिळवण्याचा प्रयत्न करेल
त्याचप्रमाणे शरीराची भूक भागली नाही तर कोणताही प्राणी आक्रमक होऊन ती भूक भागवण्याचा प्रयत्न करेल. पिरीयड.

हे इतके साधे तत्व आहे.

वरती एका प्रतिक्रियेत जेवणाचे उदाहरण चुकीच्या पद्धतीने दिले आहे. आपण त्याचा योग्य पद्धतीने विचार करू. जेवायला एकाच प्रकारचे खाद्य सतत दिले तर भूक भागेल का? काही दिवस खाल्ले जाईल. नंतर भूक असूनही ते अन्न खायची इच्छा होणार नाही. मनुष्य प्राणी नैसर्गिकरीत्या polygamous आहे (गुगल करून पहा). विवाह पद्धतीमुळे त्यावर प्रचंड प्रमाणात बंधने आली आहेत. बलात्कार हा त्याचाच साईड इफेक्ट आहे.

समजून घेण्यासाठी थोडे प्राचीन काळात जावे लागेल (प्रतिक्रिया दीर्घ होईल. पण इलाज नाही):

विवाह पद्धती जन्माला यायच्या आधी स्त्रीसत्ताक संस्कृती होती. स्त्रिया टोळीचे नेतृत्व करत. त्या स्त्रीच्या नावे ती टोळी ओळखली जायची. टोळीत स्त्री पुरुष संबंधांना मोकळीक होती. टोळीत जन्माला आलेल्या मुलांच्या संगोपानाची जबाबदारी टोळीतल्या सर्वांची असे. या टोळ्या एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात अन्नपाण्याच्या शोधात भटकंती करत असत. राजवाडेंच्या पुस्तकात तसेच अजून एक लेखिका आहेत (त्यांचे नाव आठवत नाही) या संबंधी तपशीलवार उल्लेख आढळतात. तात्पर्य: "वैयक्तिक मालकी हक्क" हि भावना नव्हती. हि माझी स्त्री, तो माझा पुरुष, हि माझी जमीन, हे माझे मुल असे नाही. माझे पेक्षा आपले (टोळीचे) अशी भावना अधिक प्रबळ होती. अनेक प्राणी आजही या अवस्थेत जीवन जगात आहेत.

नांगराचा शोध लागल्यानंतर मात्र मनुष्य प्राण्यांची परिस्थिती बदलली. टोळ्यांची अन्नासाठी भ्रमंती थांबली. शारीरिक बळ जास्त असल्याने नांगरण्याचे काम आपसूकच पुरुषांकडे आले. पण अर्थातच काही पुरुष अधिक बलवान तर काही कमी. त्यातून नांगरले कुणी आणि अन्न कुणाला किती प्रमाणात मिळायला हवे यावरून टोळीत पुरुषांमध्ये हाणामारी होऊ लागली. माणसा माणसातील प्रतवारी व वर्चस्ववादाला कदाचित इथूनच सुरुवात झाली असावी. त्यावर तोडगा म्हणून पुढे पुरुषांकडे जमिनीची मालकी हा प्रकार सुरु झाला. ज्याने त्याने आपापल्या बळानुसार आपापल्या जमिनीत नांगरून पिक घ्यावे. पुरुषप्रधान संस्कृतीची सुरवात. पुरुषाचा मृत्यू झाला कि जमिनीची मालकी त्याच्या मुलाकडे. त्यातून पुरुषी वंश पद्धती निर्माण झाली. टोळ्या नष्ट झाल्या. पुढे पुरुषांनी स्त्रियांचे वर्चस्व पूर्ण मोडीत काढले. उलट, जमिनीबरोबर स्त्रीवर सुद्धा मालकी हक्क आला. "आपले" ऐवजी "माझे" आले. माझी जमीन, माझी स्त्री, माझी मुले. त्यामुळे कोण स्त्री कुणाच्या मालकीची व्हावी यावरून हाणामाऱ्या होऊ लागल्या. आणि त्यावर तोडगा म्हणून विवाह पद्धती जन्माला आली. स्त्रीवर मालकीत्व आल्याने नंतरच्या काळात स्त्रीच्या इच्छा, पुरुषांप्रमाणे तिचे पॉलीगामी नेचर या सगळ्याचे पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये पद्धतशीरपणे दमन केले गेले. वस्तूप्रमाणे तिची अवस्था झाली. मग बलवान पुरुषांकडून भूक भागवण्यासाठी तिचे अपहरण बलात्कार हे क्रमप्राप्त होत गेले. मालकीत्व आल्याने स्त्रीने एकापेक्षा अधिक पुरुषांबरोबर संबंध (ज्याला टोळी पद्धतीत पूर्ण मुभा होती) ठेवणारीला "कुलटा" म्हणून हिणवले गेले. त्याचे पिढ्यानपिढ्या हजारो वर्षे मनावर इतके खोल संस्कार झाले आहेत आहेत कि आताची स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांबरोबर संबंध ठेवण्याची कल्पना देखील करू शकत नाही. पुरुषांना मात्र अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवायला अगदी अलीकडच्या काळापर्यंत मुभा होती. आणि आता तर माझ्या माहितीप्रमाणे भारतात polygamy बेकायदा आहे (स्त्री आणि पुरुष दोघांनाही).

हि सगळी पार्श्वभूमी विचारात घेता बलात्कार का होतात आणि स्त्रीच्या दृष्टीने ते का भयानक आहेत त्याची कारणे लक्षात येतील. धागा कर्त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे पण मिळतील.

>> १. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
>> २. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
>> ३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
तिन्ही प्रश्नांचे उत्तर: हो. नक्कीच.

>> ४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
>> ५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
>> ६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.

वर लिहिल्याप्रमाणे मुक्त लैगिक व्यवस्थेमुळे बलात्कार कमी होतील. पण तोच एकमेव उपाय नाही. व तो अमलात आणणे इतके सोपे पण नाही.

लग्न पद्धती तशीच ठेवून लैगिक स्वातंत्र्य अबाधित राखणे हा त्यावर एक सुवर्णमध्य आहे. म्हणजे मुलांचे संगोपन व जबाबदारी लग्न झालेल्या जोडप्यानेच घायची. पण त्यांनी एकमेकाला लैगिक स्वातंत्र्य पण दिले पाहिजे. अर्थात असे लग्नबाह्य संबंध केवळ polygamous लैंगिकतेला 'vent' करण्यासाठी म्हणूनच असायला हवेत. ते आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित कसे असतील हे पाहणे व यातून मुले जन्माला न घालणे हे अतिशय जबाबदारीचे व म्हणून महत्वाचे. अर्थात, सध्याची मानसिकता (स्त्री व पुरुष दोघांचीही) त्यासाठी अजिबात अनुकूल नाही. वरती काही प्रतिक्रियांवरून हे सहज लक्षात येते. व अशा मानसिकतेच्या असंख्य लोकांनीच आपला समाज बनलेला आहे. Polygamy नैसर्गिक आहे हेच आपल्याला मुळी मान्य नाही. म्हणून हाच त्याच्या अंमलबजावणीतील प्रमुख धोंड आहे.

>> ७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.
पुरुषप्रधान व्यवस्था असल्याने लिंग गुणोत्तर व्यस्त झाले आहे. ज्या देशात हे गुणोत्तर समान आहे (असे अनेक देश आहेत) तिथल्या लोकांची मानसिकता, तिथे स्त्रियांना दिली जाणारी सुरक्षा, पुरुष आणि स्त्रियांचे सर्वत्र समान अधिकार हे आपण अभ्यासायला हवेत. शेवटी या गोष्टी मानसिकतेवर असतात. पण त्याचा समाजाने अंगीकार करणे आवश्यक आहे.

इतर काही प्रतिक्रियांमधून उमटलेले प्रश्न आणि सूर:

पूर्वीच्या काळी बलात्कार इतके होत नव्हते. आता प्रमाण का वाढले आहे?
पूर्वीही बलात्कार होत होतेच. फक्त त्याच्या बातम्या होत नसत, त्यामुळे प्रमाण किती आहे कधीच कळत नसे. तसेच आता लोकसंख्या पण वाढली आहे. त्याप्रमाणात सर्वच गोष्टी वाढतात. शिवाय आता परीस्थिती पण बदलली आहे. नांगराच्या शोधानंतर जे झाले आता तेच इंटरनेट, पोर्न आणि सोशल मेडियामुळे होत आहे. बदल अपरिहार्य आहे. त्यावर बंदी घालणे हा उपाय नाही. तसे असेल तर घरे दारे सोडून नांगराने शेती करण्यावर बंदी घालून परत स्त्रीसत्ताक टोळ्या करून रहावे का?

मुक्त लैगिक संबंध वेश्याव्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तरीही बलात्कार का होतात?
याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, लोकसंख्येच्या मानाने वेश्या खूप कमी आहेत. ज्या आहेत त्यांना सामाजिक सन्मान नाही. समाज उपयोगी काम करणाऱ्यांनाच आपल्या समाजाने हीन वागणूक दिली आहे.
दुसरे कारण म्हणजे वेश्येकडे जाणे ह्याला पण बंधने आहेत. कारण polygamy जी नैसर्गिक गोष्ट आहे तीच समाजाला अमान्य आहे. मान्य असती तर समतोल समाज रचनेत स्त्रियांप्रमाणे पुरुषांचे सुद्धा वेश्याव्यवसाय सुरु झाले असते.

जबरदस्तीने संभोग करणे हे अनेकदा प्राण्यांमध्ये सुद्धा आढळते. मांजरे संभोग करण्याआधी अनेकदा जोरजोरात भांडतात. मांजरी विरोध करत असते. पण एकदा समागम सुरु झाले कि दोघेही त्याचा आनंद घेतात. पण इच्छेविरुद्ध संभोग केला म्हणून मांजरीने नंतर जीव दिल्याचे एकही उदाहरण नाही. तात्पर्य: बलात्कारानंतर स्त्रीच्या मनावर होणारा आघात (आणि त्यामुळे काही प्रसंगी तिची आत्महत्या) याला बलात्कार करणाऱ्यापेक्षा आजवरचे स्त्रीवरचे हजारो वर्षांचे सामाजिक संस्कार जास्त जबाबदार आहेत, विवाह संस्कृती जबाबदार आहे, कुलटा म्हणवणारी पुरुषप्रधान विकृत्ती जबाबदार आहे, स्त्रीवर मालकी हक्काची परंपरा निर्माण करणारे आद्यपुरुष जबाबदार आहेत.

थोडक्यात: विवाह पद्धती हि मुक्त लैगिक व्यवहाराच्या पद्धतीशी, जमीन आणि स्त्रीच्या मालकी हक्काशी सांगड घालताना निर्माण झालेल्या समस्येवर उपाय म्हणूनच शोधली गेली आहे. पण अर्थात हा उपाय परिपूर्ण नाही. कारण बलात्कार हा या उपायातील एक प्रमुख दोष म्हणून आजकाल वेगाने पुढे येत आहे. यावर उपाय म्हणून नवीन काहीतरी पद्धती निघेलच. अर्थात हे सगळे सतत उत्क्रांत होतच असते.

इनामदार,मस्त विवेचन केलेत.आपण म्हणता तसे विवाहसंस्था मोडीत काढायची गरज नाही ,पण लैंगिक स्वातंत्र्य असायला हवे.

ईनामदार,
मांजरांमध्ये ओव्यूलेशन हे इंडूस्ड ओव्युलेशन असते.
त्यांच्या एका सायकलमध्ये जी साधारण चार - पाच महिन्याची असते, पहिले ओव्यूलेशन व्हायच्या इस्टरस फेजमध्ये माद्या प्रथम नराला आकर्षित करायला विव्हळते आणि नंतर पहिल्या समागमाच्या वेळी बोक्याच्या पेनीसच्या काटेरीपणामुळे उद्दीपित होऊन ओरडते.
असे उद्दीपन झाले नाही तर मांजरींना ओव्यूलेशन होत नाही आणि मग पुढे नवी पिढी जन्माला येणार नाही.
तेव्हा मांजरे भांडतात, मांजरी विव्हळतात ते ओव्यूलेशन इंडक्शन असते , बलात्कार नव्हे.

(एका सायकलमध्ये पहिल्यांदा ओव्यूलेशन इंडक्शन झाले की मग प्रत्येकचेळी या भांडण प्रकाराची आणि विव्हळण्याची गरज नसते.)

प्राणी सृष्टीचे सगळेच नियम माणसाला लावता येणार नाहीत.
प्रत्येक प्राण्याची लैंगिकता आणि पुनरूत्पादनाच्या सवयी वेगवेगळ्या असतात.

@साती: धन्यवाद. मांजराचे उदाहरण कदाचित चुकीचे असेल. पण मुद्दा हा आहे कि एकतर प्राणी बलात्कार करत नाहीत. माझ्या माहितीनुसार प्रमाण अत्यल्प आहे. आणि असलेच कुठे तर त्यामुळे जीव दिल्याचे उदाहरण एकही नाही.

@ इनामदार, फारच सुंदर विवेचन केलेत.

विवाह पद्धती जन्माला यायच्या आधी स्त्रीसत्ताक संस्कृती होती. स्त्रिया टोळीचे नेतृत्व करत. त्या स्त्रीच्या नावे ती टोळी ओळखली जायची. >>> हि स्रीसत्ताक संस्कृती कशी निर्माण झाली होती? कदाचित अवांतर होईल, पण ह्याचे विवेचन आपणांकडून जाणून घ्यायला आवडेल.

>> हि स्रीसत्ताक संस्कृती कशी निर्माण झाली होती? कदाचित अवांतर होईल, पण ह्याचे विवेचन आपणांकडून जाणून घ्यायला आवडेल.

मी उल्लेख केल्याप्रमाणे राजवाडेंच्या पुस्तकात याचे अत्यंत तपशीलवार वर्णन आहे. कुठे मिळाल्यास जरूर वाचा. इथे थोडक्यात देतो...

आदीमानव अवस्थेत असल्यापासून मनुष्यप्राणी कळपाने राहतो. पूर्वी असे मुक्त कळप असत. त्यांना नेतृत्व असे नव्हते. अतिआदीम अवस्थेत नातेसंबंध तर अस्तित्वातच आले नव्हते. त्यामुळे लैगीकतेला कोणतेही धरबंध नव्हते. मूल स्त्रीला झाले इतकेच ज्ञान असायचे. कोणत्या पुरुषामुळे (वा पुरुषांमुळे) हा प्रश्नच अस्तित्वात नव्हता. मुले थोडी मोठी झाली कि त्यांची कळपात सहज सरमिसळ व्हायची. त्यामुळे कळपातल्या सर्व स्त्रिया म्हणजे कळपात असलेल्या सर्व बालकांच्या आया असे समजण्याची परंपरा होती. पुढे या सरमिसळ समाजात एक क्रांती घडून आली. हि सामयिक मातृत्वाची चाल मागे पडून अमुक मुल अमुक स्त्रीचे असे त्या मुलाला ओळखायला सुरवात झाली. कळपातच असे अस्पष्ट "माता आणि तिची मुले" असणारे गट तयार होऊ लागले. त्याला फारफारतर आद्यावस्थेतील कुटुंब म्हणता येईल. पण नाते हि कल्पनाच अस्तित्वात नसल्याने अनिर्बंध लैगिक संबंध अद्यापही सुरूच होते.

तथापी, मुलाला स्त्रीची व्यक्तिगत ओळख निर्माण झाल्यापासून त्यांच्या संगोपानावरून कळपातील काही स्त्रियांत बेबनाव सुरु झाले. त्यामुळे या स्त्रिया आपापल्या मुलाबाळांसह वेगळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या. तरीही या स्वतंत्र रहात असलेल्या स्त्रियांशी समागम मात्र कळपातील कोणीही पुरुष करीत असत. पुरुषांनी शिकार करून आणावी आणि ती या कुटुंबप्रमुख स्त्रियांकडे हवाली करून त्या करतील ते अन्न खावे असा प्रघात होता. ज्या स्त्रियांना असे वेगळे राहायचे नव्हते त्या अर्थातच अन्य स्त्रीच्या कुटुंबाचा भाग बनून राहू लागल्या. अशा रीतीने पूर्वीच्या नेतृत्व रहित कळपांचे नेतृत्व नकळतपणे स्त्रिया करू लागल्या. त्या स्त्रियांच्या नावे ते कळप ओळखले जाऊ लागले.

थोडक्यात: आपल्या अपत्याला घेऊन त्याचे संगोपन करत वेगळे करण्याच्या हट्टापाई विभक्त होणाऱ्या काही स्त्रियांमुळेच पुढे स्त्री सत्ताक टोळ्या बनत गेल्या.

http://m.thehindu.com/features/metroplus/society/the-rape-issue/article4...
ही एक ४ लेखांची मालिका आहे. प्राण्यांमधेही बलात्कार होतात. प्रमाण कमी असेल, पण शून्य नाही.
लेखाखाली बाकी ३ लेखांच्या लिंक्स आहेत.

ईनामदार, छान मस्त पोस्ट.

एक शंका आहे. जर एकापेक्षा जास्त जोडीदाराबरोबर संभोग करायची मुभा कायद्याने आणि समाजाने स्त्री-पुरुष दोघांनाही दिली तरी चांगला जोडीदार मिळवण्यासाठी बलात्कार होतच राहतील.

असामी, वर्चस्व हा सेकंडरी मुद्दा होतो. नंबर एक मुद्दा आहे इच्छा होणे. पुढे ती इच्छा पुर्ण करायला तुम्ही किती पुढे सरकू शकता ह्यावरुन वर्चस्व हा मुद्दा येतो. भारतात एकू येतात त्या बर्‍याच केसेस मध्ये तरुण मुलांना वर्चस्व गाजवणे ह्या गोष्टीशी काहीही घेणं नसून लैंगिक दमन झाल्यामुळे आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे अशी कृत्ये करतात. बरीच मुलं फार श्रीमंत घरची पण नसतात जेणेकरुन त्यांना "आपल्याला कोणी काही करु शकत नाही" ह्या वर्चस्वाच्या भावनेतून असं काही करायला उर्मी येते. काही मुलं तशी असतात पण सगळी नाही. मी उल्लेख करतोय ती मुलं/पुरुष पुढे काय होईल ह्या गोष्टींची काळजीच फारशी करत नाहीत, इतके ते आंधळे झालेले असतात ह्या दमनामुळे.

इनामदार, विस्तृतपणे लिहिली असली तरी बरेच लूपहोल आहेत तुमच्या थियरी मध्ये. मी आधीही लिहिलय की ह्या रेप ह्या गोष्टीचं सोल्युशन थेट पॉलिगमी ही खुपच शॉर्ट साईटेड आणि वर हायझनबर्ग नी उल्लेख केलाय तसं आपल्या सोयीचं वाटणार्‍या सोल्युशनचं घोडं बळच पुढे दामटवण्यासारखं आहे.

पॉलिगमी चां नेमका अर्थं काय आहे?
the practice or custom of having more than one wife or husband at the same time.
म्हणजे बेसिकली एक पेक्षा जास्त मॅरिड पार्ट्नर असणे. त्याचा आणि रेपचा थेट संबंध आजिबात लागत नाही.
तुम्ही जर पॉलिगमीचा अर्थ एका पेक्षा जास्त व्यक्तीशी शारिरिक संबंध ठेवणे असा घेतला असेल तर वर झक्कींनी लिहिलय तसं त्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे फक्त भारतीय समाजात अजून त्याला इतकी मान्यता नसल्यामुळे ते फार उघड उघड होत नाही. एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारिरिक संबंध ठेवणे ह्यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कन्सेंट किंवा परवानगी. तुम्ही वर पॉलिगमीचा मुद्दा अशा थाटात मांडला आहे की सगळ्यांना जर वाट्टेल तितक्या लोकांशी संबंध ठेवू दिले तर सगळा प्रॉबलेम सॉल्व होईल. अहो पण मेन मुद्दा हा आहे की एखाद्या पुरुषाला लाख वाटत असेल की किमान २५ स्त्रीयांशी संबंध ठेवावे पण त्या स्त्रीयांना ते मान्य असायला(च) हवं ह्याचं काय?
इथे तोच तर मेन प्रॉबलेम आहे. योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे, चुकीच्या सोर्सेस कडून स्त्रीयांविषयी माहिती मिळाल्या मुळे सध्या भारतात बर्‍याच तरुण मुलांना, पुरुषांना रस्त्यावर दिसेल त्या बाईशी शारिरिक संबंध ठेवायचे असतात. इथे १) आपल्याला दिसेल त्या बाईशी संबंध ठेवावेसे वाटतात हा आपल्या डोक्यातला फॉल्ट आहे, हे समजणे आणि २) आपल्याला जरी वाटलं की संबंध ठेवावे तरी त्याला त्या स्त्रीची परवानगी लागते आणि ती जर नाही म्हणाली तर आपल्याला ते स्विकारावच लागेल ह्याची जाण असणे हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत.
हा डोक्यातला (मानसिकतेतला) फॉल्ट जो पर्यंत दूर होत नाही तो पर्यंत अशा पुरुषांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा हेच स्त्रीयांच्या हातात उरतं.

इनामदार सर, तुमची पोस्ट माहिती म्हणून वाचायला छान आहे पण तिचा काही उपयोग नाही. अश्मयुगात माणूस दगडाची हत्यारे वापरीत असे. पण आता ते शक्य नाही. त्याच प्रमाणे तुम्ही म्हणता त्या समाजव्यवस्थेपासून मानवजात फार दूर निघून आली आहे आणि जे बदल घडले आहेत ते परिस्थितीजन्य आहेत. तुम्ही काळाचे चक्र मागे फिरवू शकत नाही. आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे की ती व्यवस्था अधिक चांगली होती? You are playing with the theory to prove your point. You can't furnish an actual evidence to prove it. रामाच्या काळात रामराज्य होतं! Who knows? The weaker sections of the society are always known to be least documented in the history of civilization. There might be several faults with the old system that never got documented.

ती जर नाही म्हणाली तर आपल्याला ते स्विकारावच लागेल ह्याची जाण असणे + इथेच सगळं घोडं पेंड खातं

@ वैद्यबुवा ,मुक्त लैंगिक व्यवहार म्हणजे फक्त सेक्स नव्हे.तर दोन्ही जेंडरचे सोशल इंटरॅक्शन वाढले पाहीजे .आपल्याकडे मुलेमुली वयात आल्यावर त्यांना लांब केले जाते ,हे व्हायला नको,शाळे कॉलेजातही मुलंमुली वेगवेगळी का बसवतात हे मला अजूनही कळलेले नाही.मुलाची मैत्रीण ,मुलीचा ,बहिणीचा मित्र,नवर्याची मैत्रिण बायकोचा मित्र या गोष्टी भुवया उंचवायला लावतात हे थांबले पाहीजेत.स्त्रीचा सहवास हा अप्राप्य आहे हा भारतीय पुरुषाला आलेला गंड नाहीसा होण्यास यामुळे मदत होईल.जेंडर इक्वेलिटीसाठी हे गरजेचे आहे.

इनामदार तुम्ही बोल्ड करून लिहिलेले पहिलेच वाक्य
.
बलात्कार हे लैगिक भूक भागवण्यासाठी होतात. वर्चस्वासाठी नव्हे.

अत्यंत सिम्प्लिस्टिक व चुकिचे आहे.

निर्भया प्रकरणातील आरोपींना आपली भूक भागवण्याचे अन्य उपाय उपलब्ध नव्हते काय ? बांगलादेश, कुनान-पोशपोरा वगैरे घटना काय दर्शवितात ?

बुवा योग्य पोस्ट

भारतात एकू येतात त्या बर्‍याच केसेस मध्ये तरुण मुलांना वर्चस्व गाजवणे ह्या गोष्टीशी काहीही घेणं नसून लैंगिक दमन झाल्यामुळे आणि योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे अशी कृत्ये करतात. >> त्यातही सतत पुरुषसत्ताक पद्धतिच उद्दात्तिकरण त्यामूळे पुरूष सुपेरियर असल्याच कन्डिशनिन्ग पण कारणिभुत आहे.

@ इनामदार, आपल्या अपत्याला घेऊन त्याचे संगोपन करत वेगळे करण्याच्या हट्टापाई विभक्त होणाऱ्या काही स्त्रियांमुळेच पुढे स्त्री सत्ताक टोळ्या बनत गेल्या>>> फारच छान माहिती दिलीत. माझ्या ज्ञानात भर पडली. आपणांस धन्यवाद!!! राजवाडे यांचे पुस्तक नक्की वाचेन.

असामी, वर्चस्व हा सेकंडरी मुद्दा होतो. नंबर एक मुद्दा आहे इच्छा होणे. पुढे ती इच्छा पुर्ण करायला तुम्ही किती पुढे सरकू शकता ह्यावरुन वर्चस्व हा मुद्दा येतो >> बुवा इथे कसली इच्छा होणे अपेक्षित आहे ? फक्त लैंगिक ? तसे असते तर त्याचे स्खलन बलात्काराच्या रुपानेच दिसले नसते ? फक्त लैंगिक इच्छा नसून इतरांवर लैंगिक वर्चस्व गाजविण्याची इच्छा हे मुख्य कारण आहे. मी कदाचित मूळ पोस्ट मधे भूमिकेऐवजी इच्छा शब्द वापरायला हवा होता.

महत्वाचा विषय. चांगली चर्चा.
धागाकर्ता व इनामदार यांचे विवेचन पटले.

माझे दोन पैसे :
१. पुरुषाची लैंगिक उर्मी जबरदस्त असते.
२. निसर्गानुसार पुरुष हा बहुपत्निक( polygamous) आहे.
वरील दोन्ही विधानांचा एकत्रित विचार केल्यास असे म्हणता येईल की कोणत्याही युगात बलात्कार हे होतच राहणार. कायद्याची जरब व झटपट अंमलबजावणी असल्यासच त्यांचे प्रमाण काहीसे कमी होऊ शकेल.

३. विवाह हा एक प्रकारचा कायद्याने मान्य असा बलात्कारच आहे. हे विधान धाडसाचे वाटेल पण नीट विचार केल्यास पटेल. एका पुस्तकातील प्रसंग आठवला. दोन मध्यमवयीन रात्री गच्चीवर गप्पा मारत फिरत असतात. त्यातील एक आसपास बघत दुसऱ्याला म्हणतो,’’ women are being raped under most of the roofs’’.

...चर्चेचा व चिंतनाचा विषय आहे खरा पण, त्यावरील उपाययोजना वाटते तेवढी सोपी नाही असे खेदाने म्हणतो.

@बुवा, तशा प्रकारचे वर्चस्व. त्यात फिजिकॅलिटी नि सायकॉलॉजिकल हे दोन्ही भाग आले. दोघांची परीणती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होउ शकते. बलात्कार हे एक रुप झाले.

इथे फक्त वेगवेगळे दृष्टिकोन लिहिले जात आहेत. त्यात ऊग्र प्रतिक्रिया देऊन फारसा उपयोग होणार नाही. उगाचंच फालतु टाइमपास अस म्हणून दुसृयच्या मतांना झटकणे योग्य वाटत नाही. केवळ एका धाग्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत याचे भान ठेवावे. कोणिही समाज मन बदलू शक त नाही हे नक्की.

बलात्काराची कारणमीमांसा काही असो, जगभरच्या मनुष्य प्राण्यांचे एक व्यवछेदक लक्षण म्हणजे कधी हि समाधान न होणे. म्हणून कोट्यवधी रुपये मिळाले तरी अजून हवे असतात, भूक भागली तरी आणखी थोडे साठवून ठेवायचेच असते.

तसेच काहीसे लैंगिक इच्छांचे आहे, फक्त ही भूक अनेक रीतीने प्रकट होते, नि जवल जवळ कधीहि न संपणारी आहे. त्यामुळे कितीही मोकळेपणा असला तरी दुसर्‍याच्या मनाविरुद्ध ती भूक भागवायची म्हणजे तो बलात्कारच.

एक वेळ माझे पैसे चोरले तर मी म्हणीन, जाउ दे, थोडे महिने वाईट वाटेल, पुनः पैसे मिळाले की विसरून जाईन.

पण जेंव्हा स्त्रीवर बलात्कार होतो तेंव्हा
- मानवी हक्कावर आक्रमण, शारीरिक तसेच मानसिक व्यथा हे सगळे त्यात आले. एक प्रकारे पूर्ण पराभव झाल्यासारखे वाटते. काही जणींना कायमचे डिप्रेशन येते.
म्हणून हा गुन्हा भयंकर आहे, दुर्दैवाने देवाने केवळ जे वंश पुढे चालू ठेवण्यासाठी दिले त्याचा अतिरेकी वापर करणे माणसाला सुटत नाही!!

सगळे धर्म गेले चुलीत, सगळे कायदे गेले चुलीत, काहीहि करा. जोपर्यंत संयम हा गुण लहाणपणापासून मनावर बिंबवला जात नाही तोपर्यंत कश्शाचा काही उपयोग नाही.

Pages