मुक्त लैंगिक व्यवहार स्विकारल्यास बलात्कार कमी होतील काय????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 2 November, 2016 - 11:15

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मायबोलीवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तसेच काहीसे लैंगिक इच्छांचे आहे...<<

थोडा असहमत या विचाराशी. वंश/रेस पुढे चालु रहावा याकरता लैंगिक इच्छा/उर्मी यांचं प्रयोजन निसर्गाने केलेलं आहे (आॅल लिविंग क्रिचर्स आर वायर्ड दॅट वे); हाव, लालसा, हिंसा, बळजबरी वगैरे त्याचे साइडइफेक्ट्स आहेत. वर बर्याच जणांनी उल्लेख केलेले उपाय बलात्कारांचं प्रमाण कमी करु शकतील परंतु ते शुन्यावर आणणं हे जवळजवळ अशक्य...

मुक्त लैगिक व्यवहार हे सोलुशन असेल तर नुडिस्ट कॅंप्समध्ये कडक नियमावली असुनहि बलात्कार का होत असावेत?..

हे साईड एफेक्ट्स संयमात ठेवणे याचेच शिक्षण मिळायला/द्यायला पाहिजे.
मला माहित नाही कसे ते. सध्या तरी ही गोष्ट वैयक्तिक पातळीवर ज्याने त्याने जमेल तसे जमवावे.
जसे डायेट, त्यात शिकवायचे काय? ज्याचे त्याने करावे.
तसेहि सगळेच पुरुष उठून बलात्कार करायला जात नाहीत, कदाचीत इतर विवाहबाह्य संबंध वगैरे प्रकार करत असतात पण बलात्कार नाही.

आज सकाळचीच टीव्हीवरील बातमी, खामगाव (की कोणते गाव?) येथिल "आश्रमशाळेतील" दहा पेक्षा अधिक मुलिंवर आलटून पालटून गेला काही काळ सातत्याने सामुहिक बलात्कार होत होता. कशी कोण जाणे या प्रकाराला वाचा फुटलीये.
(विरोधी पक्ष आचरटासारखे त्याचेही राजकारण करीत मुख्यमन्त्री अन मुंडे यांचे राजिनामे वगैरे मागताहेतच )

प्रश्न असा, की वरील "कटकारस्थानयुक्त" दीर्घकाळ चालत आलेले सामुहिक बलात्काराचे गुन्हे हे देखिल "मुक्त लैंगिक व्यवस्था" नसल्यामुळे(च) होताहेत, असे धागाकर्त्यास वाटते काय?

या व अशाचस्वरुपाच्या बलात्कारांच्या विविध घटनातील "पुरुषांचे" कोणत्या प्रकारचे "लैंगिक दमन" झाले होते यावर धागाकर्ता त्याचेकडील "आकडेवारीने" काही "प्रकाश" पाडू शकेल काय?

<<विरोधी पक्ष आचरटासारखे त्याचेही राजकारण करीत मुख्यमन्त्री अन मुंडे यांचे राजिनामे वगैरे मागताहेतच>>
------ असा राजिनामा मागण्याचा हा पहिलाच आचरटपणा नाही आहे. या आधी अनेक अनेक वेळा मुख्यमन्त्र्यान्चे राजिनामे मागितले गेले आहेत. तेव्हा राजिनामे मागणारे वेगळे होते, आज तसा आग्रह धराणारे वेगळे आहेत. चालायचेच.

वरील सर्व प्रतिक्रिया वाचल्या. पॉलीगॅमी हा शब्द मी माझ्या प्रतिक्रियेत प्राणीशास्त्राच्या व्याखेनुसार वापरला आहे. म्हणजे "एकापेक्षा अधिक जोडीदारांशी लैगिक संबंध ठेवण्याची नैसर्गिक प्रवृत्ती" या अर्थाने. काही प्राणी मोनोगॅमस असतात. पण नैसर्गिक दृष्ट्या मनुष्य हा पॉलीगॅमस आहे आणि विवाहपद्धती व मालकीहक्क यामुळे त्यावर बंधने आली त्याचे विस्तृत विवेचन मी माझ्या पोष्ट मध्ये केले आहे.

सगळे नसले तरी बहुतांश बलात्कार हे लैगिक स्वातंत्र्य न मिळाल्याने होतात (बाकीच्या केसेस मध्ये लैगिक बंधने हि अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतात. कसे ते नंतर सांगतोच आहे). दिल्लीतील २०१२ च्या निर्भया प्रकरणातील आरोपीने बीबीसीने घेतलेल्या मुलाखतीत समाजाला प्रश्न विचारला आहे कि "आम्हाला हे (लैगिक सुख) मिळण्याचा अधिकार नाही का?". यावरून लैगिक सुखासाठी समाजात जे पर्याय आहेत ते किती अपुरे आहेत. किंबहूना तितकेसे प्रभावी नाहीत हे दिसून येते. (Disclaimer: इथे बलात्काऱ्याचे समर्थन करण्याचा कोणताही हेतू नाही. पण समस्या सोडवायची तर दोन्ही बाजू समजून घेणे महत्वाचे आहे.)

यावर कायदे, शिक्षा, मार्गदर्शन, संयम या गोष्टी म्हणजे WORKAROUND आहेत. पण SOLUTION नव्हे. पाणी प्यायला बंदी घालून तुम्ही लोकांना तहानेवर संयमाने नियंत्रण कसे करावे यावर मार्गदर्शन करणार आहात का? तरीही कोणी पाणी चोरून प्यायला तर त्याच्या जिभेला चटके देण्याची किंवा जीभ कापण्याची शिक्षा करणे हा त्यावर उपाय आहे का? लैगिक जोडीदारावरचा मालकीहक्क टिकवण्यासाठी इतका खटाटोप? कशासाठी?

असो. बलात्कारांना लैगिक बंधने नव्हे तर वर्चस्व दाखवण्याची वृत्ती कारणीभूत आहे असा दावा काहीनी प्रतिक्रियांमधून केला आहे. युद्धात शत्रूच्या सैनिकांनी केलेले बलात्कार. किंवा जातीय अथवा धार्मिक द्वेषातून केले गेलेले बलात्कार याची उदाहरणे यासाठी दिली गेली आहेत.

हे बलात्कार थेट पणे लैगिक भुकेतून जरी झाले नसले तरी त्याचे मूळ कारण कुठे आहे? शत्रूचे सैनिक किमती वस्तूंची व मालाची लुटालूट करतात. धार्मिक वा जातीय दंगलीत सुद्धा हे घडते. का? कारण "तुझ्या मालकीच्या वस्तूवर मी माझा हक्क सांगतोय" ही वर्चस्व दाखवणारी भावना त्यात असते. अगदी हीच भावना बलात्कार करताना पण असते. मान्य. पण ती का येते? मुळातच विवाह, मालकी हक्क, लैगिक बंधने नसती तर हे घडले असते का? क्षणभर कल्पना करू कि त्या शत्रूने अनेक वर्षांपासून असे जाहीर केले आहे कि,

"इथले पाणी हे फक्त आणि फक्त आमच्याच मालकीचे आहे. इतरांनी ते पिण्याची हिम्मत सुद्धा करू नये. आम्ही या पाण्याचे प्राण गेला तरी रक्षण करू"

तर काय झाले असते? हेच सैनिक तिथे गेल्यावर तहान लागलेली नसताना सुद्धा विजयोन्मादात तिथले पाणी घटाघटा पाणी प्यायले असते. नाही का? मला वाटते हे उदाहरण खूप बोलके आहे. नैसर्गिक भूक असणाऱ्या गोष्टींवर मालकी हक्क सांगितला, बंधने घातली तर ती गोष्ट ओरबाडून घेण्याचा प्रयत्न हा होणारच. भूक आहे म्हणून किंवा प्रसंगी भूक नसताना सुद्धा.

टोळ्यांच्या काळात बलात्कार नव्हते याला पुरावा काय? हि काही रामराज्याची पुराणकथा नाही. राजवाडेंच्या पुस्तकात सर्व पुराव्यासहित दिले आहे. पण तरीही आपल्याला समजून घ्यायला त्याचीही गरज नाही. प्राण्यांचे उदाहरण घेऊ. त्याकाळात मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळे नव्हते. आज इतर प्राणी हे माणसांपेक्षा अप्रगत आहेत. पण आज लैगिक संबंधांच्या बाबतीत प्राणी हे माणसांपेक्षा सुखी आहेत हे मान्य करावेच लागेल. प्राण्यांमध्ये बलात्कार केवळ अपवादात्मक आहेत. (बाय द वे, मादी नाही म्हणाली म्हणून तिच्यावर बलात्कार केला असे प्राणी करत नाहीत. याच्या मुळाशी सुद्धा त्यांच्यात असणारे लैगिक संबंधांना स्वातंत्र्य हेच आहे. विचार करून पहा). प्राण्यांमध्ये वर्चस्ववाद असतो, आपापला इलाका असतो, लैगिक जोडीदारावरून भांडणेसुद्धा होतात. पण म्हणून काय निसर्गतत्वाच्या विरोधात जाणारा "लैगिक जोडीदारावरचा कायमचा मालकीहक्क" हा प्रकार त्यांनी त्यावर उपाय म्हणून स्वीकारलेला नाही (पुन्हा एकदा, मी पॉलीगॅमस प्राण्यांविषयी बोलतोय). अन्यथा प्राण्यांनी सुद्धा बलात्कार केले असते.

२०१५ साली भारतात बलात्काराच्या चौतीस हजार केसेस रिपोर्ट केल्या गेल्या आहेत. या शिवाय रिपोर्ट न केलेल्या केसेस कितीतरी पटीने अधिक असतील. यावरून हि समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येईल.

वाढत्या बलात्कारांवर उपाय म्हणून काळाचे चक्र मागे फिरवून आपण पुन्हा प्राणी व्हावे असे माझे म्हणणे नाही. पण मानसिकता बदलून सुवर्णमध्य साधता येऊ शकतो असे माझे मत आहे. अर्थात हे करेक्शन येण्यासाठी अजून अनेक पिढ्या जातील.

जाता जाता:
सगळ्या प्रतिक्रियांमधून "बलात्कार हि फक्त पुरुषाची मक्तेदारी आहे" असाही एक सूर नकळत आळवलेला दिसतो. माझ्या आधीच्या पोष्ट मध्ये उल्लेख केल्या नुसार स्त्रीचे इतके दमन केले गेले आहे कि तिला इच्छा असतात, ती सुद्धा पॉलीगॅमस आहे याची समाजाला पूर्ण विस्मृती झालेली आहे. हे इतक्या खोलवर रुजलेय कि आजकालची स्त्री स्वत: सुद्धा त्याची कल्पना करू शकत नाही. स्त्री बलात्कार करू शकत नाही का? निसर्गात समतोल असतो. स्त्रिया पण बलात्कार करू शकतात. काही वर्षापूर्वी यावर एक चित्रपट पण येऊन गेला आहे.

@vijaykulkarni, निर्भया प्रकरणातील आरोपींना आपली भूक भागवण्याचे अन्य उपाय उपलब्ध नव्हते काय ? >> समजा गृहीत धरू, की आपली भूक भागवण्यासाठी इतर मार्ग त्यांना उपलब्ध होते. मग त्यांनी हा मार्ग का निवडला ?
एक कारण तर असे असू शकेल, की एक तर त्यांना आपला हक्क वाटला आणि कायद्याचे भय राहिले नाही. बालपणापासून कदाचित त्यांच्या मनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बिंबवले गेले असेल की असे सुख फक्त ओरबाडून मिळते, आणि तो पुरुषाचा हक्कच आहे. म्हणजे येथे स्त्रीच्या निवडीचा किंवा त्यांच्या होकार-नकाराचा विचारच नाही, कारण अशी काही गोष्ट असते हेच मुळात बऱ्याच जणांच्या गावी नसते.
बरे मग आता प्रश्न असा येतो की स्त्रीची निवड हा मुद्दा आपल्या ध्यानीमनी का नसतो? माझ्या मते तरी याची २ कारणे असावीत :

१) अपुरी माहिती - लैंगिक विषय आणि आवडीनिवडी , पुरुषांच्या वा स्त्रियांच्या, जाणून घेण्याच्या किती संधी आपला समाज देतो? थेट शारीरिक संबंध जाऊद्या, आपण अजूनही या विषयावर उघडपणे बोलू शकत नाही. भिन्नलिंगी व्यक्तीची स्वतःची काही मते असू शकतात, हे आपल्याला त्यांच्याशी, अन बरोबरीने इतर समाजाशी उघडपणे चर्चा करूनच कळेल, अन मग पुढे ज्याला त्याला आपल्या आवडीप्रमाणे जोडीदार निवडता येईल. यासाठी लैंगिक संबंधाबाबत किमान मोकळेपणा तर हवा?

२) संबधाबाबत नकार - एखाद्याने शारीरिक सुखाची मागणी केली अन त्या स्त्रीने/पुरुषाने नकार दिला, तरीही तो नकार स्वीकारला का गेला नाही? कारण या सुखासाठी इतर कोणीतरी होकार देईल, अशी संधीच मुळात त्या व्यक्तीला दिसत नाही. काही ठिकाणी मिळाला नकार, पण इतर ठिकाणी होकार मिळू शकतो, हेच आपल्या गावी नसते. कारण अशा संबंधावर असलेला बहिष्कार, मग तो परस्पर सहमतीने ठेवला असला तरीही. यामुळे बहुतेकदा उघडउघड वेश्येकडे जाणेसुद्धा टाळतात, आणि नकाराची ही साखळी अशीच लांबत जाते. एका क्षणी मग काहीजण तो स्विकारु शकत नाहीत, आणि संधी मिळते तेव्हा असे बलात्कार केले जातात.

या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील, तर आपल्या समाजात अशा संबंधाबाबत (भले मग व्यक्ती स्त्री असो व पुरुष) मोकळेपणा यायला हवा. मोकळे शारीरिक संबंध (किमान लग्नापूर्वीचे) जर उघडपणे स्वीकारले, तर स्त्रीची स्वतःची निवड हीसुद्धा आपसूकच वर येईल. अन शारीरिक सुखाबाबत सतत मिळणार नकार या गोष्टी सुद्धा कमी होतील.

अन असे वयातल्या मुला-मुलींचे उघड संबंध नवीन अजिबातच नाहीत, कंबोडियात "Love hut" नावाची परंपरा अजूनही अस्तिवात आहे, जी बरीचशी मुक्त लैंगिक समाजासारखीच आहे.

खालचे निरीक्षण आवर्जून नमूद करावेसे वाटते -
According to villagers, divorce and sexual violence in the community remains non-existent, and young women only engage in relationships with those they feel comfortable with. (संदर्भ - http://www.dailymail.co.uk/news/article-2174389/Cambodian-fathers-build-...)

यासंर्भातला National Geographic ची ही तीन मिनिटांची चित्रफीत याबाबत आणखी माहिती देऊ शकेल.

निर्भया प्रकरणातील मुले आर्थिक बाबत्वेत स्वावलंबी होती का ? ते नसताना त्याना समाजाने अधिकार नेमका कसा द्यायला हवा होता ?
रेशनवर मुली सप्लाय करायच्या ?
एखाद्या श्रीमंताने गरीब युवकाची दया येऊन त्याला घरजावई करुन घ्यायचा?
वेश्यांनी खास गरीब बेरोजगारांसाठी एखादा दिवस फ्री सर्विस द्यायची?
सेक्स टॉय घेण्यासाठी शासकीय अनुदान देणे?

समाजाने नेमकं काय करायला हवं ?
-------------------------------

हस्तमैथुन , लग्न , मैत्री , पेड सेक्स .... ज्यान हवे तसे करावे.... समाज कुठे मध्ये येतो ?

इनामदार पाण्याचे उदाहरण गैर लागू आहे. इथे पाणी कंसेट देत नाही. बलात्कारामधे कंसेट नाहि म्हणून वर्चस्व गाजविण्याची भूमिका येतेय.

>> इनामदार पाण्याचे उदाहरण गैर लागू आहे. इथे पाणी कंसेट देत नाही. बलात्कारामधे कंसेट नाहि म्हणून वर्चस्व गाजविण्याची भूमिका येतेय.

तुम्हाला उदाहरण कळलेले नाही. "कंसेट नाहि म्हणून वर्चस्व गाजविण्याची भूमिका" हा प्रकार मग प्राण्यांमध्ये का नसतो?

माझ्या आधीच्या पोष्ट मध्ये उल्लेख केल्या नुसार स्त्रीचे इतके दमन केले गेले आहे कि तिला इच्छा असतात, ती सुद्धा पॉलीगॅमस आहे याची समाजाला पूर्ण विस्मृती झालेली आहे. हे इतक्या खोलवर रुजलेय कि आजकालची स्त्री स्वत: सुद्धा त्याची कल्पना करू शकत नाही.>>>>>>> विस्मृती झाली त्याला आपल्या समाजाचे एवोल्युशन जबाबदार आहे आणि काही बाबतीत ती योग्य किंवा जस्ट नॅचरल ऑर्डर ऑफ थिंग्स आहे. तुम्ही एका पोस्ट मध्ये लिहिलय तसं आधी स्त्रियांचं संरक्षण ह्यानी गोष्टी सुरु होऊन पुढे त्याचा विपर्यास होऊन पुरुषी वर्चस्व प्रमाणापेक्षा जास्त वाढलं.
आता मागच्या काही वर्षांमध्ये स्त्रियांचे हक्क, मुलांचं एकत्र संगोपन (म्हणजे संगोपनात पुरुषांचा पण एक्वल सहभाग) ह्या गोष्टींना महत्वा यायला लागलं आहे. का? कारण स्त्रियांनी पुढे येऊन त्यांचे हक्क मागायला सुरवात केली आहे म्हणजेच त्यांना ज्या गोष्टी योग्य वाटतात ते करायचं स्वातंत्र्य त्या मागत आहेत. त्यांच्या इच्छांचे दमन होत आहे आणि त्यात लैंगिक स्वरुपाच्या (?) इच्छा सुद्धा असतील पण फक्त त्याच इच्छा आहेत असं आजिबात नाहीये. मुळात, तुम्ही ज्या इवोल्युशनचा दाखला देताय त्यानुसार सुद्धा लॉजिकली स्त्रियांना एकच युटेरस असल्यामुळे एका वेळेस एकच मूल वाढवता येत असल्यामुळे जास्तीत जास्त पुरुषांशी संबंध ठेवण्यात रस नसतो. ह्या उपर मी म्हणेन की स्त्रियांना इच्छा होतात. पण अ त्या केसेस मध्ये जो मुद्दा पुरुषांना लागू होतो तोच त्यांना पण होतो. त्या हवं त्याच्याशी संबंध ठेवू शकतात पण त्या व्यक्तींची संमती महत्वाची आहे. स
रतेशेवटी लैंगिक इच्छांचे दमन होऊन ऑपोझिट सेक्स शी जबरदस्ती/अतिप्रसंग करुन त्या इच्छा पुरवल्या जात आहेत हे जास्त कुठल्या लिंगा विषयी घडत आहे? पुरुषांबाबत. स्त्रिया सुद्धा बलात्कार करु शकतात पण तो पुरुष करतात त्याच्या तूलनेत सध्या किती वेळा होतो?

"कंसेट नाहि म्हणून वर्चस्व गाजविण्याची भूमिका" हा प्रकार मग प्राण्यांमध्ये का नसतो? >> कंसेट हा प्रकार प्राण्यांमधे असतो कि नाही हा प्रश्न इथे कसा येतोय ? मनुष्यांमधे असतो(च). तेंव्हा प्राण्यांची किंवा कंसेट देउ शकणार्‍या व दिलेला कि न दिलेला कंसेट कळणाया/न कळणार्‍या मनुष्यप्राण्याचे वागणे समजून घ्यायला ईतर उदाहरणे जरुरी नाहित.

सेक्स डिप्रायवेशनमुळे रेप होणे गृहीत धरले तर मग उद्या झोपडपट्टीतील काय्म उपाशी मनुष्याला अंबानीच्या घरावर दगड टाकायचा अधिकार मान्य करायचा का?

अधिकार? अधिकार दोन्ही उदाहरणात नाहीच आहे ना कोणाला?
आणि हो चोर्‍या होतात म्हणजे काय होतं मग? परवानगी शिवाय दुसर्‍याचा एवज हस्तगत करण्यात येतो. दोन्हीही गुन्हे करणारे समाजाचेच प्रॉडक्ट आहेत.

>> स्त्रिया सुद्धा बलात्कार करु शकतात पण तो पुरुष करतात त्याच्या तूलनेत सध्या किती वेळा होतो?
तो त्या तुलनेत फार कमी आहे आणि सामाजिक समतोलच्या दृष्टीने ते चुकीचे आहे (याचा सकारात्मक अर्थ पुरुषांनी केलेले बलात्कार तुलनेने खूप कमी होणे आवश्यक)

>> कंसेट हा प्रकार प्राण्यांमधे असतो कि नाही हा प्रश्न इथे कसा येतोय ?
असतो कि नाही हा प्रश्न नाही. प्राणी कोणताही असो (मनुष्य वा मनुष्येतर) कंसेट हा घ्यावाच लागतो. फरक इतका आहे कि मनुष्येतर प्राण्यांमध्ये जर तो दिला नाही (समजा मादीने) तर (नराकरवी तिच्यावर) बलात्कार होत नाही. आणि हे पॉलीगॅमीसाठी आवश्यक ती लैगिक मोकळीक असल्याने घडते असे मला म्हणायचे आहे. याउलट मनुष्य प्राण्यांमध्ये मात्र नकार आला कि "बंधनांमुळे आधीच जोडीदार मिळणे मुश्कील त्यात आणि तुझा नकार" या फ्रस्ट्रेशन मधून बलात्कार होतात. विवाह व इतर बंधनांमुळे नैसर्गिक पॉलीगॅमी वृत्तीसाठी आवश्यक ते एकापेक्षा अधिक लैगिक जोडीदार मिळवणे मनुष्य प्राण्यांसाठी इतके सोपे राहिलेले नाही जितके कि ते इतर प्राण्यांमध्ये आहे. परिणामी काहींकडून बलात्कार होतात.

याउलट मनुष्य प्राण्यांमध्ये मात्र नकार आला कि "बंधनांमुळे आधीच जोडीदार मिळणे मुश्कील त्यात आणि तुझा नकार" या फ्रस्ट्रेशन मधून बलात्कार होतात. >> बलात्कार करणारे सगळे जण ह्या फ्रस्ट्रेशन मधून बलात्कार करतात असे तुम्हाला का वाटते ? खैरलांजी सारखे प्रकरण आठवा. विकसित देशांमधे मुक्त संबंध ठेवण्याची मुभा असतानाही बलात्कार का होतात ? फ्रस्ट्रेशन हा घटक मुख्य नसून त्यावर ताबा न ठेवता समोरच्या व्यक्तीवर हक्क बजावणे हा मुख्य गुणधर्म आहे. बलात्कार ह्या शब्दामधला 'बल' हा पहिला भाग बोलका आहे.

अरे असामी काही सोडेना राव बल आणि वर्चस्वाला. Lol असामी, तो मुद्दा मान्य आहे पण मी टिपापात लिहिलं तसं काही केसेस मध्ये तो फॅक्टर मेजर होता, बर्‍याच ठिकाणी फक्त भावनांना वाट करुन देणे हाच मुद्दा असतो. दर वेळेस असतो असंही नाही. आता अगदी रिसेंट बातमी आली अंबोळीच्या केसची. टोटली रँडम स्त्रिया ह्या अशा पुरुषांच्या तावडीत सापडल्या गेल्या आहेत. त्यात त्यांना वर्चस्व वगैरे काहीही दाखवायचं नव्हतं. They only needed "a woman".

तो बलात्कारातला "बला" हा अबला ह्याच्याशी संबंधित असावा का? बल = शक्ती असा नसून.

बुवा Sorry, I do not find this joke worthy. तुम्ही वर्चस्व ह्या मराठी शब्दाऐवजी power, domination हा शब्द धरुन विचार करून पहा, मुद्दा स्पष्ट होईल. तुमचे They only needed "a woman". हे वाक्य They only needed "a woman" to exercise power असे वाचा. म्हणून कंसेट हा प्रकार बाजूला सारला जातो ह्या प्रकारांमधे.

बल = शक्ती असा नसून >> बळजोरी हा शब्द ऐकलाय ?

सॉरी, आय डू कारण मी तू लावून धरत आहेस त्याला हसलो, मूळ त्याच्या अर्थाला नाही. आता शेवटचं लिहितो, वि कॅन अग्री टु डिसग्री आफटर धिस. नीडेड टु एक्सरसाईज पावर हे आजिबात फिट बसत नाही कारण मी सांगितलेल्या उदाहरणात तो फॅक्टर कार्यरतच नाहीये.
पावर किंवा डॉमिनन्स म्हणजे मी हे करु शकतो किंवा केलं तरी कोणी माझं काही करु शकत नाही अशा माज प्रवृत्ती मधून येतो. काही केसेस मध्ये प्युअर्ली वर्चस्व दाखवायला, समोरच्याला शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या पार मातीत घालायचं ह्या हेतूनी बलात्कार केला जाऊ शकतो.
सध्या जी स्त्रियांना रात्रीचं कुठे एकटेपणानी जाण्याची भिती वाटते त्या केसेस मधे इन्वॉल्व्ड असलेल्या पुरुषांना त्यांच्या वासना शमवायला फक्त एक स्त्रि देह हवा होता. इट डिडंट मॅटर हु, व्हेअर. ह्या केसेस आजिबात वर्चस्व ह्या सदराखाली येत नाही कारण असं करुन ह्या पुरुषांना कुठेच वर्चस्व गाजवायला मिळालेलं नाहीये. काही मिळालं असेल तर काही मिनिटांचं सुख ज्या करता ते स्वतःच आणि त्या स्त्रिचं आयुष्या पुर्णपणे बरबाद करायला तयार होतात. कित्येक पुरुष हे अगदी गरिबीत राहाणारे आहेत, त्यांना मनाच्या कोपर्‍यात माहित असतं की आपलं काही खरं नाही पण ते इतके अंधळे झालेले असतात की एक तर त्याची फिकिर करत नाही किंवा आपण जे होईल ते बघून घेऊन असं म्हणून पुढे सरकतात.

पण बुवा,
१. प्रत्येक उदाहरणात सगळेच्या सगळे फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ड असतात असं नाहीच.
२. बलात्कार हा बळाचा वापर करूनच होतो - individually or collectively बलात्काऱ्यांचं बळ व्हिक्टिमपेक्षा जास्त असेल तेव्हाच तो शक्य असतो.
३. तसं शक्य नसतं तेव्हा मग गर्दीचा किंवा अनॉनिमिटीचा फायदा घेऊन विनयभंग वगैरे प्रकार होतात.

>>> असं करुन ह्या पुरुषांना कुठेच वर्चस्व गाजवायला मिळालेलं नाहीये
the act itself is associated with पुरुषार्थ unfortunately!!

१. प्रत्येक उदाहरणात सगळेच्या सगळे फॅक्टर्स इन्व्हॉल्व्ड असतात असं नाहीच.
बरोबर.
२. बलात्कार हा बळाचा वापर करूनच होतो - individually or collectively बलात्काऱ्यांचं बळ व्हिक्टिमपेक्षा जास्त असेल तेव्हाच तो शक्य असतो.
असामी वर्चस्व असा उल्लेख करत होता म्हणून मला त्याचा अर्थ बळानी समोरच्यावर अतिप्रसंग करणे येवढाच अर्थ अभिप्रेत असेल असं नाही वाटलं. वर्चस्व म्हणजे डॉमिनन्स. डॉमिनन्स ह्याची तुलना पुरुष बलात्कार करताना वापरतो ते बल असा सोपा नाही होऊ शकत. कित्येक वेळा त्या पुरुषांना सुद्धा दुखापत होते, लागतं पण दे बिकम अ‍ॅनिमल्स इन धिस क्वेस्ट.
३. तसं शक्य नसतं तेव्हा मग गर्दीचा किंवा अनॉनिमिटीचा फायदा घेऊन विनयभंग वगैरे प्रकार होतात.
बरोबर आहे आणि ह्या मुद्द्यालाही माझा विरोध नाहीच.

मी म्हणत आहे ते सध्या मेजर इश्यु काय आहे? बर्‍याच केसेस मध्ये एक कॉमन डिनॉमिनेटर दिसून येतो तो म्हणजे सेक्शुअली पिसाळलेले पुरुष. पब्लिक प्लेसेस, ट्रेन, बस, स्टेशनं अशा ठिकाणी गेलं की कोणी काही न करताही स्त्रियांना अगदी जागेवर अनकंफर्टेबल करतील अशा नजरा. अशी नजर का होते? मग पुढे ह्याचं पर्यववसन, स्त्रि एकाकी सापडली की बलात्कारात का होतं? What is at the bottom of this? Not the attitude that I can do it and get away with it. Its just the pure force and drive of the desire to have sex, which comes from bottling up these desires in the first place. Are these desires natural? I don't think so. Which is why trying to solve this problem with polygamy is pure nonsense. (this is for Inamdar)

They only needed "a woman">>+100
असामी, निर्भया प्रकरणात अारोपी आणि पिडीत मुलीची काहीच पूर्वओळख नव्हती, मग तिच्यावर असे कोणते वर्चस्व गाजवण्याचा प्रश्न येतोच कुठे?
मध्यंतरी उबेर चालकाकडून परदेशी महिलेवर, जिचा आरोपीशी संबंध फक्त एक अनोळखी गिर्हाईक ईतकाच होता, तिच्यावर झालेला बलात्कार, किंवा वर लिंबूभाऊंनी म्हटल्याप्रमाणे अल्पवयीन मुलामुलींवर केलेले अ़त्याचार यात सूडभावना कशी येऊ शकते? ५-६ वर्षांच्या लहान मुलावर कोण कुठला सूड उगवण्यासाठी बलात्कार करेल?

लैंगिक संबंधातून मिळणारा आनंद क्वचितच इतर कुठल्याही आनंददायी कृतीतून मिळतो. साहजिकच ते मिळवण्याची लालसा, अन तिचे शमन न झाल्यास तो येनकेनप्रकारे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, ही साधी गोष्ट आपण का नजरेआड करतोय? का ही गोष्ट समजून घेण्यात आपली शरीरसुखाविषयीची किळस आड येतेय?

ह्या केसेस आजिबात वर्चस्व ह्या सदराखाली येत नाही कारण असं करुन ह्या पुरुषांना कुठेच वर्चस्व गाजवायला मिळालेलं नाहीये. >> Exactly my point being. This allows them to exercise the power which manifests as a rape. असो, अ‍ॅस यु सेड वि कॅन अग्री टु डिसग्री आफटर धिस.

राजवाडेंचे पुस्तक पुन्हा शोधून वाचले. त्यात बलात्कार नि मुक्त लैंगिक संबंध ह्यांचा परस्पर संबंध लावलेला आढळला नाही.
http://www.marathipustake.org/Books/bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf

विलभ तुम्ही आधीही सूड म्हणजे वर्चस्व असे धरून पोस्ट लिहिली होती. ह्या दोन्ही गोष्टी वेगऴ्या आहेत.

असामी, निर्भया प्रकरणात अारोपी आणि पिडीत मुलीची काहीच पूर्वओळख नव्हती, मग तिच्यावर असे कोणते वर्चस्व गाजवण्याचा प्रश्न येतोच कुठे? >> पुरुषार्थाचे वर्चस्व. तुम्ही ह्या प्रकारावरची documentary बघितली असेल तर तुम्हाला आठवेल कि ह्या प्रकारातील आरोपी नि त्यांचे नातलग, 'लडका तो है. ऐसाही करेगा' असा सूर लावून बोलतात. ह्यात 'लडका असणे' हा माज नि त्यानुषंगाने येणारी dominating attitude हे त्या बलात्काराचे कारण.

निर्भया प्रकरणात बलात्कारी इकॉनॉमिकली लोअर आणि सोशली मागासलेल्या वर्गातले असण्याचा उहापोह झाला होता. 'शिकलेली, मित्राबरोबर आत्मविश्वासाने अवेळी फिरणारी तरूण मुलगी' ही फक्त डिजायरला चिथावणी नव्हती - ऑन अ सटलर लेव्हल इन्सिक्यूरिटीला डिवचणीही होती! 'साली औरत हमपे रौब जमायेगी?!' हा राग होता.
२+२=४ इतकं सोपं इक्वेशन नाही ते!

>>> desire to have sex, which comes from bottling up these desires in the first place
Are you claiming that all or majority rapists are in some way sexually deprived?

आता मोठी पोस्ट लिहायला घेतली पण तेवढ्यात लक्षात आलं.
पुरुषार्थाचे वर्चस्व. तुम्ही ह्या प्रकारावरची documentary बघितली असेल तर तुम्हाला आठवेल कि ह्या प्रकारातील आरोपी नि त्यांचे नातलग, 'लडका तो है. ऐसाही करेगा' असा सूर लावून बोलतात.>>>>>>>>> हे झालं कृत्य केल्या नंतरचं स्पष्टिकरण. जे अत्यंत दुर्दैवी आहे ती वेगळी गोष्ट.

'शिकलेली, मित्राबरोबर आत्मविश्वासाने अवेळी फिरणारी तरूण मुलगी' ही फक्त डिजायरला चिथावणी नव्हती - ऑन अ सटलर लेव्हल इन्सिक्यूरिटीला डिवचणीही होती! 'साली औरत हमपे रौब जमायेगी?!' हा राग होता.>>>>>>> हा मह्त्वाचा मुद्दा आहे. ह्या उदाहरणात त्या मुलांनी ही मित्राबरोबर एकटी फिरते म्हणून हीला धडा शिकवावा म्हणून बलात्कार केला गेला की हे बलात्कार केल्यानंतरचं स्पष्टिकरण होतं?

मला मुद्दा लक्षात आला तुमच्या दोघांचा आणि मला डॉक्युमेंटरी बघायला जमली तर बघेनच (येवढा जीव होत नाही बघायला). जर बर्‍याच केसेस मध्ये पुरुष लोकांचा फक्त माज, की मे हे करु शकतो, हा ड्रायविंग फोर्स असेल तर आय विल स्टँड करेक्टेड. The only thing is, I strongly feel, that person's desire to have sex is most of the times the first major factor to push them toward that act. To dominate or put them down is something that gets attached later. Like in examples above it came out as an excuse to justify what they did.

Are you claiming that all or majority rapists are in some way sexually deprived?>>>>>> Not all but in most of the cases in India because our environment is producing sexually deprived men.
Number one underlying factor in my view is the skewed male to female ratio. Men just don't have enough women partners.

Pages