पुलाव हरियाली (चटणी भात)

Submitted by टवणे सर on 15 October, 2016 - 15:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदूळ
१/३ कप मटार
१/२ कप ओला नारळ
१ कप कोथिंबिर
२ हिरव्या मिरच्या
१/२ कप पेक्षा थोडा जास्त पुदिना
१०-१२ काजू
२-३ चमचे तेल अथवा तूप
१-२ तमाल पत्र
१/२ चमचा साखर
२ चमचे जिरे
२ चमचे दही
एक छोटा कांदा उभा चिरलेला
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
चवीनुसार मीठ

क्रमवार पाककृती: 

नारळ, कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करून घ्या.

तांदूळ धुवून घ्या व बाजूला ठेवा.
पातेल्यात तूप घालून गरम करा. तूप तापले की त्या मध्ये जिरे व तमालपत्र घालून परता. मग त्यात नारळा/कोथिंबीरीची केलेली पेस्ट घाला आणि ६-७ मिनिटे कोरडी होईतोवर परता. मग कांदा घाला व परता.
त्यानंतर तांदूळ घालून परता व शेवटी काजू घाला.
यात तांदळाच्या अडीच पट पाणी घाला. त्यात जिरे पूड, धने पूड, साखर, मीठ, मटार घाला. दही घुसळून ते घाला.

पाण्याला उकळी आली की झाकण ठेवून भात शिजू द्या.

हा भात रायत्याबरोबर छान लागतो.

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी
माहितीचा स्रोत: 
बायको
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्स्स्स्स्स्स..... लागणार्‍या जिन्नसांची यादी वाचत असता जर महातोंपासु झाले तर रेसिपी हिट्टं आहे असं म्हणायला हरकत नाही..सुपर लाईक!!

भरत. मटर ऑपशनल असू शकतील बहुतेक Happy

नैतर तेव्हढे मटर घालून झाले कि फोटो जरूर अपलोड करा प्लीज!!! Happy

छान कृती.

मी केली तर बहुतेक क्रम बदलेन, आधी काजू परतून काढेन. मग कांदा, मग मटार मग चटणी आणि मग तांदूळ.

छान प्रकार...घरात काल पाणी-पुरी मसाल्या साठी केलेली पुदिना-कोथिंबीर-मिरची ची पेस्ट शिल्लक आहे. त्याचे काय करायचे हा विचार करत असतानाच ही कृती आली. आता त्यात नारळ घातला की झालं!

मी केली तर बहुतेक क्रम बदलेन, आधी काजू परतून काढेन. मग कांदा, मग मटार मग चटणी आणि मग तांदूळ. >> मी पण हाच क्रम वापरेन.

रेस्पी भारी आहे! नक्की करून बघणार. प** / **टे घालणार (नाही).

स्वाती Lol

कोसल्यापासून कोसल्यापर्यंत जाहलेली टण्याची प्रगती बघता ह्या पदार्थाला 'हरित क्रांती' किंवा तत्सम नाव द्यायाला हरकत नाही. Proud

मस्त वाटतेय रेसिपी. सगळे पदार्थ घरी नेहमी असणारे आहेत. त्यामुळे लवकरच करणार

नाव बदला ब्वॉ रेस्पीचं ! चटणी भात काय >> सात्विक मटार चटणी खिचडी म्हणा मग Proud

चला नाव बदलले आहे.

या पाकृमध्ये माझा सहभाग फक्त ती इथे टंकणे इतकाच आहे!

या पाकृमध्ये माझा सहभाग फक्त ती इथे टंकणे इतकाच आहे!

<<

हंऽऽऽऽऽ

म्हंजे(च) टण्या पुलाव नसून, चटणी पुलाव आहे तर.

.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
टीपः
हलके घेणे.
टण्या/टणी अशी कोटी करायचा क्षीण प्रयत्न केलेला आहे.

(च)टणी पुलाव >> Lol
मस्त रेसिपी.
दीपची कोथिंबीर चटणी मिळते ती घालून एकदम झटपट होतो. काजू भरपूर घातले की शाही पण होतो.

>>दीपची कोथिंबीर चटणी मिळते ती घालून एकदम>> बघा, दीपची चटणी कशी मल्टीपर्पज आहे हे पटतंय तर लोकांना. Wink
मस्तय रेसिपी.