Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राणी नसेल तर छोटारे बरोबर
राणी नसेल तर छोटारे बरोबर आम्हाला तरी डिनर ची कुपने द्या>>
'एव्हढं डोकं असलेली बाई मी
'एव्हढं डोकं असलेली बाई मी आजपर्यंत बघितली नाही' म्हणजे काय? :रागः सगळं डोकं देवाने ह्या तिघांनाच दिलंय का? मग अजून केस सॉल्व्ह झाली नाही ते.
त्या मराठेने रेखासोबत तिचा
त्या मराठेने रेखासोबत तिचा भाऊ होता म्हटल्यावर छोटारे आणि कंपनीने केसशी संबंधित सर्व पुरुषांचे फोटो दाखवायला हवे होते ना ह्यांना? तसेच निघून आले आणि आता खल करताहेत बावळट. ते दोघे कॉन्स्टेबल तर एव्हढे माठ आहेत. म्हणे ह्या लोकांना उभं करू कोर्टात. अरे त्याने धनंजय सरदेसाईच्या केसमध्ये काय सिध्द होणार? त्यांच्या बोलण्यात तर सारखं 'सर, मी काय म्हणतो' असंच असतं.
घ्या.आता त्या निनावी फोन करणार्या माणसाला शोधताहेत. मला तर वाटलं की छोटारे शरदला 'तू मध्येमध्ये बाहेर जातोस म्हणे' असं म्हणाले त्याचा अर्थ त्यांना तोच फोन करायचा हे कळलंय.
छोटारे म्हणतात की हा मांजर-उंदराचा खेळ आहे. कोण कोणावर झडप घालणार हे टायमिगवर अवलंबून आहे. मला तर वाटत होतं की मांजर उंदरावर झडप घालतं. हा कोण बरं दारासिंग उंदिर मांजरावर झडप घालणारा?
आता त्या दुसर्या
आता त्या दुसर्या कॉन्स्टेबलला राणीच्या बंगल्यावर जायचे डोहाळे लागलेत. म्हणे राणी सरदेसाईंच्या घरी कधी जायचं. तिथे काय गावजेवण आहे काय रे ठोंब्या......तिथे जाण्यासारखं काही हाती लागलंय का तुमच्या अजून.....
शरद राणीशी डबलक्रॉस करणार आहे काय अशी एक शंका येते मला. आणि एव्हढे कोटी रुपये मिळून राणीला चांदीचे देव आणि चांदीची ताटं न्यायची आहेत म्हणे. हे नाही वाटतं मिडल क्लास??
संगीता माठाधिपती आहे. :रागः
अजून किती भाग बाकी आहेत? आणि
अजून किती भाग बाकी आहेत? आणि तपास कुठवर आला?
दोन भाग, आज आणि उद्या. ते बघ,
दोन भाग, आज आणि उद्या. ते बघ, सर्व समजेल, बाकी फार महत्वाचं नाही. मी हल्लीच बघायला सुरुवात केली.
छोटारेना राणी आणि गुलामाचा
छोटारेना राणी आणि गुलामाचा लग्नातला फोटु सापडला असं दाखवतायेत .
आता सगळ तर आपल्याला माहितिय , फक्त ठाकुर साहेबाना कस आणि काय , कधी कळलं हे बघायच
राणीला अटक केली. जेव्हा ती पो
राणीला अटक केली. जेव्हा ती पो. स्टेशन मधे कॉफी मागवते तेव्हा लगेच कॉफीची ऑर्डर देतात. मस्त केबीन मधे बसून चौकशी ला सुरुवात करतात. आता फक्त त्या राणी साठी पायघड्या घालयच्या बाकी राहिल्या होत्या.
आज शेवटचा भाग. शरदला मारहाण
आज शेवटचा भाग. शरदला मारहाण करून त्याकडून सगळे राणीच्या बरोबरीने केलेले गुन्हे वदवून घेणार कि संपली मालिका
मला पॅटर्न कळला आहे
मला पॅटर्न कळला आहे गुन्हेगाराचा , तुला फोन येइल असं कोठारे नेहाला का सांगतो? राणी नेहाला फोन करते का?
हो, बर्याचदा.
हो, बर्याचदा.
पण मग ट्विस्ट काय आहे? केस
पण मग ट्विस्ट काय आहे? केस कशी सॉल्व्ह केली ते सांगणार नाहितच का मग?
आजचा भाग पाहिलाच पाहिजे.
शरद ने इतक्या वेळा फोन केला
शरद ने इतक्या वेळा फोन केला तेव्हा आपला हिरो गप्पा मारत बसला होता आणि काल अचानक त्याला त्याचा शोध लागला. सिमकार्डवाल्याला 'तू खरे सांगितले नाहीस तर तुझ्या बायकोला तू काय काम करतोस ते सांगेन' या धमकीवर खरे बोलायला भाग पाडले
संगिताला ती सापडल्यावर 'सर ती घाबरली आहे, आता काही बोलणार नाही' असे बोलून गप्प केले.
राणी आणि शरद चा फोटो सापडला नसता तर पोलिसांकडे बाकी काहीच पुरावा नव्हता.
ज्या कंपनीच्या दोन्ही मालकांचा खून झालाय आणि त्याबद्दलच्या केसचा निकालही लागला नाही अशी कंपनी रतोरात विकून पळून जाता येते का?
आणि आता धडाधड सगळे पुरावे
आणि आता धडाधड सगळे पुरावे फेकतोय छोटारे राणी समोर
राणी सगळं नाकारतेय आणि शरद
राणी सगळं नाकारतेय आणि शरद सगळं मान्य करतोय.
संपली ना. आता आज रात्री D3
संपली ना. आता आज रात्री D3 आहेना. डिनर twist काही नाही दाखवला, परत पार्ट २ आणणार आहेत का
पुचाट होती.
मला आवडली ही मालिका! कोठारे
मला आवडली ही मालिका!
कोठारे आणि राणी दोघेही आवडले. तावडेंचं कामही छान.
शेवट आवडला. अगदीच अपेक्षाभंग
शेवट आवडला. अगदीच अपेक्षाभंग झाला नाही याचा आनंद. पुरावे तरी बर्यापैकी व्यवस्थित दिले छोटारे आणि कंपनीने. राखेचा सारखा पुराव्याशिवाय शेवट केला नाही.. ते जास्त आवडलं.
आजवरच्या गुन्हे तपास
आजवरच्या गुन्हे तपास सिरेलीतली ब्रिलियंट सिरेल असेल ही.
you never know what happen
you never know what happen next. असं काही तरी का म्हणाली राणी ? म्हणजे अजून एक भाग येणार
पण रहस्यमयच करायची आहे मालिका
पण रहस्यमयच करायची आहे मालिका, तर तपासाला अजुन थोडे दिटेल मधे दाखवता आले असते.
आताच्या आधुनिक काळाच्या मानाने पोलिसांचा तपास २-४ कानाखाली वाजवण्यातच संपतोय.
थोडे CID चे एपिसोड्स दाखवले पाहिजे लेखकाला. जरा फॉरेन्सिक वगैरे वगैरे अजुन वढले असते तरी चालले असते.
>>आताच्या आधुनिक काळाच्या
>>आताच्या आधुनिक काळाच्या मानाने पोलिसांचा तपास २-४ कानाखाली वाजवण्यातच संपतोय.
थोडे CID चे एपिसोड्स दाखवले पाहिजे लेखक
सीआयडी मध्ये पण एक कानाखाली वाजवली की गुन्हेगार पोपटासारखे बोलतात एपिसोडच्या शेवटी. फक्त 'अब तुम्हे फांसी होगी फांसी' हे तेव्हढं नव्हतं.
हो, ती ही मालिका खुप छान आहे,
हो, ती ही मालिका खुप छान आहे, असे नाहीच. पण at least एखादी लॅब, इतर पुराव्यांची शोधाशोध एवधे तरी दाखवतात. मला वाटते , फोकस तपासावर दाखवला तर जास्त चांगले वाटले असते.
तसा गुन्हेगार तर पहिल्या एपिसोड मध्यच माहीत होताच की.
'माझिया मना बन दगड' असं
'माझिया मना बन दगड' असं स्वतःला शंभर वेळा बजावत कालचा एपिसोड पाहिला. आणि अपेक्षेप्रमाणेच पुचाट आणि ढिसाळ निघाला. ह्या लोकांना शेवटचा एपिसोड का ग्रिपिंग करता येत नाही????
राणीसारख्या बाईला फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये विष दिलं गेलंय हे कळेल एव्हढंही माहित नसावं? बरं, एकदा जे विष नवर्याला दिलं तेच पुन्हा पटवर्धनांना दिलं? उरलं होतं ते फेकून कशाला द्यायचं हा मिडल-क्लास विचार ह्यामागे होता की काय?
कार मध्ये कोण कुठे बसलंय हे दिसण्याइतपत प्रगत सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या देशात आहेत का? आणि एव्हढा भक्कम पुरावा जवळ असताना छोटारेनी एव्हढा वेळ (आपला!) आणि फुटेज का बरं खाल्लं?
पटवर्धनांच्या घरात खाण्यात किंवा एखाद्या औषधात विष मिसळायची सोय असताना शरद त्यांच्या तोंडात विष ओतायला का बरं गेला? आणि तिथे सापडलेले केस (बहुतेक त्याच्या मिशीचे असावेत!) हे शरदचे आहेत हे छोटारेंना कसं कळलं? शरदच्या डीएनएचं सँपल होतं का त्यांच्याकडे?
शरदसारखा निर्ढावलेला खुनी कानाखाली दिल्यावर बोलायला लागला?
तिवारीचा खून झालाय हे छोटारेंना कोणी सांगितलं किंवा त्यांना कसं कळलं?
हे सगळं जाऊ देत. शेवटी राणी एखाद्या इन्स्पेक्टरचं पिस्तूल खेचून घेऊन पळायचा यत्न करेल किंवा छोटारेला मारायचा यत्न करेल किंवा स्वतःला संपवायचा....निदान नेहाला ओलिस धरायचा तरी प्रयत्न करेल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. छोटारेने राणीकडे शेवटी का पाहिलं? आणि 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' छाप वाक्य राणीने का टाकलं? एक देवाला ठाऊक आणि दुसरं दिग्दर्शकाला.
एकूणात जोरदार धडक देऊन गेलेल्या ट्रकच्या मागे 'फिर मिलेंगे' लिहिलेलं दिसावं तसं वाटलं. अगदी हेच फिलिंग राखेचा चा शेवटचा एपिसोड पाहून आलं होतं. पुढेमागे जमलं तर 'पार्ट २' काढायची सोय असावी हा हेतू आहे की काय?
हे छोटारेंना कसं कळलं? >>>
हे छोटारेंना कसं कळलं? >>> अश्या बर्याच गोष्टी होत्या ज्या छोटारेला कळल्या होत्या म्हणे पण त्या त्याने गुप्त ठेवल्या होत्या कारण जोपर्यंत ठोस पुरावा हाती लागत नाही तोपर्यंत शत्रुला सावध करायचे नव्हते.
छोटारेला मारायचा यत्न करेल किंवा स्वतःला संपवायचा..>> मला पण तसेच वाटले होते. पण अपेक्षाभंग झाला.
मला आवडली ही मालिका! Happy
मला आवडली ही मालिका! Happy कोठारे आणि राणी दोघेही आवडले.>>
मला पण , मीरा सरदेसाई पण आवडली . झी मराठीच्या सध्याच्या मालिकांपेक्षा उजवी होती .
मला आवडली ही मालिका! Happy
मला आवडली ही मालिका! Happy कोठारे आणि राणी दोघेही आवडले.>>
मला पण , मीरा सरदेसाई पण आवडली . झी मराठीच्या सध्याच्या मालिकांपेक्षा उजवी होती .>>>> +१०००
नेहमीपेक्षा वेगळी आणि मस्त मालिका होती. तसही मालिका मध्ये बॉंबच आहे पण ही मालिका वेगळी होती त्यातल्या त्यात. तेजस्विनीने छान अभिनय केला . शेवटही लॉजिकल दाखवला मला राखेचा सारखा पुचाट शेवट करतात की काय असं वाटलेलं
तेजस्विनीने छान अभिनय केला .
तेजस्विनीने छान अभिनय केला . >>> मम. तिची आणि फक्त तिचीच ही सिरीयल होती. आदिनाथ आवडतो मला त्यामुळे फार dashing नाही दाखवला तरी शेवटी मला खटकला नाही, आधी मात्र काहीच रोल नाही त्याला नुसते तिने बोलावलं की जातोय असं होतं मग मी सिरीयल बघायची बंदच केली आणि शेवटी बघितली. पण तरीही ते प शेवटी काहीतरी गेम करेल असं वाटलं होतं म्हणजे होल्ड ठेवायचा प्रयत्न करायला जाईल पण सक्सेसफुल होणार नाही तो वरचढ ठरेल असं काहीतरी दाखवतील हे वाटलं त्यामुळे मला तसं पुचाट वाटलं.
संपले १०० दिवस.. शेवटचा भाग
संपले १०० दिवस.. शेवटचा भाग एकंदरीत मालिकेच्या फुसक्या रेप्युटेशन ला शोभेसा झाला. अजय व गँग ने 'संदर्भासहीत स्पष्टीकरणे' ची ऊत्तरे दिली. शरद चा पेपर (एकाच कानशीलात) फुटला पण राणी बाईंनी मात्र 'सो व्हॉट' म्हणून त्यांना वाटेला लावले.
राणी च्या पुढील मालिकेच्या प्रतीक्षेत
शरद चा पेपर (एकाच कानशीलात)
शरद चा पेपर (एकाच कानशीलात) फुटला >>> करेक्ट ये बात हजम नही हुई. एवढे सहज पटापट खून करणारा लगेच ढेपाळला.
असो मी आपली माझ्या आवडत्या लोकांची सिरीयल चालू झाली ह्या आनंदात.
Pages