अ‍ॅपल रेलिश

Submitted by लालू on 24 February, 2009 - 16:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ अ‍ॅपल्स (सफरचंदे Happy लाल किंवा हिरवीही चालतील.)
२ लवंगा
१ इंचभर लांबीची दालचिनी
१ सुकी लाल मिरची
अर्ध्या लिंबाचा रस
२ टेबलस्पून तेल (कोणतेही)
१ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून साखर

क्रमवार पाककृती: 

भांड्यात तेल घालून मध्यम उष्णतेवर गरम करत ठेवावे. सफरचंदे चिरुन लहान चौकोनी फोडी कराव्यात. तेल गरम झाले की त्यात लवंगा, दालचिनी आणि सुकी मिरची २ तुकडे करुन घालावी. त्यावर सफरचंदाच्या फोडी घालून परताव्यात. मग चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी आणि वरुन लिंबाचा रस घालून झाकण ठेवावे. फोडी शिजून मऊ झाल्या आणि रस आटला की रेलिश तयार झाले. थंड झाल्यावर डब्यात भरुन फ्रीजमध्ये ठेवावे. हे रेलिश चपातीबरोबर, सँडविचमध्ये घालून खाता येते. टिकतेही बरेच दिवस.

फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी याची प्युरी करुनही ठेवू शकता. मग स्प्रेड म्हणून वापरायला सोपे जाते. पण प्युरी करण्यापूर्वी लवंग, दालचिनी आणि मिरचीचे तुकडे काढून टाकावेत.

मीठ आणि साखरेचे प्रमाण सफरचंदाच्या आंबट-गोड चवीनुसार कमीजास्त करावे.

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या प्रमाणात १ कप रेलिश होईल.
अधिक टिपा: 

यात शिजवताना थोडी रेड वाईनही घालता येते.

माहितीचा स्रोत: 
मी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू,
सफरचंदे चिरुन लहान चौकोनी फोडी कराव्यात>> सालासकट करायच्या का फोडी?
-अनिता

हो, सालासकट. बिया मात्र काढायच्या. Happy

itsme, खाऊन पण बघ गं. Wink

मी तो बी प्रश्न विचारायला हवा होता का? Happy

करुन बघता येइल पण खाऊन कसे बघणार ?

खाऊन पण बघ गं >>
प्रयत्न करते लालू Happy

लालु ! केले मी appale relish. एकदम चवदार लागत,क्रुतिसाठि धन्यवाद!

टेस्टी झालय रेलीश. एक प्रश्न, ऐअर टाईट डब्यात ठेवायचे की साधा प्लॅस्टिक चा डबा चालेल?

झक्कास झाले हे रेलिश. पण रंग मृणच्या रेलिश इतका सुरेख नाही आला. पण तरीही खातांना मजा आया. आता लेकाला देउन मग कळवते, त्याला आवडले की नाही. जर त्याला आवडले तर मग लाल्वकांना साष्टांग नमस्कार.
फळांच्या अशाच रेसिपी लिही ग लालु अजुन.... तुला खुप खुप धन्यवाद.

-प्रिन्सेस...

सुरभी, साधा डबा चालेल. पूर्ण थंड झाल्यावर भरुन ठेव.
मुलांना आवडते सँडविचमध्ये किंवा स्प्रेड म्हणून. पण नुसतेच अ‍ॅपल खाल्ले तर चांगलेच. Happy

व्वा!!! छान दिसतेय ही रेसीपी...करुन पहायला हवी...लेकाला आवडली तर लन्च बाअ‍ॅक्स्साठी एक पदार्थ मिळेल!
फुलराणी.

लालू.. मस्त झाले होते रेलिश... उर्वीला खूप आवडले (तिच्या शब्दात अ‍ॅपलची भाजी laughing.gif)

छान आणि सोपी आहे रेसिपी Happy

हाय लालू,
करून बघितले रेलिश . मस्त झाले. आणि करत असताना किती अप्रतीम वास सुट्ला होता. सफरचंद, दालचिनी आणि लिंबू हे combination hit आहे.
प्युरी करताना जरा पाणी घालाव अस वाट्त होत. कारण रेलिश तसे घट्ट झले होते त्यामुळे प्युरी फाइन नाही झाली.
काही चुकले आहे का असेच असते?