तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता दुसरा कोण आलाय तो चम्या दिसतोय, कुठेतरी बघितलंय त्याला. अंजलीच्या आईने स्थळ आणलंय तो आहे की काय.

काय पण जागा निवडलेली डायरी लपवण्यासाठी!!! ....वरच्या पातेल्याखाली...दुस-या मिनिटाला त्या चंदेने पाणी पिण्यासाठी तोंड वर केलं आणि तिला डायरी दिसली.

र्‍राणाने डायरी मागितल्यावर लगेच सांगायचे ना कि हि बघ तुझ्या वहिनीने आताच चुलीत घातली, तर रडत बसली.

अंजलीच्या आईने स्थळ आणलंय तो आहे की काय>>> अंजली त्याला बघून खूष होते म्हणजे कोणी ओळखितला असेल. स्थळ नसेल. पण राणा लगेच जेलस झाला Happy

ओहह असं झालं काय डायरीप्रकरण. मग गोदाक्कांचीच चूक आहे, ती बया वहिनी उडत्या पाखराची पिसं मोजणारी आहे हे माहिती असून ती डायरी इतकी easy मिळेल अशी ठेवली. चंदा चमचीच आहेना तिची.

गोदाक्का टिपं गाळत बसतात फक्त. अभिनय छान करतात.

डायरीचे सांगायला हवं होतं पण वहिनीने बाजी उलटवली असती, ती हुशार आहे.

वहिनीने बाजी उलटवली असती, ती हुशार आहे.>> तेच केलं. माझ्याकडे डायरी नाही. ती वाचून झाल्यावर मी गोदाक्काला दिली असे म्हणून हात वर केले ना तिने.

हो बरोबर. चुलीत त्यानीच टाकली असेल, हात पण भाजलाय चुलीत टाकताना असं पण म्हणाली असती वहीनी, जर गोदाक्का बोलल्या असत्या तर.

इतका शहाणपणा करते, नवरा कसा वागतो तिथे लक्ष नाही.

हो ना! आणि पाठकबैच्या आईला कल्पेश चक्क पाठकबै साठी आवडलाय असं दिसतंय. तो जेवताना पाठकबैच्या आईला तो मुंडावळ्या बांधून बसलाय असं दिसलं.

स्पष्ट बोलायचं तर मला तरी बै तो कल्पेश झंपकच वाटला. सारखा कै फायद्याचा विचार करतो. "लग्नातनं काय फायदा झाला तर लग्नाला लगेच टाईम मिळेल बघ. " असं बोलला तो. कसं बै बोलतात कुणास ठाऊक.

गोदाक्कांनी डायरी मस्त पटकन दिसेल अशीच ठेवली होती. पूर्णपणे आत पण सरकवली नव्हती. आता वैनीसायबांनी जाळली तर रडायचं कशाला. गुपचूप जाऊन अंजलीला सगळं खरं सांगून टाकायचं. राणाला सांगून तो विश्वास ठेवायचाच नाही हेही खरं.

अरे पण जर हे लोक असे शहाण्यासारखे वागले तर शिरेल चालु होताच संपतील महीन्याभरात

अरे पण जर हे लोक असे शहाण्यासारखे वागले तर शिरेल चालु होताच संपतील महीन्याभरात>> Proud

ही शिरेल पण 'झी' वळण घेणार लवकरच! हळू हळू एकेक पात्राचा समावेश सुरु आहे त्या दृष्टीकोनातून..

पाक खुळं हाय राना!
राणाच्या भोळसटपणाचा आणि नंदिताच्या पाताळयंत्रीपणाचा कळस आहे. लंबकाची दोन टोकं आहेत.
काल किती दिवसांनी मालिका बघितली, कंटाळा आला जाम. राणा, अंजली आणि गोदाक्का ह्या सर्वांना दंडाला धरून गदागदा हलवून पुढं ढकलावंसं वाटलं.

गोदाक्कांनी अंजलीला साडी घेतली ते बघून वैनीसायबांचा जीव जळला. मग रानाभाऊजींसमोर मोठेपना दाखवन्यासाठी वैनीसायब बोलल्या 'आमी बी अंजली साठी पैठणी काढून ठेवली होती पण द्यायची राहून गेली. ' गोदाक्कांनी तेवढंच धरुन रानाला सांगितलं वैनीसायबांची पैठनी अंजलीला देवन ये म्हणून. वैनीसायब आता कशाला, अंजलीला वायट वाटलं असं कायबाय सांगू लागल्या पण मग राना कसला ऐकतूय.. त्याने पिच्छा करुन वैनीसायबांकडनं पैठणी घेतली नि अंजलीला द्यायला गेला.
वैनीबायचं तोंड अगदी बघन्यासारखं झालं हुतं. Wink

खूप दिवसांनी आत्ता ही मालिका बघायला टीव्ही लावला तर तो कल्पेश अजूनही आहेच, मला वाटलं गेला असेल हा परत. जाऊदे त्याला बघून बंदच केला टीव्ही.

पाठकबैनी लज्जतदार जेवण बनवून राग काढला की राणाजींचा.

कल्पेश कधी जायचा?? तो आला तेव्हा म्हणालेला अंजलीला की तुझ्या मम्मी पप्पांना भेटून लगेच जायचंय, टायम नाय म्हणून.. आणि आता इतके दिवस कशाले राहिला??
त्याच्यामुळे थोडी बोअर झालीय सिरियल.

होय होय ..कल्पेश बोर मारतोय. तरी पण राणाजी आणि पाठक बाईंमुळं सिरियल बघावी असं वाटतं.
गोदाक्का , बरकत , वैनीसाब सगळ्यांनी चांगली कामं केलीत. राणाजींचा निरागसपणा बनावट वाटत नाही.
बाकीच्या सिरियल पेक्षा खूप बरी आहे.

Pages