जिओ G भर के ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 September, 2016 - 02:57

काल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का?

स्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.

मोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.
तर त्या ऊलट रिलायन्स प्लस मोदी कॉम्बिनेशन काहीतरी स्वस्तात आणि फुकटात देतेय तर त्यात नक्कीच गडबड घोटाळा हे माझे मत.

दोघांची टोकाची मते पण सत्य काहीतरी वेगळे असणार. ते जाणून घ्यायला, या जिओ चे फायदे तोटे समजून घ्यायला, आणि आता या निमित्ताने जे युद्ध छेडले जाणार आहे त्याची चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिपॉझिट फोरफीट केलं तर त्यावर जीएसटी कसा लागेल?

कायद्याने जर डिपॉझिट फोरफीट केलं तर रिलायन्स ला जीएसटी भरावा लागेल. तो ग्राहका कडुन वसुल करो वा न करो.
रिलायन्स कडे दुसरा उपाय आहे की १५०० ही जीएसटी सकट रक्कम आहे असे घोषित करुन २२९ जीएसटी भरुन १२७१ रुपये स्वताकडे ठेउ शकतो. १२७१ च्य १८% २२९ रुपये होतात. दोन्ही रक्कम अ‍ॅड केल्यास १५०० रुपये होतात.

डिपॉझिट फोरफीट केलं, त्याबरोबर फौनही परत घेतला. मग जीएसटी नक्की कशावर? आमचा फोन तूम्हाला एक वर्ष विपरायला दिला त्या सेवेवर? पण ते डिपॉझिटच म्हणताहेत.
मग फोन वापरण्याचा काळ वाढतो, तसं सेवाशुल्क कमी होऊन चालतं का?
कोणी करतज्ञच सांगू शकेल.

तीन वर्षांच्यावर चालण्यासारखे नसतील ते फोन.
आणि फोन.परत नाही केले तर ती विक्री होईल.
पण तीन वर्षांच्यि अलीकडे एक नियम आणि पलीकडे दुसरि हे अजिबात कळत नाहीए.

https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/jio-rings-in...?

एवढ्या स्वस्तात फोन सर्विस देउन सुध्धा जिओ ला मागच्या तीन महिन्यात ५०८ कोटीचा फायदा ! एवढ्या लवकर जिओ फायद्यात येईल असे वाटले न्हवते. फायद्यात असल्याने स्वस्तातली फोन सेवा आजुन काही वर्ष चालु राहायला हरकत नाही .

जिओ फोनची स्कीम नक्की काय आहे माहीत नाही. पण त्यांनी जी जिओ fttx डिव्हाईसेस आणलीत ती कस्टमरकडे राहिली तरी कंपनीचीच प्रॉपर्टी राहणार. कस्टमरने जर पूर्ण सेट परत केला तर पूर्ण डिपॉझिट त्याला परत मिळणार. अर्धवट सेट परत केला तर जे परत केले नाही तेवढयाचे डिपॉझिट जप्त होणार. जेवढे डिपॉझिट फॉरफीट केले जाईल तेवढी रक्कम कंपनीला सेल म्हणून बुक करावी लागेल व त्यामुळे त्यावर gst लावावा लागेल. पण हा gst कंपनी स्वतःच्या खिशातून भरणार, म्हणजे 1500 रु डिपॉझिटमधून जर 1000 फॉरफीट केले तर हे 1000 आफ्टर gst असे गृहीत धरले जाईल. कस्टमरला वेगळा gst भरावा लागणार नाही. बिलिंग डॉक्यूमेण्ट बनवताना gst साठी बॅकवर्ड calculation करणार. फोनसाठी हीच पद्धत असावी.

पण फोन परत का करायचे हे लक्षात आले नाही. कंपनीची प्रॉपर्टी असल्याने कंपनी 3 वर्षात डेपरिशिऍट करून मोकळी होणार. मग तो फोन घेऊन करणार काय. काहितरी टॅक्सचा लोचा असणार ज्यामुळे फोन परत घेणे बंधनकारक होतेय. परत घेतला नाही तर डेपरिशिएट करता येत नसणार. म्हणून परत घेऊन भंगारात फेकणार असावेत.

मला एक माहिती हवी आहे, परंतु केवळ त्यासाठी वेगळा धागा नको काढायला म्हणून इथे विचारतो आहे.

२०१६ मध्ये जेव्हा जिओ सुरु झाली तेव्हा (जर तुम्हाला आठवत असेल) जिओ ग्राहकांकडून कागदी फॉर्म भरून घेत नव्हती, ना आधार कार्ड ची फोटोकॉपी (झेरॉक्स) घ्यायचे. त्यांच्या customer executives च्या फोन मध्येच ते ग्राहकाचे नाव, आधार क्र. टाकायचे आणि त्याला जोडलेल्या fingerprint scanner वर बोट ठेवायला सांगायचे. मग थेट आधारच्या सर्व्हर वर verification होऊन ग्राहकाचा फोटो, पत्ता आदी सर्व माहिती त्यांच्याकडे यायची.
याच काळात इतर कंपन्या मात्र कागदी फॉर्म्स वापरायच्या आणि आधार / Pan card ची वगैरे झेरॉक्स जोडायला सांगायच्या आणि मग नंतर वेरीफिकेशन करायच्या.
नंतर मात्र कोणीतरी privacy चा मुद्दा उपस्थित करुन कोर्टात का कुठे गेलं आणि मग जिओला आपली ही (आधुनिक) पद्धत बदलून जुन्या पद्धतीवर (कागदी फॉर्म्स आणि आधार ची झेरॉक्स) वर यावं लागलं.

तर ही जी जिओची पद्धत होती, त्याला काय म्हणायचे? म्हणजे e-Aadhar verification वगैरे की अजून काही???

आणि एक वापरकर्ता (user) म्हणून तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते? म्हणजे fingerprint scanner वर बोट ठेवून जागेवर (on-the-spot) verification की आधारची झेरॉक्स देऊन नंतर verification???

टीप:
आता हे सगळे विचारण्याचे कारण म्हणजे, मला तत्वतः जिओ ने सुरवातीला अनुसरलेली e-Aadhar verification पद्धतच योग्य वाटते कारण त्यात जोपर्यंत वेरीफिकेशन होत नाही तोपर्यंत ग्राहकाला सिम कार्ड मिळत नाही. सध्याच्या पद्धतीमध्ये मात्र (मी चौकशी केली त्यानुसार) फॉर्म भरल्यावर सिम लगेच हातात मिळते, २- ३ तासांत सुरूही होते, वेरीफिकेशन मात्र २४-४८ तासांत होते. म्हणजे एखाद्याला गैरवापर करायचाच असेल तर तो खोटे आधार कार्ड बनवून सिम मिळवून वेरीफिकेशन होईपर्यंत गैरवापर करू शकतो आणि मग सिम तोडून फेकून देऊ शकतो.

ई आधार आणि फोटोकॉपीची गंमत
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1828797 27 MAY 2022
UIDAI cautions of sharing photocopy of Aadhar

Unique Identification Authority of India (UIDAI) has warned the general public not to share photocopy of one’s Aadhaar with any organizations because it can be misused. Alternatively, a masked Aadhaar which displays only the last 4 digits of your Aadhaar number can be used for the purpose. It can be downloaded from UIDAI official website https://myaadhaar.uidai.gov.in. Select the option “Do you want a masked Aadhaar” and proceed to download.
The existence of any Aadhaar number can be verified at https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar. To verify offline, you can scan the QR code on e-Aadhaar or Aadhaar letter or Aadhaar PVC card using QR code scanner in the mAadhaar mobile application.

Only those organizations that have obtained a User License from the UIDAI can use Aadhaar for establishing the identity of a person. Unlicensed private entities like hotels or film halls are not permitted to collect or keep copies of Aadhaar card. It is an offence under the Aadhaar Act 2016. If a private entity demands to see your Aadhaar card, or seeks a photocopy of your Aadhaar card, please verify that they have valid User License from the UIDAI.

दोनच दिवसांनी

https://www.livemint.com/news/india/aadhaar-photocopy-advisory-withdrawn...

The central government on Sunday withdrew a UIDAI advisory that cautioned the general public against sharing photocopies of their Aadhaar with any organisation.

The new statement said the Aadhaar ecosystem had adequate features to protect the identity and privacy of users, and that users are only advised to exercise "normal prudence".

The Unique Identification Authority of India says among its frequently asked questions: "It is near impossible to impersonate you if you use Aadhar to prove your identity."

"People have been freely giving other identity documents. But did they stop using these documents for the fear that somebody would use them to impersonate? No!" it says.

म्हणजे जबाबदारी पब्लिकचीच.

Unlicensed private entities like hotels or film halls are not permitted to collect or keep copies of Aadhaar card. It is an offence under the Aadhaar Act 2016. If a private entity demands to see your Aadhaar card, or seeks a photocopy of your Aadhaar card, please verify that they have valid User License from the UIDAI.....
यात केवळ आस्थापनेच येतात की इतरही???
म्हणजे उद्या माझ्या घरी मी कामवाली ठेवतांना किंवा AC/Fridge / Washing Machine repairing वाल्याला प्रवेश देतांना त्याचे / तिचे आधार कार्ड विचारू शकतो की नाही? कामवाली जी जवळपास दररोज येणार आहे, संपूर्ण घरात तिचा वावर असणार आहे तिच्या आधारकार्ड ची कॉपी घेऊन ठेऊ शकतो की नाही???

... आणि हो, एखादी Adult movie असेल तर सिनेमा हॉल वाल्यांनी किशोरवयीन मुलांचे आधार कार्ड तपासावे की नाही??? किंवा हॉटेल वाल्याने (जर बारची सुविधा उपलब्ध असेल तर) ग्राहकाचे वय २१ का २५ किती लागते ते आहे की नाही हे तपासायला आधार कार्ड मागावे की नाही????

E verification होऊनच कार्ड सुरू होते...

असे असेल तर 'scam करणारे लोक किंवा रात्री ०९.३० / ११.०० वाजता तुमची वीज कापली जाईल, रात्री १२ वाजता बँक अकाऊंट बंद होईल' छाप मेसेजेस पाठवणारे लोक हे पकडले कसे जात नाहीत. किंवा त्यांच्या विरोधात तक्रार गेल्यावर (आणि ती खरी आहे हे सिद्ध झाल्यावर) अशा लोकांना 'आयुष्यभर कोणत्याच कंपनीचे सिम कार्ड / broadband मिळणार नाही' अशी तरतूद असलेला एखादा कायदा नाही का???
या लोकांना इतक्या मोठ्या संख्येने सिम कार्ड कशी काय मिळतात? कारण हे लोक दररोज नवीन सिम कार्ड वापरतात असा माझा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी मला वीज कापली जाईल चा मेसेज आला होता. अर्थातच हे प्रकार माहित असल्याने मीच उलट त्याला सुनावले. पण तो नंबर त्यादिवसापासून मी दररोज मुद्दाम try करतो आहे, दररोज switched off! याचा अर्थ त्याने ते सिम फेकून दिलेले असणार.

हॉटेलसाठी राहणाऱ्या एकाचे/सर्वांचे आधार मागतात तेव्हा "तुमचे लायसन दाखव" म्हणायचे?
आधार कॉपी देताना त्यावर अमुक हॉटेल, शहराचे नाव टाकून देतो तेव्हा घेतातच. आपल्यापुरता प्रश्न सुटतो. कॉपी नसल्यास आधार घेऊन त्यांच्या स्कॅनर मध्ये कॉपी काढतात. ते टाळावे.
(माथेरानमध्ये रेल्वेच्या डावीकडे गावभाग आहे त्यात काही जणांकडेच हॉटेल लायसन आहे. लायसन नसणारे नोंदवही ठेवत नसतात.)

आधारकार्डची जरुरी नाही.
ड्रायव्हिंग लायसन्सही चालते.
कुणालाही आधारकार्ड कॉपी मागु नये आणि देवूही नये.
ज्या ठिकाणी आधार कार्ड गरजेचे आहे तिथे मास्क्ड आधारकार्ड दाखवावे.

आधार कॉपी देताना त्यावर अमुक हॉटेल, शहराचे नाव टाकून देतो.....
हे मी पण करतो. आधारच्या कॉपीमध्ये फोटोवर गळ्याच्या खाली येईल (म्हणजे चेहरा दिसेल) अशा ठिकाणी 'Given to xxx for yyy purpose' असे लिहून देतो.

आधारकार्डच्या ऐवजी ड्रायव्हिंग लायसन्स...
पण फोटो, नाव, जन्मतारीख आणि पत्ता तर दोन्हीकडे आहे.
डा. ला. मध्ये सुद्धा आपल्या डाव्या हाताचा अंगठा आहे, रेटीना नाही.
आधारमध्ये रेटीना, दहाच्या दहा बोटांचे ठसे आहेत इतकाच काय तो फरक! (अर्थात हा data सर्वरवर आहे, कार्ड मध्ये नाही.)
उलट ड्रायव्हिंग लायसन्स वर तर आपली सही सुद्धा आहे!

मग ड्रायव्हिंग लायसन्स आधारपेक्षा सुरक्षित कसे???

आधारकार्डची जरुरी नाही.
ड्रायव्हिंग लायसन्सही चालते.

- होय. ओळखपत्र म्हणून सात चालतातच. पण आधार सर्वांकडे असते ना.

Pages