नवीन रेस्टॉरंट साठी कल्पना सुचवा

Submitted by चंपक on 18 August, 2016 - 21:38

नमस्कार!

अहमदनगर - औरंगाबाद राज्य महामार्ग क्र ६० वर अहमदनगर पासुन अंदाजे ६० किमी वर श्री क्षेत्र देवगड हे गांव आहे. तेथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे.

तेथे मला ३७,००० स्क्वेअर फुट रोड्लगत जागेवर एक रेस्टॉरंट सुरु करायचे आहे. सदर जागा नेवासा, श्री क्षेत्र शिंगणापुर, औरंगाबाद आणि आदर्श गांव गोगलगांव यांपासुन १० ते ५० किमी अंतरावर आहे.

माझ्या कल्पनेनुसार - एक डायनिंग हॉल, एक कॉन्फरंस रुम (१०० क्षमता), एक १५-२०,००० स्क्वे. फुट. लॉन, ५ रुम्स/व्हिलाज (लॉज), अशी योजना करतो आहे.

त्याबाबत आपली मदत अपेक्षित आहे.

१) त्यासाठी सुंदर नाव सुचवावे. सदर नावाने पुढे किमान १० रेस्टॉरंट सुरु करता येतील असे "युनिव्हर्सल" नाव असावे.
२) रेस्टॉरंट डिजाईन संबंधी सुचना कराव्यात. उपलब्ध डिजाईन असल्यास पाठवावे.
३) मेन्यु कार्ड सुचवावे.
४) पर्यटक्-प्रवासी म्हणुन आपल्या सोयी--सुविधांसंबंधी अपेक्षा आवर्जुन सांगाव्यात.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे आभार!

"वनश्री" नावाबद्दल विचार करतो आहे! "योगी-क्लासिक' असे ही नाव विचाराधीन आहे.

बजेटः बांधकामावर ५० लाखांपेक्षा जास्त नाही. हो, अगोदर रेस्टॉरंट सुरु करुन मग इतर जागा विकसीत करण्याचाच विचार आहे.

वाळुज्/पंढरपुर एम्.आय्.डी.सी. ३०-३५ किमी वर आहे. तसेच आस्-पास सधन गावे आहेत. रात्रीच्या लग्ना/पार्टीसाठी लॉन ची योजना आहे.

हायसेनबर्ग, अकु व इतर सर्वांच्याच सुचनांचे पालन करुत.

मेन्यु: शेवगा भाजी, सोलापुरी पिठले- भाकरी- चटणी, आक्खा मसुर, मास्-वडी-आमटी, खानदेशी भरीत, आणि असेच खास पदार्थ! नो जंक फुड !

शेवगा भाजी, सोलापुरी पिठले- भाकरी- चटणी, आक्खा मसुर, मास्-वडी-आमटी, खानदेशी भरीत, आणि असेच खास पदार्थ! नो जंक फुड !>>>> उत्तम मेनु

"या, बसा आणि जेवा" - हे नाव कसे राहील?

तिन्ही ऋत्तुंचा विचार करुन सोयी असायल्या हव्यात. हिवाळा असेल तर गरम पाणी, गरम चहा मिळावा.
पावसाळा असेल तर थोडी उब, त्यानुसार अन्नाचा बेत असावा
उन्हाळा असेल तर गार गार ताक, पन्हे असावे.
डबा द्यायची सोय असावी.
सभोवर सुगंधित फुलेझाडी लावावी.
संडास नाहणी कमालीचे स्वच्छ असावे आणि त्याची संख्या जास्त असावी. रांग लागू नये.
म्हातार्‍या लोकांसाठी चढाउतरायची सोय असावी.
अंपग लोकांसाठी वेगळा संडास असावा.
लहान मुलांसाठी कमी तिखट जेवण असावे.
कामगारांसाठी गणवेष असावा.

सोयी करायला गेलो तर अनेक आहेत.
माबोचे एक गटग तुमच्याकडे करण्याचा विचार आवडला.

अशा ठिकाणी नसलेली अजून एक गोष्ट म्हणजे लहान मुलांना खेळायला जागा.
प्रवासात एका जागी बसून मुले कंटाळली असतात. सहज लक्ष ठेवता येईल अशा खेळायच्या जागा असल्या तर चांगले.

स्वच्छता मस्टच. स्वच्छ असेल तर आम्ही किमती जास्त असल्या तरी जाऊ.

चव, अदबशीर सेवा आणि स्वच्छता या तीन गोष्टींची काळजी घेतली तर बाकी काही जास्तीचे करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते!
म्हंटल्या तर गोष्टी एकदम बेसिक आहेत पण निम्मी अधिक रेस्टॉरंटस तिथेच कमी पडतात
इंटिरियर आणि value added service वर भर देण्यापेक्षा do the basics right!

तोंडातून वाह! बाहेर पडेल असे खायला घाला... कस्टमरचा इगो सुखावेल अशी सर्विस द्या.... त्यासाठी स्टाफला स्पेशली ट्रेन करा
झगमगाटापेक्षा स्वच्छतेच्या चकचकाटाकडे लक्ष द्या!

बाकी नाव वगैरे सुचेलच तुम्हाला एखादे चांगलेसे!

मेन्यु छान, चमचमीत चवीचा व पोटभरीचा आहे. गावरान थाळी ठेवणार असाल तर कांदा, मिरची, मुळा - काकडी चकत्या, तळलेली भजी / पापड / कुरडया हेही त्यात असू देत. सुमधुर दह्याची वाटी, लिंबाची कोर, घरगुती चवीचं लोणचं. मऊसूत गरम वाफेची मूगडाळ खिचडी, कढी मेनूत असेल तर वृध्द, लहान मुले व पथ्य असणाऱ्या व्यक्तींना किंवा ज्यांना खूप पोटभर जेवण नकोय त्यांना सोयीचे जाईल.

तळलेली भजी / पापड / कुरडया हेही त्यात असू देत. सुमधुर दह्याची वाटी, लिंबाची कोर, घरगुती चवीचं लोणचं. मऊसूत गरम वाफेची मूगडाळ खिचडी, कढी >>>>>

हॉटेल आहे की दसरा दिवाळीची पंगत Proud

सॉरी अकु पण अगदीच राहवलं नाही Happy

सिरीयसली विचारतो.
माझी व्यावसायिक कन्सल्टन्सी आहे. कल्पना हव्या असतील तर संपर्क साधावा.

मायबोलीचा चांगला उपयोग करून घेतला आहे.
सूचनाही काही चांगल्या आहेत. साध्या साध्या गरजा लक्षात आणून देणा-या आहेत ( करता येण्यासारख्या).
आपण स्वतः भोजनालय चालवणार आहोत अशी कल्पना करून केलेल्या सूचना व्यवहार्य राहतील.
जंक फूड नाही हे खूप आवडले. त्या बाजूला जाणे झाले तर इथेच थांबणार हे नक्की.

मी फर्स्ट टाइम मायबोली वर लिहीत आहे . तुम्ही सूचना केली होती कि स्वतः रेस्टॉरंट काढणार आहोत अशी कल्पना करा म्हणून माझी कल्पना मांडत आहे .

माझ्या कल्पनेतील सुचवावेसे ;वाटलेले नाव आहे " पंगत "..हो . पंगत च !!!

आजकाल तशी लग्नातून पंगत तर हद्दपार झाली आहे पण त्यातील मजा बुफे ला नाही. ..खरंच नाही !!!
थोडं विषयांतर होतंय पण बुफेमध्ये पण अनेकवेळा अन्न वाया जातेच ना ..आणि वेळ म्हणाल तर तसाही रांगेत उभे राहायला आणि आपला टर्न यायला निदान १० मिनिटे लागतातच ना ..

तर जर माझं रेस्टॉरंट असेन तर मी पुढील कल्पना लढवेल .कोणी हसतील तर कुणाला वेडेपणा , स्वप्नरंजन वाटेन .. पण निदान ऐकून घ्यायला काई हरकत आहे ? कदाचित एखादी कल्पना आवडेल तुम्हाला जी खरंच राबवाल Happy you never knows Happy

१. जसं नाव तसंच अन्न द्यायचे स्वरूप असेन ..ते म्हणजे 'पंगत'..छान पूर्वीप्रमाणेच पंगतीला व्यवस्था असेन .. आडवे( rectangle) टेबल आणि खुर्च्या ..नेहमी प्रमाणे चौकोनी टेबल नाही . येणाऱ्यांचे स्वागत हे गूळ पाणी ने व्हावे . ( पूर्वीची पद्धत )
२. रेस्टॉरंट चे बांधकाम हे कौलारू आणि दगडी विटांचे असावे . गावाकडील फील देणारे असावे .छान बाग असेन.
३. जेवणासाठी वाढणारे बाप्ये , त्यांच्या डोक्यावर "गांधीटोपी नक्की असेन. बायकांनी पण "नऊवारी " नेसली तर हरकत नसावी ( आजकाल रेडिमेड मिळते ).. हा हा हे जरा जास्तच आहे ..सॉरी ...
४. पंगत म्हंटल्यावर जेवण हे अस्सल महाराष्ट्रीयन चवीचेच असेन तिथे सौथ इंडियन , पंजाबी , चायनीज असं काही काही नसेन !!
मेनू हा अस्सल "गावरान " असेन .. पिठलं , भाकरी , वांग्याची भाजी , मटकीची उसळ हे तर असेनच पण तरी अजून वेगळे गावरान पदार्थ असतील जसा की अंबाडीची भाजी , अळूवडी , म्हाद्या आणि बरेच काही वेगळे पदार्थ ( संशोधन करावं लागेन ).
५. वापरणारी ती भांडी हि पूर्वी सारखी पितळेची असतील स्टईलची नाही . पितळेचं तांब्या भांडं आणि ताट वाह !! असा वाटेन जणू काही ५०-६० वर्ष मागे गेलो कि काय. खरंच खूप सुंदर दिसतात ती तांब्या पितळेची भांडी !!
६. जर भांडी वापरायची नसेन तर चक्कं केळीची पाने वापरावीत ( इको फ्रेंडली )आणि जागा मोठी असेन तर बागेतच केळीची आणि काही नारळाची झाडे लावावीत . तसंही रेस्टॉरंट कौलारू असल्यामुळे केळीची झाडे शोभून दिसतीलाही !!
७. येणारे अतिथी हे अनेकदा देवभक्त असतातच त्यामुळे एक तरी गणपतीची मूर्ती (किंवा फोटो) आणि त्यापेक्षा पांडुरंग आणि रुक्मिणीची किंवा दत्ताची छोटीशीच मूर्ती असावी . कारण हे दोन देव सगळीकडे असतात.
८. प्रवेशद्वाराजवळच अन्नपूर्णेची मोठी मूर्ती किंवा फोटो असावा .
९. आतल्या भिंतीवर " पुंडलिक वरदे हरी विठ्ठल " असे लिहावे जर ग्रामीण लोक असतील तर त्यांना नक्की आवडेन आणि तेही नको असें तर
आपण लहानपणी म्हणत असलेले " वदनी कवळ घेता " पण खूप छान वाटेन.
१०. भिंतीवर जुन्या पद्धतीचा एखादा फोटो किंवा कोपऱ्यात 'जातं', तांब्या पितळेची भांडी किंवा त्याची मांडणी जरूर असावी .
११. रेस्टॉरंट मध्ये शिरताना ते सिंथेसायझर चे म्युझिक पेक्षा मांगल्यमयी असे "सनई ' चे सूर असावेत ..
१२. मी पंगत हे का सुचवले कारण जेव्हा 'पंगत' असायची पूर्वी तेव्हा यजमान आवर्जून सगळ्यांना "सावकाश होऊ दे " असं म्हणायचे आणि स्वतः एखादा पदार्थ वाटायचे ( बुफे मध्ये कुणी कुणाला विचारात नाही ..आपलं झालं कि उठायचं ) तसंच रेस्टॉरंट च्या मालकाने आवर्जून सगळ्यांची चौकशी करावीं (पर्सनल टच ) .जे आजकाल कोणीच करत नाही . असे आतिथ्य मिळाले तर सगळेच परत परत येत राहतील Happy Happy

वाह .. ..... अशी कोणी "पंगत " केली तर खरंच "रंगत ' येईन जेवायला !!! Happy

अजून बराच काही लिहिता येईन ..कल्पनांना अंत नसतो आणि मग मी वेड्यासारखी लिहीत राहीन सो एवढेच बस्स .. (हो पदार्थाबद्दल पण काही कल्पना आहेत )

तसंही अजून वेगळी नावे रेस्टॉरंट साठी ती म्हणजे ....

देवश्री ,यद्यकर्म , आसरा , निवारा किंवा निवांत ,पूर्णब्रम्ह , झुळूक , तृप्त , रानगंध , निसर्गमित्र, रानवा, आतिथ्य, साद .. हाहाहा यादी काही संपणार नाही आणि माझे स्वप्नरंजन पण !!!

अर्थात खरंच कोणी असे अस्सल मातीतले ..एकदम अस्सल रेस्टॉरंट काढले तर खरंच मजा येईन !!!.. मी अशा रेस्टॉरंट साठी तरसत आहे .... वाट पाहत आहे ..

कुणाला माझा हा वेडेपणा आवडला नाही तर ह्या यजमाना कडून क्षमस्व !!... Happy

I just think out of box which people may don't like.....sorry Sad

@ वृन्दा, छान कल्पना दिलीय. अशा रेस्टॉरंटचे नुसतं चित्र डोळ्यापुढे आणूनच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेत. अक्षरशः गावच्या लग्नाला आल्यासारखं वाटलं. प्रत्यक्षात मी तिथे जाईल तेव्हा माझ्यासारखा नशीबवान मीच असेन.

आणि ते " पुंडलिक वरदे हरी विठ्ठल " आणि " वदनी कवळ घेता " लई भारी!!!

I just think out of box which people may don't like.....>>> I like it very much. खरंच! आपले विचार हटके (चांगल्या अर्थाने) आहेत.

अजून बराच काही लिहिता येईन ..कल्पनांना अंत नसतो आणि मग मी वेड्यासारखी लिहीत राहीन
>>> अजून लिहा कि! मी वाचायला आतुर झालोय.

वृंदा पंगत हे नाव अभिनव आहे. आवडलं

बाकिची कल्पना अनेकांना आवडतेय पण मला नाही आवडली . याबद्दल प्लीज माफ कराल ना ?
गोखले मळा, अभिरुची अशा ठिकाणी राबवली गेलेली आहे. अनेक ठिकाणी हा फॉर्मॅट आहेच की ! एखादे वेळी ते छान वाटतं. पण नेहमी मला तरी नाही आवडणार. हायवेला रेस्तराँ असेल तर ग्राहक रेंगाळून नाही चालत. अभिरुची किंवा गोखले मला अशा ठिकाणी येणारं पब्लीक वेगळं असतं.

मुंबई अहमदाबाद हायवे, बेंगलोर हायवे अशा ठिकाणी जर बजेट हर्डल नसेल तर वेगवेगळ्या कल्पना राबवता येतात. मोटेल पासून ते प्रत्येक राज्याची खासियत देऊ करणारं बहुमजली रेस्तराँ !
ज्या ठिकाणी लेखकाला रेस्तराँ सुरू करायचेय त्या रस्त्याला नेहमीच्या पद्धतीचे "हॉटेल " खूप चालेल. पण अलिकडे गावठी बंगल्याप्रमाणे बांधकाम करून त्याचे रेस्तराँ मधे रुपांतर करण्याची फॅशन आली आहे, ते टाळले तर छानच होईल. छोट्या छोट्या झोपड्या पण खूप कॉमन झालं. प्रत्यक्षात अशा ठिकाणी प्रवासातून आल्यावर नीट बसता देखील येत नाही. त्यातून कपडे असे असतात की मांडी घालता येत नाही. बरेच ठिकाणी गेरूचा विटकरी रंग लावलेला असतो तो कपड्यांना लागतो.

बाग वगैरे करायची असल्यास आधीच कागदावर प्लॅनिंग करा. लॅण्डस्केपिंग करणारे व्ञावसायिक असतात. बगिचा डिझाईन करणारे असतात. अशांचा सल्ला घेतलेला बरा. वाटेल तशी बनवलेली बाग वाईट दिसते.

@ लेखक
तुम्ही दिल्ली चंदीगढ या रस्त्याला भेट दिलीये का ? दिलेली नसल्यास अवश्य द्या. एक से एक कल्पना आहेत. फूड मॉल पासून ते वैशिष्ट्यपूर्ण धाबे आणि अगदी अल्ट्रा मॉडर्न एसी रेस्तराँज !! पंजाबी खाद्य संस्कृती प्रसिद्ध असल्याने त्यांना तो अ‍ॅडव्हान्टेज मिळतो. बेंगलोरला एक सात मजली रेस्तराँ आहे (नाव विसरले). जोधपूरलाआ रतनाडा पॅलेस जवळ एक शाही जेवणाचा अनुभव देणारं भोजनालय आहे.

या सर्व ठिकाणी आधी थीम नक्की केलेली दिसते. खूप बारीक विचार करून त्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी जमवलेल्या आढळतात.

कर्नाल येथील हवेली ढाबा नक्की बघून या.

सगळ्यांना धन्यवाद !! Happy

कल्पना चांगली आहे प्रत्यक्ष अमलात आणायला नक्कीच थोड कठीण आहे ..गोखले मळा आणि पूर्वी अभिरुची होतेही असे थोडेफार पण आता मजा नाही तेवढी .. हेही खरे कि हायवे ला येणाऱ्या पब्लिकला हे आस्वाद घेण्यापेक्षा लवकर पोट भरून निघण्याची घाई असते किंवा थोडा ब्रेक मिळावा म्हणून आलेले असते तिथे commecial च रेस्टोरंट हवे ... मी फक्त थिम सांगितली कदाचित असं रेस्टोरंट अस्तित्वात असेनही !!

पण मला तरी सध्या पुण्यात नाही दिसत असं रेस्टोरंट .. अस्सल महाराष्ट्रीयन ..except थोडंफार "फडके हॉल " आणि " शबरी ".. जेवण तर छानच आहे पण इंटेरिअर पण छान आहे .!!!.

हेही खरे कि हायवे ला येणाऱ्या पब्लिकला हे आस्वाद घेण्यापेक्षा लवकर पोट भरून निघण्याची घाई असते किंवा थोडा ब्रेक मिळावा म्हणून आलेले असते तिथे commecial च रेस्टोरंट हवे >> हो.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

सर्व कल्पना आर्किटेक्ट व इंजिनीअर महोदयांना वाचायला दिलेल्या आहेत. त्यातुन काय सार (आणि आमटी) बाहेर निघतेय ते लवकरच कळेल ! Happy

नक्की कळवा तुमचे रेस्टॉरंट चे फायनल झाले की . उत्सुकता बरीच आहे Happy

हायवे म्हणजे फास्ट फूड शिवाय पर्याय नाही Sad

एकच विनंती आहे फर्स्ट एड बॉक्स , बेसिक मेडिसिन ,बी. पी apparatus, ऑन कॉल डॉक्टर आणि जवळच्या हॉस्पिटल चा नंबर जरूर जरुर ठेवा. Happy

सपना, पुन्हा एकदा पोस्ट पटली आणि आवडली Proud

अभिरुची चालूये का अजुन? मला वाटलं बंद झालं Uhoh
गोखले मळा Sad कशाला आठवण काढली Sad मला आत्ताच्या आत्ता जावंस वाटतंय तिकडे Sad

मला माहीतेये हे....
मायबोलीवर वर्षुतै माहीतेय का तुला? सध्याचा आयडी माहीत नाही, पुर्वीचा आयडी वर्षुनिल होता तिचा, तीने टाकलेत बघ एका धाग्यात या हॉटेलचे फोटोज..
मोबाईल वरुन टाईपतेय म्हणुन नाही तर मीच लिंक शोधुन दिली असती

Pages