सिरीयल किलर डॉक्टर ......

Submitted by अजातशत्रू on 16 August, 2016 - 23:40

'डॉक्टर म्हणजे देवदूत' या समाजाला छेद देणारी घटना इतकंच या घटनेचे वर्णन करून चालणार नाही तर हे कसे शक्य झाले अन हे का घडले याचाही विचार होणे गरजेचे आहे .....
निसर्गरम्य सातारा जिल्ह्यातील धोम या गावातली काळजाचा थरकाप उडवणारी ही गोष्ट. एका पाठोपाठ सहा खून घडूनही तिथं एक डॉक्टर स्वतःला देवदूत असल्याचे भासवत होता. प्रत्यक्षात तो होता खुनी यमदूत ! त्या डॉक्टर संतोष पोळवरची ही पोस्ट...
डॉ. पोळच्या डोक्यात ज्याला मारायचे आहे त्याची पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार असायची. हत्या करण्याचा पूर्ण प्लॅन तयार असायचा. हत्या करण्याचा कालावधी तो आधी निश्चित करायचा अन मुक्रर केलेल्या दिवसाआधी तीन महिने तो कामाला लागायचा. त्यासाठी आधी तो जेसीबी भाड्याने घ्यायचा. जेसीबीवाल्याला त्याच्या फार्महाऊसवर घेऊन जायचा. खेडेगावात शिवारात असते तसे खोपटवजा आणि थोडे कच्चे बांधकाम केलेल्या त्याच्या या फार्महाऊसच्या मोकळ्या जागेपाशी जेसीबी आला की तो तिथं चार बाय दोनचा मोठा खड्डा खोदून घ्यायचा. सहा सात फुट खोल खांदून झाले की जेसीबीवाल्याची मजुरी देऊन त्याला आठवणीने सांगायचा, "मला शेतात नारळाची झाडे आवडतात. नवीन रोपे आणून या खड्ड्यात लावणार आहे !"
प्रत्यक्षात त्या खड्ड्यात तो त्याचे 'सावज' खलास झालं की पुरून टाकायचा.
त्यासाठी ज्याचा खून करायचा आहे त्याला कधी आमिष दाखवून, तर कधी गोड बोलून तर कधी ब्लॅकमेल करून तिथं बोलवायचा. मग त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करून तो त्यांना विषारी वा तत्सम औषधांचे ओव्हरडोस द्यायचा. शिकार गर्भगळीत झालं की तो त्याला संपवून टाकायचा.

डॉ. संतोष पोळने डॉक्टरीची सुरुवात धोम या आडवळणाच्या गावातून केली. मातीचे घर आणि त्यावर पत्रे अशा रुपात त्याचा दवाखाना होता. धोमसह आसपासच्या गावातील नागरिकांना त्याचाच दवाखाना सर्वात जवळचा होता. महाराष्ट्रात आजही अनेक खेडोपाडी असे शेकड्याने डॉक्टर आढळतील, विशेष म्हणजे यांच्या पदवीची खातरजमा करण्याची कोणतीही यंत्रणा इंडियन मेडिकल कौन्सिलकडे नाही. ते पोलिसांच्या मागे टुमणे लावतात. आहे त्या कामांनी अन पुढारयांना सलाम ठोकून 'बेजार' झालेले पोलीस तरी काय काय करणार ? असो... तर ह्या डॉक्टरची लवकरच पंचक्रोशीत ख्याती झाली, गावातील राजकारणी आणि उच्चभ्रू लोकांसोबत उठबस वाढली. त्याच्याकडे येणारया लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली अन त्याची नियत बिघडू लागली. आर्थिक देवाण घेवाणी वरून ज्याच्याशी वाद होऊ लागले त्यांना गोत्यात आणण्यासाठी त्याने एक नामी अस्त्र शोधून काढले. त्याच्याकडे येणारया 'नेमक्या' महिलांना तुम्हाला गुप्तरोग आहे असे सांगायचा अन पुरुषांना सांगायचा की तुम्हाला एड्स झाला आहे. असे खोटेनाटे सांगून तो ब्लॅकमेलिंग करू लागला. त्याच्याकडे गेलेल्या पेशंटला तो म्हणायचा, 'तुम्हाला गंभीर आजार झाला आहे. त्यासाठी तुम्हाला हे इंजेक्शन घ्यावे लागेल. उपचारासाठी परत-परत यावे लागेल,' असे सांगून तो रुग्णाला कधी इलाजाच्या बहाण्याने तर कधी कामाच्या निमित्ताने त्यांना फार्महाऊसवर नेऊ लागला. त्या व्यक्तींना तिथं नेऊन तो त्यांच्याशी लैंगिक कृष्णकृत्ये करायचा. त्याच्या या ब्लॅकमेलिंगची लोकांना कुणकुण लागली होती पण त्याचे त्यांपुढचे अघोरकर्म लोकांच्या नजरेस पडले नव्हते त्यामुळे दबक्या आवाजात त्याच्या बद्दल चर्चा वाढू लागली होती. त्याच्या सामाजिक प्रतिष्ठमुळे लोक त्याच्याविरोधात बोलण्यास घाबरत होते. त्याचा नेमका फायदा संतोष पोळने घेतला आणि त्याची 'चटक' व 'तलफ' वाढत गेली.....

मांजराने जरी डोळे झाकून दुध पिले तरी जगाला ते दिसत असते. सत्य हे कधी न कधी बाहेर येतेच. संतोष पोळचेही बिंग असेच फुटले. अंगणवाडी सेविका मंगल जेधे या अंगणवाडी सेविकांच्या संघटनाच्या पदाधिकारी महिलेची मिसिंगची तक्रार आली अन पोलीस खात्यावर दबाव वाढला तसे पोलीस लगेच सक्रीय झाले.
२००३ पासून वाई पोलिस स्टेशन हद्दीतून महिलांच्या मिसिंग कसे समोर येत होत्या. त्यामुळे वाई आणि आसपासच्या पोलिस स्टेशन अंतर्गत किती महिला मिसिंग आहे याची माहिती क्राइम ब्रँचने घेतली. यात मंगला जेधे, सलमा शेख, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, सुरेखा चिकने यांचे प्रकरण गंभीर होते. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात आल्यानंतर वेगाने तपास सुरु झाला. यातील सलमा, वनिता ह्या संतोषकडे नर्स म्हणून पूर्वी कामास असल्याची माहिती आल्यामुळे पोलिसांचे लक्ष या यमदूत डॉक्टरकडे गेले. शिवाय ज्या दिवशी मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवसाच्या लास्ट मोबाईल कॉलचे लोकेशन आणि त्याच काळातले संतोष पोळच्या मोबाईल लोकेशन एकच निघाले. आपल्यावर संशय घेऊन तपासाचा फास आवळला जातोय हे लक्षात येताच संतोषने कौटुंबिक कारणं सांगून तिथून सुं बाल्या केला. मंगल जेधे ह्या १६ जूनपासून गायब होत्या अन पोलिसांनी पाळत ठेवून १३ ऑगस्टला दादरजवळ अटक केली अन या सर्व गोरखधंद्यावरचा पडदा उठला. त्याला जेरबंद केल्यावर त्याने सर्व गुन्हे कबुल केले मात्र त्याने जी हकीकत सांगितली ती मात्र चक्रावून सोडणारी अन माणुसकीला काळीमा लावणारी होती. डॉक्टरी पेशाला तर पूर्णतः कलंकित करणारी होती.

घटना घडल्या दिवशी मंगल जेधे ह्या वाई येथून मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला निघाल्या होत्या. मात्र मंगल जेधे तेथे पोहोचल्याच नाहीत. ज्या ज्योती मांढरेमुळे मंगल जेधे आणि संतोष पोळ यांच्यात वाद झाला होता त्या ज्योती मांढरे हिला त्याने नर्स म्हणून कामावर ठेवले होते. पोलिसांनी तिलाच जेंव्हा आपल्या रडारवर घेतले तेंव्हा ती पोपटासारखी बोलू लागली अन सगळे क्ल्यू खुले झाले. तिने आपण तीन जीवांना विषारी औषधाचे ओव्हरडोस दिल्याचे कबूल केले. ज्योतीच मंगलला वाई बसस्टँडवरुन पोळच्या फार्म हाऊसवर घेऊन गेली होती. वाईपासून हे फार्म हाऊस १३ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून ह्या दोघी थेट फार्महाऊसवर आल्या अन मंगल जेधे आपल्या जीवाला मुकल्या...

मंगल जेधेंना संतोषच्या भानगडींची कुणकुण लागली होती. त्याचे आणखी काही स्त्रियांसोबत संबंध असावेत असा त्यांचा संशय होता अन झालेही तसेच. ज्योती मांढरे सोबत रासलीला करताना त्यांनी संतोष पोळला रंगेहाथ पकडले. आता मंगल जेधे आपल्याला जड जाईल हे लक्षात येताच संतोषने त्यांचा काटा काढला. फार्महाऊसवर 'नारळाच्या खड्डयाचे' खोदकाम करून घेतले ! २२ मे २००३ ला त्याने पहिला खून केला होता तो सुरेखा चिकणे यांचा होता. त्यांनतर १२ऑगस्ट २००६ रोजी वनिता गायकवाड, तर १५ ऑगस्ट २०१० रोजी जगबाई पोळ, १० डिसेंबर २०१५ ला नथमल भंडारी आणि १७ जानेवारी २०१६ ला सलमा शेखचा खून केला, आणि १६ जून २०१६ ला मंगल जेधे यांची हत्या केली. त्याने आणखी किती हत्या केल्या, किती जणांचे शोषण केले हे आणखी काही दिवसात स्पष्ट होईल.

संतोष पोळने त्याच्याकडे येणारे रुग्ण सोडले नाहीत की त्याच्या सहायक असणारया परिचारिका सोडल्या नाहीत. त्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेत त्यांनाही औषधाचा डोस पाजून त्याच्याशी संबंध ठेवू लागला. याच साखळीत त्याने मंगल जेधेंना अडकवले. त्यानाही भूलथापा ठोकल्या. मात्र त्यांच्या हत्येतील तपासातच त्याचे आधीचे सर्व गुन्हे उघडकीस आले...

जिथे डॉक्टरची डिग्री खरी की खोटी हे लोकांना माहिती नसते तिथे औषधांविषयी असणारे शून्य ज्ञान, आपल्याला कोणती ट्रिटमेंट दिली जातीय हे माहिती नसणे या गोष्टी अशा लोकांच्या पथ्यावर पडतात. लोकांमध्ये काही रोगांची भीती असते, त्याबद्दल ते वाच्यता करायला घाबरतात वा त्याची खरी माहिती किंवा उपचारपद्धतीही त्यांना ठाऊक नसते. त्याचा अचूक फायदा घेण्याची मनोवृत्ती तिथे बळावते. मग गुन्हेगारी अन विकृतीला तिथे पालवी फुटते अन असे किस्से अधूनमधून आपल्या कानावर येत राहतात. भ्रामक कल्पना डोक्यात ठेवून सहज विश्वास ठेवणे, तथाकथित उच्चभ्रू लोकांना घाबरणे आणि सत्य समोर मांडायला कचरणे यामुळे या प्रवृत्तीचे फावते आणि आपण नेहमीप्रमाणे बैल गेला झोप केला या उक्तीने पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर कामाला लागतो. सजग आणि निर्भीड समाजच असे दुष्प्रकार थोपवू शकतो हे वेगळे सांगायला नको. पण या सर्व प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रास एक काळिमा लागला हे देखील खेदाने नमूद करावे वाटते एकीकडे असे किस्से कानावर येत असताना काही डॉक्टर्स आपल्या पदराला खार लावून रुग्णसेवा करतात त्यांचे मोठेपण अशा प्रसंगानंतर अधिक उठून दिसते .....

- समीर गायकवाड.

अधिक वाचनासाठी ब्लॉगवर भेटा ...
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_85.html

untitled-3_1471325232_147.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयानक.

>> डॉक्टर शब्द आला की तो प्रतिसाद आपल्याला लागू झाला ह्या अहंकारातून बाहेर पडून विचार केला तर हे जाणवेल

डॉक्टर च्या जागी गझलकार शब्द टाकला तर समोरच्याकडे एक बोट दाखवताना बाकीची चार बोटं कोणाकडे निर्देश करताहेत तेही कळेल.

ज्यांना उद्देशून प्रतिसाद लिहिलेले आहेत त्यांना ते बरोबर समजलेले असावेत. बाकीच्यांनी ज्ञानप्रदर्शन नाही केले तरी सध्या चालेल. धागा भरकटण्याची सुरुवात कोठून झाली हे वाचक वाचत आहेत.

अवांतर - गझलकार म्हणून अहंकार दाखवल्याची उदाहरणे एखादा वेगळा धागा काढून पोस्ट केली गेली तर सुधारण्यास मदत होईल. (सापडली तर अवश्य डकवा)

समीर गायकवाड - तुमच्यासारख्या लेखकाच्या धाग्यावर ही वैयक्तीक आणि अवांतर चर्चा होत असल्याचा खेद आहे. पण फार झाले आणि संयम सुटला त्यातला प्रकार आहे. अन्यथा वरच्या बहुतेक संबंधितांचा हुकुमी अनुल्लेख करण्याचे कौशल्य प्राप्त केलेले आहेच.

-'बेफिकीर'!

akalecha kanda's reaction is very funny.
1. He has been practicing medicine in a famous hospital till last year on his very same degree recognized by govt as doctor once upon a time. So, if govt has not cancelled - he would still qualify for that degree - is it okay then?
2. There are multiple scams where doctors were actually involved in those cases - what do u say about it? and they are from all practices. We all have read and heard so many bad (as well as good - in which case, they are praised and are treated like heros) experiences of doctors.
So please do not say, allopathic doctors do not do such things.
3. In this case, he being doctor helped him to get control which he otherwise would not have - so the title is very appropriate.

I do not know you and have nothing against you personally - but your reactions are really not logical.

चर्चा "माणूस" ह्या संकल्पनेभोवती होऊ शकत नाही का? चांगल्या किंवा वाईटाशी "पेशा"चा काय संबंध?

>> गझलकार म्हणून अहंकार दाखवल्याची उदाहरणे एखादा वेगळा धागा काढून पोस्ट केली गेली तर सुधारण्यास मदत होईल. (सापडली तर अवश्य डकवा)

गझलकार च्या जागी डॉक्टर शब्द टाकला तर डॉक्टर उपकृत होतील.

गुंड्याभाऊ तिकीट चेकर होतात ती गोष्ट आठवली.

गुंड्याभाऊ आगगाडीतून फलाटावर उतरुन स्थानकाबाहेर जाणार्‍या प्रवाशांची तिकीटे तपासण्याकरिता उभे असतात. तेव्हा एक विनातिकीट प्रवासी त्यांच्यासमोर येतो. गुंड्याभाऊ त्यास तिकीट विचारतात. तो मोठ्या ऐटीत खिशात हात घालून विचारतो, "मी तिकीट काढले आहे, पण ते तुम्हास दाखवायलाच हवे का?" त्यावर गुंड्याभाऊही मोठ्या विनम्रतेने त्यास "तुम्ही तिकीट काढले आहे म्हंटल्यावर ते दाखवायची काहीच गरज नाही. तुम्ही जाऊ शकता, पण हां जर का तुम्ही ते काढले नसते तर मात्र मी तुम्हाला ते दाखविल्याशिवाय सोडले नसते." त्यावर तो विनातिकीट प्रवासीही पुन्हा मानभावीपणाने उत्तरतो, "हो आणि मीही ते काढले नसते तर तुम्हाला नक्कीच दाखविल्याशिवाय बाहेर पडलो नसतो."

इथे गुंड्याभाऊचा उद्देश चांगला आहे की, ज्याने तिकीट काढले आहे त्या सभ्य प्रवाशाची तपासणी करुन त्यास अपमानित करावयाची गरज नाही तर फक्त विनातिकीट प्रवाशांचीच तेवढी तपासणी करावयाची. पण यातली ग्यानबाची मेख अशी की, प्रवासी विनातिकीट आहे की तिकीटधारक हे तपासणी केल्याशिवाय कळणार तरी कसे?

तद्वतच केवळ भोंदू डॉक्टरांपासूनच जनतेने सावध आणि चौकस राह्यला हवे हे मान्य, पण जोवर त्याची तपासणी होत नाही तोवर फलकावर नावाअगोदर "डॉ." असे एकाक्षरी संबोधन लावून व्यवसाय करणारा खरा की खोटा हे कळणार तरी कसे?

डॉक्टरी पेशातील (किंवा इतर कुठल्याही पेशातील) शेकडा एक लोक फसवणूक करणारे असले काय किंवा शेकडा नव्व्याण्णव लोक फसवणूक करणारे असले काय त्याने उर्वरित जे सचोटीने व्यवसाय करणारे आहेत त्यांची प्रतिष्ठा कमी होणार नाहीच, उलट ती वाढतच जाईल. तेव्हा मायबोलीवर सक्रिय असणार्‍या आणि नसणार्‍याही सर्व सन्माननीय डॉक्टरांनी "असे अनेक डॉक्टर्स अजूनही असतील" या वाक्याने मनस्ताप करुन घेण्यापेक्षा उलट असे तांदळातले खडे शोधण्यास मदत करावी.

कशी तेही इथे सुचवितो.
इथले सर्वच डॉक्टर तज्ज्ञ आणि अनुभवी आहेत. ते मायबोलीकरांना अशा टिप्स नक्कीच देऊ शकतील ज्याद्वारे मायबोलीकर जेव्हा रुग्ण म्हणून स्थानिक डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना दोनचार असे काही प्रश्न विचारतील की त्यांच्या उत्तरांमधून तो डॉक्टर खरा की बोगस (किंवा खरा असुनही अर्धशहाणा) हे कळण्यास मदत होईल.
अशा प्रश्नांची यादी मायबोलीकर डॉक्टरांना देणे शक्य असल्यास त्यांनी जरुर द्यावी ही नम्र विनंती.

(असे काही शक्य नसल्यास माझा पास. मी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नाही परंतु अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असणारे मी व माझे सहकारी आमच्या संपर्कात येणार्‍या इतर अभियंत्यांचे, जे की आमचे सप्लायर असतात - अशांचे ज्ञान काही मोजके प्रश्न अगदी खुबीने अनौपचारिक गप्पांत विचारुन त्यांच्या उत्तरावरुन जोखतो आणि त्यानंतर त्यांची उत्पादने / सेवा विकत घ्यायचा निर्णय घेतो.)

अशांचे ज्ञान काही मोजके प्रश्न अगदी खुबीने अनौपचारिक गप्पांत विचारुन त्यांच्या उत्तरावरुन जोखतो आणि त्यानंतर त्यांची उत्पादने / सेवा विकत घ्यायचा निर्णय घेतो>>>> सुंदर कल्पना!!!!

मेडिकल काॅन्सिलच्या साईटवर डाॅक्टरचे नाव किंवा रजिस्ट्रेशन नंबर सर्च करुन तो डाॅक्टर खरा (रजिस्टर्ड) आहे का याची पडताळणी करता येते.

डाॅ. ची डिग्री, युनिव्हर्सिटी, रजिस्ट्रेशनचे डिटेल्स पाहता येतात.

शिवाय ब्लॅकलिस्टेड डाॅ. ची यादी देखील आहे.

http://www.mciindia.org/InformationDesk/IndianMedicalRegister.aspx

गमभन, त्यात फक्त मॉडर्न मेडिसीन (सो कॉल्ड अ‍ॅलोपथिक) डॉक्टरांचं रजिस्ट्रेशनच बघता येतं.
आयुर्वेदिक /होमिओपथी/युनानी/सिद्ध अशा वेगवेगळ्या पथ्यांच्या कौन्सिल वेगवेगळे रजिस्टर मेंटेन करतात.
त्यात सरकारने मध्ये खरंच इलेक्ट्रोपथी नावाचा फालतू कोर्स मान्य करून मग रद्द केला होता. (याची कॉलेजे म्हणजे अगदी दिव्य असत.)
नॅचरोपथीचा पत्राद्वारे कोर्स केलेले एक्स वाय झेड पण हल्ली स्वतःच्या नावामागे डॉ लिहितात.

बाकी बालाजी तांबे सारखे लोक स्वतःला डॉक्टर म्हणवून घेतात, त्यांची पदवी कुठल्या कऊंसेलात रजिस्ट्र्ड आहे ते बघायला आवडेल.

साती,
या असल्या विकृत भोंदूंच्या वागण्यावरून येनकेन प्रकारेन सर्वच व खर्‍या डॉक्टरांवरही संशयाचे वातावरण तयार करण्याची विकृती तुमच्या मनात कुठून व का येते? रजिस्ट्रेशन आणि पदवी बघून सजग राहणे, चौकशी करणे असल्या गोष्टी केल्याबद्दल वेल्कम टू द ग्रुप. ते इंग्रजीतलं बोलणं तुम्हीच परत वाचून या. ते चिकटवण माझ्याने होणार नाही.

अमितव, तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाही आहे.
म्हणजे प्रतिसादाचा रोख वगैरे.
एवढंच सांगते की जर कुठले डॉक्टर नोयम पाळत वगैरे असतील तर अश्या काऊंसेलात रजिस्टर्ड.

पण डॉक्टरकडे जाताना खात्री करा वगैरे भारतात प्रॅक्टीकली शक्य नाही हो.
वाई तर तसा गावठी भाग पण भर पिंपरीत चिंचवड एरियात गेल्यावर्षी एका हायटेक डॉक्टरला अटक झाली जो स्वतःला एम डी फिनीशीयन म्हणवून घेत होता पण बारावी पासही नव्हता.
बरं अटक झाली कारण त्याच्या पहिल्या पत्नीने त्याच्या दुसर्‍या लग्नावर आक्षेप घेतला.
कुठल्या रूग्णाने त्याच्या डिग्रीवर किंवा औषधांवर संशय घेतला म्हणून नव्हे.

मला आत्तापर्यंत गेल्या १२ वर्षांत तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काय असे विचारणारे मोजून दहा ते बारा लोक मिळाले असतील.
ते पण इन्शुरन्स वगैरे क्लेम करायला.
इथे लोक सर्टीफिकेट बगैरे चेक करत नाहीत.
दवाखान्यावरचा बोर्ड आणि तोंडी जाहिरात यावरून येतात.

गावात सातवी पास /नापास ते बी एस सी/एम एल टी/ नर्सिंग असे कुणीही प्रॅक्टीस करतात.

महाराष्ट्रातले मला माहित नाही, पण इथे कर्नाटकात अश्या लोकांच्या क्लिनीकवर छापे मारायला सुरूवात केली की हे लोक सरळ धरणे धरतात्/स्ट्राईक करतात , राजकारण्यांवर दबाब आणतात.
स्थानिक लोकांचाही याला पाठिंबा असतो कारण रात्री अपरात्री साधं पेनकिलर /अ‍ॅसिडीटीचं दहा रू चं इंजेक्शन घ्यायला दोन तीनशे रूपये घालून पन्नास साठ किमी यायला लोक तयार नसतात.

याला असणारी सोशिओइकॉनॉमिक कारणे पुन्हा राजकारण्/भ्रष्टाचार /सरकारी अनास्था याकडे जातात.
तेव्हा हे बास.

मात्र या पर्टीक्यूलर केसमध्ये मूळातच हा माणूस विकृत दिसतो.
तो भोंदू डॉक्टर नसता तरी ज्या कुठल्या फिल्ड्मध्ये असला असता तिथली संसाधने वापरून त्याने असे काही प्रकार केलेच असते असे वाटते.

गमभन, त्यात फक्त मॉडर्न मेडिसीन (सो कॉल्ड अ‍ॅलोपथिक) डॉक्टरांचं रजिस्ट्रेशनच बघता येतं.
आयुर्वेदिक /होमिओपथी/युनानी/सिद्ध अशा वेगवेगळ्या पथ्यांच्या कौन्सिल वेगवेगळे रजिस्टर मेंटेन करतात.
>>

अरे बापरे. असं पण आहे काय? माहितीच नव्हते.
ज्यांना माॅर्डन मेडिसिन, आयुर्वेद, होमिओपथीची ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यांनी त्या त्या कौन्सिलच्या रजिस्टरमधुन पडताळुन पाहावे.

पण लोकांमध्ये याविषयी अवेरनेस व्हायला पाहिजे.
आपल्याकडे तर केमिस्टला पण डाॅ समजुन भक्तिभावाने ऒषध घेणारे लोक आहेत. Sad

गमभन, आपल्या एच के रिजनात हापिशीयली अशा 'प्रॅक्टीसिंग' डॉक्टरांना अध्येमद्ये रजिस्टर्ड करण्यात येते.
काही दिवस हैद्राबादेतल्या मोठ्या किंवा सरकारी कॉलेजात तीन महिन्याचा काहिसा सरकारी कोर्स करून मध्ये एकदोनदा या फुटकळांना रजिस्टर्ड करण्यात आलं.
दहावी पास्/एखाद्या हास्पिटलात काही ठराविक काळ काम केल्याचे सर्टीफिकेट एवढ्याच आवश्यक गोष्टी होत्या.
मेढकमधले काही आर एम पी माझ्याकडे सर्टीफिकेट मागायला आले तेव्हा मला समजलं हे.

आमच्या इथे एक डॉक्टर होता ,बोगस होता की नाही माहीत नाही,त्याने एका महीलेला भुलीचे इंजेक्शन देऊन योग्य तो कारभार साधला अशी त्या महीलेची का तीच्या नातेवाईकांची तक्रार होती.तेव्हा पासुन तो डॉक्टर " भुलीचा डॉक्टर " यानावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध पावला.खेड्यापाड्यात प्रॅक्टीस करत होता म्हणजे mbbs न्हवताच,गंमतीचा भाग असा की या प्रकारानंतरही भुलीचा डॉक्टर पंचक्रोशीत लोकप्रिय होता व लोक त्याच्याकडे जात होते.यावरुन लोक कसे असतात हे कळते,साधी कोथिंबीर ताजी आहे का हे सतरांदा विचारुन भाजीवालीला/ल्या बेजार करतील ,पण खेड्यात तडमडत आलेला डॉक्टर खरा आहे की खोटा हे मात्र जराहि विचारणार नाहीत.

काही दिवस हैद्राबादेतल्या मोठ्या किंवा सरकारी कॉलेजात तीन महिन्याचा काहिसा सरकारी कोर्स करून मध्ये एकदोनदा या फुटकळांना रजिस्टर्ड करण्यात आलं.
>>
हे भयंकर आहे.

दहावी पास व्यक्तीला मानवाच्या शरीराची अगदीच बेसिक माहिती असेल ती पण शाळेत जे काही शिकवलेले असेल ते.
अश्या व्यक्तीला रजिस्टर्ड करुन रुग्णांचा जीव का धोक्यात घालावा.

सर्कारला विचारा.
खेड्यापाड्यातल्या जनतेच्या सेवेसाठी म्हणे!

खेड्यापाड्यातल्या जनतेच्या सेवेसाठी म्हणे!>>>> एकेक नवीन नवीन माहिती वाचून आश्चर्यचकित झालोय. ऐसा भी होता है?

@ साती | 19 August, 2016 - 23:23 नवीन>>>>> संपुर्ण पोष्ट्ला अनुमोदन

खेडे कशाला शहारात देखिल कोणी डॉक्टरांची ईतकी माहिती काढताना निदान मला तरी माहीत नाही

माझ्या मित्राचा एक मामेभाऊ आहे नाशिक कळवणला एका गावात. त्याला डॉक्टर बनायचा खूप शौक आहे. 10 वि झाल्यावर तो गावातल्याच एका डॉक्टरकडे हरकाम्या म्हणून लागला. डॉक्टर कायम दारू पिउन आउट असायचा, हाच दवाखाना सांभाळायचा, म्हणजे करायचा काय तर पेनकिलर द्यायचा. सर्दी ताप पेशंट तपासायचा. बाकी सगळे डाक्टर शुद्धीत असताना करायचा. याला त्या डॉक्टरमुले दोन चार पेन किलरची नावे माहीत झालेली तेवढे ज्ञान बस झाले याबद्दल खुपच खात्री होती याला. दोन वर्षे गावचा अनुभव खूप झाला , आता मुंबईला थोडा अनुभव घेऊ म्हणून तो इथे आला तेव्हा माझी त्याची ओळख झाली. अमुक आजारावर अमुक औषध चालते हे तो इतक्या आत्मविश्वासाने म्हणून मला सांगायचं कि ऐकून मी हतबुद्ध व्हायचे. मी एकदोनदा त्याला म्हटलेही कि पेन किलरने सगळी कामे होत असतील तर लोक कांय वेडे आहेत इतकी वर्षे खर्च करून डॉक्टरकीचा अभ्यास करायला? तर हसायचा. हिला काय कळतेय हा भाव असायचा चेहऱ्यावर. पेन किलर्सची नावे तो अगदी धडाधड घ्यायचा, त्यांनी सगळे रोग बरे होतात यावर ठाम श्रद्धा. इथल्या क्लिनिकमध्ये त्याला गावी होता तसा फ्री हॅन्ड मिळेना, क्लिनिक बदलले तरी फरक पडला नाही म्हणून शेवटी शिव्या देऊन क्लिनिक सोडले आणि परत गावी त्याच डॉक्टरकडे गेला. त्याला स्वतःचे क्लिनिक सुरु करायचेय. आणि ते सुरु करणारच यावर तो ठाम आहे. त्यासाठी एखादा शॉर्ट टर्म कोर्स करायलाही तो तयार आहे. पण पैसे नसल्याने सगळेच गाडे अडकलेय. देव भले करो भविष्यात त्याच्याकडे येणाऱ्या पेशंटचे.

साधना, अशा भोंदु लोकांची कमाई नेहेमी चार दिनकी चांदनी अशी असते. भविष्यात त्यांचा खोटेपणा हा उघडकीला येणारच असतो. कारण भोळ्या- भाबड्या ( गावातल्या-खेड्यातल्या) लोकांना किती दिवस फसवुन यांचे दुकान चालणार? शेवटी वरती त्याच्याकडे न्याय असतोच असतो.

साती, राजकारणी लोक/ पुढारी/ नेते हे कोणत्याही पक्षाचे का असेना, त्यांना स्वतःच्या १४ पिढ्या बसुन खातील एवढे मिळाले म्हणजे झाले. लोकांशी त्यांना काय घेणे देणे? लाच खाऊन आपले सरकारी कर्मचारी काम करणार आणी यांना हजार रुपये मोजुन डिग्र्या मिळणार. दुनिया झुकती है.....

गमभन, तुम्ही दिलेल्या साईट वर, मी माझे न्युरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलोजिस्ट, आणि पत्नीचे डायबेटॉलॉजिस्ट यांचे नाव नाही. एकाचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला तर त्याच नंबरवर पाच सहा वेगळ्या राज्यातली नावे आली पण त्यात हवे ते नाव नाहीच.
हे डॉक्टर्स हैद्राबाद मध्ये प्रसिद्ध रुग्णालायत सुद्धा प्रॅक्टिस करतात, त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर्स शिक्का / लेटरहेडवर प्रिंटेड आहेत. त्यांच्या आलेल्या अनुभवावरुन शंकेला किंचितसा सुद्धा वाव नाही.
म्हणजे तूर्तास तरी या साईटवर पूर्ण डाटा अपलोड नसावा.

काही विशिष्ट सामाजिक स्तरातले लोकच असले धन्दे करतात. एका विशिष्ठ वर्गातली नावे कधीच या भोंदू डॉक्टरां च्या यादीत येणार नाहीत ही अभिमानाची बाब आहे.

गमभन, ओके. इकडे आडनाव वगैरे नसते. इनिशियल्स वापरायची पद्धत आणि कागदोपत्री त्याचा पूर्ण विस्तार ही शक्यता लक्षात इनिशिअल वगळून सर्च केल्यास नाव आले, इनिशिअल विस्तारासकट. पण रजिस्ट्रेशन नंबर जुळत नाही.
MBBS पदवीचा रजिस्ट्रेशन नंबर वेगळा, आणि पु्ढील स्पेशलायझेशनच्या रजिस्ट्रेशनचा नंबर वेगळा (जो लेटरहेडवर छापलाय) असे असते का?

साधना, अशा भोंदु लोकांची कमाई नेहेमी चार दिनकी चांदनी अशी असते. भविष्यात त्यांचा खोटेपणा हा उघडकीला येणारच असतो. कारण भोळ्या- भाबड्या ( गावातल्या-खेड्यातल्या) लोकांना किती दिवस फसवुन यांचे दुकान चालणार? शेवटी वरती त्याच्याकडे न्याय असतोच असतो.
>>>>

हाहाहा. तुम्हाला कितीतरी आर.एम.पी. किंवा शुद्ध ढोंगी डॉक्टर (क्वॅक) दाखवेन ज्यांना आयुष्यभर काहीही झाले नाही. आरामात जगून श्रीमंतीत मेले!

आर एम पी ही मान्यता प्रप्त डिग्री होती. ज्ञान कमी होते पण खेडोपाडी मागच्या पिढीत त्यानी त्यांच्या मर्यादेत फारसे शोषण न करता बर्‍यापैकी एथिकल प्रॅक्टीस केली आहे.

Pages