'डॉक्टर म्हणजे देवदूत' या समाजाला छेद देणारी घटना इतकंच या घटनेचे वर्णन करून चालणार नाही तर हे कसे शक्य झाले अन हे का घडले याचाही विचार होणे गरजेचे आहे .....
निसर्गरम्य सातारा जिल्ह्यातील धोम या गावातली काळजाचा थरकाप उडवणारी ही गोष्ट. एका पाठोपाठ सहा खून घडूनही तिथं एक डॉक्टर स्वतःला देवदूत असल्याचे भासवत होता. प्रत्यक्षात तो होता खुनी यमदूत ! त्या डॉक्टर संतोष पोळवरची ही पोस्ट...
डॉ. पोळच्या डोक्यात ज्याला मारायचे आहे त्याची पूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार असायची. हत्या करण्याचा पूर्ण प्लॅन तयार असायचा. हत्या करण्याचा कालावधी तो आधी निश्चित करायचा अन मुक्रर केलेल्या दिवसाआधी तीन महिने तो कामाला लागायचा. त्यासाठी आधी तो जेसीबी भाड्याने घ्यायचा. जेसीबीवाल्याला त्याच्या फार्महाऊसवर घेऊन जायचा. खेडेगावात शिवारात असते तसे खोपटवजा आणि थोडे कच्चे बांधकाम केलेल्या त्याच्या या फार्महाऊसच्या मोकळ्या जागेपाशी जेसीबी आला की तो तिथं चार बाय दोनचा मोठा खड्डा खोदून घ्यायचा. सहा सात फुट खोल खांदून झाले की जेसीबीवाल्याची मजुरी देऊन त्याला आठवणीने सांगायचा, "मला शेतात नारळाची झाडे आवडतात. नवीन रोपे आणून या खड्ड्यात लावणार आहे !"
प्रत्यक्षात त्या खड्ड्यात तो त्याचे 'सावज' खलास झालं की पुरून टाकायचा.
त्यासाठी ज्याचा खून करायचा आहे त्याला कधी आमिष दाखवून, तर कधी गोड बोलून तर कधी ब्लॅकमेल करून तिथं बोलवायचा. मग त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करून तो त्यांना विषारी वा तत्सम औषधांचे ओव्हरडोस द्यायचा. शिकार गर्भगळीत झालं की तो त्याला संपवून टाकायचा.
डॉ. संतोष पोळने डॉक्टरीची सुरुवात धोम या आडवळणाच्या गावातून केली. मातीचे घर आणि त्यावर पत्रे अशा रुपात त्याचा दवाखाना होता. धोमसह आसपासच्या गावातील नागरिकांना त्याचाच दवाखाना सर्वात जवळचा होता. महाराष्ट्रात आजही अनेक खेडोपाडी असे शेकड्याने डॉक्टर आढळतील, विशेष म्हणजे यांच्या पदवीची खातरजमा करण्याची कोणतीही यंत्रणा इंडियन मेडिकल कौन्सिलकडे नाही. ते पोलिसांच्या मागे टुमणे लावतात. आहे त्या कामांनी अन पुढारयांना सलाम ठोकून 'बेजार' झालेले पोलीस तरी काय काय करणार ? असो... तर ह्या डॉक्टरची लवकरच पंचक्रोशीत ख्याती झाली, गावातील राजकारणी आणि उच्चभ्रू लोकांसोबत उठबस वाढली. त्याच्याकडे येणारया लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली अन त्याची नियत बिघडू लागली. आर्थिक देवाण घेवाणी वरून ज्याच्याशी वाद होऊ लागले त्यांना गोत्यात आणण्यासाठी त्याने एक नामी अस्त्र शोधून काढले. त्याच्याकडे येणारया 'नेमक्या' महिलांना तुम्हाला गुप्तरोग आहे असे सांगायचा अन पुरुषांना सांगायचा की तुम्हाला एड्स झाला आहे. असे खोटेनाटे सांगून तो ब्लॅकमेलिंग करू लागला. त्याच्याकडे गेलेल्या पेशंटला तो म्हणायचा, 'तुम्हाला गंभीर आजार झाला आहे. त्यासाठी तुम्हाला हे इंजेक्शन घ्यावे लागेल. उपचारासाठी परत-परत यावे लागेल,' असे सांगून तो रुग्णाला कधी इलाजाच्या बहाण्याने तर कधी कामाच्या निमित्ताने त्यांना फार्महाऊसवर नेऊ लागला. त्या व्यक्तींना तिथं नेऊन तो त्यांच्याशी लैंगिक कृष्णकृत्ये करायचा. त्याच्या या ब्लॅकमेलिंगची लोकांना कुणकुण लागली होती पण त्याचे त्यांपुढचे अघोरकर्म लोकांच्या नजरेस पडले नव्हते त्यामुळे दबक्या आवाजात त्याच्या बद्दल चर्चा वाढू लागली होती. त्याच्या सामाजिक प्रतिष्ठमुळे लोक त्याच्याविरोधात बोलण्यास घाबरत होते. त्याचा नेमका फायदा संतोष पोळने घेतला आणि त्याची 'चटक' व 'तलफ' वाढत गेली.....
मांजराने जरी डोळे झाकून दुध पिले तरी जगाला ते दिसत असते. सत्य हे कधी न कधी बाहेर येतेच. संतोष पोळचेही बिंग असेच फुटले. अंगणवाडी सेविका मंगल जेधे या अंगणवाडी सेविकांच्या संघटनाच्या पदाधिकारी महिलेची मिसिंगची तक्रार आली अन पोलीस खात्यावर दबाव वाढला तसे पोलीस लगेच सक्रीय झाले.
२००३ पासून वाई पोलिस स्टेशन हद्दीतून महिलांच्या मिसिंग कसे समोर येत होत्या. त्यामुळे वाई आणि आसपासच्या पोलिस स्टेशन अंतर्गत किती महिला मिसिंग आहे याची माहिती क्राइम ब्रँचने घेतली. यात मंगला जेधे, सलमा शेख, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, सुरेखा चिकने यांचे प्रकरण गंभीर होते. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात आल्यानंतर वेगाने तपास सुरु झाला. यातील सलमा, वनिता ह्या संतोषकडे नर्स म्हणून पूर्वी कामास असल्याची माहिती आल्यामुळे पोलिसांचे लक्ष या यमदूत डॉक्टरकडे गेले. शिवाय ज्या दिवशी मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवसाच्या लास्ट मोबाईल कॉलचे लोकेशन आणि त्याच काळातले संतोष पोळच्या मोबाईल लोकेशन एकच निघाले. आपल्यावर संशय घेऊन तपासाचा फास आवळला जातोय हे लक्षात येताच संतोषने कौटुंबिक कारणं सांगून तिथून सुं बाल्या केला. मंगल जेधे ह्या १६ जूनपासून गायब होत्या अन पोलिसांनी पाळत ठेवून १३ ऑगस्टला दादरजवळ अटक केली अन या सर्व गोरखधंद्यावरचा पडदा उठला. त्याला जेरबंद केल्यावर त्याने सर्व गुन्हे कबुल केले मात्र त्याने जी हकीकत सांगितली ती मात्र चक्रावून सोडणारी अन माणुसकीला काळीमा लावणारी होती. डॉक्टरी पेशाला तर पूर्णतः कलंकित करणारी होती.
घटना घडल्या दिवशी मंगल जेधे ह्या वाई येथून मुलीच्या बाळंतपणासाठी पुण्याला निघाल्या होत्या. मात्र मंगल जेधे तेथे पोहोचल्याच नाहीत. ज्या ज्योती मांढरेमुळे मंगल जेधे आणि संतोष पोळ यांच्यात वाद झाला होता त्या ज्योती मांढरे हिला त्याने नर्स म्हणून कामावर ठेवले होते. पोलिसांनी तिलाच जेंव्हा आपल्या रडारवर घेतले तेंव्हा ती पोपटासारखी बोलू लागली अन सगळे क्ल्यू खुले झाले. तिने आपण तीन जीवांना विषारी औषधाचे ओव्हरडोस दिल्याचे कबूल केले. ज्योतीच मंगलला वाई बसस्टँडवरुन पोळच्या फार्म हाऊसवर घेऊन गेली होती. वाईपासून हे फार्म हाऊस १३ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून ह्या दोघी थेट फार्महाऊसवर आल्या अन मंगल जेधे आपल्या जीवाला मुकल्या...
मंगल जेधेंना संतोषच्या भानगडींची कुणकुण लागली होती. त्याचे आणखी काही स्त्रियांसोबत संबंध असावेत असा त्यांचा संशय होता अन झालेही तसेच. ज्योती मांढरे सोबत रासलीला करताना त्यांनी संतोष पोळला रंगेहाथ पकडले. आता मंगल जेधे आपल्याला जड जाईल हे लक्षात येताच संतोषने त्यांचा काटा काढला. फार्महाऊसवर 'नारळाच्या खड्डयाचे' खोदकाम करून घेतले ! २२ मे २००३ ला त्याने पहिला खून केला होता तो सुरेखा चिकणे यांचा होता. त्यांनतर १२ऑगस्ट २००६ रोजी वनिता गायकवाड, तर १५ ऑगस्ट २०१० रोजी जगबाई पोळ, १० डिसेंबर २०१५ ला नथमल भंडारी आणि १७ जानेवारी २०१६ ला सलमा शेखचा खून केला, आणि १६ जून २०१६ ला मंगल जेधे यांची हत्या केली. त्याने आणखी किती हत्या केल्या, किती जणांचे शोषण केले हे आणखी काही दिवसात स्पष्ट होईल.
संतोष पोळने त्याच्याकडे येणारे रुग्ण सोडले नाहीत की त्याच्या सहायक असणारया परिचारिका सोडल्या नाहीत. त्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेत त्यांनाही औषधाचा डोस पाजून त्याच्याशी संबंध ठेवू लागला. याच साखळीत त्याने मंगल जेधेंना अडकवले. त्यानाही भूलथापा ठोकल्या. मात्र त्यांच्या हत्येतील तपासातच त्याचे आधीचे सर्व गुन्हे उघडकीस आले...
जिथे डॉक्टरची डिग्री खरी की खोटी हे लोकांना माहिती नसते तिथे औषधांविषयी असणारे शून्य ज्ञान, आपल्याला कोणती ट्रिटमेंट दिली जातीय हे माहिती नसणे या गोष्टी अशा लोकांच्या पथ्यावर पडतात. लोकांमध्ये काही रोगांची भीती असते, त्याबद्दल ते वाच्यता करायला घाबरतात वा त्याची खरी माहिती किंवा उपचारपद्धतीही त्यांना ठाऊक नसते. त्याचा अचूक फायदा घेण्याची मनोवृत्ती तिथे बळावते. मग गुन्हेगारी अन विकृतीला तिथे पालवी फुटते अन असे किस्से अधूनमधून आपल्या कानावर येत राहतात. भ्रामक कल्पना डोक्यात ठेवून सहज विश्वास ठेवणे, तथाकथित उच्चभ्रू लोकांना घाबरणे आणि सत्य समोर मांडायला कचरणे यामुळे या प्रवृत्तीचे फावते आणि आपण नेहमीप्रमाणे बैल गेला झोप केला या उक्तीने पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर कामाला लागतो. सजग आणि निर्भीड समाजच असे दुष्प्रकार थोपवू शकतो हे वेगळे सांगायला नको. पण या सर्व प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रास एक काळिमा लागला हे देखील खेदाने नमूद करावे वाटते एकीकडे असे किस्से कानावर येत असताना काही डॉक्टर्स आपल्या पदराला खार लावून रुग्णसेवा करतात त्यांचे मोठेपण अशा प्रसंगानंतर अधिक उठून दिसते .....
- समीर गायकवाड.
अधिक वाचनासाठी ब्लॉगवर भेटा ...
http://sameerbapu.blogspot.in/2016/08/blog-post_85.html

<<<अहो खून केल्याशिवाय त्याना
<<<अहो खून केल्याशिवाय त्याना शान्त झोपच येत नाही स्मित . जसे काहीना मांसाहार केल्याशिवाय चैनच पडत नाही तसे>>>>>>
या वाक्याचा उत्तरार्ध अनावश्यक आहे. हाहा
>>
अगदीच आवश्यक. प्रत्यक्ष खून करणे आणि चिकनवाल्याकडून खून करवून घेणे यात तत्वतः मला फरक वाटत नाही. ::फिदी:
अगदी कापणारा मुलाणीही विचारतो " काटूं क्या"
तुम्ही म्हणता 'हो हो बेशक'
मग तो वर पाहून त्याच्या देवाला सांगतो ' इसने बोल्या, मैने काट्या.." मग त्याला हत्येचे पातक लागत नाही. त्याने त्यातून स्वतःची सोडवणूक देवाच्या साक्षीने केलेली असते. मग ते पाप त्याच्या अकाउंटवरून तुमच्या अकाऊंट वर ट्रान्स्पर होते ::फिदी:
ता क. मीही चिकनादि पदार्थांचा भोक्ता आहे...
भयानक, पण शिक्षेचे काय ?
भयानक, पण शिक्षेचे काय ?
बाप रे! भयानक.
बाप रे! भयानक.
भयाण....
भयाण....
किती विकृतपणा.. यक्क्क...
किती विकृतपणा.. यक्क्क...
भयानक. अशा घटनांना खरेतर
भयानक.
अशा घटनांना खरेतर समाजही तितकाच जबाबदार आहे. आपण माणसाच्या किती मोठ्या ओळखी आहेत यावरून त्याची पारख करतो. या प्रकरणातही लोकांना संशय आला पण एवढा मोठा माणूस, आपण काय बोलणार म्हणून लोक गप्प. काय म्हणायचे या वृत्तीला?
अण्णांबद्दल मजकूर - आपल्या समाजात प्रत्येक कायद्याचा गैरफायदा घेण्यात आलेला आहे. म्हणून मूळ कायदा वाईट होत नाही.
त्यांनी पदवीच न दिलेला माणूस
त्यांनी पदवीच न दिलेला माणूस डॉक्टर म्हणून वावरू लागला तर त्याच्या खोटेपणाचा छडा लावण्याचे काम ह्या कौन्सिलचे कसे? ते तर पोलिसांचे काम ना? >>>> आपणांस अनुमोदन.
अरे बापरे.. आज न्युज
अरे बापरे..
आज न्युज बघितल्याच नाही अन नेमका पेपर पन वाचला नाही..
इतके क्रुर लोक.. अतिशय भयानक आहे हे सगळ..
शीर्षकात शक्य झाल्यास
शीर्षकात शक्य झाल्यास डॉक्टरच्या जागी भोंदू वा बनावट डॉक्टर टाकले तर बरे, उगाच हा पेशा बदनाम नको.
आमच्या घरीही काल की परवा या बातमीवरचा अर्धा तासाचा कार्यक्रम बघत होते. नेमके तेव्हा आमचे जेवण चालू असल्याने कशाला जेवताना उगाच असल्या बातम्या बघतात म्हणून माझी चीडचीडच होत होती. कारण सध्या ऑलिंपिक चालू असल्याने बघण्यासारख्या बरेच चांगल्या बातम्या होत्या. त्यात अजून घरचे त्या माणसाला शिव्या घालत होते. याला नुसते फाशी देऊन उपयोग नाही तर याचे तोंड काळे करून धिंड काढली पाहिजे मग रोज चौकात नागडे करून चाबकाने फोडायला हवे. छळ छळ करून मारायला हवे वगैरे वगैरे ईति वडील. तर शी कशी असतात ना माणसे हे वारंवार आई. शेवटी वडील म्हणाले की अजून चारसहा खून केले असतील याने हळूहळू बाहेर निघतील. बहुधा आजच्या पेपरमध्ये बातमी आहे की खरेच अजून काही बळी घेतलेत याने.
ही बातमी रोजच्याच बातम्यांपैकी एक आहे की दखल घ्यावी ईतपत गंभीर याची कल्पना नाही. पण आपल्या सिस्टीमवर भाष्य करून जाणारी आणि बरेच दोष उघडे पाडणारी आहे हे नक्की.
राहिले खूनाचे मोटीव - तर मी कोणाचाही बिनधास्त खून करून पचवू शकतो. मी एक डेण्जर माणूस आहे. माझ्या नादाला लागायचे काम नाही. हा अहंकार. ही कुठल्याही प्रकारची विकृती नाही.
@ अण्णा आणि माहितीचा
@ अण्णा आणि माहितीचा अधिकार..
तो वापरून एखाद्याला ब्लॅकमेल कसे करता येते हे समजले नाही. म्हणजे मला माहीत नाही. प्लीज कोणी सविस्तर सांगेल का?
म्हणजे एखादा फॉल्टमध्ये असेल त्यालाच ब्लॅकमेल करू शकतो की प्रामाणिक अधिकारयांनाही ब्लॅकमेल करता येते? आणि कसे?
हा माणूस सायको दिसतोय, आता
हा माणूस सायको दिसतोय, आता याने तर ह्याला ज्या पोलिसांनी पकडले त्यांची प्रशवंसा केलीय
http://www.ndtv.com/india-news/sp-sir-a-great-salute-to-you-dr-death-hai...
आता याचाबाबद्ल वाचून मला The Silence of the Lambs मधील dr. hannibal lectar ची आठवण झाली.
बापरे.. बातमीतील डॉक्टर
बापरे..
बातमीतील डॉक्टर अजिबात बदलू नये. तो डॉक्टर म्हणूनच वावरत होता. टेक्निकली डॉक्टर नसेल तरीही.
यावरून डॉक्टरांची चौकशी करणे / डॉक्टरांबाबत सजग राहणे / त्यांच्यावर नको तितका विश्वास ठेवणे बंद झाले/ कमी झाले तर फायदाच आहे.
मी डॉक्टर हा शब्द काढायला
मी डॉक्टर हा शब्द काढायला नव्हते सांगितले तर त्या आधी भोंदू किंवा बनावट शब्द जोडायला सांगितले होते. त्यामुळे उलट तुम्ही म्हणता तो हेतू आणखी चांगल्या प्रकारे साध्य होईल असे वाटते.
भयानक.
भयानक.
ऋ + १ "सिरीयल किलर डॉक्टर" या
ऋ + १
"सिरीयल किलर डॉक्टर" या ऐवजी "डाॅक्टर म्हणवून घेणारा सिरीयल किलर" असे शीर्षक योग्य वाटते.
छ्या! कैतरीच काय ऋ,
छ्या! कैतरीच काय ऋ, गमभन?
डॉक्टरला शिव्या दिल्या की कसं शूरवीर वाटतं बेफि, अमितव इ. लोकांना. असूदेत डॉक्टरच.
अमितव | 19 August, 2016 -
अमितव | 19 August, 2016 - 04:31
बापरे..
बातमीतील डॉक्टर अजिबात बदलू नये. तो डॉक्टर म्हणूनच वावरत होता. टेक्निकली डॉक्टर नसेल तरीही.
यावरून डॉक्टरांची चौकशी करणे / डॉक्टरांबाबत सजग राहणे / त्यांच्यावर नको तितका विश्वास ठेवणे बंद झाले/ कमी झाले तर फायदाच आहे.
<<
या असल्या विकृत भोंदूंच्या वागण्यावरून येनकेन प्रकारेन सर्वच व खर्या डॉक्टरांवरही संशयाचे वातावरण तयार करण्याची विकृती तुमच्या मनात कुठून व का येते? You know what? People with your mentality actually deserve "doctors" like this.
>>>> अकलेचा कांदा | 19
>>>> अकलेचा कांदा | 19 August, 2016 - 09:25 नवीन
छ्या! कैतरीच काय ऋ, गमभन?
डॉक्टरला शिव्या दिल्या की कसं शूरवीर वाटतं बेफि, अमितव इ. लोकांना. असूदेत डॉक्टरच.<<<<
माझ्या सदस्यनामाचा सुतराम संबंध नसताना ते ह्या प्रतिसादात गोवण्यात आलेले आहे.
अश्या प्रकारांची दखल घेतली जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो.
>>>>अकलेचा कांदा | 19 August,
>>>>अकलेचा कांदा | 19 August, 2016 - 09:42
या असल्या विकृत भोंदूंच्या वागण्यावरून येनकेन प्रकारेन सर्वच व खर्या डॉक्टरांवरही संशयाचे वातावरण तयार करण्याची विकृती तुमच्या मनात कुठून व का येते? You know what? People with your mentality actually deserve "doctors" like this. <<<<
कोट केलेल्या प्रतिसादातील ठळक केलेल्या वाक्याचा तीव्र निषेध!!!!
डॉक्टरांची चौकशी करणे, सजग
डॉक्टरांची चौकशी करणे, सजग राहणे, आणि स्वतःची अक्कल वापरून कुणावरही अंध विश्वास न ठेवणे इतकं झालं असतं वरच्या केस मध्ये, तर कदाचित एकदा प्राण वाचला असता. हे न वापरता खरा आणि खोटा डॉक्टर, आपल्यावर इलाज योग्य होतायत का नाही हे कसा ओळखतात ते मला तरी माहित नाही. लटकवलेले सर्पतिकीट हे कृपया सांगू नका.
बाकी तुमचं वरचं वाक्य लवकर काढून टाका आणि अवतार कार्य आटोपून इतक्यात जाऊ नका.
"अजूनही असे अनेक डॉक्टर
"अजूनही असे अनेक डॉक्टर असतील", हे विधान बेफिकीर नामक प्राण्याने केलेले आहे. ही विकृती आहे.
स्क्रीन शॉट्स आहेत.
अमितव, तुमचा प्रतिसाद व डॉक-बॅशिंग प्रवृत्ती विकृत आहे, हे पुन्हा म्हणतो.
>>>> या असल्या विकृत
>>>> या असल्या विकृत भोंदूंच्या वागण्यावरून येनकेन प्रकारेन सर्वच व खर्या डॉक्टरांवरही संशयाचे वातावरण तयार करण्याची विकृती तुमच्या मनात कुठून व का येते? <<<
ती विकृती नसेलच, ओघाने आलेले असेल,
पण तरीही तुमचा आक्षेप "सत्य आहे" असे मानले तर मला वाटते की, बहुतेक, "सध्या जसे एकविसाव्या शतकातल्या ब्राह्मण जमातीविरुद्ध सरसकटरित्या त्यांचे जीवघेणी हवा करण्याकरता जशी मुगलकालिन्/शिवकालिन/वेळेस अगदी पौराणीक कथां चेही सहाय्य घेऊन अडाण्यांची माथी भडकविण्याकरता त्यातिल अत्यंत तुरळक उदाहरणांद्वारे जी व जशी गरळ ओकली जाते, त्याद्वारे जसे भांडारकर घडवले जाते, "त्याचेच तर हे वरील उदाहरण देखिल केवळ अंधानुकरण नसेल ना?
काये ना की पेरावे तसे उगवते असे कोणतरी काल परवाच म्हणले आहे, नै का?
बायदिवे, माझी एक प्रामाणीक शंका की "डॉक्टर" असा उल्लेख करुन काही एक भाष्य केले तर ते "अॅट्रॅसिटी कायद्याखाली" येत नाही ना? नै, धागाकर्त्याने वेळीच काळजी घेतलेली बरी हो.....
असो.
हा धाग्याचा विषय नाहीये, तेव्हा विषयांतर नको. अन स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवतीलच लोकं !
रुग्ण डॉ च्या दबावाखाली येऊन
रुग्ण डॉ च्या दबावाखाली येऊन फार्म हाऊस ला जात होते?
इतका दबाव आणी दबदबा असेल तर लोकांना खरे गुन्हे माहिती असते तरी त्यांनी काही केले नसते.इथे पोलीसांनी चिकाटीने अडकवल्याने तो अडकला.
घरातील साध्या बल्ब साठी आपण
घरातील साध्या बल्ब साठी आपण काल कित्येक तास चर्चा केली. आणि डॉक्टर बाबतीत सजग रहा म्हटलं तर ते बॅशिंग, आणि वर मला असेच डॉक्टर मिळो हा आशिर्वाद. उत्तम आहे.
चांगुलपणा करो आणि माझ्यावर माझी बुद्धी गहाण टाकण्याची वेळ न येवो.
>>>> अकलेचा कांदा | 19
>>>> अकलेचा कांदा | 19 August, 2016 - 10:56 नवीन
"अजूनही असे अनेक डॉक्टर असतील", हे विधान बेफिकीर नामक प्राण्याने केलेले आहे. ही विकृती आहे.<<<<
एखाद्या सदस्याला प्राणी म्हणणे ही जन्मजात विकृती आहे. अजूनही असे डॉक्टर्स असतील ह्या विधानात काहीही कपोलकल्पित नाही. आधीही असे डॉक्टर्स सापडलेले आहेत, टीव्हीवरील मालिकांमध्येही सातत्याने दाखवण्यात येतात आणि समाजात आणखीही असे डॉक्टर्स असतील. ह्यात काहीच विचित्र नाही.
डॉक्टर शब्द आला की तो प्रतिसाद आपल्याला लागू झाला ह्या अहंकारातून बाहेर पडून विचार केला तर हे जाणवेल. इतर सदस्यांना माझ्या त्या प्रतिसादात काहीच का आक्षेपार्ह आढळले नाही ह्याचाही विचार करण्यासाठी अहंकाराची झूल क्षणभर उतरवावी लागेल. काही खरोखरच कामात व्यस्त असलेल्या व सज्जनपणे वागणार्या डॉक्टर्सच्या नावाला काळिमा लागेल असे आंतरजालीय वर्तन व गर्विष्ठपणा लवकरात लवकर आवरता घेतलात तर तुमच्याच हिताचे आहे.
-'बेफिकीर'!
संतोष पोळने
संतोष पोळने इलेक्ट्रोहोमीओपॅथीची पदवी घेतली असे पेपरात आले आहे ,नंतर शासनाने इलेक्ट्रोहोमीओपॅथी रद्दबातल ठरवली तो पर्यंत तो डॉक्टर होऊन प्रॅक्टीस करत होता.त्यामुळे त्याला बोगस डॉक्टर म्हणायचे की ज्या शासनाने अश्या पदव्या सुरु केल्या त्यांना बोगस म्हणायचे हा प्रश्न आहे.
शासनाने होमिओपॅथी,आयुर्वेद ,युनानी या पदव्या लवकरात लवकर बंद कराव्यात,यांचा काही उपयोग नसतो वर हे असले डॉक्टर ॲलोपॅथीच्या प्रॅक्टीसच करत असतात.खेडोपाडी जाऊन हे असले बिगस डॉक्टर बरेच गब्बर झाले आहेत ,त्यातून त्यांची प्रतिष्ठा वाढते व मग असे विकृत संतोष पोळ तयार होतात.
पण त्याने इतके खून केले तरी
पण त्याने इतके खून केले तरी कशासाठी? स्त्रिया तर स्त्रिया पुरूषांनाही सोडले नाही
पण त्याने इतके खून केले तरी
पण त्याने इतके खून केले तरी कशासाठी? स्त्रिया तर स्त्रिया पुरूषांनाही सोडले नाही
पण त्याने इतके खून केले तरी
पण त्याने इतके खून केले तरी कशासाठी? स्त्रिया तर स्त्रिया पुरूषांनाही सोडले नाही
त्याला सैतान म्हणा, बाकी काही
त्याला सैतान म्हणा, बाकी काही म्हणायची जरूर नाही.
Pages