माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षे, तो मिळणार नाहिच्चे ग. पण शन्यावरचा राग व्यक्त करायची तिची ती पद्धत असेल. तिला मानसिक समाधान मिळत असेल ना.
त्या जब वी मेट मधे नाहिका करीना बॉयफ्रेंडला शिव्या देते मग तिला रिलॅक्स वाटत तस काहीस Wink

बाकी शन्या, ते ऑफिसवाले आणि राधिका सगळे कहर आहेत. तो गॅरी तर काम कमी आनि शन्याची हुजरेगिरी जास्त करतो अस दिसत

खरं आधी तिने गुरुला चोपायला हवा.मग शनायाला. >>+१११
या असल्या काहीतरी दाखवतात ना मालिका . पती परमेश्वर टाईप . डोक्यात जातात.

खरं आधी तिने गुरुला चोपायला हवा.मग शनायाला. >>+१११
या असल्या काहीतरी दाखवतात ना मालिका . पती परमेश्वर टाईप . डोक्यात जातात.>>>> +१११११११

राधिकाचे विचार इतक्या जुनाट वळणाचे का दाखवले आहेत? काय तर म्हणे, काहीही झाल तरी तो माझा पती आहे. बायकोने नवर्याचा शब्द मोडणे म्हणजे गुन्हाच! नवर्याच्या मनाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. बी. ए. झालेली आहे ना ती? ती वहिनीचे आणि समीधाचे टोमणे कसे काय ऐकून घेते?

गुरुच्या आईचे फोनवरचे संवाद मुळिच आवडले नाहीत (गुरुला समजावयाला फोन करते ते)->>>> +११११११

गुरुची आई म्हणते की, एखादी स्त्री तेव्हाच स्त्री होते जेव्हा ती आई होते. हा dialogue जर चुकून ही एखादया (काही मेजर कारणाने) मूल न होऊ शकणार्या बाईने ऐकला आणि ती जर इमोशनल असेल तर तिला काय वाटेल हे ऐकून? ती असाच विचार करेल ना की आपल्याला मूल होत नाही म्हणजे आपण स्त्री नाही आहोत का? आपल्यात काही कमी आहे का? आई होण्यासाठी मुलान्ना जन्म दयायचाच असतो अस काही नाही, ती दुसर्या मुलान्ना सुद्दा माया लावू शकते की.

राधिका मोलकरीणगिरी करते म्हणुन ती चांगली.>>> मोलकरीणगिरी?:अओ: गृहीणी असणे म्हणजे मोलकरीणगिरी करणे नव्हे.

काल अनिता दाते लायनीत उभी होती नोटा काढायला बराच वेळ आणि पेपर वगैरे वाचले मग तिच्या लक्षात आले बराच वेळ लागणार आहे मग तिने जवळच्या चहावाल्याला लायनितल्या सर्वांसाठी चहा बिस्किटं द्यायला सांगितली तिच्याकडून. >>>> राधिकाचे character घुसले कि काय तिच्यात? :अओ::हाहा: त्या व्हेन्टीलिटर च्या प्रिमीयरला सुद्दा असच काहीतरी म्हणत होती कि हा चित्रपट पाहून मला आपल्या माणसान्ची आठवण आली. डिट्टो राधिका!

होत अस कधी कधी की, जनरली काही कलाकार एखादे character साकारताना ते त्या character मध्ये इतके घुस तात की खर्या आयुष्यात सुद्दा ते त्या character सारखे वागू,बोलू, विचार करु लागतात. Happy

चला म्हणजे एकंदरीत सध्या तरी बघायची गरज नाही. हा आठवडा राधिका, अलका कुबल मोड मधे असाच असेल बहुतेक.>>> नाही आज ती शनायाला मारणार आहे.

शनायाला आज होणारी मारहाण बहुतेक शनाया किंवा गॅरीच्या स्वप्नात दाखवली असणार... या आधी पण गॅरी ऑफिस मधून बाहेर काढतो असे स्वप्न पडलेच होते शनायाला.....

इथे कोणी ' तुझ्यात जीव रंगला ' मालिका पाहत का ?
एकदम छान आहे
हिरो हिरॉईन दोघंही मस्त आहेत ,स्मार्ट आहेत ,
सगळ्यांचा अभिनय पण छान आहे
झी मराठीच्या इतर सगळ्या बावळट हिरो हिरॉइन्स पेक्षा राणा आणि अंजली खूप छान आहेत

>>>>राधिका मोलकरीणगिरी करते म्हणुन ती चांगली.>>> मोलकरीणगिरी?अ ओ, आता काय करायचं गृहीणी असणे म्हणजे मोलकरीणगिरी करणे नव्हे.---

नाही हो. गृहीणी असणे वेगळे. राधिकाचे प्लस पॉईंट्स गुरुची आई सांगत होती ना तेव्हा डोक्यात आले की नक्की यांना राधिका का हवी आहे. निमुट्पणे गुरुची सेवा करायला की काय!

ते शनाया आणि गुरु एकत्रित सीन्स इतके विचित्र आणि नाटकी वाटतात ना बघायला..

आणि तिचे कपडे जराही सूट होत नाही.

राधिकाच्या सुद्धा. एकाच प्रकारच्या साड्या बोर आहेत.

त्या शन्याच शॉपिन्ग वेड काही कमी होणार नाही,
उद्या कुणी मरुन पडलं असेल तरी ती गॅरीला म्हणेल ते तू नको लक्ष देऊस,चल आपण शॉपिंग्ला जाऊ Lol

आज कुणा पोलिस बाईच्या घरात दिसली ती राधिका तिला काय शन्याला मारल्याबद्दल अटक केली की कॉय???

तो गुरुनाथ तिला इतकं वाट्टेल तस बोलतोय, इग्नोर करतोय, बावळट्ट, गावंढळ म्हणतोय तरी हिच गळ्यात पडणं काही कमी नाही. लोकांना मारे शिकवत असते अन्याय सहन करु नका, भ्रष्टाचार करु नका आणि स्वतः काय करतेय. अजिबातच सेल्फ रिस्पेक्ट नाहिये का तिला, कुणी मला अस हिणवल असत तर तिथच मुस्काड फोडल असत मी Wink

मला त्यातले ते गुप्ते आणि तिची मैत्रीणच जास्त आवड्तात.

अश्या सेल्फिश मैत्रिणी असतात अहो.

आता हळू हळू राधिकामधला सेल्फ रिस्पेक्ट जागा होणार असं दिसतयं, आता ती रणरागिणी बनून शनयाला धडा शिकवेल, खरतर गुरव धडा शिकवायच्या लायकीचा आहे, पण झी वर ते होणे नाही.

गुप्ते आणि राधिकाची मैत्रीण यांच्यातले सीन्स मस्त दाखवलेत. दोघांच अवघडलेपण आणि राधिकाला मदत करायची धडपड दोघेही छान दाखवतात.
ती मैत्रीन मला आवडते फार स्पष्ट आणि रोखठोक बोलते. कितींदा तरी समजावते त्या राधिकाला पण हिचं आपलं एकच की हे अस करणारच नाहीत.

तो गुरुनाथ तिला इतकं वाट्टेल तस बोलतोय, इग्नोर करतोय, बावळट्ट, गावंढळ म्हणतोय तरी हिच गळ्यात पडणं काही कमी नाही. लोकांना मारे शिकवत असते अन्याय सहन करु नका, भ्रष्टाचार करु नका आणि स्वतः काय करतेय. अजिबातच सेल्फ रिस्पेक्ट नाहिये का तिला, कुणी मला अस हिणवल असत तर तिथच मुस्काड फोडल असत मी >>>>>>नैतर काय.

कहाणी आता राधिका इन part २ mode मध्ये यायला लागली ना .
पुढील भागात तिला सुबुद्धी सुचताना दाखवली ना.

अजिबातच सेल्फ रिस्पेक्ट नाहिये का तिला, कुणी मला अस हिणवल असत तर तिथच मुस्काड फोडल असत मी
१००% रास्त बोललात

बादवे, माझं सगळं म्हणण हे राधिका नावाच्या कॅरॅक्टर बद्दल आहे जे या सिरेलीत तद्दन तकलादू लिहिलय. अनिता दाते मला आवडते, तिच कामही. पण इथे अशी सोकॉल्ड सिरेल्सूनेची भुमिका तिने का स्विकारली असेल हा प्रश्न पडलाय मला
नॉर्मली वागताना दाखवतच नाहीत कुणाला. कितीही राहणीमान, भाषा, वागणं आवडत नसलं तरी इतक्या टाकुन कुणी बोलत नाही कुणाला, जाता येता बावळट्ट म्हणुन हिणवत नाहीत. आणि ती/तो जर आपला साथीदार असेल तर नक्कीच चर्चा होतात अगदी वाद घालुन सुद्धा स्वत:च म्हणण मांडल जात. मग इथे अगदी टोकाची मते का दाखवतात. अति चांगल किंवा अतिवाईट.

मला बर्याचदा ही सिरियल बघताना वाटत..राधिकाला हकलुन देण्याआधी जेव्हा हे एकत्र राहात होते तेव्हा
त्यांच्यात काही फिजिकल रिलेशन होतं की नाही? मुलगा तर आहे.. पण तो अभिजीत असच तिच्याशी नीट बोलत नव्हता मग जवळ जाणे तर लांबच मग राधिकाला ते पण जाणवलं नाही का कधी..
म्हणजे नवरा बायको एकत्र राहतात बाय्को स्वयंपाक करते नवरा डब्बा घेउन जातो येवढच रिलेशन असत का?
फिजिकल रिलेशन हा पण नात्याचा मोठा भाग आहेच ना..

कितीही राहणीमान, भाषा, वागणं आवडत नसलं तरी इतक्या टाकुन कुणी बोलत नाही कुणाला, जाता येता बावळट्ट म्हणुन हिणवत नाहीत >>>> नाही हा असतात बरेच असे , असे वागुन काय पुरुषार्थ सिद्ध करायचा असतो देव जाणे

पण गुरुनाथ स्वतः त्याच गावात लहानाचा मोठा झालाय्/शिकलाय, बोली पण तीच बोलत होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच आणि तिच प्रेम होत एकमेकांवर मग अचानक दुसरी मुलगी त्याच्या सोकॉल्ड स्टेटस ला शोभणारी मिळाली म्हणुन सगळं प्रेम आटल? काही सद्सदविवेक बुद्धी नाहिये का त्याच्याकडे.
कितिही प्रेमात आंधळा असला माणूस तरी खिशाला वारंवार खड्डे पडायला लागले की जागा होतोच की

आणि ती समिधा काय त्याला म्हणतेय , तु चांगल केलसं , तुझी नविन चॉईस चांगली आहे . वगैरे सांगत होती.
गप ना ग बाई .

आणि ती समिधा काय त्याला म्हणतेय , तु चांगल केलसं , तुझी नविन चॉईस चांगली आहे >>>
अस म्हणाली ती??? Uhoh तिला लगेच सांगायला पाहिजे होत तिच्या सासर्‍यांनी की बाई तुझ्या नवर्‍याने जर चॉईस बदलला तर हे असे सल्ले द्यायला पण वेळ नसेल तुझ्याकडे लोकांना Lol

हो समिधा त्याला येउन म्हणते ,माझा तुम्हाला सपोर्ट आहे म्हणून . कैच्याकै.
एखाद्याच्या स्टेटस ला घर शोभत नाही म्हणून त्याने नविन घर घेतल तर कौतुक करणं वेगळं , आणि स्टेटसला बायको शोभत नाही म्हणून बदलण वेगळं .

Pages