Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! 
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गौरीला नायिकेचं अवॉर्ड
गौरीला नायिकेचं अवॉर्ड देण्यापेक्षा अस्मिताला तरी द्यायचं.
फायनली राधिकाला गुरुच अफेअर
फायनली राधिकाला गुरुच अफेअर कळल. काल अनिता दातेच काम मस्त झाल होत.
ती बाजी उलटवेल गुरु शनायावर,
ती बाजी उलटवेल गुरु शनायावर, त्या ट्रॅकला सुरुवात झाली की लिहा इकडे मग मी बघेन मधे मधे.
राधिका आणि रेवती मस्तं अभिनय
राधिका आणि रेवती मस्तं अभिनय करतात. दोघींचे दोन टोकाचे स्वभाव, विचार, आचार यांतील फरक पर्फेक्ट पकडला आहे. मैत्रिणी शोभतात त्या. शनाया बी ग्रेड वाटते, का कुणास ठाउक. भक्ती, गुप्ते यांनी अभिनयावर मेहनत घ्यावी. गुरुनाथचा आक्रस्ताळेपणा पर्फेक्ट. आपली चुक लपवण्यासाठी माणसे अशीच वागतात.
शेजारी काही पट्त नाहीत. असे शेजारी कुठे असतात आजकाल? बकुळामावशी, त्यान्ची पोलिस मुलगी कुठे गायब आहेत?
दिवाळीसारख्या सणाला रोषणाई,
दिवाळीसारख्या सणाला रोषणाई, ओवाळणी असे पाणी प्रत्येक मालिकेत घातले जाते. तेवढेच एपिसोड्स वाढतात. इथे मात्र ऐन दिवाळीत नाट्याला सुरुवात झाली आहे. त्याकरता मालिकेच्या निर्मात्याचे खूप कौतुक !
मालिकेत त्रुटी आहेतच पण इतर परदेसी येळकोटापेक्षा प्रचंड उजवी आहे ही मालिका
कथा अजूनही बांधेसूदच आहे आणि बर्यापैकी पटणारी आहे. आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तीन्ही प्रमुख कलाकारांचे उत्तम अभिनय. दाते बाईंचा आभिनय आवडायचाच पण अभिजीतचा अभिनय एक सुखद धक्का आहे. शनाया झालेल्या अभिनेत्रीचा अभिनय पण झकास आहे. कुठे या दोघींचा अभिनय आणि कुठे ती थंडाक्का मेणचट गवारी!
दिवाळीसारख्या सणाला रोषणाई,
दिवाळीसारख्या सणाला रोषणाई, ओवाळणी असे पाणी प्रत्येक मालिकेत घातले जाते. तेवढेच एपिसोड्स वाढतात. इथे मात्र ऐन दिवाळीत नाट्याला सुरुवात झाली आहे. त्याकरता मालिकेच्या निर्मात्याचे खूप कौतुक !
+१ मलाही असेच वाटले. मात्र ते शेजारी, ऑफिसचे लोकं असे मिळुन बरेच पाणी घालतात.
ह्या गॅरीला बायको मुलाबद्दल
ह्या गॅरीला बायको मुलाबद्दल खरंच काहीच भावना नाहीयेत असं दाखवलंय. राधेकाला कुठेही जा काय म्हणतो सरळ? बाहेर अफेयर असलेले बा-मु चा विचार करतच नाहीत का?
हिने त्याचीच मुंडी पिरगाळुन मी काय जात नाही. तुच जा कुठेही असं म्हणायचं ना. आणि ह्या असल्या मुर्खाकडे ही परत येणार??
घर सोडून जाताना नवर्याचा
घर सोडून जाताना नवर्याचा फोटो घेते सोबत.
त्यानं कानफटात दिली ना तिच्या
त्यानं कानफटात दिली ना तिच्या दोन दिसापूर्वी ?
काहिही..तिच्याजागी मी असती तर मीपन टिकवली असती एक त्याच्या गालावर.. या अश्या अबला नार्या डोक्यात जातात मला.. हाईट आसते एकेका गोष्टीची..श्या...
टीना +१ कानफाटात नाही तर
टीना +१
कानफाटात नाही तर वेणीचा एक फटला द्यायचा ना गर्र्कन फिरुन
सस्मित माझ्या एका ताईला आहे
सस्मित
माझ्या एका ताईला आहे बेवड्या नवर्याचा तरास..एकदा तो पिऊन अंगावर धावून आला तर हिनं स्टुल उचलला आणि फेकला त्याच्या अंगावर.. आम्ही तिला घरी घेउन आलो तेव्हा तीने अतः पासुन इतिपर्यंत सारं सांगितल..असल्या टाळ्या पडल्या न घरी तीनं हा प्रकार सांगितल्यावर.. तरी ती १०वी शिकुन आहे बास.. नवरा काम करत नाही..केल तर आलेले सारे पैसे दारुत उडवतो.. ६वी ७वीत पोरगा आहे त्याच शिक्षण वगैरे सार करायचं म्हणुन हि काम करते तर तिच्यावर तो संशय घेतो.. आम्ही प्रयत्न केला तिला बाजुला राहा आम्ही सारी मदत करतो म्हणुन सांगण्याचा पण ती परत तिथ गेलीच... शेवटी हिला साधी खरोच जरी आली तरी नवर्याला जबाबदार ठरवण्यात यावं असा सरळ रिपोर्ट देऊन ठेवला तेव्हापासुन जरा लाईनीवर आहे तो..
इथ कमी शिकलेले पण या सुशिक्षितांपेक्षा जास्त समजदार असतात अन् टिव्हीवर असला फालतुपणा दाखवतात पागल कुठले...
सस्मित.. टीना +१. मला
सस्मित..
टीना +१.
मला वाटलेलं हिला कळल्याबरोबर शनायाचा बँड वाजवेल तर ही रडत बसलीय. बावळट.
तो नवरा बरोबर बोलतोय बावळट
तो नवरा बरोबर बोलतोय बावळट तिला... काय हे पतिप्रेम... अतिच दाखवलय.. एरव्ही तर खमकी दाखवलीय
ती त्या शनाया आणि गुरुनाथला
ती त्या शनाया आणि गुरुनाथला tactfully गंडवत जाईल तेव्हा इथे लिहा हा, मग मी बघायचा विचार करतेय जरा धमाल येईल बहुतेक.
टीना विषयांतर पण ताईच्या नवऱ्याची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न केलात का? अनेक संस्था आहेत मदतीला. म्हणजे तुझ्या ताईचा त्रास जाईल तिला तिथेच राहायचे तर. मला उत्तर विपुत दे.
त्यानं कानफटात दिली ना तिच्या
त्यानं कानफटात दिली ना तिच्या दोन दिसापूर्वी ?>>> कधी? मी तो भाग मिसला का?:अओ:
हिने त्याचीच मुंडी पिरगाळुन मी काय जात नाही. तुच जा कुठेही असं म्हणायचं ना. आणि ह्या असल्या मुर्खाकडे ही परत येणार??मला वाटलेलं हिला कळल्याबरोबर शनायाचा बँड वाजवेल तर ही रडत बसलीय. बावळट. +१
काय हे पतिप्रेम... अतिच दाखवलय.. एरव्ही तर खमकी दाखवलीय>>> हो ना, तुम्ही जस म्हणाल तस मी वागेल. मी तुमच्याशिवाय कशी जाऊ, कुठे राहू, काय करु? वै वै. तुम्ही ती नोकरी सोडा म्हणते. इतक सोप असत का नोकरी सोडण? राधीका एवढी सुशिक्षित असून तिला कळत नाही.
कानफाटात नाही तर वेणीचा एक
कानफाटात नाही तर वेणीचा एक फटला द्यायचा ना गर्र्कन फिरुन
काल एका वेटिंगरुममध्ये
काल एका वेटिंगरुममध्ये बसल्याने ह्या सिरियलचा पूर्ण एपिसोड पहायचा भोग नशिबी आला. पूर्ण अर्धा तास ही बाई घरात फिरत होती. एपिसोड संपता संपता पाऊल घराबाहेर पडलं. 'आवा चालली पंढरपुरा' आठवलं अगदी. अगदी सगळ्या खोल्या फिरली. शेवटी शेवटी मला तर ती बाथरुममध्ये जाऊन तिथला गिझर, बादल्या बघते का काय अशी भीती वाटायला लागली.
अरे, ज्या घरात नवराच तुझा नाही तिथे स्टीलचे डबे आणि विणकामाचे नमुने बघून काय फायदा? वरच्या काही कॉमेन्टसवरून नवर्याने तिला तोंडात मारलं आणि कुठेही जा म्हणाला असं आलंय. मग तर तिने ठिय्या देऊन घरातच राहायचं आणि तूच जा कुठे जातोस ते असं म्हणायचं. पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही करायला हवी.
शेवटचा तो पदर अडकायचा प्रसंग तर शुध्द वैताग.
>>इथ कमी शिकलेले पण या सुशिक्षितांपेक्षा जास्त समजदार असतात अन् टिव्हीवर असला फालतुपणा दाखवतात पागल कुठले.
पांढरपेशा लोक बदनामीला घाबरतात. लोक काय म्हणतील ह्या फालतू विचारांचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा असतो. चुकीची आहे पण वस्तुस्थिती हीच आहे.
>>टीना विषयांतर पण ताईच्या
>>टीना विषयांतर पण ताईच्या नवऱ्याची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न केलात का? अनेक संस्था आहेत मदतीला.
अंजू, ह्या संस्थांचा उपयोग होतो का? काही लोक अतिशय स्वार्थी असतात. "फक्त मी" एव्हढाच विचार ते करतात. अश्यांना सोडून देणं हा एकमेव पर्याय असतो. अर्थात हेमावैम.
राधिका खमकी होईलच पण त्याआधी
राधिका खमकी होईलच पण त्याआधी अफेअर कळल्या कळल्या अशीच रडुबाई, हळवी होणे स्वाभाविक आहे असे मला वाटते. तिची मनःस्थिती हळुहळु बदलेल.
टीना विषयांतर पण ताईच्या
टीना विषयांतर पण ताईच्या नवऱ्याची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न केलात का? अनेक संस्था आहेत मदतीला. म्हणजे तुझ्या ताईचा त्रास जाईल तिला तिथेच राहायचे तर. मला उत्तर विपुत दे. --
दारुच्या भरात असे वागत असेल आणि एरवी नीट तर दारु सोडवणे हा चांगला उपाय आहे. माणुस मुळात कसा आहे यावर अवलंबुन आहे. दारु सुट्ल्यावर सुधारलेले संसार पाहिले आहेत.
राधिकाकडे मोबाईल फोन असताना
राधिकाकडे मोबाईल फोन असताना ते नाना सरळ तिला फोन करुन चौकशी करू शकतात ना. मग भावाचा पत्ता आपल्याजवळ नाही आता गुरुच्या वडीलांना फोन करुया हे कशाला
ती बावळत राधिका पण सकाळी चहा प्यायला असेल का म्हणून गुरुला फोन करते
राधिका खमकी होईलच पण त्याआधी
राधिका खमकी होईलच पण त्याआधी अफेअर कळल्या कळल्या अशीच रडुबाई, हळवी होणे स्वाभाविक आहे असे मला वाटते. तिची मनःस्थिती हळुहळु बदलेल. +१
अन किती झिडकारतो तो तीला...
अन किती झिडकारतो तो तीला... मला तु आवडत नाहि सारखं तिच्या तोंडावर सांगतो... अश्यावर परत कसलं तिने प्रेम करत बसावं... तुंम्ही रागावु नको त्रास होईल तुंम्हाला... अग तुला कसलाच त्रास होत नाहि का? काहिपण.... ठणकावुन बोल ना त्याच्या बरोबर..
राधिका खमकी होईलच पण त्याआधी
राधिका खमकी होईलच पण त्याआधी अफेअर कळल्या कळल्या अशीच रडुबाई, हळवी होणे स्वाभाविक आहे असे मला वाटते. तिची मनःस्थिती हळुहळु बदलेल.>>> हो. पण खमकी म्हणजे खमकीच होउदे. नैत ह्या मुर्ख स्वार्थी माणसापाठी गोंडा घोळ्वत बसायची.
राधिका खमकी होईलच पण त्याआधी
राधिका खमकी होईलच पण त्याआधी अफेअर कळल्या कळल्या अशीच रडुबाई, हळवी होणे स्वाभाविक आहे असे मला वाटते. तिची मनःस्थिती हळुहळु बदलेल).+१
अन किती झिडकारतो तो तीला... मला तु आवडत नाहि सारखं तिच्या तोंडावर सांगतो... अश्यावर परत कसलं तिने प्रेम करत बसावं... तुंम्ही रागावु नको त्रास होईल तुंम्हाला... अग तुला कसलाच त्रास होत नाहि का? काहिपण.... ठणकावुन बोल ना त्याच्या बरोबर.. हो. पण खमकी म्हणजे खमकीच होउदे. नैत ह्या मुर्ख स्वार्थी माणसापाठी गोंडा घोळ्वत बसायची.मग तर तिने ठिय्या देऊन घरातच राहायचं आणि तूच जा कुठे जातोस ते असं म्हणायचं. पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही करायला हवी.+ सहमत
माझं काय म्हणण हिने पहिले
माझं काय म्हणण हिने पहिले घराबाहेर पडताच कामा नये . तो कोण टिकोजीरावं सांगणारा आणि हिने का ऐकायचं ? . माझा इतका तिटकारा आला असेल तर तुम्हीच जा घराबाहेर असं ठणकावून सांगायचं . लग्न होऊन तशी आठ वर्ष झालेली दाखवली आहेत . नुकतं लग्न झाल्या झाल्या या त्रासाला सुरवात झालेली नाहीये म्हणून खमकेपणा थोडा अंगात पाहिजे . त्यातून त्याच्या सांगण्यानुसार अगदी घराबाहेर पडलीच तर मुलाला न घेता एकटीनेच बाहेर पडायचं . मुद्दामून मुलगा झोपेत असताना बाहेर पडायचं. आता त्याच्या शाळेचा प्रॉब्लेम नाही का होणार? हि त्याला शाळेत कशी पाठवणार? तिचा भाऊ मुंबईतच राहतो का ? मुलाला घरीच ठेवलं असत तर त्या गॅरी ची चांगली जिरली असती त्याला सांभाळता सांभाळता आणि आईबद्दल काही विचारलं तर प्रश्नांची उत्तर देता देता . मुलावर बाहेरूनच लक्ष ठेवायचं. नाहीतरी ते ( राधिका आणि मुलगा ) घरातून बाहेरच पडल्यावर मुलगा वडिलांबद्दल विचारणारच ना थोड्या दिवसांनी ? अशी किती दिवस राहणार भावाकडे ?
करेक्ट सुजा. पोलीस
करेक्ट सुजा.
पोलीस कम्प्लेंटपण करू शकली असती, कायदा तिच्या बाजूने आहे. पण सिरीयलची स्टोरी वेगळी आहेना. त्यामुळे ती धडा शिकवेल वगैरे, वगैरे पण नवऱ्यालाही शिकव एकट्या त्या रसिकाला नको.
मला तर म्हणायचंय नवऱ्यालाच
मला तर म्हणायचंय नवऱ्यालाच शिकव धडा. खरी चूक त्याचीच आहे. त्याचा स्वतःवर कंट्रोल हवा. अशा किती गळेपडू मुली येतील आयुष्यात म्हणून त्याचा पाय घसरायला नको होता.
शनाया त्याला लुबाडतेय हे कळत नाही का त्याला???
>>ती बावळत राधिका पण सकाळी
>>ती बावळत राधिका पण सकाळी चहा प्यायला असेल का म्हणून गुरुला फोन करते
हो का? मग पुढेमागे शनायाने बायकोसारखी गुरुची बडदास्त ठेवली नाही की ह्याला आठवेल की आपण बायकोला जायला सांगितलं तरी ती आपल्या चहाची काळजी करत होती. म्हणून हा सीन.
ही कथा कोणत्या वळणावर जाईल
ही कथा कोणत्या वळणावर जाईल असे वाटते? सवत माझी लाडकी की मुंबई चा फ़ौजदार.
गुरोबा रधिकाला बावळट वैगेरे म्हणतो तेंव्हा ती म्हणते की मी बदलेन ना. तुम्हाला आवडते तशी होईन.
अर्थात दोन्ही वर्जन बघायला मजा येईल...
बदले की आग एपिसोड्स सुरु झाले की बघावे
Pages