Submitted by ऋन्मेऽऽष on 30 July, 2016 - 11:52
शेहनशाह अमिताभ बच्चन आणि किंग खान शाहरूख खान या बॉलीवूड सुपर्रस्टार्सनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली मालिका कौन बनेगा करोडपती यंदाच्या मराठी वर्जनमध्ये घेऊन येत आहे तुमचा आमचा लाडका स्वप्नील जोशी !
या मालिकेविषयी चर्चा करायला हा धागा !
पण नुसती चर्चाच करत बसू नका, तर खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करून या पटकन..
कोणास ठाऊक स्वप्निल जोशी सोबत बसण्याचे आणि करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईलही..
ऑल द बेस्ट !!!!!!
लिंक - http://www.konhoeelmarathicrorepati.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विकु
विकु
आरे बघता का कोणी! मी अर्थातच
आरे बघता का कोणी!
मी अर्थातच येस्स!
धागा मुद्दामच सुरुवातीलाच वर काढला नाही कारण आधी स्वप्न्याला जमतेय का बघूया बोल्लो. पण येतोय. हळूहळू रंगात येतोय. अमिताभचा अदबशीरपणा ते शाहरूखची एनर्जी यांच्या सुवर्णमध्याकडे हळूवार प्रवास चालू आहे.
एक चांगले आहे की घरी आई देखील स्वताहून आवडीने बघतेय. त्यामुळे मला स्वताहून रिमोट उचलत लावायच्या भानगडीत पडावे लागत नाहीये. अन्यथा मला स्वप्निल आवडतो हे घरी सांगणे जड गेले असते. आपल्या मुलाला एखादा मुलगा (भले मग तो स्वप्निल का असेना) आवडतो हे कोणत्या आईला आवडेल
पण याचबरोबर सध्या रितेश देशमुखचा विकता का उत्तर सुद्धा चालू असते घरी. तो पोग्राम सुद्धा खूप सही आहे. किंबहुना त्याचा फॉर्मेट कौबकपेक्षा जाम मजेदार आणि हॅपनिंग आहे. रितेश सुद्धा धमाल उडवतोय. त्यामुळे क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास आश्विन सोबत जडेजासुद्धा फॉर्मला आहे अशी मजा येतेय
मी सध्या दोन्ही अधून मधून
मी सध्या दोन्ही अधून मधून बघतेय, सलग असं अजून नाही बघितलं. आता अस्खलित मराठी मात्र नाही वाटत करोडपती, मिश्रीत मराठी (हिंदी आणि इंग्रजी). मी टिका नाही करत कारण कदाचित नविन पिढीला लक्षात घेऊन केला असावा बदल. सचिन खेडेकर फार अस्खलित बोलायचे. साहित्य वगैरेवर प्रभुत्व होतं. मला अजून ते आठवतात.
स्वप्नीलचा जॉनर वेगळा आहे. त्याला समजून घ्यायला मला थोडा वेळ लागेल. रितेशचा बघितला, बरा वाटला. दोन्ही शोज अजून सलग तासभर नाही बघितले, त्यामुळे फार नाही सांगू शकणार.
त्याचं ते "आओ ना फिर" असं
त्याचं ते "आओ ना फिर" असं म्हणणं फारच इरिटेटींग वाटतं.
अंजू छान प्रामाणिक पोस्ट !
अंजू छान प्रामाणिक पोस्ट !
रितेश देशमुखचा विकता का उत्तर
रितेश देशमुखचा विकता का उत्तर सुद्धा चालू असते घरी.>>> हे कधी आणि कुठे असते?
तेव्हढं फक्त ते "शुखाचा
तेव्हढं फक्त ते "शुखाचा शुभारंभ" बदलायला सांगा...
तेव्हढं फक्त ते "शुखाचा
तेव्हढं फक्त ते "शुखाचा शुभारंभ" बदलायला सांगा... >>

नताशा रितेश शो स्टार प्रवाह
नताशा रितेश शो स्टार प्रवाह शुक्र, शनि, रवि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ.
स्वप्नील शुखाचा शुभारंभ म्हणतो, अरेरे. बघायला हवा शो आता.
नताशा रितेश शो स्टार प्रवाह
नताशा रितेश शो स्टार प्रवाह शुक्र, शनि, रवि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ.>>> ओके. थँक्स
नताशा जरूर बघा विकता का उत्तर
नताशा
जरूर बघा विकता का उत्तर देखील.. एकदा बघितलात की दुसरया दिवसापासून त्याचे टायटल.. विकता का उत्तर.. उत्तर.. विकता का उत्तर.. गुणगुणायला लागाल.
9 नोव्हेंबर रात्रो 9
9 नोव्हेंबर
रात्रो 9 वाजता
कलर्स मराठी
चुकवू नये असा भाग ...
स्वप्निल समोर हॉट सीटवर बसायला येणार आहे ..
आपलीच
बोल्ड एण्ड ब्यूटीफूल...
येस्स
सई ताम्हाणकर
. सई पहिल्या दिवशी पण येऊन
हि न्यूज ओके पण आमच्या डोळ्याचं पारणं तेव्हा फिटेल जेव्हा ऋ असेल स्वप्नीलसमोर.
बघितलं रे ऋ तुझ्या स्वप्नीलला. मला सचिन खेडेकर जास्त प्रसन्न आणि natural वाटायचे आणि बोलणं पण ओघवतं.
स्वप्नीलचं थोडं कृत्रिम वाटतं पण बघू शकते तासभर मी, अगदीच नावं ठेऊन टीव्ही बंद करावा असं नाही (थोडं इरिटेट झालं तरी).
हो येऊन गेलीय पण यंदा धमाल
हो येऊन गेलीय पण यंदा धमाल उडवलीय अशी आतली खबर कानावर आहे. म्हणजे कॉफी विथ करणला जसे शाहरूख करण सोबत काजोल वगैरे मंडळी जमतात तसे काहीतरी आहे यंदा.
बाकी माझे प्रयत्न मी मध्यंतरी वैतागून सोडलेले. आता पुन्हा चालू करायला हवेत.
एका एपिसोडला एकजण स्वप्निलला मराठीचा अमिताभ बच्चन बोलले. लोकांचेही काय प्रेम असते एकेक.
सचिन खेडेकर आणि स्वप्निल जोशीची तुलना म्हणजे शाहरूख खान आणि अनुपम खेर यांची तुलना करण्यासारखे आहे. यात गैर तसे काही नाही.
28 डिसेंबर विसरू नका
28 डिसेंबर विसरू नका बघायला....
http://www.loksatta.com/manoranjan-news/farah-khan-will-soon-seen-in-kon...
या विशेष भागामध्ये फराह खानने स्वप्नील जोशी आणि जमलेल्या प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि बरीच मज्जा देखील केली. “मी हिंदी KBC – मध्ये देखील गेले आहे ज्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचे लाडके आणि ज्यांची ओळख करून द्यायची गरज नाही असे अमिताभ बच्चन आणि त्यानंतर सगळ्यांचाच लाडका शाहरूख खान यांच्यासोबत हा खेळ खेळले. पण, मराठी मंचावर येऊन देखील मला तितकाच आनंद होतोय. कारण, मी येथेच लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे माझं या मातीशी असलेल नात घनिष्ठ आहे असं मला वाटत. मला खरच या मंचावर येऊन खूप आनंद झाला.” या शब्दांत फराह खानने आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्वप्नील जोशीने यावेळी फराह खानसोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली. फराह खानला देखील राहवलं नाही आणि चक्क सेटवर तिने स्वप्नीलबरोबर नृत्य सादरच केलं. इतकेच नाही तर त्याला दोन स्टेप देखील शिकवल्या. स्वप्नील जोशीने माधुरीच्या सुप्रसिद्ध गाण्यावर म्हणजेच हमको आज कल है यावर दमदार नृत्य सादर केलं. त्यासाठी स्वप्नील गाण्यामध्ये माधुरी दीक्षित बनला होता. तसेच फराह खानने तिच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स केला. त्याचबरोबर फराहने शाहरुख खान आणि तिच्या मैत्रीबद्दलचे अनेक किस्से देखील या मंचावर सांगितले. अश्याप्रकारे खूप धम्माल मस्ती करत या भागाचे शूटिंग झाले.
(No subject)
ऋ तू लकी हा. तुझ्या
ऋ तू लकी हा. तुझ्या स्वप्नीलचा शो संपून त्याच्या जागी तुझ्या कैवल्यचा (अमेय वाघ) शो येणार आहे, ९ जानेवारीपासून रात्री साडेनऊ. डान्स शो.
अरेरे स्वप्नील ला इथे पण
अरेरे स्वप्नील ला इथे पण टीआर्पी नाही
नाहीना, च ह ये द्या च बघतात
नाहीना, च ह ये द्या च बघतात बहुतेक सर्व. स्व जो ला नाही बघत असं दिसतंय. फार लवकर बंद होतोय.
अमेय मला पण बघायचाय
अमेय
मला पण बघायचाय
रिया, एन्जॉय watching अमेय,
रिया, एन्जॉय watching अमेय, नवीन वर्षात.
http://www.loksatta.com/manoranjan-news/amey-wagh-to-host-a-reality-show...
कोण होईल करोडपती (स्व.जो.
कोण होईल करोडपती (स्व.जो. संचालित) ह्या शो च्या मताप्रमाणे पं. हरीप्रसाद चौरसिया हे सनई साठी प्रसिद्ध आहेत.
https://www.facebook.com/mandar.m.deshpande/posts/10154800121542450
(ह्या फेसबुक पोस्टवर व्हिडीओ आहे)
आँ!
आँ!
अरेरे स्वप्नील ला इथे पण
अरेरे स्वप्नील ला इथे पण टीआर्पी नाही
>>>>
तुम्हाला या शो ला आणि या शो च्या धाग्याला म्हणायचे आहे का?
कारण स्वप्निलला टीआरपी आहे म्हणून त्याला या शो मध्ये घेतला आहे.
तसेच मी स्वप्निलवर जो धागा काढलेला त्यात 850+ पोस्ट झाल्यावर तो वाहता करण्यात आलेला. त्यानंतरही आलेल्या पोस्ट पाहता जवळपास हजार पोस्ट त्याने मिळवलेल्या.
तसेच मी स्वप्निलवर जो धागा
तसेच मी स्वप्निलवर जो धागा काढलेला त्यात 850+ पोस्ट झाल्यावर तो वाहता करण्यात आलेला. त्यानंतरही आलेल्या पोस्ट पाहता जवळपास हजार पोस्ट त्याने मिळवलेल्या.>> त्यातल्या निम्म्याच्या वर पोस्ट तुझ्याच असतील
निम्म्या नाही 786 ☺
निम्म्या नाही 786 ☺
सोनाली. खरं तर दोन टक्केही
सोनाली. खरं तर दोन टक्केही नव्हत्या. पण चला तरी असे मानलेच 50 टक्के, तरी 400-500 हा देखील अफाट आकडा नाही का. तुम्ही काढा एखादा धागा आणि दाखवा एखादा मराठी कलाकार जो ईतका टीआरपी खेचू शकतो. एक सई वगळता कोणीही आसपासही फिरकत नाही. सईने खेचलेल्या टीआरपीचे आकडे थांबा आणतो मी शोधून ..
Ek bb kadh... Just Milind
Ek bb kadh... Just Milind somancha ek pic n miso tewadhach lihi...
Baghuyat kiti posts yetayet
big boss मध्ये जाण्याइतकी
big boss मध्ये जाण्याइतकी नौटंकी मराठी ताय्रांत नसते का? हा धागा कधी येणार?
रीया, काढला ! एस आर डी, मी
रीया, काढला !
एस आर डी, मी त्या जीवांपैकी एक आहे ज्यांनी सीजन एक पासून बिगबॉसचा एकही शो पाहिला नाही. सीजन वन मध्ये काय आहे हे बघायला एकदोन भाग पाच-दहा मिनिटांसाठी पाहिले असतील तेवढेच.
तर अश्या फालतू कार्यक्रमात आपले लाडके मराठी कलाकार न जातील तरच बरे...
Pages