परदेशात वास्तव्यास जाताना स्वतःजवळील सोन्याची नोंद

Submitted by स्वाती२ on 22 July, 2016 - 07:45

नमस्कार मंडळी,
मला थोडी माहिती हवी आहे. परदेशात वास्तव्यासाठी जाताना आपल्याजवळ जे सोन्याचे दागिने असतात त्याची भारतीय पासपोर्ट वर नोंदणी केली तर परत येताना सोईचे पडते. तर अशी नोंद एअरपोर्टवर कुठे करुन घ्यावी? माझी वहिनी ऑगस्टमधे डिपेंडंट विसावर न्युजर्सीला येणार आहे. तिच्यासाठी ही माहिती हवी आहे. मी अमेरीकेत पहिल्यांदा आले तेव्हा स्त्रीधन म्हणून दागिन्यांची अशी नोंद करुन घेतली होती. पण ते २२ वर्षंपूर्वी. त्यामुळे नक्की कुठल्या काउंटरवर काम झाले ते आठवत नाही. आता व्यवस्थेतही बराच बदल झालाय. मायबोलीकरांना याबाबत काही माहिती , स्वतःचा अनुभव असल्यास कृपया मदत करावी. वहिनी दोन लहान मुलं घेवून एकटीच येणार आहे. त्यांना संभाळत एअरपोर्टवर चौकशी करत फिरण्यापेक्षा आधीच माहिती मिळाली तर सोईचे पडेल आणि इतरांनाही मार्गदर्शक होइल म्हणून हा धागा.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती ,

मी भारतातून येताना किंवा जाताना ( मुंबै, हैदराबाद, बंगळुरु) कधिही दागिन्यांची नोंद केली नाही. बरेचदा हातात / गळ्यात असतील तेवढेच दागिने होते. पण क्वचित ( लग्नानंतर येताना, इतर नातेवाईकांच्या लग्नासाठी जाता / येता) हँड बॅग मधे दागिने होते. माझ्या सासू बाई सुद्धा येताना बरोबर दागिने आणतात आणि परत नेतात. त्यांना कधी काही अडवले नाही. एकदा मुंबै एअरपोर्ट वर कस्टम मधे विचारलं होतं फक्त - भाची लग्नासाठी आले आहे असे मराठीतून सांगितले. तर पुढे काही प्रश्न विचारले नाहीत.

तुमच्या वहिनींना प्रवासासाठी शुभेच्छा.

दोन वर्षापुर्वी जवळच्या ओळखीतली एक स्त्री अगदी वरच्या परिस्थितीत अमेरिकेत गेली. नवरा तिथे, डिपेंडंट विसा, ३ वर्षांचा मुलगा सोबत घेऊन एकटीने न्यु जर्सीपर्यंत प्रवास. तिने नेहमीचे दागिने जसे मंसु वगैरे अंगावर घातले होते, गळ्यातला हार, बांगड्या वगैरे हातातल्या सामानातुन नेलेले. पासपोर्टवर कुठेही नोंद वगैरे काही करावे लागले नाही. गेल्या वर्षी परतताना परत तसेच हातातल्या सामानातुन घेऊन आली.

भारतातून निघताना अशी नोंद केली न्हवती. ३-४ वर्षांपूर्वी भावाच्या लग्नाला येताना सगळे दागिने एका पिशवीत घालून आणले. ती पिशवी मुंबईला स्कॅन करताना अर्थात वेगळी काढली गेली आणि पोलिसांनी कोपच्यात घेतलं. त्यांना मराठीत लग्नाला आलोय, सगळे दागिने भारतातच घेतले आहेत असं सांगितलं. बरोबर लहान मुलगा/ कुटुंब/ मराठी बोलतायत/ दागिने भारतीय आहेत/ आणि म.म. माणूस जेवढे दागिने आणेल तेवढेच आहेत इ. मुळे पुढच्यावेळी दागिने घेतल्याच्या पावत्या जवळ बाळगा असं सांगून सोडलं.

शक्य तेवढे दागिने कस्टम डेस्कच्या आधी अंगावर घालणे, उरलेले (उरलेच तर) स्प्रेड करून ठेवणे आणि पावत्या ठेवणे वेअर टेकवे.

शक्यतो सर्व दागिने अंगावर घालून जा, (कष्टम्स पार होताना ) . पासपोर्टवर नोंद करावी लागत नाही आता. पुर्वी भिंतीवर तसे माहितीफलक होते, आता नव्या टर्मिनल वर दिसत नाहीत.

बरोबर लहान मुलगा/ कुटुंब/ मराठी बोलतायत/ दागिने भारतीय आहेत/ आणि म.म. माणूस जेवढे दागिने आणेल तेवढेच आहेत >> अगदी माझाही हाच अनुभव - कोपच्यात नव्हते घेतले पण कस्टम वाली बाई विचारत होती एवढेच.

बहीण म्हणे जुन्या फॅशनचे दागिने पाहून तिला दया आली असणार तुझी Happy

हो सेम माझाही अनुभव. मी इकडून तिकडे फार दागिने नेण्याची वेळ आली नाही कधी. पण मंसू, चेन, अंगठ्या इतपत दागिने(!) घालूनच प्रवास करते मी. कुठे नोंद करावी लागली नाही की चौकशा नाहीत.

लग्नानंतर प्रथम येताना, आईबाबांनी भेट म्हणून दिलेली मोठी गजांतलक्ष्मीची मूर्ती पाहून मात्र सिक्युरिटीची लोकं बावचळली होती! त्यांना वाटले एव्हढे जड सगळं सोनेच आहे! खूप वेळ बाजूला घेऊन चौकशा चालू होत्या. त्यांना सांगता सांगता पुरेवाट झाली की ते प्रकरण सगळे सोन्याचे नाहीये. वरून केवळ सोन्याचे पाणी आहे. इत्यादी.

परदेशी जाताना स्वतःकडील सोन्याची/ दागिन्यांची नोंद जरूर करावी. कर नाही त्याला डर कशाला?

आता परदेशातून दागिने, बिस्किटे, कॉईन अशा कोणत्याही स्वरूपात सोने आणण्यावर बरेच निर्बंध आहेत. मुंबई मध्ये इमिग्रेशन पास केल्यावर उजव्या बाजूला ड्युटी फ्रि आणि डाव्या बाजूला इमिग्रेशनचे ऑफिस आहे. इमिग्रेशन काउंटरला चौकशी करा.

प्रवासात बरोबर असलेल्या सर्व महागड्या वस्तूंची बिले फोटोकॉपी करून/ स्कॅन करून सोबत ठेवावी. वेळप्रसंगी कुठेही कामाला येतात.

इमिग्रेशनवाले शक्यतो त्रास देत नाहीत. चौकशीला थांबवलेच तर न बावचळता शांतपणे उत्तरे द्या.

इथे पहा

http://www.cbec.gov.in/htdocs-cbec/customs/cs-act/formatted-htmls/cs-rul...

अंतरंगी सोडून सारे प्रतिसाद हे माहिती देणारे नसून, बहुतेक वेळा काही होत नाही, तुम्हाला गुड लक असे हायेत.

सोने एक्स्पोर्ट करताना टॅक्स नाय म्हणुन आपण दागीने घेउन जाताना कोणी विचारत नाय.
पण इम्पोर्टवर टॅक्स हाय, दागिने असो का बिस्कीट. दागिन्याची व्याख्या काय? दागिन्यावर टॅक्स नसता राहिला तर स्मगलर लोकांनी बिस्कीट सोडून बिनदिक्कत दागिने आणले नसते काय.

परदेशातून भारतात येताना किंवा फोरेनर लोकांना प्रत्येकी एक लॅपटोप + ४५ हजाराच्या वस्तु विनाशुल्क आणता येतात.
+ जर का कोणा भारतीयाचे परदेशात वास्तव्य एक वर्ष ते अधिक असेन तर:
महिलांना प्रत्येकी १ लाख रुपयाचे दागिने विनाशुल्क इम्पोर्ट करता येतात, तर पुरुषांना ५० हजार. (अ‍ॅज ओफ डिसेंबर २०१५. नंतर या आकड्यात नाय तं वास्तव्याच्या काळात बदल झाले असल्यास माहित नाय.)
वास्तव्य एक वर्षा पेक्षा कमी असेल तर शून्य.

आता तुमच्याजवळ एक आंगठी, एक नथ, एक चैन / मंगळ सूत्र एवढंच असेल तर ठीक. जास्त असेल तर डिक्लेअर केलेलं बरं रहातं. म्हणजे येताना तुम्ही हरी हरी करत कस्टम मधून जाण्यापेक्षा बिनदिक्कत जाउ शकान.
दिल्ली एअरपोर्ट मध्ये येताना दागिन्यचे चेकिंग जास्तच चालतं. ते केव्हा मुंबई, बंगलोर चेन्नाइला लागु होईन सांगता येत नाही. या लिंका पहा:
http://www.hindustantimes.com/india/declare-all-gold-ornaments-with-you-...

http://www.dnaindia.com/delhi/report-delhi-airport-brings-in-a-new-proce...

चेक इन केल्यानंतर इमिग्रेशन काउंटर रहातो आणि नंतर कस्टम काउंटर.
या कस्टम काउंटर वरुन तुम्ही एक्स्पोर्ट सर्टीफिकेट घेउ शकता. त्यासाठी आपलं नाव पत्ता पासपोर्ट नं लिहुन आपण नेत असलेल्या सर्व दागिन्यांची लिस्ट करावी, दागिने ओळखु येण्याचे वर्णन, वजन, किंमत लिहावी. सोबत त्यांच्या पावत्या जोडाव्या. तुम्हाला अजून काही डिक्लेअर करायचे असेल तर करा. जसे की तुम्हाला एक लॅपटोप न्यायचा हाय आणि तिकडुन नविन लॅपटोप आणायचा हाय, म्हणजे येताना दोन. तेव्हा नेण्याच्या लॅपटोपचे मोडेल सिरियल नं आणि बिल जोडा. मी या वस्तु भारता बाहेर नेत असून त्या परत आणणार असे डिक्लेरेशन लिहुन सही करा.
कस्टम काउंटर वरती दागिने आणि इतर वस्तु आणि डिक्लेरेशन तपासून कस्टमवाल्यानं त्याच्यावर सही ठप्पा मारला पाहिजे. कधी सही एकीकडून घ्यायची तर ठप्पा दुसरीकडून असं रहातं, दोन्ही मिळाले की नाही तुम्ही बघुन घ्या.
तुमचे दागिने मोजकेच असतील तर कस्टमवाला डिक्लेरेशनची गरज नाही असं म्हणु शकतो.

तुम्हाला असं डिक्लेरेशन मिळालं की ते जपून ठेवाच, पण येताना तुम्हाला रेड चॅनल मधूनच यावं लागन. तिथे तुमच्या डिक्लेरेशनवरती तुम्ही दागिने परत आणल्याची नोंद होते.
ग्रीन चॅनल मधुन तुम्ही आला अन जास्तीचे दागिने म्हणुन चौकशी झाली आणि तेव्हा तुम्ही डिक्लेरेशन काढलं याचा अर्थ, असा होउ शकतो की तुम्ही मुद्दामुन डिक्लेरेशन येण्याची नोंद न करता घेउन चालले होते, नंतर त्याचा दुरुपयोग करण्यासाठी. फुकाची गरमागरमी होउ शकते. त्यापेक्षा रेड चॅनेल मधुन जाउन आपणच डिक्लेरेशन पुढे करायचे.

चांगली आणि विस्तृत माहिती काकेपांदा.

जर सरकारने एक नियम केला आहे तर तो पाळा. तुम्हाला कोणी अडवलं नाही, किंवा बोलबच्चन देऊन सुटलात तर ते तुमचं नशीब. पण कशाला त्यात वेळ घालवायचा ? जे काही असेल ते सरळ वर दिलेल्या माहिती प्रमाणे नोंदवून घ्या. येताना सरळ ताठ मानेने, कोणाला काही स्पष्टीकरण न देता रेड चॅनल मधून बाहेर या......

खूप सुन्दर आणि उपयुक्त माहिती मिळतेय . चांदीच्या वस्तू जसे की पूजेची उपकरणी, वाट्या, भांडी वैगेरे नेऊ शकतो का ? काय करावं लागतं काही माहिती आहे का ?

धन्यवाद अतरंगी आणि काकेपांदा. वहिनीला ही माहिती देते म्हणजे ती त्यानुसार तयारी करेल.
मनीमोहोर,
मी चांदीची निरांजनं वगैरे नोंद न करता नेले होते. तेव्हा चांदी स्वस्तही होती. काउंटवर ते लोकं म्हणाले की फक्त सोन्याची नोंद करतो. या सामानाची काही गरज नाही. मी कायमसाठी जात आहे का एवढेच विचारले. तसेही दागिने जसे दरवेळी कार्य प्रसंगी घालण्यासाठी घेवून येणे होते तसे या गोष्टींचे होत नाही. इथे अमेरिकेत एकूण सामानाची किंमत त्यांच्या मर्यादेच्यापेक्षा खुप कमी होती. त्यामुळे फक्त फॉर्मवर रकमेचा आकडा लिहिला.

ममो, माझे अहो, चांदीची ताटं, तुपाचे भांडे, दोन मोठ्या समया, फुलपात्री आणि सुपारीचे भांड असे सगळे घेऊन आले, चेक केले कस्टम्सला पण थोडेफार प्रश्न विचारून जाऊ दिले.

हे नियम बदलत असतात. आणि बर्‍याच वेळा कस्टम वाले जाऊ/येऊ देतात. तरीही विमानात बसण्यापूर्वी त्यावेळचे नियम पाहून खात्री करून घ्यावी.. मी वरती लिंक दिलेली आहे. गुगल केल्यास त्या-त्या वेळचे नियम लगेच सापडतील. त्याची एक प्रत सोबत ठेवावी. कित्येकदा सरकारी अधिकार्‍यानाही नियम नीट माहित नसतात.
( हा अनुभव खरा असून व्हिसावाले, कस्टम, इमिग्रेशन.. या सगळ्यांच्या बाबतीत घेतलेला आहे).. तेव्हा सोने/चांदी/नगद इत्यादी गमवायची नसेल तर नियम माहीत असलेले बरे.

मी घातलेल्या दागिन्यंबद्दल विचारले नाही. मी सर्व पावत्या जवळ ठेवल्या होत्या.
नियम बदलू शकतात कधीही + १०००. माहीती नक्की मिळवा.