चला काड्या करूया :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 July, 2016 - 12:22

मैत्रीणीचे कोडे!

गर्लफ्रेंड असूनही जिच्यात जीव अडकला, अश्या एका मैत्रीणीचा काल मेसेज येऊन धडकला.
व्हॉटसपवर आव्हान देत तिने एक कोडे घातले होते, सोडवल्यास मोह पडावा असे एक बक्षीस ठेवले होते.
पण मी जे उत्तर दिले ते तिला रुचले नाही, आणि तिने जे मला उत्तर सांगितले ते मला पचले नाही.
तर जे तिने मला घातले,तेच कोडे खाली देतो, आणि जरा मायबोलीकरांच्याही बुद्धीची चाचणी घेतो.

IMG-20160714-WA0001.jpg

वेगवेगळी उत्तर येऊद्यात, मग तिने सांगितलेले उत्तर आणि त्यावरची माझी शंकाही विचारतो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने, शेवटच्या आठ मधे असलेली मधली काडी चुकीची आहे. दोन्ही बाजूला गुल आहे तिच्या.. म्हणजे ती एकच काडी आहे की दोन काड्या आहेत???

हिम्सकूल जबरी निरीक्षण .. हे मला सुचले असते तर.. कोडे आणि उत्तर राहिले बाजूला, एक बोनस गिफ्ट यासाठीच मिळाले असते..

मला आता कोड्यापेक्षा बक्षिस काय मिळालं आणि बोनस गिफ्ट काय मिळालं असतं याचीच उत्सुकता जास्त वाटत्येय!
Wink
आमच्या सूनबाईला दाखवहो बक्षिस!

By the way ...varchi kavita ahe ka ...karan mast yamak julali ahe...ata runmesh kavitanche pn dhage kadayla mokle...

Gf la vicharlet ka he kode....bagha h mhanje answer match nai zale tar jumpaychi doghit ;):)

गर्लफ्रेंड असूनही जिच्यात जीव अडकला,
अश्या एका मैत्रीणीचा काल मेसेज येऊन धडकला.
व्हॉटसपवर आव्हान देत तिने एक कोडे घातले होते,
सोडवल्यास मोह पडावा असे एक बक्षीस ठेवले होते.
पण मी जे उत्तर दिले ते तिला रुचले नाही,
आणि तिने जे मला उत्तर सांगितले ते मला पचले नाही.
तर जे तिने मला घातले,तेच कोडे खाली देतो,
आणि जरा मायबोलीकरांच्याही बुद्धीची चाचणी घेतो.

ऋन्मुक्तचंद मधली कविता

मागे त्या मैत्रीणीला या धाग्याची लिंक पाठवलेली तेव्हा तिचे दुसरया दिवशी असे उत्तर आले होते..

.............

आताच वाचला तुझा धागा. हायला तू तर माझे कोडे ईंटरनॅशनल लेवलला नेऊन ठेवलेस. मी तर यावरच खुश आहे. बोल ऋ डीअर तुला आता काय हवे ते बक्षीस माग ..

............

मी हे ईथे मुद्दाम सांगत नव्हतो. नाहीतर उगाच तुम्ही मला "एखाद्या मैत्रीणीकडे हवे ते बक्षीस काय मागावे" याचा सल्ला मागणारा धागा काढायला उकसावले असते. पण शेवटी तुम्ही मला हे ईथे सांगायला लावलेच.

असो, मी तुर्तास फक्त शब्द मागितला आहे. वेळ आल्यावर काय ते मागेन असे म्हटले आहे. प्लीज काही उडपटांग सल्ले नकोत.........
ती हा धागा वाचतेय!

Pages