चला काड्या करूया :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 July, 2016 - 12:22

मैत्रीणीचे कोडे!

गर्लफ्रेंड असूनही जिच्यात जीव अडकला, अश्या एका मैत्रीणीचा काल मेसेज येऊन धडकला.
व्हॉटसपवर आव्हान देत तिने एक कोडे घातले होते, सोडवल्यास मोह पडावा असे एक बक्षीस ठेवले होते.
पण मी जे उत्तर दिले ते तिला रुचले नाही, आणि तिने जे मला उत्तर सांगितले ते मला पचले नाही.
तर जे तिने मला घातले,तेच कोडे खाली देतो, आणि जरा मायबोलीकरांच्याही बुद्धीची चाचणी घेतो.

IMG-20160714-WA0001.jpg

वेगवेगळी उत्तर येऊद्यात, मग तिने सांगितलेले उत्तर आणि त्यावरची माझी शंकाही विचारतो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्,
समजलं. पण मग एथीकली जायचंच आहे तर तो १ मधेच नाही घुसडवता येणार. तेवढी जागा नाहीय. त्याला शेवटी वा सुरूवातीला जागा द्यावी लागेल. ५११०८१. पण तरीही ते जवळचे दोन १ देखील एथीकल नाहीत कारण ते एकाच अंकस्थानाचे भाग आहेत. त्यांना वेगळे illuminate करता येणार नाही. शेवटच्या १ ला आणायचे असेल तरी पूर्ण नवीन अंकस्थान तयार करावंच लागेल. मग अधीक FSI चा खर्च, वायरी, सगळे सोपस्कार येतील.
तस्मात, बैलाला परत बोलवा.

आत्ताच एका गंभीर व्हॉ अ‍ॅ ग्रूपमधल्या मित्राने सांगितलं
-
८१११०५

दोनच काड्या हलवायच्या आणि आपण पण पलीकडे जाऊन बसायचं.
(उलट बघायचं)
Wink

डिजीटल डिस्प्ले म्हणून वर्ग घन करत नाहीत नी मग इल्यूमिनेट कशाला करायचा तो डिजीटल डिस्प्ले म्हणतात. जाऊदे!

ओ काकू,
मी कुठे डिजीटल डिसप्ले म्हणाले?
शुद्ध काड्यापेटीतल्या शुद्ध काड्या वापरून पहा.

मग असामींच्या ५११०८ raised to 11 मधे काय प्रॉब्लेम आहे? फॉंट कमीच पाहीजे ना! ते तुमचे बिपीनकाका म्हटले डिजीटल डिस्प्ले म्हणून हो!

दोनच काड्या हलवायच्या आणि आपण पण पलीकडे जाऊन बसायचं.
(उलट बघायचं)
>>>

साती, सकाळी आणखी एका मैत्रीणीने ही लिंक सरकावली
त्यात तुम्ही म्हणता तो प्रकार आहे
http://www.bhavinionline.com/2015/06/find-out-the-highest-possible-numbe...

ऋला गोड बक्षीस मिळवून देण्यासाठी माबोकर डोक्याचा अगदी भुगा करतायत.
>>>>
ईतनी शिद्दत से मैने वो गोड बक्षीस पाने की कोशीश की है,
के हर मायबोलीकर ने मुझे वो दिलाने की साजिश की है..

कहते है अगर किसी बक्षीस को दिल से चाहो, तो पुरी मायबोली उसे तुम्हे दिलाने की कोशिश मे लग जाती है..

और अगर बक्षीस फिर भी ना मिले.. तो वोह कोडे का दि एण्ड नही है..
इससे भी बडा नंबर अभी बाकी है मेरे दोस्त !! Happy

लॉजिकल थिंकिंगने ९९०९ हे अुत्तर बरोबर आहे

तर लॅटरल थिंकिंगने ५१११०८, ५०० ^ ३, ५००९!, आपण अुलट्या बाजुने जाउन पहाणे
ही सगळी अुत्तरे बरोबरच नव्हे तर हटके आहेत. अेकाचा विचार बघुन पुढे दुसऱ्याचा नवा विचार आणखी नवे अुत्तरे देइल.

डिजिटल डिस्पेचा रुल फॉलो केलाच पाहिजे ही अट कोड्यात दिली नाहीय.
ती असावी, असे बहुतेकजण नकळत गृहीत धरतात.
काही लोक कोड्यात कुठे सांगितलेय डिस्प्लेचा रुल फॉलो करु नका म्हणुन असंही म्हणतात त्याला अर्थ नाही.

आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिसादांचे आभार.
ही सर्वच उत्तरे मला मैत्रीणीला देता येतील. आणि म्हणता येईल, काहीही नियम लाव पण यापैकी एक उत्तर मान्य कर.

मात्र त्या आधी मला तिने दिलेले उत्तर खोडावे लागणार जे या सर्वांपेक्षा मोठे आहे. किंबहुना त्यापेक्षा मोठे उत्तरच नसावे जगात.
बस्स तेच गणिती वा कुठल्याही प्रकारच्या तर्काने खोडायला आता मला तुमची मदत हवी आहे.

हे तिने मला सरकावलेले उत्तर,

IMG-20160714-WA0002.jpg

मी तिला म्हणालो की कोणत्याही संख्येला शून्याने भागणे ही कवीकल्पना आहे. ईट शूल्ड बी टेन्डस टू झिरो अ‍ॅण्ड नॉट एक्झॅक्ट झिरो.
पण हे तिला तितकेसे पटले नाही.
मला बस हे उत्तर खोटे ठरवायचे तिला पटेल असे कारण सांगा, आयुष्यभराचा आभारी राहीन.
याव्यतिरीक्त वर आलेल्या उत्तरांप्रमाणेच आणखीही काही उत्तरे कोणाला सुचत असतील तर त्यांचेही स्वागत आहेच.

ऋन्मेष, वरील कोड्यात दोन काड्या हलवायची अट आहे पण तुझ्या मैत्रिणीने फक्त एकच काडी हलवली आहे हे कारण तिचं उत्तर चुकीचं आहे हे ठरवायला पुरेसं नाही का?

इन्फिनिटी ही संख्या नसून ती एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे संख्या तयार करायची असल्यास ते उत्तर चालणार नाही. तसेच डिव्हिजन बाय झीरो हे अनडीफाईन्ड आहे.

/

जो की चूक .
कारण एक तर कॅल्सि किंवा काड्या वापरूनही दोन काड्या / लाईन्स वापरून / चा सिंबॉल बनवला पाहिहे.

कोड्यात 'by moving maximum two sticks' असा बदल केल्यास एक वेळ उत्तर ओढून ताणून ग्राह्य मानता येईल.

लोक वाचत म्हणून नाहीत!

विलभ | 16 July, 2016 - 01:29
ही थोडी वेगळी काडी - शेवटच्या ८ मधून एक काडी काढून भागाकारासारखी अशी वापरली : ५००/० = infinity ां

अमितव | 16 July, 2016 - 01:35
डिव्हाईड बाय झिरो अन डिफाईन्ड आहे.
+ इन्फिनिटी प्रमाणे निगेटिव्ह इन्फिनिटीही होऊ शकतं.

ऋन्मेष, वरील कोड्यात दोन काड्या हलवायची अट आहे पण तुझ्या मैत्रिणीने फक्त एकच काडी हलवली आहे हे कारण तिचं उत्तर चुकीचं आहे हे ठरवायला पुरेसं नाही का?>>>>>>>+१००००

अमितव, भास्कराचार्य, सांगून बघतो. ऐकले तर ठीक, जास्त स्पष्टी विचारले तर तिचेच शब्द घेऊन इथे परत येईन.

शून्याने भागणे हे मुळात मलाही मान्य नाही. कारण भागणेचा अर्थ एखाद्या गोष्टीचे तुकडे करणे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे शून्य आकाराचे तुकडे केल्यास किती तुकडे होतील हे ईमॅजनरीच आहे.

तसेच उलट विचार करताच एखाद्या गोष्टीचे इन्फिनिटी तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याचा आकार काय असेल असा विचार करता मग इन्फिनिटीच्या जागी कितीही मोठा आकडा घ्या होणार्‍या तुकड्याचा आकार शून्य नसणार. काहीतरी युनिट साईज असणारच. याचा अर्थ ताळा बसत नाहीये Happy

..

तुझ्या मैत्रिणीने फक्त एकच काडी हलवली आहे हे कारण तिचं उत्तर चुकीचं आहे हे ठरवायला पुरेसं नाही का?
आणि
कारण एक तर कॅल्सि किंवा काड्या वापरूनही दोन काड्या / लाईन्स वापरून / चा सिंबॉल बनवला पाहिहे.
>>>>>
दुसरी काडी हलवायची अट असेलच तर ती पहिल्या पाचातील एक काडी तिथल्या तिथे हलवून त्याचा तीन नाही का बनवू शकत. उत्तर ३००/३ = इन्फिनिटी होईल.

सोनू, धन्यवाद
काल वाचलेले ते विलभ यांचे हेच इन्फिनिटीचे उत्तर, काल मुद्दाम त्यावर काही बोल्लो नाही कारण ईतर उत्तरे मग आली नसती. त्याचा उल्लेख आज करूया म्हटलेले पण मगाशी पोस्ट टाकताना ते डोक्यातून निघून गेलेले. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

ओके संशोधक, ती माझी बालमैत्रीण असल्याने काय काय करू शकते हे मला ठाऊक आहे Happy

ईथल्या धाग्याची लिंकच तिला व्हॉटसपवर सरकवली आहे. मेसेज तासाभरापूर्वी रीड झाला आहे पण अजून रिप्लाय आला नाहीये.

Pages