परशा - आकाश ठोसर फँन क्लब

Submitted by अनिश्का. on 15 June, 2016 - 04:47

परशा मला तु लै आवडतो.........

बस नाम ही काफी है।

व्हा सुरू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली ने दत्तक घेतलेले एक जबरा फॅन बाळ आहे त्याच्या प्रमाणे मी ही विद्युत व परशा ची फॅन आहे..... आणि हो माझं प्रेम ही अंधळं आहे........

ते बिफोर आफ्टर फोटो वाटतायत... विद्युत डाएट वगैरे करून बॉडी कमावलेला... परशा आपला गोंडस... गोड गोड

अरं काय... किती किस पाडाल त्या विद्युत चा...

सॉल्लीड्ड अ‍ॅक्टर आहे तो पन..

जॉन अब्राहम आणि जेनेलिया च्या आपल्या निशिकांत कामत न डिरेक्ट केलेल्या फोर्स पिच्चर मधे निगेटीव्ह भुमिका केलती त्यानं.. १००० लोकांमधुन त्याला घेतला आपल्या निशिकांतन..त्याचा बॉलिवूड डेब्यु..
त्यानंतर कमांडो नावाचा पिच्चर आलता त्याचा..
दोन्ही मदे क्रिटीक्स ला बहोत आवडलेला तो.. फोर्स मधे तर जॉन पेक्षा विद्युतच आवडला क्रिटीक्स लोकांना..

तो ट्रेन्ड मार्शल आर्टीस्ट आहे लोकांनु.. वयाच्या ३र्या वर्षापासुन खास भारतीय मार्शल आर्ट कलरीपयट्टू शिकलेला.. कितीतरी देशात त्याचे शो होतात.. त्याचे स्टंट पाहान त तोंडात बोट जाते..
कालेजात जाणार्‍या पोरींना अन जॉब करणार्‍या पोरींसाठी सेल्फ डिफेन्स चे क्लासेस सुरु केले त्यानं.. लय साजरा माणुस हाय तो..

कुटं तो कुटं परश्या.. नाय कंपेअर होत हो.. बस चेहरेपट्टी सारखी हाय...
आणि विद्युतला काई बोलु नका लोगहो.. आय लव्ह हिम..

या आता परत परश्या वर..

सो यु थिंक यु कॅन डान्स मध्ये आलेले दोघे ; त्यांचा प्रोमो पाहिला

हसून हसून नुसती वाट.
खूपच खतरनाक हिंदी. आर्ची( रिंकू राजगुरु) तर खतरा हिंदी बोलत होती. .... एक डायलॉग होता तिला देवदास मधला .. तो असा काही उच्चारला ... हसून वाट.. डायलॉग होता,

तो छोड दो... ( हे मराठी पद्धतीने पण सोलापूरी हेल करून म्हणा).

परश्या तरी पुण्यात वाढलाय पण खूपच घरच्या (मायचा) बोलीचा परीणाम आहे वाटतं , इतका सोलापुरी टोन.

परश्या मूळचा ( आई सोलापूरची) सोलापूर आणि त्यात पेहलवानकी साठी करमाळ्यात राहिला म्हणून की काय पण खूपच टोन गावठी आहे.

भाषेवर मेहनत घ्यावी लागणार जर मेनस्ट्रीम सिनेमे करायचे असतील तर. पण दोन्ही पोरं नाचली मस्त...

परश्या ( आकाश ठोसर) बुटका आहे तर आर्चीला उंची चाम्गली आहे. पंधरा वर्षाच्या मानाने एकदम थोराड दिसते मधून मधून पण बोलायला लागली की कळतं लहान आहे पोरगी.
माधुरीच्या बरोबरीने नाचत होती दोघं.


झंपी | 18 June, 2016 - 02:08
परश्या मूळचा ( आई सोलापूरची) सोलापूर आणि त्यात पेहलवानकी साठी करमाळ्यात राहिला म्हणून की काय पण खूपच टोन गावठी आहे

>>> गावठी टोन?.....आहो.. ग्रामीण बोली म्हणा हव तर.. !!

भाषेवर मेहनत घ्यावी लागणार जर मेनस्ट्रीम सिनेमे करायचे असतील तर
>>> "सैराट" कोणत्या स्ट्रीम वर होता मग?

ते जे काही करतायत वा करतील ते खुपच सुन्दर आहे..

>>>>गावठी टोन <<<<

अहो तेच ते.
त्यात वाईट काही नाही हो. ती एक बोलीच आहे माहीतीय. फक्त ते हिंदी एकताना मजेशीर वाटतं जर त्याच टोनमध्ये बोलली की.
तसेही हिंदी भाषिक मराठी लोकांवर हसतातच. आमच्या इंदोरला गेलो की मी, हिंदी भाषिक आम्हाला हसतात तर आम्ही त्यांचे मराठी एकून. फक्त गंमत म्हणून. हुस्श!
इतकं काय मनावर घेता.

मला म्हणायचे होते मेन स्ट्रीम सिनेमा ज्यात शहरी बोली मराठी ( शहरी बोली मधला मराठी ) असेल असे मूवी.
वरती "शहरी बोली मराठी " शब्द राहिल

लिहिलय की, पोरं भारी करतात नाच वगैरे... ते वाचा ना. Happy

आकाश रिंकुच्या मराठी हिंदी वर खरच हहपुवा, एक तुफान कॉमेडी सिनेमा निघेल या हिंदीवर Proud
पण आकाश त्या शोच्या प्रोमो मधे बराच धीट झालाय तरी, मानलं त्याला !
त्याच्या कुस्ती वरून काही जोक केले त्यांनी, होस्ट म्हणे अपाण एक कुस्तीचा डाव खेळु, मग आकाश स्ट्र्ज वर गेला तर तो घबरून उंच उंच पायर्या चढायला लागला स्टेजच्या सेट वरच्या... आमाशनी मग होस्ट ला खांद्यावर टाकून पायर्या उतरून आला धडधाड.
तो होस्ट त्याच्यापेक्षा तगडा उंच असून आकाशनी त्याला असं खांद्यावर टाकलं जशी एखादी हलकी बॅग Happy
गडी लय लय लय दमाचा हाय Happy
इथला व्हिडीओ पहाच. ५:०० ऑन्वर्ड्स तर पहाच !!!
http://abpmajha.abplive.in/movies/sairat-fame-archi-and-parsha-in-sytycd...

Got it.. मनावर नाही घेतल हो.. Happy ...

पण खरच.... खुप दिवसानी असा एखादा सिनेमा, त्यातली पात्र इतकी आवडली आहेत..

होना, असा तसा नाहीये आकाश.. सैराट मधे मार खल्ला भरपूर अता मात्र इथुन पुढच्या मुव्हीज मधे He deserves to be a hero who can fight too , जोरदार टाळ्या !!!
टोटली वेगळ्या रोल मधे बघायला आवडेल आकाशला, सुलतान चं मार्केट डाउन करा आता मराठीत येउ दे अ‍ॅक्शन मुव्ही !

कपिल शर्मा शो मधे पन त्यांनी हिंदीच चिंधी करुन टाकलीए..
आर्ची ला इतक कै बोलायच असत तर बिचारी अ‍ॅडजस्ट करते.. परश्याला माहिती असावी त्याची हिंदीतली गती म्हणुन पोरग अजुनही मजनुवानी चुपचाप अन गालातल्या गालात हसत बसतं.. मस्त हसतो यार तो..

परश्या ( आकाश ठोसर) बुटका आहे तर आर्चीला उंची चाम्गली आहे. पंधरा वर्षाच्या मानाने एकदम थोराड दिसते मधून मधून पण बोलायला लागली की कळतं लहान आहे पोरगी.
माधुरीच्या बरोबरीने नाचत होती दोघं.
<<
हो, आर्ची अत्ताच ५'६" आहे , अजुन उंच होउ शकते !
नागराजने यावेळीही सामान्य लोक घेतले असले तरी ते जब्या किंवा पिस्तुल्या टाइप फक्त त्या कॅरॅक्टरला सुट असे चेहरे नाही घेतले !
आकाश कमर्शिअल सिनेमातही हिरो मटेरिअल वाटेल आणि रिंकु हिरॉइन मटेरिअल पोटेन्शिअल असलेले आहेत.
भाषा कशी बदलतात ते बघावं लागेल नाहीतर मग कायम मकरन्द अनासपुरे जसा एकाच अ‍ॅक्सेंट मधे बोलतो , सुरवातीला मजा वाटते नंतर मोनोटोनस वाटतं असं होऊ नये !

आकाश कमर्शिअल सिनेमातही हिरो मटेरिअल वाटेल आणि रिंकु हिरॉइन मटेरिअल पोटेन्शिअल असलेले आहेत.
भाषा कशी बदलतात ते बघावं लागेल नाहीतर मग कायम मकरन्द अनासपुरे जसा एकाच अ‍ॅक्सेंट मधे बोलतो , सुरवातीला मजा वाटते नंतर मोनोटोनस वाटतं असं होऊ नये !>> +१

मीही तेच म्हटले वरती. सगळे सिनेमे ग्रामीण वातावरणातील नसतील. उद्या आरचीला डून स्कुल मधून आलेल्या मुलीचा रोल ऑफर झाला तर हि भाषा नाही चालणार ना

हा एपिसोड झाला का आज येणार आहे ? >>>> आज आहे रात्री ८.३० ला & टीव्हीवर.

कसला उचललाय यार परश्याने त्याला. भारीच.

<<सैराट मधे मार खल्ला भरपूर अता मात्र इथुन पुढच्या मुव्हीज मधे He deserves to be a hero who can fight too , जोरदार टाळ्या !!!>> + १११११
पण भाषेवर मेहनत घावीच लागेल हे मी पण या आधीच म्हटलंय नाहीतर काही खर नाही. थोडा उंचीत कमी पडतो नाहीतर हसण गोड आहे. Happy

कपिल शो मध्ये आकाश एकदमच लाजराबुजरा वावरत होता.. & टीव्ही च्या शोमध्ये छान मुक्त वावरतोय.. नाचलाय पण भारी. आता सवयही झाली असेल त्याला.

Pages