शुद्ध देशी पिझ्झा

Submitted by दिनेश. on 12 June, 2016 - 16:46
लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्षक्ष

क्रमवार पाककृती: 

वाढणी/प्रमाण: 
चार पिझ्झा होतील.
माहितीचा स्रोत: 
शुद्ध देसी रोमान्स हा चित्रपट :-) नव्हे त्यातल्या पाट्या ;-)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! बेस खूप सुंदर जमलाय.. भाज्यांत इटालियन हर्ब्ज आर मस्ट (माझ्याकरता) Happy

खूप टेंप्टिंग आलाय फोटो!!!

हे पीठ तयार मिळते का? कुठल्या ब्रँडचे?
तसेच तुम्ही लिहीले आहे की हे पीठ लगेच फुगायला लागते...मग चार पिझ्झे व्हायला वेळ तर लागेलच ना,. तो पर्यंत ते प्रकरण हाताबाहेर गेले तर?
तसेच बेस अर्धकच्चा भाजून फ्रीज मधे ठेवायचा का? तो दच्चड तर नाही ना होणार?
तुमच्या चित्रात ल्या सारखा स्पंजी व्हायला हवा.....तर वरचं प्रमाण अधिकृत आहे ना?

आंबटगोड, हे पीठ ( सेरे फ्लो ) स्टार बजार मध्ये मिळते. बिग बजार, डि मार्ट आणी इनॉर्बिट मॉल मध्ये पण कदाचीत मिळु शकेल.

तो दच्चड तर नाही ना होणार?>> दच्चड Happy मस्त आहे शब्द Happy

आगो : सेल्फ रेझींग फ्लावर हे हल्ली भारतात सुपरमार्केटमधे मिळते. पण ह्यात फायबर नसतात.

दिनेशदा, मस्त आहे रेसेपी.

मी फ्लोरेन्समधे जो कुठला पित्झा, पास्ता खाल्ला आहे त्या चवी आणि पोत दोन्हीच्या जवळ जाणार पित्सा इतर कुठेच पाहिला नाही. बेसमधे ही लोक गफलत करतात.

आभार सर्वांचे

मानिनी, अवन मधे पिझ्झा करायचा तर तो जून्या पद्धतीचाच हवा. किंवा मावे विथ ग्रील हवा. साध्या मावे मधे चांगला होत नाही. त्यात फ्रोझन पिझ्झाही नीट भाजला जात नाही.

आंबट गोड.. मी अंगोलात असतो. इथले ब्रांड भारतात मिळत नाहीत पण रश्मी ने सांगितलेत ते ब्रांड मिळतील.
भाजून ठेवायचे तर पूर्ण भाजून, बटर लावून ठेवायचे. अर्थात व्यवस्थित फॉईल रॅप करून. व्यवस्थित राहतात.
फ्रिजरमधे नाही तर खालीच, शिवाय २/३ दिवसांपेक्षा जस्त दिवस ठेवू नयेत.

हे प्रमाण आहे ते मी नेटवरून घेतलंय पण ते योग्य आहे असे तिथे लिहिलेले आहे. पण जर तयार सेल्फ रेझिंग फ्लोअर मिळण्यासारखे असेल, तर तेच वापरावे.

हर्ट, अगदी बरोबर, इतालियन तो इतालियनच !

दिनेश जी
Thanks,

आमच्याकडे कन्वे. मावे आहे, खरतर माझा आणी स्वयंपाकघराचा कधीच संबध येत नाही त्यामुळे काहीच माहिती नाही.
पण यावेळी विचार करते कि ट्राय करायला काय हरकत आहे तेवढेच घरचे खुश की मी काहितरी केलेय (भले ते कसे ही होवो).

होप की रेसिपि बूक मध्ये ज्या स्टेप्स दिल्यात पिझ्झा बनवाय्च्या ( Temp. time etc.) त्याच तुम्ही वर दिलेल्य पिझ्झासाठीही लागु असतील (नसेल तर प्लिझ द्याल का)

मानिनी,

मला त्यासाठी तूमच्या अवनचे सेटींग बघायला हवे. साधारणपणे २५० सें ( प्री हिटेड ) ला पाच मिनिटे लागतात पिझ्झा भाजायला. ( ट्रॅडीशनल पद्धतीने म्हणजे न भाजलेल्या बेसवर टॉपिंग पसरून ) जर जाड बेस असेल तर जास्त वेळ लागेल.

पहिल्यांदाच करणार असाल तर सतत लक्ष ठेवायला हवे. चीज वितळायला लागले आणि वर सोनेरी रंग आला कि अवन बंद करायचा. आणि लगेच बाहेर काढायचा नाहीतर चीज करपते.

बेसची जाडी, टॉपिंगच्या साहित्याची जाडी वर पण वेळ ठरेल.

वरच्या पद्धतीने म्हणजे आधी बेस, बेक करून घेणार असाल तर दोन मिनिटे बेस बेक करा आणि मग तो उलटा
करुन त्यावर टॉपिंग पसरा. आणि मग तीन मिनिटे बेक करा.

पण तरीही, सतत लक्ष ठेवण्याला पर्याय नाही. निदान पहिल्या वेळेला तरी. ती वेळ नोंदवून ठेवली कि मग पुढच्या वेळेस उपयोगी पडते.

Thanks दिनेशजी,

ओवनच्या सेटींग बद्द्ल काहीच कल्पना नाही.
मम्मी ची मदत घ्यावीच लागेल असे दिसतेय.

असो पण निदान प्रयत्न तरी करेन

हे फोटो पाहिल्यापासून रहावत नव्हतं.
मुलांना फोटो दाखवल्यावर तर 'करच..' म्हणून मागे लागली होती.
मग मैदा, बेपा आणून, सेल्फ रेजिंग फ्लार करण्यापासून सगळं केलं.
नशीबाने इथे हल्ली मोझ्झेरेला चीज- मिल्की मिस्ट कंपनीचे मिळू लागलेय.
मुलांना म्हणून कमी मसालेदार आणि पनीर घालून पिझ्झा केला.

हा बेस-
दोन्ही बाजूंनी तव्यावर शेकूनच केला.
image_2.jpeg

ही भाजी- सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, पनीर आणि टोमॅटो सॉस. थोडे इटालीयन हर्ब्ज
image.jpeg

मग पिझ्झा तयार केला, वर चीज पसरून
image_0.jpeg

माझ्याकडे मावे विथ ग्रिल आणि कन्वेक्शन आहे. पण त्यात तापमान २२० पर्यंतच जाते. तर २२० लाच प्रिहीट करून मग प्रत्येक पिझ्झा ज्यांना थोडा स्टिकी क्रस्ट हवाय त्यांच्यासाठी चार मिनीटे भाजला. ज्यांना सोनेरी क्रस्ट हवाय त्यांच्यासाठी पाच ते सहा मिनीटे.
image_1.jpeg

एकदम भारी झालाय.
परदेशात एकदा ईटालीयन माणसाच्या घरगुती रेस्टॉरंटमध्ये ईटालीयन पिझ्झा खाल्ला होता , तसा झालाय. (ऑऑ आणि ऑलिव्हज घातले नाहीत त्यामुळे तो फ्लेवर आला नाही.)

चक्क आज तिन्ही मुलांनी एकेक इटुकला पिझ्झा ब्रेकफास्ट्ला खाल्ला.
आणि एकेक डब्यातून नेला.

मजा आली.

धन्यवाद दिनेशदा!

वा साती क्या बात है!:स्मित: खूप सोप्या पद्धतीने समजावलस. मस्त दिसतोय पिझ्झा. आणी तुझ्या आधी दिनेशजीना धन्यवाद, त्यांच्या रेसेपीमुळे तू करुन पाहीलास आणी इथे सविस्तर लिहीलस.

दिनेशजींचे बरोबर आहे, कारण प्रत्येक ओव्हनचे सेटींग वेगळे असतेच.

साती, मस्त जमलाय.

आणि घरचा पिझ्झा खाऊन मस्त पोट भरते.

मी कधी फारसा कन्व्हेंशन टाईप अवन वापरलाच नाही. घरी आहे तो गॅस टाईप आहे, तो चालू करणेच जरा ट्रिकी वाटते मला. त्यापेक्षा ग्रील वापरणे सोपे वाटते.

डॉ.साती जी अन आमच्या दिनेशदादांना दंडवत घालून आम्ही एक राऊंड मुखत्सुनामी गिळलेली आहे, आता हे बनवणे आले ओघाने! बघू जमेल तसे जमेल तेव्हा

मीही हा पिझ्झा बनवून बघितला, खूप सुरेख झालेला, फोटो काढेपर्यंत धीर धरवला नाही. ऐशुने नंतर मुंबईच्या कुठल्यातरी कॅफेत ऑथेंटिक पिझ्झा खाल्ला, घरी आल्यावर सेम आपण केलेला तसाच लागला म्हणाली. Happy

फक्त मैद्यात बेकिंग सोडा घालून ते भिजवले तरी फुगले नाही. त्यामुळे नंतर खूप कडक झाला बेस. पण पातळ असल्याने चालून गेले. बेकिंग पावडर जुनी असल्याने असे झाले असावे हा अंदाज.

आभार परत एकदा..

साधना बेकिन्ग पावडर जूनी असेल तर आधी थोडी टेस्ट करुन पहावी लागते. सध्याच्या पावसाळी हवेत ती निष्क्रिय होऊ शकते.

Pages