पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!
सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!
पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात.
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))
नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!
खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! )
त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!
परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!
आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..
आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.
सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.
अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss
ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये.
नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!)
नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?)
कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!!
पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!
गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल!
आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!
आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"
काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....
त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो.....
अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….
_/\_
Bag tar adhich jate, first
Bag tar adhich jate, first attempt of running , when they got caught by police !
जाते की ती पण बॅग पडून, ट्रेन
जाते की ती पण बॅग पडून, ट्रेन पकडायच्या आधीच्या शॉट मध्ये >> तस नाही बहुतेक...
जेव्हा पोलीस या सगळ्याना पकडतात बसस्टाप वरुन तेव्हा ती बॅग घेतात आणि तात्याना परत करतात बहुतेक..
बॅग घेताना दाखवलं नाहीये , की
बॅग घेताना दाखवलं नाहीये , की मीच मिस केलं ते ?
दीपांजली
दीपांजली
बॅग पोलीसांनी ताब्यात
बॅग पोलीसांनी ताब्यात घेतल्यावरच जाते.
आर्ची परश्या कडे पळताना फक्त पिस्तुल आहे.गाडी पकडण्या आधी ते पण त्या रेल्वे मार्गा शेजारच्या खडीत टाकून देतात.
train pakdatanachya shot
train pakdatanachya shot madhe she isn't carrying anything except gun !
Paise jewelry gheun अdhichya scene madhe palate mhanun police case plan banvatat , robbery rape etc .
श्री | 28 June, 2016 - 22:58
श्री | 28 June, 2016 - 22:58 नवीन
बॅग घेताना दाखवलं नाहीये , की मीच मिस केलं ते ? >>
अस बॅग घेताना दाखवलं आहे हे नक्की नाही आठवत.. पण जेव्हा पोलीस या सगळ्याना पकडतात बसस्टॉप
जवळ तेव्हा त्यानी ती घेतलेली असणार मुलाकडुन....
पण मानल राव अर्चिच्या
पण मानल राव अर्चिच्या डेअरीन्गला (दुरद्रुष्टी, चाणक्शपणा नाहीतर आजुन काहिही म्हणूनुयात )
... पळुन जाताना पण पुढे येणार्या वाटचालीत प्रेमा सोबत पैसे पण किती महत्वाचे आहेत हे ओळखुन पुर्ण स्टॉकच आणते बॅग भरुन... !!!
अय कोन्रे पोस्टी बदलतय!
अय कोन्रे पोस्टी बदलतय! इंग्लिश मधे सांगू का?
डिज्जे, पिस्तुल पण फेकताना दाखवलीये. बॅग मला वाटतं जीपड्यात राहून गेलीअसेल.
BUwa, She throws away just
BUwa,
She throws away just before getting in train because she doesn't need it anymore
Bag of course was taken away when they get caught ( not shown clearly but they make case of robbery so understood. )
मायबोलीवर एखाद्या चित्रपटावर
मायबोलीवर एखाद्या चित्रपटावर आलेल्या या सर्वात जास्त कमेंट आहेत असे मला वाटते .खखो admin जाणे.
एग्जॅ़टली डिज्जे. पोलिस
एग्जॅ़टली डिज्जे. पोलिस त्यांना ताब्यात घेतात आणि परत आणतात. एकदा ती घरच्यांबरोबर आहे म्हणल्यावर, तात्य अन कंपनीनी बॅग परत घेतली असणार.
not shown clearly but they
not shown clearly but they make case of robbery so understood. ) >>> डिज्जे पाँईटे.
नाही बहुतेक मी सीन पाहिलाय
नाही बहुतेक मी सीन पाहिलाय जिथे बॅग खाली पडते. ती गाडीतून चालली असते तेव्हा परश्याला मारहाण होत असते.. तेव्हा ती त्याला वाचवायला गन घेऊन जाते तेव्हा बॅग खाली पडते आय गेस.. नंतर ती नुसतीच गन घेऊन पळत जाते.. परत पाहायला हवा..
थोडं आफ्टर इंटर्वल पण लिहा
थोडं आफ्टर इंटर्वल पण लिहा लोकहो.
ते टॉयलेटला जातानाची आर्चीची मन:स्थिती बघून रडवेला झालेला जीव. एवढ्या घाणीत पाय टाकाय्चा म्हणजे केवढी शिक्षा.
'चव' जशी मेंदूत रुतुन असते तसेच 'गंधा'चेही असावे याची साक्ष पटली. शीतल, सुगंधी मल्टीप्लेक्स काही सेकंदासाठी उकिरडा वाटलेले.
मंजुळे.. मंजुळे!!
बरोबरय बस्के, मलाही आठवतय
बरोबरय बस्के, मलाही आठवतय पडल्याची आता. पहिला हाफच इतका बघितला जातो, अजून १-२ वेळाच बघितला दुसरा हाफ.
लोकांना शेकडावी (१००, ५००,
लोकांना शेकडावी (१००, ५००, १००० वगैरे) पोस्ट टाकण्याची एवढी एक्साईटमेंट आहे तर, बुवा/श्री मी म्हणतो तुम्ही ह्या ऐतिहासिक धाग्यावर २००० व्या पोष्टीचा लिलाव चालू करा.
धाग्यावर पाच हजार पोष्टी झाल्यातर अॅडमिन दिवाळी अंकात नक्कीच खास ऊल्लेख करतील बुवांचा, तेव्हा मी नागराज तात्यासाहेबांची करून देतो तशी मायबोलीकरांना बुवांची रनिंग कॉमेंट्री ईंट्रो करून देणार आहे.
"मायबोली वरचे झाडून सगळे सिनेफ्यान टी पार्टी महोत्सोवाला गेले असतांना तुम्हाला सांगतो मायबोलीच्या सामान्य सैराट फ्यानसाठी टी पार्टी महोत्सोवाला जायचं टाळून धागा ऊघडून ईथं कायम हजेरी लावली येवढ्या मोठ्या मनाचा हा माणूस है."
:)
हाब लिलाव
हाब
लिलाव 
सेकंड हाफ मी पण फार वेळा नाही
सेकंड हाफ मी पण फार वेळा नाही पाहिला.
दोघांचही विश्व बदलतं पण आर्चीच्या लाइफस्टाइल मधे जितका तफावतीचा बदल होतो तितका परश्याच्या आयुष्यात होत नाही.
तो आधीही गरीब होता , झोपडीतच रहात होता , अख्खी फॅमिली एकाच खोलीत.
इथे निदान एका खोलीत दोघच आहेत , अर्थात स्ट्रगल त्यालाही भरपूर आहे पण आर्चीला पाणी पिणे ते बाथरुमला जाणे बेसिक नीड्स पासून भयंकर बदल आहेत.
एका नॉन मराठी समीक्षकानी परफेक्ट मांडलं होतं कि सैराट ही परशापेक्षा आर्चीची जर्नी आहे , फॅक्ट्स ऑफ लाइफ बिइंग पॉवरफुल अँड पॉवरलेस !
अगदी पटत् ते , जेंव्हा ती तात्यांची मुलगी आहे तेंव्हा तिचा वचक आहे, सगळी मुलं तिला घाबरतात , ते तिच्या ओरडण्याला किंवा अॅटीट्युडला नाही, तिच्या पाटलाची मुलगी असण्याला !
जेंव्हा ती पॉवरलेस आहे तेंव्हा तिला आयुष्यताला सगळा स्ट्रगल आहे , कोणी मुलं तिला घाबरत नाहीत कि ती झाशीच्या राणी सारखी वागत नाही, अगदी परशा सुध्द्दा तिला कानाखाली आवाज काढायला घाबरत नाही !
बुवा एक फोटू टाका राव वरती
बुवा एक फोटू टाका राव वरती सिनेमाच्या पोष्टरचा, धागा लईच ब्लॅक अँड व्हाईट वाटतोय लगा.
+१ डिज्जे. टाकतो हाब.
+१ डिज्जे.
टाकतो हाब.
प्रिन्सने कानाखाली मारल्यावर
प्रिन्सने कानाखाली मारल्यावर प्रिन्सिपल आणि साठे येतात तेव्हा तात्या त्यांना मुद्दाम भाव खाऊन इग्नोर करतात मग उगाच आपलं ओळख करून देतात, या सीनमध्ये प्रिन्सिपल सायबांनी पण चांगले एक्स्प्रेशन्स दिलेयत.
प्रिन्सने कानाखाली मारल्यावर
प्रिन्सने कानाखाली मारल्यावर प्रिन्सिपल आणि साठे येतात तेव्हा तात्या त्यांना मुद्दाम भाव खाऊन इग्नोर करतात मग उगाच आपलं ओळख करून देतात, या सीनमध्ये प्रिन्सिपल सायबांनी पण चांगले एक्स्प्रेशन्स दिलेयत.
<<
अगदी !
प्रत्यक्षात ते थोबाडीत खात नसले तरी त्यांचाही चेहरा थप्पड खाल्यानी अपमानित झाल्यासारखा हतबल !
हायझेनबर्ग | "मायबोली वरचे
हायझेनबर्ग |
"मायबोली वरचे झाडून सगळे सिनेफ्यान टी पार्टी महोत्सोवाला गेले असतांना तुम्हाला सांगतो मायबोलीच्या सामान्य सैराट फ्यानसाठी टी पार्टी महोत्सोवाला जायचं टाळून धागा ऊघडून ईथं कायम हजेरी लावली येवढ्या मोठ्या मनाचा हा माणूस है."
>>>>
हसून लोळण, ... पडलो न लगा हिथ खुर्चित्न...!!!!
हायझेनबर्ग | 29 June, 2016 -
हायझेनबर्ग | 29 June, 2016 - 02:31
बुवा एक फोटू टाका राव वरती सिनेमाच्या पोष्टरचा, धागा लईच ब्लॅक अँड व्हाईट वाटतोय लगा >>>
होय ना राव...बुवा..एक छान पैकी पोष्टर येउदया खरच...
हो आणि वरतून सगळ्या स्टॉफकडनं
हो आणि वरतून सगळ्या स्टॉफकडनं वर्गणीपण द्यावी लागली ती पण प्रिन्सच्या वाढदिवसाची
नंतर तो किडकिड्या प्रोफेसर उगाच आपली चीड काढतोय परश्यासमोर... सगळीकडे पाटलाचंच राज्य आहे कां म्हणे, त्याला तर सगळ्यात जास्त आनंद झाला असेल आर्ची पळून गेल्याचा.
अरे ते टिपार्टी फ्यान क्लब
अरे ते टिपार्टी फ्यान क्लब आत्त बघितलं
हायझेनबर्ग | "मायबोली वरचे
हायझेनबर्ग |
"मायबोली वरचे झाडून सगळे सिनेफ्यान टी पार्टी महोत्सोवाला गेले असतांना तुम्हाला सांगतो मायबोलीच्या सामान्य सैराट फ्यानसाठी टी पार्टी महोत्सोवाला जायचं टाळून धागा ऊघडून ईथं कायम हजेरी लावली येवढ्या मोठ्या मनाचा हा माणूस है."
>>>> अगागागा. पार ह ह पु वा !!
जेंव्हा ती तात्यांची मुलगी
जेंव्हा ती तात्यांची मुलगी आहे तेंव्हा तिचा वचक आहे, सगळी मुलं तिला घाबरतात , ते तिच्या ओरडण्याला किंवा अॅटीट्युडला नाही, तिच्या पाटलाची मुलगी असण्याला>>
हे तितकसं नाही पटत. म्हणजे पोहणार्या बिली बांउडीची 'चड्डी फाटली' वर हसणे ते लंगड्याला 'प्रदीप' म्हणून किंमत देणे यात बरीच तफावत आहे. ती निव्वळ बापाच्या जिवावर 'माज' करणारी असती तर 'कानफाड' प्रकरणात भावाशी न भांडता एंजोय केले असते.
परश्याचे तिला कानाखाली मारणे हा 'कॉम्प्लेक्स' आहे.
आर्ची ही आर्ची आहे. बापाच्या सावलीमुळे थोडी हवा मिळाली हा फायदा आणी जीव गमावला हा तोटा.
Pages