संगीतकार आणि त्यांची वैशिष्ट्ये

Submitted by गजानन on 7 June, 2016 - 03:44

बर्‍याचदा तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि गाणे संपत असताना तुम्ही तुमच्या मनात 'या गाण्याचा संगीतकार कोण असावा?' याचा अंदाज बांधता. बर्‍याचदा तो बरोबर निघतो. कारण एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकून ऐकून त्याच्या वेगळ्या शैलीची काही व्यक्त/अव्यक्त गणितं किंवा नोंदी तुमच्या मेंदूने नोंदून ठेवलेल्या असतात. यात चाल, वापरलेली वाद्ये आणि गायक/गायिकेच्या किंवा वाद्यांच्या आवाजाचा विशिष्ट पद्धतीने करून घेतलेला वापर, इ. चा समावेश असतो, असे म्हणता येईल.

हा धागा संगीतकारांच्या अश्या शैलींची (लक्षणांची?) चर्चा करण्यासाठी. त्यामुळे पुन्हा ऐकताना त्या त्या गाण्यांची / संगीताची मजा आणखी वाढेल, अशी आशा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, सिनेसंगीत, भावगीतं, इ. सर्वप्रकारच्या संगीतासाठी.

कोणते संगीतकार तुम्ही कोणत्या आधारे अचूकरित्या ओळखू शकता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई, बाळासाहेबांची आणखी एक खासियत.. ते आपल्याच चाली चोरतात

सुहास्य तूझे = मी मज हरपून
जांभूळ पिकल्या झाडाखाली = होली आयी
जिवलगा राहिले = ओ बावरी

याशिवाय लेकिन मधल्या गाण्यावर एक गझल बेतली होती.

मराठी चित्रपट - कीचकवध (१९५८-५९) - संगीत - मा. कृष्णराव - धुंद मधुमती रात रे - या गाण्यात हवाईन (का हवाई) गिटारचा वापर.

ते आपल्याच चाली चोरतात

हे आर डी बर्मन यांनी सुध्दा केले होते. सागर चित्रपटातले सुरुवातीचा म्युझिक पीस वरून त्यांनी "आ जा मेरी जान" नामक टुक्कार चित्रपटात "आजा मेरी जान" हे गाणे रचले होते. जे किशनकुमार नामक अतिमहाभयंकर केसाळ प्राण्यावर चित्रित केलेले.

अन्नू मलिक ने सुद्द्दा बाजिगर चित्रपटात "ए मेरे हम सफर" या गाण्याच्या सुरुवातीला व्हिसल म्युझिक आहे त्या चालिवरून आमिर - जुही अभिनित "इश्क" चित्रपटामधे "इश्क हुवा कैसे हुवा" हे गाणे बनवले Happy

प्रादेशिक विषय असेल तर त्यानुसार संगीत द्यायचा प्रयत्न व्हायचा. त्या चित्रपटातली सगळीच गाणी त्या त्या प्रदेशाची वाटायची.. रुस्तम सोहराब ( सज्जाद हुसैन ) मदर इंडीया ( नौशाद ) हिर रांझा ( मदन मोहन )
तिसरी कसम ( शंकर जयकिशन ) सरस्वतीचंद्र ( कल्याणजी आनंदजी ) असा प्रयत्न लगान मधेहि झाला होता ( बहुदा शेवटचा का )

आता प्रादेशिक विषय असले ( मेरी कोम, कायपो छे वगैरे ) तरी संगीतातून ते जाणवत नाही.

ओ पींची गाणी तशी पटकन लक्षात येतात. परवाच सलमान-करिश्माचं देखो देखो तुम, हो गया मै गुम हे गाणं लागलं होतं, त्याच्यावर विलक्षण ओ.पी. छाप जाणवत होती. तुषार भाटिया किंवा तत्सम कोणी असेल म्हणून प्रथम दुर्लक्ष केलं, पण नंतर राहवेना म्हणून शोध घेतला तेव्हा कळलं की हे निश्चय या चित्रपटातील गीत आहे आणि या चित्रपटाला संगीत ओ.पींचंच आहे! हा बहुदा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट असावा.

प्रादेशिक विषय असेल तर त्यानुसार संगीत द्यायचा प्रयत्न व्हायचा <<<
गंगा जमुना : नौशाद (खास भोजपुरी टच, नैन लड गई है, तो मन्वा मा कसक होई बे करी ....)
गंगा जमुना : नौशाद (खास भोजपुरी टच, ढुंढो ढुंढो रे साजना ढुंढो रे साजना मोरे कान का बाला ....)

सलिल चौधरींच्या खुप चाली केवळ लतासाठीच होत्या. आजा रे परदेसी / ओ सजना बरखा बहार आयी / बन्सी क्यू गाये / मिला है किसीका झुमका / मचलती आरजू खडी बाहे पसारे / मदभरी ये हवाये / सहर तो है तेरे लिये / घिर घिर आयी...

या गाण्यात मी आणखी कुणाच्या आवाजाची कल्पनाही करू शकत नाही.

संगदिलला सज्जाद हुसेननी संगीत दिलं होतं, सगळी गाणी अप्रतीम आहेत. त्यातल्या 'ये हवा, ये रात ये चांदनी' या गाण्यावरून मदन मोहननी 'तुझे क्या सुनाऊ मै दिलरूबा' या गाण्याची चाल चोरली असा आरोप सज्जाद्जींनी केला होता. दोन्ही गाण्यांत कमालीचं साम्य आहे हे खरं Happy

तसंच साम्य मला 'मै जिंदगीमे हरदम रोताही रहा हू" आणि 'बरसात मे जब आयेगा सावन का महिना' या दोन गाण्यांतही जाणवतं, पहिल्याचे संगीतकार बहुतेक शंकर जयकिशन आहेत आणि दुसर्‍याचे लक्ष्मीकांत प्यारेलाल.

विविधभारतीवर कान पोसले गेल्यामुळे गाण्यासोबत त्याची श्रेयनामावलीही कानावर पडायची आणि नोंदली जायची. त्यामुळे गाणं लक्षात राहिलं की गायक, संगीतकारही आपसूक लक्षात राहिले आहेत. अलीकडेच एक पुस्तक वाचताना जाणवलं की गीतकारांची नावं तितकी मनात नोंदवली गेली नाहीत. गाजलेल्या गीतकारांची गाजलेली गआणी फिट आहेत. पण त्यांच्या प्रख्यात शैलीपेक्षा वेगळं गाणं त्यांचं असूनही त्यांचं म्हणून रजिस्टर झालं नाही.

मला तीन चालींबद्दल मुद्दाम लिहायचे आहे.

दिवाना हुवा बादल ( ओपी) बहारों फुल बरसाओ ( एस्जे ) ओ मेरे सोना रे सोना ( आर्डी )

हि तिन्ही गाणी गुणगुणून बघा.. यांना एक सुंदर अशी अंगभूत लय आहे. या गाण्याचे मूळ कुठे असेल याबद्दल मी काही वाचले नाही कधी. बहारो तर दरबारी रागात आहे.. तरी हे तीन किस्से

१) दिवाना हुआ बादल

मस्कतला अन्नु कपूर अंताक्षरी कार्यक्रम घेऊन आला होता. हा कार्यक्रम मोकळ्या मैदानात होता. हे गाणे सुरु असताना त्याने अचानक ऑर्केस्ट्रा थांबवला आणि प्रेक्षकांना हे गाणे गायला सांगितले. चार ओळी संपल्यावर परत ऑर्केष्ट्रा सुरु केला तेव्हा सर्व प्रेक्षक बरोबर मात्रेत होते. त्याच्या पुढच्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या एका
इजिप्शियन माणसासोबत मी जात होतो, तर तो शिट्टीवर हेच गाणे वाजवत होता. तो त्या कार्यक्रमाला आला नव्हता. मला म्हणाला मी कधीतरी लहानपणी हे गाणे ऐकले होते. शब्द वगैरे काही आठवत नाहीत पण सूर मात्र कायम लक्षात राहिलेत.

२) बहारों फुल बरसाओ

याच चालीवर रफिनेच एक इंग्लीश गाणे गायले होते. ऑल्दो वुई हेल फ्रॉम ... असे शब्द होते. गेल्या वर्षी माझा एक बेल्जियन मित्र याच चालीवर एक गाणे म्हणत होता. मी त्याला मुद्दाम विचारले कि tu हे इंग्लीश गाणे ऐकले आहेस का तर म्हणाला नाही. हे गाणे ( तो म्हणत होता ते ) तिथल्या चर्च मधे त्याचा ग्रुप गात असत.

३) ओ मेरे सोना रे

एकदा हे गाणे मी ऐकत होतो तर माझा एक सुदानी मित्र एकदम नाचायलाच लागला. तो म्हणाला लहानपणापासून तो हे गाणे ऐकतोय. त्याला सोना रे हे शब्द सोडले तर फक्त कसूर आणि खफाँ हे शब्द कळत होते . पण तरी त्याला हे गाणे, मधल्या म्यूझिक सकट पाठ होते

दिनेश यांनी नेहमीप्रमाणे जनरलाइज्ड फेकाफेक सुरु केली आहे.
आता प्रादेशिक विषय असले ( मेरी कोम, कायपो छे वगैरे ) तरी संगीतातून ते जाणवत नाही.>>> ऑ??
फार मागे जात नाही. मागच्या पाच वर्षातले हे चटकन आठवलेले काही...

१. कायपोछे मध्ये गुजराती लोकसंगित जाणवलं नाही?? "शुभारंभ" आणि "मांजा" मध्ये काय आहे मग? हिपहॉप की जाझ? Lol
२. हायवे च्या गाण्यांमध्ये पंजाबी लोकसंगीत नव्हतं?? पटाखा गुड्डी मध्ये गरबा बीट्स आहेत का मग?
३. लुटेरा ची गाणी ऐकलीत? बंगाली बाउल संगित ऐकु नाही आल? माँटा रे ऐका. सवार लूं ऐका.
४. रांझणा मध्ये बनारसी वातावरण निर्मितीमध्ये गाण्यांचा काहीच हात नव्हता?
५. स्लमडॉग मिल्यनेर च्या गाण्यांमध्ये मुंबईच्या लोकलचा ठेका ऐकु आला नाही?
५. रॉकस्टार चं एकमेव प्रादेशिक गाणं "कतिया करु" तुम्हाला पंजाबी-कश्मिरी लोकसंगिताचा फील देत नाही?

वर जे लिहिलंय त्यावरुन मुळात तुम्हाला लोकसंगीत किती कळतं याविषयीच शंका वाटतेय. असो. तुम्ही आपली फेकाफेकी सुरु ठेवा. सो कॉल्ड सौम्य वावर असला की काय वाट्टेल ते खपतं.

दिनेश, स्वतःचीच गोष्ट अनेकदा वापरली तर ती चोरी कशी काय?
एनीवे, विषयांतर झालं. सॉरी गजानन.

गाणं ओळखीचं नसेल तरी इंटरल्युड्समधे अ‍ॅकॉर्डियन आलं की पटकन शंकर जयकिशन असतील असं वाटतं.
किंवा आपण ऐकतानाही पोचू शकणार नाही अशा दुर्गम सुरावटी आणि लता गात असेल तर मदनमोहन असतील असं वाटतं. खुपदा गाणी ऐकलेली नसतात तेव्हा निदान मदनमोहनबद्दलचे अंदाज साधारण बरोबर निघतात.

झन झन छिन छिन वाजले की ते म्युझिक शंकर जयकिशनचे असे आमचे ते हे म्हणुन गेले आहेत.

नदीम श्रवणची बरीच गाणी ए हे हे हे, आ हा हा हा, वगैरे आलापीने सुरु होतात.

आर. डी. - विशिष्ट आवाजाचा फील येण्यासाठी स्वतः शोधून काढलेली अपारंपारिक वाद्ये (उदा. - सध्या वॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेले - शोलेमधील ठाकूर फॅमिलीच्या हत्याकांडानंतर जो एक विशिष्ट आवाज निर्माण केला गेला - त्यासाठी त्याने स्वतः तयार केलेले ते अपारंपारिक वाद्य)>> हे प्रत्यक्ष बघीतले आहे मी. एका शो मधे आणले होते व तो झोक्याचा आवाज काढुन दाखवला होता. Priceless. Happy

बाजिगर चित्रपटात "ए मेरे हम सफर">> हे गाणेच मुळात 'मि एक्स इन बाँबे' मधल्या 'खुबसुरत हसीना जाने जां जानेमन' वरुन ढापले आहे. असो.

चर्चेला योग्य वळण देण्यासाठी धन्यवाद मंडळी.

लता मंगेशकर या (मोजक्याच गाण्यांना का होईना पण) संगीतही देतात हे पूर्वी मला माहीत नव्हतं. 'लता - चित्रपटसंगीत' अश्या नावाची एक सीडी मला मिळाली तेंव्हा ही इतकी ओळखीची गाणी लता मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली समजल्यावर सुखद धक्का बसला होता. (ऐरणीच्या देवा तुला, अखेरचा हा तुला दंडवत, बाई बाई मन मोराचा, माळ्याच्या मळ्यामंदी, राजाच्या रंगम्हाली, सोनसकाळी सर्जा सजला इ.)

सोपी आणि सहज गुणगुणता येणारी, त्यातल्या गोडव्यामुळे मनात रेंगाळत राहणारी चाल, वाद्यांची मोजकीच पण परिणामकारी कलाकुसर ही काही वैशिष्ट्ये.

लता मंगेश कर म्हणजेच आनंद घन बहुतेक. त्या ह्या नावाने संगीत देत असत.

हृदयनाथ मंगेशकरांच्या चाली खास लता साठी असतात त्या भरपूर काँप्लेक्स. असं वाट तं की ते बहिणीला चॅलेंज देतात व तीही प्ले फुली गाउन जिंकून दाखवतेच. लेकिनची गाणी ऐकून बघावी. सुनियो जी अरज म्हारी बाबुला हमार. हे गाणे फार मस्त आहे. त्यात लताजी कधी माहेरी गेल्या? त्यामुळे ऐकताना जास्तच सुन्न व्हायला होते. अगदी हळवे गाणे आहे.

संगीतकार बाप्पी लाहिरींचे संगीत म्हणजे गंमत मजा दंगा. किंवा मग इंच इंच कंपोज केलेले खास नंबर्स.
शराबी मधील लोग कहते हैं मै शराबी हूं आणि इंतेहा हो गयी इंतजार की. ह्यातला मधला गिटार व ड्रम्स्चा पीस ऐकला की आपलीच प्रेयसी वाट बघायला लाउन शेवटी आली एकदाची आणि जिवात जीव आला व मन नाचू लागले असे फीलिन्ग कन्वे होते.

नमक हलाल मधले पग घुंगरू. रात बाकी, जवानी जानेमन,

बंबईसे आया मेरा दोस्त. ते गुंडे मधील टंग टंग दिल म बजी घंटी. असूद्या.

सई, श्रीनिवास खळ्यांच्या बाबतीत अगदी खरे. त्यांच्या संगीतरचनेत असे काय आहे, हे मला नेमके सांगता येणार नाही. त्यांची गाणी हळूहळू मनावर गारूड करतात. माझ्या बाबतीत त्यांची बरीच गाणी मी सुरुवातीला ऐकली तेंव्हा त्यात काही खास अथवा लक्षात राहणारे असे जाणवले नव्हते (जाहल्या काही चुका, सुंदर ते ध्यान, कन्या सासुरासी जाय, कमोदिनी काय जाणे, इ.) पण जेवढी जास्त वेळा ती ऐकली तेवढी ती किती आनंददायी आहेत, याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येत राहिला. पहिल्यांदा ऐकताना काही खास जाणवले नसतानाही ती पुन्हा ऐकावीत असे आतून वाटते, म्हणजे त्यांची गाणी एकप्रकारची छुपी ओढ लावतात. एखाद्या कार्यक्रमात जेंव्हा त्यांचे गाणे कोणी इतर गायक गातो आणि एखादी जागा त्याला/तिला हवी तशी जमत नाही, त्यावेळी खळ्यांच्या संगीताची उंची प्रकर्षाने जाणवते. अश्या वेळी कधी एकदा ती मूळ जागा मूळ गाण्यात जाऊन ऐकतो, असे होते.

------------------------------------------

अमा, तुम्ही लोकसत्तेतली लिंक दिलेली वाचायची आहे.

आनंदघन म्हणजेच लता मंगेशकर.
(दुसरे नाव घेऊन का संगीत दिले? कुठे वाचल्यासारखे पुसट आठवतेय पण नक्की नाही.)

Pages