संगीतकार आणि त्यांची वैशिष्ट्ये

Submitted by गजानन on 7 June, 2016 - 03:44

बर्‍याचदा तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि गाणे संपत असताना तुम्ही तुमच्या मनात 'या गाण्याचा संगीतकार कोण असावा?' याचा अंदाज बांधता. बर्‍याचदा तो बरोबर निघतो. कारण एखाद्या संगीतकाराची गाणी ऐकून ऐकून त्याच्या वेगळ्या शैलीची काही व्यक्त/अव्यक्त गणितं किंवा नोंदी तुमच्या मेंदूने नोंदून ठेवलेल्या असतात. यात चाल, वापरलेली वाद्ये आणि गायक/गायिकेच्या किंवा वाद्यांच्या आवाजाचा विशिष्ट पद्धतीने करून घेतलेला वापर, इ. चा समावेश असतो, असे म्हणता येईल.

हा धागा संगीतकारांच्या अश्या शैलींची (लक्षणांची?) चर्चा करण्यासाठी. त्यामुळे पुन्हा ऐकताना त्या त्या गाण्यांची / संगीताची मजा आणखी वाढेल, अशी आशा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, सिनेसंगीत, भावगीतं, इ. सर्वप्रकारच्या संगीतासाठी.

कोणते संगीतकार तुम्ही कोणत्या आधारे अचूकरित्या ओळखू शकता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लता मंगेशकर म्हणजेच आनंदघन.

भालजींच्या साधी माणसं, मराठा तितुका मेळवावा, मोहित्यांची मंजुळा ह्या सिनेमांचे संगीत त्यांचे आहे. गनिमी कावाचेही बहुतेक!

गजानन, मस्तच. अनेकानेक धन्यवाद ह्या धाग्याबद्दल

सध्या स्वस्थपणे फुरसतीत गाणी ऐकण्याचा रियाझ कमी पडतोय त्यामुळे लिहिता ये त नाहीये पण वाचायला मजा येत्ये. स्मृतींना उजाळाही मिळतो आहे.

मनापासून आभार नताशाबाई,

तूम्ही दिलेल्या यादीतल्या हायवे बद्दल मीच काय लिहिले होते ते वाचले नाहीत का ?

रेहमाने संगीत आहे आणि त्याने बहुतांशी लोकसंगीताचाच वापर केला आहे. ते ज्या भागातून प्रवास करतात त्या भागातील लोकसंगीताशी त्यां गाण्याचे नाते जुळून गेलेय आणि ती गाणी वेगळी अशी जाणवतही नाहीत पण त्याचवेळी लक्षही विचलित करत नाहीत.

http://www.maayboli.com/node/55995

मुद्दाम विचारले हो, कारण फक्त माझेच लेखन वाचता, असे दिसते Wink

सॉरी, गजानन.. विषयांतर केले.

आनंदघन चे संगीत इतके गोड आहे की लताने ते का थांबवले असा प्रश्न पडतो. असेही ऐकले आहे की त्या चालींमधे अहिराणी लोकागीतांचा प्रभाव आहे. 'जा जा रानीच्या पाखरा' च्या बाबतीत लतानेच बहुधा सांगितले होते.

इथे वर तुम्ही काय लिहिलेय त्यावर ती प्रतिक्रिया आहे. माझ्या इतर उदाहरणांविषयी तुमचं काय मत आहे?

उषा खन्ना - यांनी बहुतांशी संगीत आपल्याच नवर्याने लिहिलेल्या गीतांना दिलं. आता हे "वैशिष्ट्य" आहे का याची कल्पना नाहि...

रेशमिया - याची गाणी तर मला सारखीच वाटतात...

गजानन, अगदी सहमत. आणि खळेंची गाणी ऐकताना एक शांतता येते, समाधान मिळतं बघ. ते वेगळं आहे, शब्दात सांगणं कठीण आहे.

अमा, प्यारेलालजींचा लेख खुप छान आहे.

अमांनी दिलेला लेख मस्तच आहे.

(त्यात एके ठिकाणी
आम्ही काय केलं, खिशातून पंचवीस पंचवीस हजार रुपये काढले, सव्वा लाख रुपयांचं कर्ज काढलं, असे पावणेदोन लाखांचे ‘फिल्मफेअर’ विकत घेतले आणि त्यातल्या कूपनांवर संगीत विभागासाठी ‘दोस्ती’चं नाव लिहून पाठवून दिलं. असं आहे. हे नीट कळले नाही. त्यासाठी बहुतेक फिल्मफेअरची प्रोसेस वाचायला लागेल. )

खळेंची गाणी ऐकताना एक शांतता येते, समाधान मिळतं बघ. <<< सई, हो! आणि त्या शांततेची आणि समाधानाची परिसीमा म्हणजे 'नीज माझ्या नंदलाला'.

मासिकांचे वर्गणीदार जे मतदान करतात त्याप्रमाणे नामांकनं ठरतात ना.
तर लक्ष्मी-प्यारेंनी पावणेदोन लाख किंमतीचे अंक जमवून दोस्तीच्या नामांकनासाठी स्वतःच कूपनं भरून पाठवली.

नीज माझ्या नंदलाला ___/\___

ओ.पी. ने त्याच्या कारकिर्दीत लता मंगेशकरांकडून एकही गाणे गाऊन घेतले नाही ह्या वैशिष्ट्याचा केला नाही का उल्लेख कोणी?

बादवे, ही साधी गोष्ट नाही. त्या काळात लताची गाणी न करता यशस्वी संगीतकार होणे महाकठीण होते.

वैशिष्ट्य म्हणून नाही पण गंमत म्हणून. राजेश रोशनला पहिला ब्रेक दिला तो मेहमूदने कंवारा बापसाठी.

नंतर लकी अलीला (जरी तो पॉप सिंगर म्हणून फेमस असला तरी) प्लेबॅक सिंगर म्हणून पहिला ब्रेक दिलाय तो राजेश रोशनने कहोना प्यार है मध्ये. (दुश्मन दुनियाका तोपर्यंत कुणाच्याच लक्षात नाही )

ओ.पी. ने त्याच्या कारकिर्दीत लता मंगेशकरांकडून एकही गाणे गाऊन घेतले नाही ह्या वैशिष्ट्याचा केला नाही का उल्लेख कोणी? >>>> अरे हो. त्यांच्यात काहीतरी वाद झाले होत ना?

अरे हो. त्यांच्यात काहीतरी वाद झाले होत ना?>>>

काहीतरी डिफरन्स ऑफ ओपिनियन होते असे वाचले आहे.

अजून एक गंमत, रफीने ओ. पी. ला "यूं तो हमने लाख संगीतकार देखें, तुमसा नही देखा" असे लिहून पाठवल्याचा संदर्भही कुठेतरी वाचला होता.

काहीतरी डिफरन्स ऑफ ओपिनियन होते असे वाचले आहे. >>>> त्यालाच मी मराठीत वाद अस म्हणाले.. असो....

अजून एक गंमत, ओ. पी. ला "यूं तो हमने लाख संगीतकार देखें, तुमसा नही देखा" असे लिहून पाठवल्याचा संदर्भ >>>> अस लताने लिहुन पाठवल होत?

हो Happy

सस्मित | 9 June, 2016 - 15:14 नवीन

हो स्मित >>> मग ओळख आहे आपली

मुग्धटली | 9 June, 2016 - 15:26 नवीन

हायला, भारीच.>>> काय भारी Uhoh

मुग्धा,

जाग्याव पलटी | 9 June, 2016 - 14:56
त्वरीत लक्षात आले म्हणजे माझ्या.

धन्यवाद सस्मित(नन्ना च ना?)

या पोस्टीला
सस्मित | 9 June, 2016 - 15:14
हो स्मित

हे उत्तर आहे असे मला वाटते.

अग पण मग ओळख आहे आपली कुठुन आल? आणि गायकाने/गायिकेने एखाद्या संगीतकाराला अस कैतरी लिहुन पाठवण भारीच ना

Lol

मुग्धा अगं ते मला म्हणताहेत की आपली ओळख आहे.
आणि तुझं नुसतच भारी आहे त्यांना कळलं नसावं.

बरं ओळख नाही पटलीये पण Happy

ओ.पी. ने त्याच्या कारकिर्दीत लता मंगेशकरांकडून एकही गाणे गाऊन घेतले नाही >>> याचे कारण त्यांच्यातील मतभेद हे नव्हते. व्यावसायिक संबंध आलाच नाही तर मतभेद कुठले यायला?

तर ओ. पी. साहेबांचं म्हणणं की सगळेच संगीतकार लताच्या गळ्याचे गुलाम आहेत. एकालाही तिच्याशिवाय यशस्वी गाणी देता येऊ नयेत? मग तो एक मी का नसावा? म्हणून नय्यर्साहेबांनी जिद्दीने त्यांचं "लताशिवायचं" संगीतही यशस्वी करुन दाखवलं. ( हे शिरीष कणेकरांच्या लेखामधे होते))

त्यांचे मतभेद झाले ते आशाबाईशी, ते देखील नंतर. त्यांची बरीचशी सांगितिक कारकीर्द आशाबाईंच्या आवाजाच्या साथीनी झाली.

पण आपली गाणी फक्त आपल्या भगिनीद्वयानेच गावीत हा खाक्या जीवापाड जपला त्यांनी. हेही वैशिष्ट्यातच गणायला हवं >>>>>>> सो व्हॉट? यातही ज्यांची लायकी नाही त्याना गाणी गायला द्यायला हवी होती का? ज्यांची लायकी होती त्यांनाच दिली गाणी त्यांनी. किशोरी आमोणकर (हे श्यामसुंदर राजसा, जाईन विचारीत रानफुला चिसरलात का?), पद्मजा फेणाणी यांनीही त्यांची गाणी गायली आहेत. असो.

आनंदघन चे संगीत इतके गोड आहे की लताने ते का थांबवले असा प्रश्न पडतो>>>>>>>>मागे एकदा लताच्या मुलाखतीत ऐकले होते.. ती म्हणते.. "मी एकदा कोणाला चाल लावुन दाखवली आणि त्यांनी त्यात बदल सुचवले..हे असे करा ते तसे करा इ. मला हे जमले नसते म्हणुन मी ते सोडुन दिले".
बाय द वे "आनंदघन" हे नाव घेण्यासाठी लताला भालजी पेंढारकर यांनी सुचविले होते. त्या वेळेला तिची गायक म्हणुन ख्याती होती. समजा संगीतकार म्हणुन अपयश आले असते तर काय.. या विचाराने त्यांनी तिला दुसर्‍या नावाने संगीत दयायला सुचविले होते.तिने दत्ता डावजेकर यांना अरेंजर म्हणुन घेउन गाण्यांवर काम केले.

मला संगीतकार बर्‍यापैकी ओळखता येतात असे वाटते एकदा रेडिओवर एक कार्यक्रम मधुनच लावला तेव्हा ते राजेश रोशनबद्दल बोलत होते आणि नंतर त्यांनी "दिल से दिल मिलनेका कोइ कारण होगा" हे गाणे लावले. गाणे ऐकुन वाटले ही तर आर डी बर्मन चाल आहे..राजेश रोशनने काय पर्फेक्ट स्टाईल घेतली आहे. नंतर शोधाशोध केली तेव्हा कळले की हे गाणे आर डी चेच आहे "विश्वासघात" नावाच्या चित्रपटातले..मला असा चित्रपट आलाय हेही माहित नव्हते.

एका गाण्यामधे मात्र माझी सपशेल दांडी गुल झाली. "पास नही आना , भुल नही जाना" हे आप की कसम मधले गाणे कितीतरी दिवस मला लक्ष्मीकांत-प्यारेलाल चेच वाटत होते. त्यातील ढोलकीचा पीस तर एल पी ची स्टाईल होती. आप की कसमची बरीच गाणी मला एल पी स्टाईलची वाटली (जय जय शिवशंकर, करवटे बदलते रहे इ)

Pages