Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
आमच्या घरातली रेसिपी आहे ही.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फजाँव / फेजाँव हा पोर्तुगीज
फजाँव / फेजाँव हा पोर्तुगीज शब्द आहे. कुठल्याही प्रकारच्या चवळी टाईप ओल्या / सुक्या दाण्यांसाठी तो वापरतात. त्याच्यासोबर वर्णन करणारा आणखी एक शब्द असतो. जसा फजोंव ब्रांको म्हणजे पांढरे दाणे.
सूनटून्या, कोकणात पिक घेत नाहीत, देशावर हे माहितही नाहीत.. मग गूढ आहे हे. बाकीच्या राज्यातून येतात का ? अगदी पुर्वीपासून कोकणात खाल्ले जाताहेत हे.
धन्यवाद दिनेशदा. माबोवर एके
धन्यवाद दिनेशदा. माबोवर एके ठिकाणी फजाव म्हणजे राजमा असे वाचले.
तोंपासू रेसिपी दिनेशदा.. काळा
तोंपासू रेसिपी दिनेशदा..
काळा वाटाणा म्हणजे नक्की काय आणि कुठे पिकतो याची खुप उत्सुकता होती (बरीच वर्ष खात असले तरी), जालावर खूप शोधल्यावर ही माहिती सापडली: Dried peas are produced by harvesting the peapods when they are fully mature and then drying them. Once they are dried and the skins removed, they split naturally. म्हणजे मटारच्या शेंगा अगदी जून झाल्यावर तोडणी करून, वाळवून नंतर फोडतात आणि तेच हे काळे वाटाणे!!
अगदीच टडोपा मोमेंट
दिनेशदा, तोंपासू. आंबोळ्या तर
दिनेशदा, तोंपासू. आंबोळ्या तर पटकन उस्लून खाव्या असं वाटतयं.

वाटण पाट्यावर वाटल्यानंतर तो गोळा एका ताटात काढून मग पाटा वरवंटा धुवून त्याचे पाणी देखील ताटलीत घेत असत. सपाट पाट्यावर वरवंटा उभा धरून त्यावर बेताचे पाणी ओतून ते पटापट निपटून घेत असत. >>>>>>>>>..लहानपणी हा नेहमीचा उद्योग असायचा. कडधान्याची आमटी करताना, ती मिळून येण्यासाठी, शिजलेलं थोडं कडधान्य वाटून आम्ही आमटी करायचो. तसचं खोबरं, चटणी वगैरे पण पाटयावरच वाटावं लागायच. तेव्हा आम्ही असाच पाटा, वरवंटा धुवून ते पाणी आमटीत घालायचो. ती आठवण जागी झाली.
नही नही मॅगी, मटारचे चुलत
नही नही मॅगी, मटारचे चुलत चुलत भावंड आहे ते.
ओह इन्ना.. मला वाटतच होतं
ओह इन्ना.. मला वाटतच होतं मटारमे कुछ काला हय! ये वाटाणा तो पूराही काला निकला
:
::)
हो हर्ट, राजम्याला पण तोच
हो हर्ट, राजम्याला पण तोच शब्द वापरतात.
शोभा.. आता गावाला पण मिक्सर आलेत !
पांढरे, काळे आणि हिरवे असे तीन कडधान्य वाटाण्याचे प्रकार. पण ओले असताना तिन्ही हिरवेच असतात.
माबोवर एके ठिकाणी फजाव म्हणजे
माबोवर एके ठिकाणी फजाव म्हणजे राजमा असे वाचले.>>>> नाही .चवळीच्या जातीचे,काळ्या रंगाचे,चवळीच्याच आकाराचे पण जरा गबदुल दाणे असतात.डिचोलीला(गोव्यात)फजावाचे दबदबीत आणि उंडे (एक प्रकारचा पाव) खाल्ले होते त्याची आठवण अजून आहे. यांचेच एक भावंड म्हणजे हळसांडे. गोव्यात हे मिळतात.फिक्या लाल+ तपकिरी रंगाचे,मोठ्या चवळीपेक्षा जरासे मोठे दाणे असतात.याचे मसाल्याचे दबदबीत छान लागते.
बी, कातळ्या म्हणजे ओल्या
बी, कातळ्या म्हणजे ओल्या नारळाचे काप. वर फोटोत दिसताहेत ना तसे. सकाळची पेज देताना सोबत मोठी गोल कातळी पण द्यायचे खायला. हे सकाळी ८ वाजता खाल्ले की दुपारी १ पर्यंत खाण्याची आठवण नको.
फजाव मी फक्त सावंतवाडीला पाहिलेत आणि तिथेच खाल्लेत. राजम्याचेच चुलत मावस वगैरे असे भावंड पण मला नाही येत ओळखता. माझ्या आईला येतात ओळखता. अर्थात गोव्यात पण असणार पण माझे तिथे वास्तव्य नाही.
मालवणी माणुस कधी सांबार म्हणणार नाही. त्याच्यासाठी कायम काळ्या वाटाण्याचा सांबाराच आसा ता...
पण काळे वाटाणे खुप जणांना पचत नाहीत. माझ्या घरात आहेत असले मेंबरची.
वा ! सही फोटो आहेत . पाककृती
वा ! सही फोटो आहेत . पाककृती पण तुम्ही अगदी बारकाव्यांसह लिहिली आहे . छान आहे.
मालवणी माणुस कधी सांबार
मालवणी माणुस कधी सांबार म्हणणार नाही. त्याच्यासाठी कायम काळ्या वाटाण्याचा सांबाराच आसा ता.>>+१००
हर्ट प्रतिसाद देण्यास उशीर
हर्ट प्रतिसाद देण्यास उशीर झाल्यबद्दल sorry. कातळ्या आणि फजाव यांची माहिती वर दिली आहे. काकडीच्या वड्याची कृती विचारुन पोस्ट करीन.
काळे वाटाणे मला वाटते गुजराथम्ध्ये होतात. पुर्वी वाचल्याचे आठवते.
दिनेशदा, तुमची कृती बरीचशी
दिनेशदा,
तुमची कृती बरीचशी पाळून आज का.वा.चे दबदबीत केले.सु.मि.घरी नसल्याने तिखट परतवले.झकास झाले आहे.
तेलाची फोडणी करून त्यात हळद टाका व वाटलेला मसाला परता. हे मला नवीन होते.मी का.वा. आधी टाकून मीठ घातल्यानंतर एका उकळी घ्यायची.नंतर वाटण घालायचे.
देवकी, असा मसाला जरा परतला कि
देवकी, असा मसाला जरा परतला कि सांबारा.. जास्त खमंग लागते. नाही तर ओल्या खोबर्याचा ओलेपणा जाणवतो.
सुके खोबरे वापरले तर असे परतायची गरज नसते.
मालवणला आमच्या घरी, मसाला फार काळा न करता भाजतात.. प्रत्येक काकीची वेगळी रित.. आणि लग्ने होऊन युगे लोटली तरी आमच्यात असे करतात, वगैरे गप्पा मारायच्या त्या.
तळकोकणात सुक्या पेक्षा ओले
तळकोकणात सुक्या पेक्षा ओले खोबरेच वापरायची पद्धत आहे आणि जर ते भाजके वापरायचे असेल तर ते मंदाग्नीवर खूप खरपूस भाजले जाते. जर नीट भाजले नाही तर सगळी चव ओंफस होऊन जाते.
6
सुके खोबरेहि जेवणात ओल्याच्या जागी वापरता येते हा शोध मला लग्नानंतर लागला. नैतर आधी सु.खो. फक्त चिवड्यात आणि करंजीच्या सारणात वापरतात एवढेच माहीत होते.
आणि लग्ने होऊन युगे लोटली तरी आमच्यात असे करतात, वगैरे गप्पा मारायच्या त्या.≥>>>>>> माझी जेवण बनवायची पद्धत आता इतकी बदललीय कि माझी आई माझ्याकडे आली कि दिवसातून एकदातरी आमच्यात आम्ही असेअसे करतो हे ऐकवते.
त्यावर मुलगी वैतागून आमच्यात म्हणजे नक्की कोणात हे एकदा विचार असे माझ्याकडे गुपचूप पुटपुटत.
लग्ने होऊन युगे लोटली तरी
लग्ने होऊन युगे लोटली तरी आमच्यात असे करतात, ...... मला वाटते की प्रत्येक बाईचा,हा आवडता डायलॉग असावा.
वाटलेला मसाला परता.......... आईकडेही हे पासऑन केलंय.
दिनेशदा, मस्त
दिनेशदा, मस्त पा.कृ.
खोब्र्यार्याची कापे तर नुसती बघत राहावित अशी आहेत.
भाऊकाका, व्यं.ची. मस्तच असा
भुरे, साधना फार छान माहिती
भुरे, साधना फार छान माहिती दिली त्याबद्दल मी ग्रेट्फुल आहे. धन्यवाद.
म. भुरे, तुम्ही काकडीचे वडे विचारुन रेसेपी लिहा. काकडीचे पराठे माहिती आहेत पण वडे पण होतात हे ऐकले नाही कधी.
दिनेशदा, आमचा वाणी म्हणतो,
दिनेशदा, आमचा वाणी म्हणतो, कडधान्यांच्या मार्केटमधे "बेळगांवी काळा वाटाणा " सगळ्यात उत्तम प्रतिचा समजतात. आमचे बेळगांवचे एक नातेवाईक नेहमी तिथल्या खास ओल्या वाटाण्याच्या शेंगा आमच्याकडे पाठवत. इतर शेंगांपेक्षां त्या आकाराने खूपच लहान असत व चवही कांहींशी वेगळी असे. हेच ते काळे वाटाणे असावेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची बेळगांवशी असलेली जवळीक पहातां, काळा वाटाणा मुख्यत्वे कर्नाटकातल्या बेळगांव परिसरातच होत असावा व त्याची चटक मालवणी माणसाला लागली असावी, असं वाटतं.
[ एक गंमतीची आठवण- क्रिकेटचे समालोचक सुरेश सरैया माझे मित्र म्हणण्याइतपत परिचयाचे. अतिशय लाघवी व गप्पिष्ट माणूस. .नरिमन पाँइंटलाच त्यांचंही ऑफिस. त्यामुळे, लंच -टाईमला रस्त्यावर भेट व गप्पा होत. क्रिकेटमधे अजिबात रस नसलेला माझा सहकारी मित्रही ह्या सरैयाच्या गुजराती मराठीतल्या इंग्लीश- मिश्रित गप्पा नाईलाजाने ऐकत असे. एकदां त्याने मला विचारलं, " काय रे, हा तुझा सरैया गुजराती असून त्याला वाटाणे एवढे कसे आवडतात ?" . मला हंसू आवरेना. 'वाटाणा' हा सरैयाचा खूपच आवडता शब्द होता व तो इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठीही नेहमी वापरायचा - 'बावळट' या अर्थाने ! ]
दिनेशदा काल केल्ये ही
दिनेशदा काल केल्ये ही आमटी/सांबारं! मस्त झालंय!
.
.
भरत, दिनेशदांनी पाकृ साफ केली
भरत, दिनेशदांनी पाकृ साफ केली आहे. ममोंच्या धाग्यावर चर्चा चालू आहे म्हणून हा धागा वर काढला का? पण फारसा फायदा होणार नाही
Pages