काळ्या वाटाण्याचे सांबार / आमटी

Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
आमच्या घरातली रेसिपी आहे ही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मंजूडीसारखीच करते वाटणाची, गरम मसाला घालून उसळ पण गुळ नाही घालत, मस्त लागते. प्रॉपर मालवणी सांबार लहानपणी खाल्लंय वेंगुर्ला शेजाऱ्यांकडून.

भाऊकाका व्य.चि. भारी.

>>तसा प्रत्येक घरातही हा पदार्थ करताना थोडा फार फरक केला जातोच.>> आमच्याकडे यात काजूगर टाकतात. मिळाले तर ओले काजूगर पण.
>> थोडे शिजलेले वाटाणे वेगळे काढून ते वाटून आमटीत टाकतात >> हो हे करतातच. Happy

मस्त रेसिपी. आमच्याकडे कृष्णाष्टमीला हा बेत हवाच असा माझ्या बाबांचा आग्रह असे त्यामुळे वर्षानुवर्षे मी कृष्णजन्म म्हणजे कावाऊ व आंबोळी हेच लक्षात ठेवलेले.

गावी गणपतीत काही घरी भजन असते जे रात्री साधारणपणे १० वाजता सुरू होते आणि सकाळ ५-५.३० वाजेपर्यंत चालते. मध्यंतरात याच का.वा.ची सुक्की उसळ आणि चहा असतो. हल्ली ब.वडे वगैरे पदार्थही ऐपतीप्रमाणे असतात पण द्रोणातल्या का वा उसळीची परंपरा पुरातन आहे. सकाळी परतताना पुरूष मंडळी मुद्दाम मागितलेले जास्तीचे द्रोण घेऊन घरी येतात. त्या उसळीची जी काय चव असते ती शब्दात वर्णन करणेही मला जमायचे नाही, तशी उसळ बनवणे तर अशक्यच....... आहाहा......

दिनेश दा....

तोन्डात ५-६ लिटर पाणी जमा झाले आहे.........

अप्रतिम फोटो....

मागे मी कान्दा मावे मधे सालासकट भाजला होता. मग चिरला आणि वाटला... मस्त चव आली होती. ते वाटण मी मुगाच्या उसळी साठी वापरले होते. माझ्याकडे एक गॅस तंदुर आहे. त्यात कांदा भाजुन वापरुन पहाते....

बाकी....... जाउदे काय बोलणार......

विकू... काळे वाटाणे अमेरिकेत मिळत नाहीत... खूप वर्षांपूर्वी एकदा ओकट्री रोडवर एका दुकानात दिसले होते, पण हल्ली अजिबात दिसत नाहीत.. मी भारतातून आणतो..

>>याला इंग्रजीत काय म्हणतात ? हे वाटाणे अमेरिकेत भारतीय दुकानात मिळतात<<

सुविधा ब्रॅंडचे ब्लॅक वाटाणा या नावाने मिळतात. फेडेक्स/युपिएसचा अकाउंट नंबर कळवा, कुरीयर करतो इथुन... Happy

माझा आवडता पदार्थ. आमच्याकडे कृष्णाष्टमीला काळ्या वाटाण्याचे सांबार आणि आंबोळ्या आणि गणपतीत विसर्जनाच्या दिवशी सांबार आणि वडे असतात. खूप जणांना काळ्या वाटाण्याचे 'सांबार' हा शब्द माहीत नसतो. इथे वाचून मस्त वाटले.

खुप मस्त वाटतेय, सर्वांच्या प्रतिक्रिया बघून.

परदेशात मी कधी हे बघितले नाहीत ( मी नायजेरियातही कुळीथ, पोहे घेतलेत पण हे नाहीतच )

याचे पिक, कोकणात नेमके कुठे घेतात, ते पण माहित नाही ( कोकणातच घेतात का, ते पण माहीत नाही )

अहा, मलाही कुडाळच्या घराची आठवण आली . सणवार काळ्या वाटाण्याशिवाय नाहीच आमच्याकडे पण . इथे पुणयात चांगले काळे वाटाणे मिळणे मात्र कठीण . आमच्या कडे कुडाळहूनयेतात. पुटपुटीत ते अगदी पिठ ह्याच्या बरोबर मधले शिजलेले वाटाणे शिजवणे म्हण्जे सुगरण पणाची कमाल.सणवाराला शिवराक अन अन्यवेळी कांदा घालून . या रैवारी केलीच पाहिजे. Happy
त्या आंबोळ्या कसल्या मस्त दिसतायत.

परदेसाई अगदी बरोबर ...
सांबार नाही सांबारां किन्वा साम्बारं Happy
साम्बार म्हटलं की ईडली आठवते , आंबोळी नाही

सांबार किंवा सांबारा याचा वापर काॅंटेक्स्ट वरुन ठरतो.

उदा: १. गो बायो, काळ्या वाटाण्याचा सांबार बनव भेस्तरवारी... (इथे सांबारा नाहि)
उदा: २. बाबी, वडो सांबारात बुडवुन खा, खुळो सुके वडे खात्हा... (इथे सांबार नाहि) Happy

सणाला करतात ते सांबार शिवराक असते. त्यात शिजताना ओल्या मिरचीचे (मिरशांगाचे) , कातळ्या आणि आल्याचे बारीक तुकडे घालतात. तसेच त्या मसाल्याच्या वाटणात कांदा लसुण नसते. खोबर्‍याबरोबर आले भाजतात. तसेच बरोबर काकडीचे वडे.

काळे वाटाणे, वालीचे सुकलेले दाणे, फजाव, कुळताचे पीठ हे नक्की भारतीय वारीत आणले जातात. हल्ली वालीचे दाणे आणि खमंग भाजलेले कुळीथ+धणे + सुकी मिरची घालून केलेले पीठ मिळ्णे कठीण झाले आहे.

काल रेसिपी घरी नेली बनवून बघितली. बनताना छान सुगंध सुटला पण चव नाही तितकीशी जमली. माझी सासू अगदी अस्सल मालवणी स्टायलीत बनवते व सोलिड चव आहे तिच्या हाताला. आज आंबोळ्या बनविल्या. आता टिफिनमध्ये रात्रीची काळ्या वाटण्याचा सांबार आणि आंबोळ्या..... Happy

याचे पिक, कोकणात नेमके कुठे घेतात, ते पण माहित नाही ( कोकणातच घेतात का, ते पण माहीत नाही )>>>

दिनेशदा
कोकणात तर नक्किच नाहि.

सणाला करतात ते सांबार शिवराक असते. त्यात शिजताना ओल्या मिरचीचे (मिरशांगाचे) , कातळ्या आणि आल्याचे बारीक तुकडे घालतात. तसेच त्या मसाल्याच्या वाटणात कांदा लसुण नसते. खोबर्‍याबरोबर आले भाजतात. तसेच बरोबर काकडीचे वडे.

काळे वाटाणे, वालीचे सुकलेले दाणे, फजाव, कुळताचे पीठ हे नक्की भारतीय वारीत आणले जातात. हल्ली वालीचे दाणे आणि खमंग भाजलेले कुळीथ+धणे + सुकी मिरची घालून केलेले पीठ मिळ्णे कठीण झाले आहे.

>> म. भुरे, इथे कातळ्या आणि फजाव म्हणजे कशापासून बनवलेला असतो तो पदार्थ? आणि काकडीचे वडे कसे बनवतात?

मस्त वाचन होते आहे. आठवणींचा सुगंध काहीतरी औरच असतो. विदर्भात काळे वाटाणे कधी पाहिले नाही. आमच्याकडे ओले आणि सुके हिरवे वाटाणेच मिळतात. पण सिंगापुरमधे मुस्तफात काळे वाटाणे आणि पेशवाई मराठी दुकानात काळे वाटाणे हमखास मिळतात.

<< काळे वाटाणे, वालीचे सुकलेले दाणे, फजाव, कुळताचे पीठ >> पावसाळ्याच्या आधीं शेतात परडीं करून [ कुंपण घातलेला शेताचा छोटा भाग ] त्यांत भाज्या [ चवळीच्या वाली(शेंगा),काकडी, दोडकी इ.इ. ] लावतात. पावसाची चाहूल लागली कीं तीं परडीं मोडून भात लागवडीसाठी नांगरणी करतात. त्यावेळीं परड्यात उरलेल्या चवळीच्या शेंगांमधील दाणॅ काढून सुकवून ठेवतात. बाजारात मिळणार्‍या चवळीपेक्षां अतिशय रुचकर असा हा प्रकार हल्लीं कांहींसा दुर्मिळच झाला आहे. बहुतेक, परडीं लावण्याची प्रथाच पाण्याच्या कमतरतेमुळे बंद पडत चालली असावी. बर्‍याच कोकणी माणसांप्रमाणे माझाही अत्यंत आवडीचा प्रकार.

राज ,
मुळात प्रश्न सांबार वि. सांबारं चा आहे .
सांबार हे ईडली सोबत खायच असतं ,काळ्या वाटाण्याच ते सांबारं . Happy

सांबार किंवा सांबारा याचा वापर काॅंटेक्स्ट वरुन ठरतो.>>>> हे विभक्ती प्रत्यय झाले Happy

सुंदर फोटो...विशेषतः आंबोळ्या तर प्र चं ड तोंपासु दिसतायंत Happy

मी मायबोलीवर वाचूनच काळे वाटाणे आणायला सुरुवात केली. खरंतर खूप जण 'अजिबात आवडत नाहीत' असं म्हणतानाही पाहिले आहेत.
डी-मार्टमध्ये मिळतात. ते ऑथेंटिक असतात का माहीत नाही. चवीला जरा उग्रच असतात काळे वाटाणे आणि शिजायलाही कठीण असतात पण आवडतात आम्हाला अधूनमधून खायला.
कांदा-खोबरं वाटण + आलं लसूण पेस्ट + गोडा मसाला + चिमूटभर गरम मसाला + लाल तिखट + भरपूर गूळ ह्या कृतीवर हात बसला आहे.
( गोडा मसाला + चिमूट गरम मसाला + आलं-लसूण किंवा नुसती लसूण पेस्ट हे काँबो फार सुंदर लागतं. वाटण न घालता कांदा-टोमॅटो तेलात परतून आख्खा मसूरही मस्त होतो ह्या मसाल्यात. त्यात मात्र गूळ नाही घालत. )

Pages