माझी नवी वेबसाईट : कलाकौशल्याच्या वस्तूंसाठी : www.skillproducts.com

Submitted by मामी on 10 May, 2016 - 09:36

साधारण दोनेक वर्षांपूर्वी ही कल्पना मनात उगम पावली. आजूबाजूला अनेक मित्र मैत्रीणी छान छान कलापूर्ण आणि कौशल्यपूर्ण वस्तू करत असताना बघत होते. त्याचवेळी अशा वस्तूंना मागणीही खूप असते असं लक्षात आलं आणि मग यासाठी एक वेबसाईट सुरू करावी असा विचार डोक्यात घोळायला लागला. मग काही महिन्यांपूर्वी खरंच पावलं उचलली आणि आनंदाची बातमी ही की मी नुकतीच सर्व प्रकारच्या कला-कौशल्याच्या वस्तू विकण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे. www.skillproducts.com

या साईटचं वैशिष्ट्य असं की केवळ नियमीत व्यवसाय करणार्‍यांपुरतीच ही साईट मर्यादित न ठेवता कितीही छोट्या प्रमाणावर अशा वस्तू करून विकणार्‍या व्यक्तींनाही यात सामील होण्याची संधी ठेवली आहे. त्यामुळे गृहिणी असोत, आपला नोकरी व्यवसाय सांभाळून फावल्या वेळात हौशीखातर काही वस्तू बनवणारे असोत, काही ठराविक सणांपुरत्याच त्या त्या सणांना उपयोगी अशा वस्तू बनवणारे असोत किंवा कॉलेजच्या सुटीत पॉकेटमनी मिळवण्यास काहीतरी बनवून विकणारे असोत सगळ्यांचं या साईटवर स्वागत आहे.

काही जणांच्या बोटात कला असते, काहींच्या डोक्यात असते तर काहींच्या नजरेत असते. अशा कोणत्याही प्रकारे कलेशी निगडीत असलेली व्यक्ती www.skillproducts.com वर आपलं नाव रजिस्टर करून वस्तू देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकते. म्हणजे कसं की काही जणी स्वतः वस्तू बनवून यावरून विकतील तर काहीजणी आपल्या डोक्यातील कल्पना दुसर्‍यांकडून करवून घेऊन त्या विकतील ( आणि त्यामुळे गरजू स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देतील. ) शिवाय जर तुम्ही कलारसिक असाल, तुमच्याकडे कलात्मक नजर असेल, तर अशा वस्तू बनवणार्‍यांकडून ( विशेषतः विविध राज्यातील पारंपारीक कलाकार) वेचक आणि वेधक वस्तू निवडून भारतभरच्या ग्राहकांना पुरवू शकता. प्रत्येकासाठी हे व्यासपीठ खुलं आहे.

आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याची वेगळी अशी हस्तकलेची परंपरा आहे. त्या त्या राज्यातल्या पारंपारीक शोभेच्या वस्तू, कपडे, चपला, दागिने, बॅग्ज, भांडी कुंडी, खेळणी अशा सुरेख वस्तू ग्राहकांना नेहमीच आकर्षित करतात. याव्यतिरीक्त क्रोशा, क्विलिंग, पर्सेस, दुलया, दुपटी, लहान मुलांचे कपडे, फॅब्रिक पेंटिंग, भरतकाम, वॉलहँगिंग्ज, शिवणकाम, रुखवताचं सामान, घरगुती डेकोरेशन, रेडीमेड रांगोळ्या, दिवे, तोरणं, फ्रेम्स, दागिने, वायरवर्क, स्वेटर्स, शाली, अगरबत्ती, ग्लास पेंटिंग, विविध प्रकारच्या आणि आकाराच्या बॅग्ज, फुलं, पॉलिमर क्ले, पेपरमॅशे, सिरॅमिक इ. च्या पारंपारीक आणि आधुनिक वस्तू अशा सर्व प्रकारांना बाजारात नेहमीच मागणी असते. विविध कलाविष्कारांतून निर्माण होणार्‍या शोभेच्या अथवा उपयोगी वस्तू एकत्रितरित्या उपलब्ध करून देण्याची सोय या साईटद्वारे मिळणार आहे.

अनेक सणसमारंभ आणि लग्नकार्य इ मुळेही अनेकविध वस्तूंना सतत मागणी असते. लग्नसमारंभ आणि दिवाळी, राखी पौर्णिमा, होळी, गुढीपाडवा, गणपती सारखे मोठे सण हे अशा वस्तूंच्या उलाढालीकरता अगदी योग्य संधी असते. लग्नात तर जितकी हौस करावी तितकी कमीच असते. हौशीबरोबरच कलाकारांनी आपली कला दाखवायला भरपूर वाव मिळतो. याकरता मेंदी, अनेक भेटी, त्या भेटी देण्यासाठी सुबक, सुंदर रंगसंगती वापरून केलेली वैशिष्ट्यपूर्ण गिफ्ट पॅकिंग्ज, रूखवतासाठी लागणार्‍या विविध वस्तू, मुंडावळ्या, मण्यांनी नटवलेले नारळ, कलश, रंगित बास्केट्स आणि ट्रे. कितीतरी गोष्टी असतात. हल्ली तर मोत्यांचा आंतरपाटही बनवला जातो. तर या अशा आणि अजूनही कितीतरी वस्तू ग्राहकांसाठी साईटवर एकत्रित उपलब्ध असाव्यात असा प्रयत्न आहे. म्हणूनच अशा विविध वस्तू बनवणार्‍या कलाकारांनी इथे जरूर यावं असं आवाहन करावसं वाटतं.

याचबरोबर काही अगदी वैशिष्ट्यपूर्ण वस्तूही उदा. कॅलिग्राफी वापरून हातानं लिहिलेली आमंत्रणं, एखाद्या व्यक्तीला आवडतील अश्या निवडून बनवलेली परफ्यूम्सची गिफ्ट हँपर्स, पर्सनलाईज्स गिफ्ट पॅकिंग्ज, कस्टममेड टी-शर्ट प्रिंटिंग, वाढदिवसाला लागणारी रिटर्न गिफ्ट्स, टेबल-टॉप गुढ्या किंवा रेडिमेड गुढ्या, रेडिमेड पारंपारिक रांगोळ्या, राखीकरता राखी-कार्ड-कुंकूतांदूळाच्या छोट्या डब्या आणि एखादी भेट अशी एकत्र पॅकेट्स, होळीकरता रंग भरलेल्या मडक्यांचं गिफ्ट हँपर, दिवाळीसाठी दिव्यांची गिफ्ट हँपर्स, इकोफ्रेंडली गणपती अशा अनेक गोष्टींना मागणी असते. असे कोणी कलाकार असतील तर त्यांनी या साईटद्वारे आपला व्यवसाय अधिक वाढवता येइल.

लहानमोठ्या, व्यावसायिक-हौशी अशा कलाकारांव्यतिरीक्त काही संस्थाही विविध वस्तू विकत असतात. अपंगांच्या संस्था, मतिमंद मुलांच्या संस्था, अंधशाळा, स्त्रीयांचे बचतगट अशा सर्व प्रकारच्या संस्थांनाही याद्वारे जोडून घेण्याची माझी इच्छा आहे. ज्या संस्थांकडे कॉम्प्युटर आहे, इंटरनेटची सोय आहे आणि वस्तू बनवणारे हात आहेत त्या संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्या वस्तूंची बाजारपेठ अधिक मोठी करण्याची ही संधी जरूर घ्यावी. याबरोबरच जर कोणी कला कौशल्यावर आधारीत व्यवसाय करत असतील, क्लासेस घेत असतील (उदा. रांगोळी काढणे, मेंदी काढणे, केक बनवणे) किंवा खाद्यपदार्थ बनवून विकण्याचा व्यवसाय करत असतील तर त्यांनाही या साईटवर आपली जाहिरात अत्यंत वाजवी खर्चात देता येईल.

अशी ही सर्वसमावेशक आणि पूर्णपणे कलेला वाहिलेली साईट आहे. आपल्यातलेच जास्तीतजास्त कलाकार या व्यासपीठावर एकत्र यावेत आणि त्यांनी स्वतःच्या सृजनशीलतेला पूर्ण वाव द्यावा हाच या साईट काढण्यामागचा हेतू आहे. सध्यापुरती ही साईट केवळ भारतातच सेवा देणार आहे. पुढे भविष्यात अधिक व्यापक होईलही.

तर मायबोलीकरांनो, कलाकार विक्रेते म्हणून आणि कलारसिक ग्राहक म्हणून दोन्ही प्रकारे या वेबसाईटला आपण पाठिंबा द्यावा अशी विनंती. तुमच्या ओळखीतले कलाकार, व्यावसायिक, तुम्ही निगडीत असलेल्या संस्था अशा सर्वांपर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा.

www.skillproducts.com इथे नक्की भेट द्या. आमचं फेसबुक पेज लाईक करायलाही विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, सगळ्यांनाच. Happy

मला वाटतं की वेबसाईटवर आणखी काम करावं लागेल. >>> भ्रमर इमेल किंवा फोन करून कळवणार का प्लीज?

अभिनंदन मामी.साईट आता पाहिली.छान आहे.
दोन मैत्रीणीना सांगुन ठेवणार आहे त्यांच्या वस्तु विकायला त्यांना अजुन एक संधी मिळेन. Happy

स्तुत्य उपक्रम. अभिनंदन व शुभेच्छा.
[मीं आत्तां प्रयत्न केला पण ती साईट उघडत नाहीय. कांहीं तात्पुरती अडचण आहे का ?]

मीं आत्तां प्रयत्न केला पण ती साईट उघडत नाहीय. कांहीं तात्पुरती अडचण आहे का ?>>> हो मला पण नाही उघडली Sad

आणि हो अभिनंदन मामी Happy

अतरंगी यांनी केलेली सूचना विचार करण्याजोगी आहे. Customization साठी वेगळे चार्जेस आकारण्यास देखिल हरकत नाही. या जोडीने Corporate Gifting साठी branding करुन देण्याची सोय उपलब्ध करुन देता आली तर तेही उत्तम होईल असे वाटते.

पुढे भविष्यात अधिक व्यापक होईलही. >> आमेन! Happy

कल्पना सुरेख आहे. आवडली एकदम.
साईटच डिझाईन मात्र नाही आवडलं फार. राग मानू नका. तुम्ही सुचना लिहा अस लिहिलं नाहीये त्यामुळ कळत नाहीये लिहाव कि नाही.

मामी , तुझी साईट म्हणजे अलीबाबाचा खजीना आहे ग , एकदम हटके डिझाईनचे प्रोडक्टस आहेत ....
'पुढील १० वर्ष कानातले खरेदी करण्याची गरज नाही ..इतक्या वरायटीचे कानातले माझ्याकडे आहेत' , हा माझा गैरसमज मी ह्या खरेदीने मोडला Wink

20160926_110709.jpg

खूप खूप धन्यवाद , एका क्लिक वर असे युनिक प्रोडक्ट उपल्ब्ध करुन दिल्याबद्द्ल Happy

माझ्या बर्याचश्या मैत्रिणींना प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल खूप धन्यवाद.
प्रत्येकीकडे काहीतरी स्कील होते, पण ते जगासमोर कसे आणावे, त्यातुन व्यवसाय कसा सुरु करायचा हे माहीत नव्हते. पण तुझ्यामुळे ते शक्य झाले , थँक्यु मामी .

धन्यवाद विनार्च.

इतरांनाही धन्यवाद.

मायबोलीवरील अनेक कलाकारांनी माझ्या साईटवर त्यांच्या कलापूर्ण वस्तू ठेवल्याबद्दल त्यांचेही सर्वांचे धन्यवाद.

सध्या खूप सुंदर आणि वैविध्यपूर्ण वस्तू उपलब्ध आहेत. दिवाळी आणि इतर प्रसंगी भेट देता येतील, आपल्या घराकरता उपयोगी पडतील अशा अनेक वस्तू www.skillproducts.com वर आहेत. सर्व मायबोलीकरांनी साईटला जरूर भेट द्यावी आणि खरेदी करून आपल्यातल्याच कलाकारांना प्रोत्साहन द्यावे अशी विनंती.

नमस्कार मामी,

तुमची वेबसाइट अधुन मधुन पाहिली जातेच. मला साईट खुप आवडली...छान आहे....

साईट वरील विक्रि बद्दल मला काही अधिक माहीती हवी आहे....

जर मला काही कलात्मक वस्तू आपल्या साईट वर विकावयाच्या असल्यास ? ....
उदा. : एखादी कलात्मक वस्तू सुबक पारदर्शक प्लॅस्टीक डब्यात बंद (पॅक) करुन विक्रि करिता तयार झाली.... आता मनाला पडणारे प्रश्न.....

(आपल्या साईट्चे मुख्य ठिकाण मुंबईमध्ये आहे असे समजुन...)

१) हि वस्तू तुमच्या पर्यंत (मुंबईत), आम्ही कशी पोहोचवायची?
२) विक्रेता मुंबई बाहेर असल्यास… तुमच्या पर्यंत कशी पोहोचवायची?
३) मुळ पॅकींग वर अजुन तुमचे काही वेगळे हार्ड पॅकींग कार्टन असते का?
(जसे इतर ऑन लाईन शॉपिंग चे येते तसे... अॅमझॉन इ.)
४) शिपींग चार्जेस दर कसा व किती आकारला जातो इ. सर्वकष माहिती...

मला नेमके काय प्रश्न पडले आहेत, ते नक्कीच तुम्हांला समजले असणार.... कृपया यावर अधिक काही माहिती असल्यास इथे नक्की द्यावी...

तुमच्याकडे या विषयी एखादे माहिती पत्रक असेल तर ते मला ई-मेल द्वारे पाठवावे...

धन्यवाद.
उषा.

Pages