Submitted by मुग्धमानसी on 25 April, 2016 - 03:27
तुम्हीच का ते? ज्यांच्याबद्दल
ती शेवटी बरळत होती?
तुमचीच छबी बहुदा तिच्या
डोळ्यांमध्ये तरळत होती...
तुम्ही थोडे चांदण्यातल्या
डोहासारखे दिसता का?
तुमचाच गंध पहिल्या पावसात
मातीत उमलून येतो का?
तसं असेल तर तुम्हीच ते...
ज्यांची बाधा जडून तिनं,
रात्री काढल्या तळमळून अन्
धगीत लोटलं सगळं जिणं!
शेवटी शेवटी सांगते अश्शी
लालबुंद रक्ताळलेली...!
डोळे जड मधाळलेले...
थोडी थोडी स्वप्नाळलेली...
काय होतंय?... कुणालाही
सांगू शकली नाहीच ती
अखेरपर्यंत तुमचं नाव
घेऊ शकली नाहीच ती...
फार हाल झाले तिचे...
तुमच्यापायी झुरताना...
निरोप द्यावा कुणापाशी?
तुमच्यासाठी मरताना?
फक्त म्हणाली 'जाळू नका...
नव्हतंच मुळी जे तुमचं',
भल्या पहाटे तुमची झाली...
ऐहिक सोडून कायमचं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे !!!
बापरे !!!

सुन्न करतेय कविता!!
सुन्न करतेय कविता!!
जबरदस्त! काय ताकदीचं लिहितेस
जबरदस्त! काय ताकदीचं लिहितेस तू मानसी!
....
....
भन्नाट!
भन्नाट!
धन्यवाद!
धन्यवाद!
अफाट लिहिलयं!! फक्त, फक्त
अफाट लिहिलयं!!
फक्त,
फक्त म्हणाली 'जाळू नका...
नव्हतंच मुळी जे तुमचं', >>>
याचा अर्थ लागला नाही . सांगाल काय ?
मस्त!
मस्त!
बिचारी. विद्या.
बिचारी.
विद्या.
धन्यवाद.
धन्यवाद.
फक्त कविता म्हणून वाचली तर
फक्त कविता म्हणून वाचली तर आवडली.
अवांतर - एक विचार आलाच मनात. मला नीट शब्दात मांडता येत नाहीये. इक दुनिया उजड़ गयी हो तो क्या दुसरा तुम जहाँ (जहान) क्यों बसाते नहीं ? असे काहीसे..
कोणावर मन जडावे हे तिच्या हातात नसेल कदाचित. ( प्रेमाच्या ज्ञात नियमांनुसार ते संबंधितांच्या हातात नसतच :)) काही कारणाने ते प्रेम प्राप्त झाले नाही तर त्यासाठी झुरून हाल करून घ्यावेत हे पटले नाही.
हं चंद्रा. बरोबरे तुमचं.
हं चंद्रा. बरोबरे तुमचं.
जबरदस्त!
जबरदस्त!
!!!!!
!!!!!
बापरे...निशब्द...अफाट लिहिता
बापरे...निशब्द...अफाट लिहिता तुम्ही.
धन्यवाद!
धन्यवाद!
पुन्हा पून्हा वाचली .
पुन्हा पून्हा वाचली .
नि:शब्दं
नि:शब्दं
आधीच वाचली होती काय
आधीच वाचली होती काय प्रतिक्रिया द्यावी ते कळत नव्हते.
तर
नि:शब्द
धन्यवाद!!
धन्यवाद!!
काय लिहू?
काय लिहू?
वाचुन सुन्न! शब्द नाहीत!
वाचुन सुन्न! शब्द नाहीत!