आम्रखंड

Submitted by मृणाल साळवी on 10 April, 2016 - 08:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ग्रीक दही = १ किलो
आंब्याचा पल्प = ५०० ग्रॅम
पिठीसाखर = ४५० ग्रॅम
मिक्स ड्रायफ्रुट्स = १/४ वाटी किंवा आवडीनुसार
विलायची पावडर = १/२ चमचा
केशर = ४-५ काड्या
मिठ एक चिमटी

क्रमवार पाककृती: 

१. दही एका फडक्यात बांधुन रात्रभार टांगुन ठेवावे, त्यामुळे त्यातील सगळे पाणी निथळुन जाईल.
२. एका बाऊलमधे हे दही घेउन त्यात आंब्याचा पल्प टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.

p1p1p1

३. ह्यात पिठीसाखर टाकुन परत एकत्र करावे. तुम्ही आवडेप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता.

p1

४. ह्यामधे मिक्स ड्रायफ्रुट्स, केशर, विलायची पावडर व एक चिमटी मिठ टाकुन एकत्र करावे.
५. सर्व निट मिक्स करुन बाउल १-२ तासासाठी फ्रिज मधे ठेवुन द्यावे.

p1

६. तुम्ही हे आम्रखंड पुरीसोबत किंवा नुसते serve करु शकता.

p1p1

वाढणी/प्रमाण: 
५-६
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरा फोटो आहेत. श्रीखंड करायचे विचार मनात घोळत आहेतच, आंबेही आहेत आणलेले. त्यामुळे नक्की करणार.

सगळेच फोटो छान पण नंबर सहाचा फोटो खूप म्हणजे खूपच सुंदर आला आहे Happy

(BTW पुर्‍यांकरता ठेवलेला पेअर ऑफ टाँग्ज् भारी आवडला (की आवडले?). ते कुठून घेतलं आहे? आणि अजून एक म्हणजे इकडे अमेरिकेतलं किंवा कुठलंही "योगर्ट" वापरून चक्का केलेलं श्रीखंड फेटायची/स्मूथ करायची गरजच नाही का? मी इतर काही लोकांकडूनही योगर्ट वापरून केलेलं श्रीखंड फेटायची गरज नाही असं ऐकलंय. तुमच्याही रेसिपीत ती स्टेप दिसत नाही. फेटण्याने एक स्मूथ, तुकतुकीत लूक येतो असं वाटत नाही का?

सगळ्यांचे खुप धन्यवाद.

सशल आणि अंकु- इथे जे दही मिळते ते मुळातच सॉफ्ट असते. त्यामुळे त्याला चक्क्याप्रमाणे जास्त फेटावे लागत नाही. मी ग्रीक दहीच वापरते, कारण ते जास्त फॅटी असते. त्यामुळे चक्का छान बनतो.

मी ते टाँग्स आणि चमचा व्हिएन्नाला फ्ली मार्केट (जुना बाजार) लागते दर शनिवारी, तेथुन आणला आहे.

मृणाल, धन्यवाद. सुंदर आहेत टाँग्ज आणि चमचा Happy

>> इथे जे दही मिळते ते मुळातच सॉफ्ट असते. त्यामुळे त्याला चक्क्याप्रमाणे जास्त फेटावे लागत नाही.

ह्यावर विचार करत आहे . तुम्ही पिठीसाखर वापरली आहे. मध्ये इकडे पाकातल्या श्रीखंडावर बरीच चर्चा झाली होती. तर अजून एक मुद्दा आठवला तो म्हणजे फेटल्यामुळे चक्क्यातल्या गुठळ्या जातातच पण आपण जी ग्रॅन्युलेटेड शुगर सहसा वापरतो तीही मुरून चांगली मिक्स होते फेटण्याच्या अ‍ॅक्शन मुळे असं वाटतंय मला.

पण कन्व्हिनिअन्स नक्कीच आहे योगर्ट आणि पिठीसाखर वापरण्यात.

फोटो मस्तच!

मी चक्का आणि साखर फेटूनच घेते आणि त्यात थोडे सावर क्रीम पण टाकते. sour क्रीम मुळे श्रीखंड एकदम सॉफ्ट होत.

ऐन वेळी करायचं झाल्यास बाजारात मिळणार्‍या दह्याला टांगून ठेवून केलं आम्रखंड तर कसं होईल? Uhoh
प्रयोग करून पहायला हवा.

सशल.. हो पिठीसाखर वापरल्यामुळे जास्त फेटायला लागत नाही. ग्रीक दह्यामधे गुठळ्या होतच नाहित, त्यामुळे काम लवकर होते.
दक्षिणा.. ऐन वेळी दही आणुन त्याचे लगेच श्रीखंड होणार नाही. मी सुद्धा दही रात्रभर टांगुन ठेवले होते.

Pages