"निदान" - माझे नवीन पुस्तक !

Submitted by SureshShinde on 27 March, 2016 - 11:15

प्रिय मायबोलीकर मित्र,
नमस्कार !
आपणास कळविण्यास आनंद वाटतो कि 'मायबोली'वर मी लिहिलेल्या कथांचा संग्रह 'निदान' या नावाने सकाळ प्रकाशनाने नुकताच पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. हे पुस्तक बुकगंगा, सकाळ प्रकाशन, अमेझोन इत्यादी ठिकाणी व पुस्तक दुकानातही उपलब्ध आहे. (पृष्ठसंख्या - १६८ किंमत- रु. १९०.)
सर्वश्री डॉ. अशोकराव निरफराके, ह वि सरदेसाई, लिली जोशी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. वाचकांचा प्रतिसादही उत्तम आहे.
प्रस्तावनेमध्ये 'मायबोली'चा उल्लेख अनिवार्यच होता. आपण सर्व मायबोलीकर मित्रांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनपर प्रतिसादांमुळे हुरूप येवूनच हे घडू शकले याची कृतज्ञतापुर्वक नोंद करू इच्छितो.
या पुस्तकाच्या काही विनामूल्य प्रती माझ्याकडे उपलब्ध आहेत. ज्या मायबोलीकरांना त्या हव्या असतील त्यांनी मला विपू करून आपला पत्ता कळविल्यास त्यांना पाठवण्यास मला आनंद वाटेल. कृपया आपली इच्छा येत्या दोनच दिवसात कळवावी कारण त्यानंतर एक महिनाभरासाठी मी बाहेरगावी जाणार आहे.
सध्या इच्छा असूनही व्यवसायव्यग्रतेमुळे लिखाणासाठी वेळ देत येत नाही याची खंत वाटते. तरीही वेळात वेळ काढून लिहिण्याचा प्रयत्न करीनच.
आपल्या सर्वांचे व 'मायबोली' या दर्जेदार संकेतस्थळाच्या प्रशासकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद !
- सुरेश शिन्दे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन डॉक्टर !
चांगले लिखाण पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशकांचे आभार. विकत घेईन.

मेडीकलला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचं कौतुक करण्यासाठी देता येण्यासारखं पुस्तक आहे हे.

प्रिय मायबोलीकर मित्रांनो,
आपणा सर्वांच्या प्रेमाने, प्रतिसादाने खूपच गहिवरून आले आहे. केवळ 'धन्यवाद' हा शब्द माझ्या भावना व्यक्त करण्यास अपुरा आहे. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार, धन्यवाद!
बहुतेक सर्व जणांना कुरियर द्वारा पुस्तक पाठविले आहेच. अनेक मित्रांनी मायबोलीच्या संपर्कातून मेसेज पाठविला आहे पण त्यात पत्ता नसल्यामुळे त्यांना पुस्तक पाठविता आलेले नाही. कृपया पुन्हा मेसेज पाठविल्यास पाठविता येईल.

आपला,
सुरेश शिंदे

अभिनंदन !!! खूप खूप शुभेच्छा. भारतात आल्यावर विकत घ्यायच्या पुस्तकाच्या यादीत तुमचे पुस्तक नक्की असेल.

अभिनंदन डॉक्टर ! पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा !
तुमच्या निदानचातुर्य कथा आम्हाला अशाच वाचायला मिळोत.

आपले पुस्तक आपल्या स्वाक्षरी साहित पाठवता आल्यास आपला कायम ऋणी राहीन
धन्यवाद
माझा पत्ता :-
Swapnil Sansare
Ground Floor, TV18 Broadcast Ltd,
Empire Complex,
414 Senapati Bapat Marg,
Lower Parel (W)
Mumbai 400013

अभिनन्दन....!!! जर पुस्तक शिल्लक असेल तर, क्रुपया खालिल पत्यावर पाटवा,

अब्दुल हामीद श. इनामदार,
घर न. २१५७, गुरुवार पेथ, मुल्ला वाडा, मिरज
तालुका - मिरज, जिल्हा - सान्ग्ली, ( महाराष्ट्र ) ४१६४१०
मो. ८४२११३१९०७

Apale pustak milalyas anandch hoil mi tumacha khup motha pankha ahe
Sagar ramkisan bhande mo.no.7030310218 hanumantgaon ta.vaijapur dist.auranabad

Mast! Tumache lekh avadalele. Pustak chan asel hyat shankach nahi. Milavanyacha prayatna Karen.

Pages