"निदान" - माझे नवीन पुस्तक !

Submitted by SureshShinde on 27 March, 2016 - 11:15

प्रिय मायबोलीकर मित्र,
नमस्कार !
आपणास कळविण्यास आनंद वाटतो कि 'मायबोली'वर मी लिहिलेल्या कथांचा संग्रह 'निदान' या नावाने सकाळ प्रकाशनाने नुकताच पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. हे पुस्तक बुकगंगा, सकाळ प्रकाशन, अमेझोन इत्यादी ठिकाणी व पुस्तक दुकानातही उपलब्ध आहे. (पृष्ठसंख्या - १६८ किंमत- रु. १९०.)
सर्वश्री डॉ. अशोकराव निरफराके, ह वि सरदेसाई, लिली जोशी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. वाचकांचा प्रतिसादही उत्तम आहे.
प्रस्तावनेमध्ये 'मायबोली'चा उल्लेख अनिवार्यच होता. आपण सर्व मायबोलीकर मित्रांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनपर प्रतिसादांमुळे हुरूप येवूनच हे घडू शकले याची कृतज्ञतापुर्वक नोंद करू इच्छितो.
या पुस्तकाच्या काही विनामूल्य प्रती माझ्याकडे उपलब्ध आहेत. ज्या मायबोलीकरांना त्या हव्या असतील त्यांनी मला विपू करून आपला पत्ता कळविल्यास त्यांना पाठवण्यास मला आनंद वाटेल. कृपया आपली इच्छा येत्या दोनच दिवसात कळवावी कारण त्यानंतर एक महिनाभरासाठी मी बाहेरगावी जाणार आहे.
सध्या इच्छा असूनही व्यवसायव्यग्रतेमुळे लिखाणासाठी वेळ देत येत नाही याची खंत वाटते. तरीही वेळात वेळ काढून लिहिण्याचा प्रयत्न करीनच.
आपल्या सर्वांचे व 'मायबोली' या दर्जेदार संकेतस्थळाच्या प्रशासकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद !
- सुरेश शिन्दे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्दीक अभिनंदन, डॉक्टर साहेब!

हे पुस्तक संग्रहि ठेवायचंय, पण तुमच्या हस्ताक्शरातल्या संदेश/स्वाक्शरी सकट. बघुया योग कसा जमतो ते...

हार्दीक अभिनंदन डॉ . आपले पुस्तक निश्चितच आवडेल वाचायला .आपण पाठवू शकल्यास आनंदच वाटेल मला .
प्रभा देशपांडे
ह . व्यायाम प्रसारक मंडळ
अमरावती .( महाराष्ट्र )
44605

अभिनंदन.. पुस्तकरुपाने तूमचे अनुभव प्रसिद्ध झाले ते खुपच छान. अर्थात तूमच्याकडे सांगण्यासारखे खुपच आहे, त्यामूळे पुढच्या पुस्तकाची वाट बघायला लागलोच आहोत आम्ही.

हार्दिक अभिनंदन डॉ.साहेब.

अशा सहज-सोप्या भाषेतील पुस्तकामुळे अनेकांना मार्गदर्शन लाभेल व अनेक रुग्णांना फायदाही होईल.

अनेकानेक धन्यवाद.

डॉक्टर, अभिनंदन Happy
वैद्यकीय व्यवसायाबद्दल विविध रास्त वा अनाठाई कारणांनी पराकोटीचे अविश्वासाचे वातावरण जनसामांन्यांमधे पसरत असतानाच, नेमक्या वेळेस, वैद्यकीय विश्वातील काहि महत्वाचे अंतरंग तुमच्या पुस्तकाद्वारे उलगडत आहेत, ज्याचे वाचनाने, वैद्यकीय व्यवसायाकडे "बायस्ड्/पूर्वग्रहदुषित" नजरेने बघु नये हा संदेश योग्यवेळी जनसामांन्यात तसेच वैद्यकीय व्यावसायिकातही जाणे गरजेचे होते, तो जाईल, हा माझा बराचसा आदर्शवादी आशावाद Happy .
आपण आपल्या समृद्ध अनुभवविश्वास साक्षी ठेवुन अजुनही बरेच बहुमूल्य लिखाण करु शकाल, ते वेळात वेळ काढून कराल, अशी अपेक्षा. Happy
तुमचे पुस्तक, हे माझे वैद्यकीय क्षेत्रातील नातेवाईक/मित्र तसेच अन्य कोणालाहि "विशेष भेट" म्हणून देण्यास मला उपयुक्त वाटत आहे. उपलब्ध संस्थळावरुन ते मी घेईनच. Happy

हार्दिक हार्दिक अभिनंदन डॉ. काका !!!!

तुमचे पुस्तक, हे माझे वैद्यकीय क्षेत्रातील नातेवाईक/मित्र तसेच अन्य कोणालाहि "विशेष भेट" म्हणून देण्यास मला उपयुक्त वाटत आहे. उपलब्ध संस्थळावरुन ते मी घेईनच >>>>> +१११११

Pages