रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेडवरून आठवलं दत्ता आणि सरिता झोपतात तो बेड किती लहान होता. सरिताने कुस बदलली की दत्ता धराशायी होणार. त्याने खोलीत नुसता दिवा लावून काय केलं मला तरी कळलं नाही. 'दिवे लावणं' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आत्ता लागला. त्यापेक्षा घरातल्या लोकांना उठवून बाहेर जाऊन बघायचं तरी. बाकी ह्यांचा बाहुला आपला आपण चालतो बोलतो हे बघून रामदास पाध्येंना घाम फुटला असणार.

घामावरून आठवलं, मला तर आता सुषल्याचा घाम कथानकाचा भाग आहे असं वाटू लागलंय. काल तर कमाल मर्यादा होती. बहुतेक ती चोरवाट किंवा भुयारातून जाऊन ते लहान मुलाच्या रडण्याचे आवाज वगैरे ऐकवत असणार. म्हणून तिला एव्हढा घाम येतो कारण तिथे व्हेंटिलेशन नसणार ना.

दत्ता आता त्या मंदिरात जायला रात्रीच का निघालाय? परत एकटा? गणेश आणि आर्चिस ला न्यायचं ना सोबत. आता रस्त्यात तो बाहुला पाय पसरून बसला नसला म्हणजे मिळवलं. नाहीतर परत 'हे जे काय चाललं ते भयंकर आसा'.>>>>>>>>>>>.. स्वप्ना Rofl

तसा कालचा भाग टरकावणारा होताच. मला वाटल की बाहुला आता तात्या सारखा चालत येणार. त्या बाहुल्याला छायाने साडी नेसवल्याने ती बाहुली झाली आहे.:फिदी:

हसताव काय, काल माझी जाम हालत झाली तो शीन बघताना. अचानकच एवढा भयानक कसा काय दाखवक लागले?? ता पण मी एकट्यानं शिरेल बघताना, असा वाटला ना माका. Proud

स्वप्ना. Lol

'हे जे काय चाललं ते भयंकर आसा'.>>>> या त्याच त्याच वाक्यांचा भयंकर वैताग येतो.

सरिताने कुस बदलली की दत्ता धराशायी होणार.
>>>
Lol टू मच हायेस स्वप्ना

घामावरून आठवलं, मला तर आता सुषल्याचा घाम कथानकाचा भाग आहे असं वाटू लागलंय.
>>>>>>
डेफिनेटली.... काल तर सीनच्या आधीव्बाटलीभर पाणी जाणूनबुजून स्प्रे केल्यासारखंच वाटलं. अजागळ रहाणीमान दाखवण्यासाठी असावं कदाचित.

पण मायबोलीतर्फे सुशल्याला २ ड्रेस नवी नेऊन द्यायला हवे. Wink

पण मायबोलीतर्फे सुशल्याला २ ड्रेस नवी नेऊन द्यायला हवे. >>>

डीओ पण देउयात फॉग चा... कारण आजकाल काय चलालाहां?? फॉग चलालाहां !!

आणि मग ती बाहेर जाते तेव्हा देविका गळणार्‍या पाण्याकडे पहात असते. बहुतेक त्याच वेळेस दत्ता आणि सरिताला तो लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो असं दाखवून देविका हे सगळं करतेय असं दाखवायचं होतं का काय देव जाणे. ती देविका पण सायकोच वाटतेय आजकाल. काय त्या अभिरामला सोनं लागलंय देवाला माहित. म्हणे मी त्याच घरात जाणार. म्हणतात ना जब गीदड की मौत आती है तो वो शहरकी तरफ भागता है

आता आज परत पुढील वाक्यं ऐकायला तयार रहा:

१. ही सगळी अंधश्रध्दा आहे/तुम्हा लोकांना कळत कसं नाही
२. माधव्/आर्चिस
३. वहिनी तुका कळत नाही
४. हे जे चाललंय ते साधंसुधं नसा
५. आये, माझो बाहुलो
६. दत्ता, काईतरी करुक होया रे

मला तर वाटतं बाहुल्याला छायाने साडी नेसवल्यामुळे त्याचा भयंकर आयडेन्टीटी क्रायसिस झाला असणार. तेचा विचार पण करुक होया.

देविकाला शोधत असते.>>> Uhoh देविका चादरीवरच्या डीझाईन मध्ये हरवु शकेल असा वाटलान की काय त्येका

आता मला नानांची सुध्द्दा शंका येते. दिवसभर निपचित पडून रवतात. आणि रात्रिस खेळ करत असणार. त्या बाहुल्याला रात्रीचा अंगणात चालवायचं म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे.

मला तर वाटतं बाहुल्याला छायाने साडी नेसवल्यामुळे त्याचा भयंकर आयडेन्टीटी क्रायसिस झाला असणार. तेचा विचार पण करुक होया.Rolling laughter

मधेच ठोकळा सायको दाखवतात मध्येच देविका... क्धी गणेश तर कधी छाया..आणि तो पांडु तर आहेच सायको

माधव सायको वाटतोय...... तसेही त्याला लहानपणापासून रहस्यकथा लिहायची सवय आहेच..... तोच हे सर्व रचून करतोय. (विद्या बालनचा क्लास लावला होता असणार)

मला तर वाटतं बाहुल्याला छायाने साडी नेसवल्यामुळे त्याचा भयंकर आयडेन्टीटी क्रायसिस झाला असणार. तेचा विचार पण करुक होया.>> Rofl

देविका चादरीवरच्या डीझाईन मध्ये हरवु शकेल असा वाटलान की काय त्येका>> क्लि.. Rofl Rofl

कालच्या एपिबद्दल मी कायच लिहू शकत नाय.. मी काय बघितलय ता लिवलय तर पांडू चक्कर येवन पडात.

आता आज परत पुढील वाक्यं ऐकायला तयार रहा:

१. ही सगळी अंधश्रध्दा आहे/तुम्हा लोकांना कळत कसं नाही
२. माधव्/आर्चिस
३. वहिनी तुका कळत नाही
४. हे जे चाललंय ते साधंसुधं नसा
५. आये, माझो बाहुलो
६. दत्ता, काईतरी करुक होया रे>>>>> अगदी अगदी.

>>डेफिनेटली.... काल तर सीनच्या आधीव्बाटलीभर पाणी जाणूनबुजून स्प्रे केल्यासारखंच वाटलं.

अगदी अगदी. आणि हे लक्षात येणार नाही किंवा येऊन सुध्दा दुर्लक्ष केलं जाईल इतकीही ही सिरियल लो बजेट वाटत नाही. म्हणून मला वाटतं की त्याला काहीतरी अर्थ असेल.

देविका आहेच तशी सुकडबोंबील >>> तर तर.. नुसतं सुक्ट आणि बोंबील च खाउ घालत असेल नार्वेकरीण बिचारीला... कुठे नाईकांची छाया , सुसल्या नि कुठे नार्वेकरांची देविका Biggrin

स्वप्ना_राज.. सगळ्याच पोस्टींना _/\_ Biggrin
आयडेंटीटी क्रायसीस Rofl
तो एक पीजे आहे ना.. मुलगा मुलीला पहायला येतो . चहा पोहे झाल्यावर विचारतो. तुला काय येतं. ती म्हणते 'घाम'.. ती मुलगी ही सुसल्याच असणार याची मला खात्री आहे Wink

Pages