विषय तसा नेहमीचाच आहे.
दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.
पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.
माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.
गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.
फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..
हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..
...............................................................
यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123
जिथे तिथे धर्म आणणे खेदजनक
जिथे तिथे धर्म आणणे खेदजनक आहे.
जो धर्म- सण वार, चाली-रिती शिकवितो..तोच माझा धर्म 'सहवेदना' ही शिकवीतो. त्याच सहवेदनेने--कोणी तरी कुठला तरी माझा बांधव, माता, भगिनी पाण्यासाठी वणवण फ़िरत असताना, पाण्याचा नास करणे माझ्या धर्मात बसत नाही.
लिंबु हिंदु धर्माचा ठेकेदार
लिंबु हिंदु धर्माचा ठेकेदार आहे. त्याच्या आणि तुमच्या धर्मात खुपच अंतर दिसतंय. तुमचा धर्म कुठला निरा?
@ टग्या-- एका कोणाला उद्धेशुन
@ टग्या--
एका कोणाला उद्धेशुन मी लिहीले नाहीये...एकुणात म्हणलेय.
पण तरीही तुमच्या प्रश्नाचे उत्तर- हिंदु
ठेकेदार कोणी ठेका दिला रे.
ठेकेदार

कोणी ठेका दिला रे.
हिंदु जन्माने असाल पण तुमच्या
हिंदु जन्माने असाल पण तुमच्या पोस्टवरुन तुम्ही बुप्रावादी दिसताय.
बुप्रावादी म्हणजे काय?
बुप्रावादी म्हणजे काय?
धर्माचा ठेका कोणी द्यावा
धर्माचा ठेका कोणी द्यावा लागतो का मायबाप.
आपणच उठायचं आणि बडवेगिरी चालु करायची.
पुराणातल्या वांग्यांचं खरपुस भरीत करुन टाकायचं
धर्मज्ञानाच्या नावाखाली लोकांनां शेण/मुत भरवायचं
बायदिवे, क्रिकेट मॅचच्या
बायदिवे, क्रिकेट मॅचच्या मैदानावर हिरवळ ठेवण्याकरता वर्षभर किति पाणी मारले जाते हो?
का हल्ली तिथे सिन्थेटिक टर्फ असते गवताच्या ऐवजी?
मी जन्माने आणि कर्माने पण
मी जन्माने आणि कर्माने पण हिंदु च आहे (म्हणजे काय ते तुम्हीच ठरवा).
पण हा विषय इथेच पुरे ही विनंती -/\- (म्हणजे माझा धर्म वैगेरे).
मुख्य विषय पाण्याचा..ते वाचवीणे हा आहे .. तोच पुढे नेवुया
असे आहे काय आम्हाला कधी असा
असे आहे काय आम्हाला कधी असा ठेका मिळाला नाही म्हणून जास्त माहीती नाही
चालू द्यावी ठेकेदारी पण घरात करावी बाहेर "प्रसाद" मिळाण्याचे फुल्ल चांसेस आहे.
निराजी, पाण्याचा नास न करता,
निराजी, पाण्याचा नास न करता, आवडत असेल तर रंगपंचमी/धुलेटी खेळावी अस आमचे म्हणने आहे.
अंगोळीच्या आधी थोडा कोरडा रंग खेळला तर कुठे बिघडले?
अनघाताई, काही लोकांच्या मते
अनघाताई, काही लोकांच्या मते हा हिंदुधर्माविरोधी कट आहे.
असू शकेल अन नसेलही. पण पाणी
असू शकेल अन नसेलही. पण पाणी हे वाचवलेच पाहिजे ... त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही... बाकी नै. धनसंपत्तीची लूट चालवली आहे म्हणून पाणी मिळतय तर वापरा भरपूर असे नसावे.
मी हे शहाणपण सांगतेय... पण आमच्या कॉलनीत (१००० सदनिका एकेठिकाणी) भरपूर पाणी नळाला येते - सकाळी ५ ते ९, अन लोक घरास्मोर पाईपने सडा घालतात. इतके वाईट वाटते पण ते लोक सांगायच्या पलीकडचे आहेत. वरच्या मजल्यावरचे त्यांना पाणी सांडू नका म्हणाले तेव्हा त्या दोन्ही बायका - पुरूष , मुलेबाळे यथेच्छ भांडण झाले.
अमित देशमुखांच्या वाढदिवशी
अमित देशमुखांच्या वाढदिवशी पाण्याची नासाडी. व्हॉलीबॉल कोर्टावर २५०० लिटर पाणी फवारले.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada...
अनघाजी... काय उत्तर देवु सुचत
अनघाजी... काय उत्तर देवु सुचत नाहिये. कारण रंग काढायला अंघोळीला पाणी जास्त लागणार म्हणजे नासाडीच की.
हे ही नको असे मावै. मत आहे.
मस्त रंगबिरंगी चित्रे काढा, मुलांना वॉटर कलर्स (चीत्रकलेचे) द्या, मनसोक्त रंगवु द्या.
ऋन्मेष, क्रिकेट, व्हॉलीबॉल
ऋन्मेष,
क्रिकेट, व्हॉलीबॉल सारख्या मैदानी खेळांसाठी पाण्याची नासाडी करावी का? असा धागा काढणार का.
अतिशय निषेधार्थ कृत्य. जेल
अतिशय निषेधार्थ कृत्य. जेल मधे पाठवा
हौस असती हो लहान मुलांना.
हौस असती हो लहान मुलांना. तसेही स्विमींग ला मुले पाठवतात लोक तेव्हा तिथे शॉ.बा. घेतात ना?
अमित देश्मुखांविरोधात गुन्हा
अमित देश्मुखांविरोधात गुन्हा दाखल करा.
समहाऊ, मी लातुर मधिल त्या
समहाऊ, मी लातुर मधिल त्या "अड्डीच्च हज्जाऽऽर" लिटर पाणी खेळाचे मैदानावर शिडकविण्याचे बाबत उगाचच डोक्यात राख घालुन घेऊ इच्छित नाही. (होय, अमित देशमुख कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार न करता हे मत आहे) \
किंबहुना टीआरपी वाढवत ठेवण्यासाठी या गोष्टीची "बातमी" बनविणार्यांची "कीव" करावी तितकी थोडी आहे व अशा प्रकारे "बातमी" करुन व तिचा वापर करुन लोकांच्या भावना भडकाविणार्यांविरुद्धच खरे तर पोलिसी कारवाई व्हायला हवी असे माझे वैयक्तिक मत. अडिच हजार ऐवजी, अडिच लक्ष किंवा दशलक्ष लिटर असा काही आकडा असता तर माझे मत वेगळे असते.
विठ्ठल, काहीही होणार नाही.
विठ्ठल, काहीही होणार नाही. कितीही झाले तरी या राजकारण्यान्चे आतुन लागेबान्धे असतात हे जगजाहीर आहे. आमच्याच इथल्या एका कॉन्ग्रेस आमदाराने आम्हाला हे सान्गीतले, माझ्या वडलान्चे ते मित्र. वरुन कितीही यानी दात ओठ खात मुलाखती दिल्या तरी हे लोक आतुन तुझ्या गळा-माझ्या गळा करतात हे आपल्याला स्व. बाळासाहेब ठाकरे आणी शरदराव पवार यान्च्या मैत्रीतुन दिसले असेलच.
सातारा आणी जवळ पासच्या गावात पण बराच दुष्काळ होता, प्यायचे पाणी लाम्बव्रुन आणावे लागत होते तर मागच्या वर्षी तिथल्याच कुठल्या तरी भागात ( बहुतेक वाई ) शाहरुक चे शुटिन्ग होते, तर अख्खा एरिआ पाणी मारुन तजेलदार ठेवला होता. किती पाणी लागले असेल? एक म्हातारा टिव्हीवर बोलत असताना अक्षरशः रडवेला झाला होता. आता गम्मत बघा. आपल्या सयाजी शिन्देने मात्र तिथे स्वतचा पैसा देऊन, स्वत माणसे गोळा करुन पाण्यासाठी कालवे खोदलेत. आपले हिरो हे सयाजी, नाना आणी मकरन्द सारखे हवेत. पण लोकाना आवडते कोण?
पाणी आम्ही वाचवतोच. अगदी
पाणी आम्ही वाचवतोच. अगदी दुष्काळी परिसरातही राहिलो आहोत. तो अनुभव गाठीशी आहेच्चे. पण म्हणून पुण्यामुंबईत होळी खेळूच नका, वा तुमचे सण "असलेच" अशा प्रकारचे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे कशासाठी? हे नक्राश्रु आहेत व तसे नक्राश्रु वाहविण्यात मी सामिल होणार नाही.
माझ्यापरीने पाण्याची बचत मी प्रत्यही करीतच असतो, >>> limbutimbuभाऊ आज ते पाणी (बचत केलेल) सत्कारणी लावायची वेळ आली आहे.
आज मुलीने शाळेतुन येताना
आज मुलीने शाळेतुन येताना पिचकारी मागीतली, तिला ठामपणे पण नीट समजावुन सान्गीतले. फक्त एक अर्धी पिचकारी भर आणी ते पाणी जास्वन्दीला घाल एवढेच सान्गीतले. माझी ९ वर्षाची मुलगी तेवढ्यात खुश आहे. तिला माहीत आहे की आजीच्या ( माझ्या आईच्या ) घरी १५- दिवसानी प्यायचे आणी वापरायचे पाणी मिळतेय. माझ्या मुलीवर मी हेच सन्स्कार करणार बाकी दुनिया गई तेल लावत.
हे पा, आम्ही कुणी पाहुणा आला
हे पा, आम्ही कुणी पाहुणा आला तरी, "पाणी घेणार का?" असे विचारणार्यांमधिल आहोत.....
बचत अन काटकसर अगदी रक्तात भिनल्यासारखी आहे. त्यामुळे उगा आला पाहुणा, की केला पाणीभर ग्लास पुढे, भले पाहुण्याला तहान असो वा नसो, अन तो एखाद घुटका पिणार, बाकीचे उष्टॅ तसेच वाया जाणार, असे चालणार नाही. शिवाय पाणी देतानाहि, तांब्याभांडे असेच देतो, देतानाच सांगतो, हवय तितके भांड्यात काढून घ्या स्वहस्ते.....
उगाच पिण्याच्या पाण्याचाच ओययोस्तवर आग्रह करुन पाहुण्याला "गार" करण्याची आवड नाही आमचि.... 
घरात वा कॅन्टिनमधे, जेवून उठताना पाण्याच्या भांड्यात अर्धवट पाणी शिल्लक ठेवुन वाया घालविलेले आजही चालत नाही, माझ्या समोर कॅन्टिनमधेही असे कुणी केले तर त्यास सुनावले जाते. तेव्हा पाणी बचतीचे महत्व आम्हांस ठावुक आहेच्च, अंमलातही आणतो.
In 201-12, Maharashtra
In 201-12, Maharashtra consumed around 33 crore bulk litres of country liquor, 17 crore bulk litres of indian made foreign liquor and 18 crore bulk litres of beer.
Six of the 11 breweries in the state are in Aurangabad in the parched district of Marathwada. They source water from the Jaikwadi dam, which now holds only 5% water as compared to 32% last year.
जिथे सर्वात जास्त बोंबाबोंब चालते त्या नागपूरमध्येही पाच ब्रुअरीज आहेत
========================
या बद्दल कुणी काही बोलणार का.....च्यायला आपण इथे एक एक बादली करत पाणी वाचवायचं आणि हे राजकारणी लेकाचे तिथे कोट्यावधीनी पाणी उपसतायत.....
हे तर झाले फक्त दारूचे.....
याखेरीज मराठवाड्यात किती उस लागतो, तो किती पाणी पितो, सहकारी साखर कारखाने किती पाणी उपसतात याची गणीते मांडली तर फेफरे येतील.
आणि वरून बोंबाबोंब करायला मोकळे की पुण्या मुंबईचे लोक पाण्याची किती नासाडी करतात.....
ते करतातच, वादच नाही आणि त्यासाठी सगळ्यांचे प्रबोधन होणे नितांत आवश्यक आहे. मुजोरांना चाप जरूर लावा पण त्याचबरोबर त्या सत्तामग्रुरांनाही लावा...
असेल हिंमत तर बंद करून दाखवा एकतरी साखर कारखाना.....
आशुचॅम्प, तुम्ही दिलेल्या
आशुचॅम्प, तुम्ही दिलेल्या आकडेवारीने डोळे अन डोके दोन्हीही फिरतय रे....
नै, पण काये ना, की "सहवेदना" जास्त महत्वाची नाही का?
), तर हो, नसेल तर नाहि... बाकी शंका कुशंका, तर्क वगैरे नामंजुर.
शिवाय चार जण जस वागतात, बोलतात, तस्सच वागायच अस्त ना, मग इनथीम पाणी वाचवा अशी आहे, तर आपण पण आवाज मिसळलाच पाहिजे, की पाणी वाचवा....
कुठे ? तर पुण्यात... जिथे दहावीस फूट खोल खणले तर आजही महामूर पाणी लागतय..... बिल्डिंगा बांधताना पाया खणताना अवघड जातय, त्या पुण्यात पाणी वाचवा म्हणून आपण आंदोलने केलीच पाहिजेत......
होळीचा सण जबरदस्तीने बंद पाडलाच पाहिजे...... त्याशिवाय "शमाजशेवा" केलीये असा "फील" कसाकाय येणार? असो.
मी याच धाग्यावर एकच म्हण मांडली होती.... परत मांडतो... मोरीच्या तोंडाला बोळा, अन दरवाजा सताड उघडा, अशागत या "होळी विरुद्धच्या" आंदोलनांचे आहे. आणि असे म्हणले की मग ठरतो आम्ही पालथ्या घड्याचे डबल ढोलकी वगैरे असे संस्कृतीरक्षक.... ! असोच.
किंबहुना, आशुचॅम्प यांनी आकडेवारी दिलेला वरील जो व्यवसाय आहे, त्यातुन सामाजिकदृष्ट्या जे विपरित "नि:ष्पन्न" होतय, त्यापासुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याकरताच तर हिंदू सणांचा वापर करुन घेतला जात नाही ना याची शंका यावी अशी परिस्थिती आहेच्चे.
फक्त बुद्धिप्रामाण्यवादात शंकांना जागा नसते /थारा नसतो, तिथे फक्त येस्स, ऑर नो... इतकेच असते. पुरावा, तो देखिल पंचेद्रियांचा असेल (हल्ली कुठल्यातरी सायटीवर प्रसिद्ध झालेल्या मजकुराची लिन्क चालते पुरावा मह्णून
इथे लिहिणारे बोलणारे बहुतेक
इथे लिहिणारे बोलणारे बहुतेक जण फ्लॅट मधे रहात असतील वा कुठेही रहात असले तरि त्यांचे घराचे संडासामधे "फ्लश" सिस्टिम आहे व ती रोज वापरली जात्ये असे गृहित धरुन पुढील विधान करतो की,
अरे नुसते ढुंगण धुवायला जरी फक्त एक टमरेलभर पाणी वापरलेत, तरि घरटी चार माणसे गृहित धरली तरी एका राऊंडला फ्लशमधुन विनाकारणच जास्तीचे वाया जाणारे दहा ते बारा लिटार पाणि वाचेल, अन दिवसातुन दोन वेळेस जायची सवय असेल, तर याच्या दुप्पट. महिन्याचा हिशोब, ३,००० ते ६,००० लिटर मधे येईल.
इतकी बचत तर रोजच्या रोज ठरवुन करु शकताच, पण ते बोलुन कसे चालेल?
मग अधिकचा विचारही न करता, तर्कबुद्धी जराही न लावता, तसेच इतरांच्या हो मधे हो मिसळत, "होळीच्या" वेळेस होळीविरुद्धच बोंब मारायचे कृतकृत्य केल्याचे समाधान कसे मिळणार?
[अवांतरः मी असे लिहितोय, म्हणजे चंद्रग्रहण ऐन भरात आले आहे की काय्?:डोमा: पट्टीचे ज्योतिषीच या अवांतर विधानाचा अर्थ नीट समजु शकतील... ]
आशुचॅम्प, मध्यन्तरी नोबेल
आशुचॅम्प, मध्यन्तरी नोबेल प्राईज विजेते राजस्थानचे राजेन्द्र सिन्ग यान्ची मुलाखत झाली होती. त्यानी मराठवाड्याचा दौरा आधी केला, मग ते बोलले. त्याना याच गोष्टीचे हसू आले की सगळ्यात जास्त पाणी पिणारी शेती कोणती तर ऊस, आणी इथे जाहीर दुष्काळ असताना कोणीही उठतो आणी ऊस लावतो. आधी माहिती घ्यायला नको की असल्या दुष्काळी भागात कुठले पीक लावायला हवे ते. पण या शेतकर्याना हे समजावणार कोण? काही वर्षापूर्वी आम्ही आम्बेजोगाईला गेलो होतो, तेव्हाच बघीतले होते की कोकण आणी पुणे ते सातारा या पट्ट्यात जशी हिरवीगार झाडे, वनराई दिसते तशी मराठवाड्यात नाहीच आहे. नुसते कोरडे ठाक. रस्ता नुसता रखरखीत उष्णता ओकत होता. कुठेही सावली म्हणून नाही. झाडे तोडायची मग लावणार कोण? कसा पाऊस पडेल? कशी सावली मिळेल?
नाही, आपल्या देशातल्या लोकाना कितीही कळकळीने काहीही सान्गा, पण त्याना पटणार नाहीच. कालच्या पेपरला बातमी होती. महाडमधल्या एका सैनिकाची जमीनच धोक्यात आहे, का तर त्यातली मातीच कोणतरी चोरतय. अरे माती चोरतात, मग राजरोस जन्गलतोड तर करणारच.
रहाता राहीले या कम्पन्यान्चे, तर राजकारणी लोक किती सैतान आहेत आणी रक्तपिपासू आहेत ते सगळ्याना माहीत आहेच. दारुबन्दी करणार्या बायकाना जिथे झोडपले जाते, तिथे हे काय ऐकुन घेणार?
पण ते तसे करतात म्हणून आपणही तेच करायचे हे मला नाही पटत. पाणी जीवन आहे बस्स!
लिम्बुभाऊ आता तुम्ही फ्लशचा
लिम्बुभाऊ आता तुम्ही फ्लशचा उल्लेख केलाच आहे म्हणून लिहीते. आम्ही तो जरुरीपुरताच वापरतो. कारण घरात बादली आहे. तिचा वापर करता येतो. घरात प्यायला जरुरीपुरते पाणी भरतो, की जेणे करुन ते परत ओतायची गरज पडु नये. पण त्यातुनही प्यायचे पाणी उरले तर ते चहा आणी स्वयम्पाकाला वापरतो.
आता तुम्ही परत पुढली पोस्ट टाकाल म्हणून लिहीते. घरात वॉशिन्ग मशीन आहे, पण सेमी आहे. हवे तेवढेच पाणी वापरतो. बरेचसे कपडे हाताने धुतो. अन्घोळीसाठी सुद्धा स्वच्छ होण्यापुरतेच पाणी वापरतो.
लिंबुटिंबु, फ्लश साठी +१. पण
लिंबुटिंबु, फ्लश साठी +१.
पण सध्या ते चालुच आहे माझ्याकडे. घरी एकुण ७ माणसं फ्लश वापरतात.
Pages