विषय तसा नेहमीचाच आहे.
दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.
पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.
माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.
गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.
फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..
हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..
...............................................................
यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123
नेहमीप्रमाणे धागाकर्ता होळी
नेहमीप्रमाणे धागाकर्ता होळी पेटवून गायब. आता होळी विझता विझता परत येईल आणि निखार्यांवर फुंकर घालून विझलेली आग पुन्हा भडकवेल..
असल्या मानभावीपणाचं काय करावं... यावर स्वतःच एक नवा धागाही काढून मोकळा होईल !
परदेशी म्हणजे महाराष्ट्रात
परदेशी म्हणजे महाराष्ट्रात नक्की कुठे?? की भारतात कुठेसं आहे परदेश??
ते मूर्ख आहेत म्हणून आपणही
ते मूर्ख आहेत म्हणून आपणही मूर्खपणा केला पाहिजे असा काही नियम आहे का ?>> नियम नाही आक्षेप तर घेऊ शकला असताना की टोमॅटो १० रु किलो आहेत. कधी कधी वरणात नसतात नवरा किरकिर करतो आणि हे टोमॅटोची रंगपंचमी खेळतात.
दुसर्याला मुर्ख म्हणणे खुप
दुसर्याला मुर्ख म्हणणे खुप सोपे असते.
चांगला जंगलात रहात होता मानव,
चांगला जंगलात रहात होता मानव, निसर्गासोबत.
काय दुर्बुद्धी झाली बिचार्याला आणि विकसीत झाला.
तिथे मुबलक पाणी आहे आनि भरगोस
तिथे मुबलक पाणी आहे आनि भरगोस पिक येते. तिथे पण दुष्काळ पडला पिक आले नाही की त्यावर्षी ते ही खेळनार नाही.
प्लिजच
सरळ सोट गणित आहे मुक्तेश्वर आता हे म्हणू नका की मराठवाड्यात पाणी नाही तर लोक नायगरा धबधब्याला कसे एंजोय करतात.
ऋ पोराच्या हाताला यश आहे
ऋ पोराच्या हाताला यश आहे बाकी!! एक धागा टाकला की १००-२०० निश्चीत.

बाकी सर्वांनी धागा टाकताना ऋ चा हात सेव्ह बटनावरुन फिरवून घ्यावा. म्हणजे मग तो "आज मी हात फिरवलेली सेव्ह बटने" असा नवा धागा काढायला मोकळा
<<नेहमीप्रमाणे धागाकर्ता होळी
<<नेहमीप्रमाणे धागाकर्ता होळी पेटवून गायब. आता होळी विझता विझता परत येईल आणि निखार्यांवर फुंकर घालून विझलेली आग पुन्हा भडकवेल..
असल्या मानभावीपणाचं काय करावं... यावर स्वतःच एक नवा धागाही काढून मोकळा होईल !>>
हो कारण धागाकर्त्याचा मुख्य हेतू लोकांच प्रबोधन करण हा नसून शतकी धागा काढणे हा आहे
त्याच्या आधीच्या धाग्याला जेमतेम २१ प्रतिसाद आले होते त्यातलेही काही प्रतिसाद खुद्द धागाकर्त्याचेच होते ,त्यामुळे बिचारा अस्वस्थ झाला असेल
आता हा शतकी धागा पाहून त्याला शांत वाटल असेल
धागाकर्ता निश्चित होळी खेळणार त्याने लिहिलंच आहे कि मोहावर विजय मिळवण कठीण आहे
इथे तर आतापासून भडका उडालाय.
इथे तर आतापासून भडका उडालाय. दोन्हीकडून इतकी टोकाची विधाने होतायत. मला जास्त आश्चर्य वाटते ते स्युडो समानतावाद्यांचे. त्यांना नाही मग मला पण नाही ही भूमिका रंग खेळण्यासारख्या तुलनेने लहान किंवा निरुपद्रवी गोष्टीत घेणे एक. पण 'रंग खेळून चार बादल्या ओतून घेणारे जग बुडवतात' हे अवसान कशासाठी? जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे आपोआप निर्बंध येतील. तेही कुणी न लादता. घरात प्यायच्या पाण्याची चणचण असताना कशाला कोण धर्म आणि परंपरांचा विचार करणार आहे. पण ज्याच्याकडे आहे त्याने खेळायचे ठरवले तर ते त्याचे स्वातंत्र्य ठरावे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे- 'यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.' असा आपल्यापुरता विचार असावा. दुसरा वेगळा वागतोय म्हणून राग, दुस्वास कशासाठी?
अकोल्यात पाणी टंचाई नाही कां?
अकोल्यात पाणी टंचाई नाही कां?
विठ्ठल तुम्हाला पण सादर
विठ्ठल तुम्हाला पण सादर निमंत्रण आमचे खुप सारे मित्र मुस्लिम बाधंव आहेत तुम्ही पण जरुर या
सुब्रमणियम स्वामी ची मुलगी सुहासिनी हैदर नदीम हैदरची पत्नी त्यांना पण विचारुयात.
तिथे मुबलक पाणी आहे आनि भरगोस
तिथे मुबलक पाणी आहे आनि भरगोस पिक येते. तिथे पण दुष्काळ पडला पिक आले नाही की त्यावर्षी ते ही खेळनार नाही. हे तुम्हाली खात्रीशीर लिहुन दिलेला वचन नामा सांभाळून ठेवा कामी येईल
चार बादल्या ओतून जग बुडणार
चार बादल्या ओतून जग बुडणार नाहीये पण हेही खर आहे कि 'थेंबे थेंबे तळे साचे '
घरात प्यायच्या पाण्याची चणचण
घरात प्यायच्या पाण्याची चणचण असताना कशाला कोण धर्म आणि परंपरांचा विचार करणार आहे.>> घ्या, तांब्याभर पाणी अस्ले तर पळीभर अंगावर उडवुन घेईन हे ब्रह्मवाक्य वाचले नाहीत वाटते.
तिथे म्हणजे परदेशी जिथे
तिथे म्हणजे परदेशी जिथे टॉमॅटो ची होळी खेळली जाते. नाहीतर हा वचननामा तुम्ही मराठवड्याला विदर्भाला वापराल
चार बादल्या ओतून जग बुडणार
चार बादल्या ओतून जग बुडणार नाहीये पण हेही खर आहे कि 'थेंबे थेंबे तळे साचे '>> हो मागे धरणात पाणी नाय तर मूतू का असे आपले माननिय महोदय म्हणाले होते.
सकुरा, गुगल केले की सग्गळी
सकुरा, गुगल केले की सग्गळी माहिती मिळते की.
आणि मुंबईत मोठ्ठा महासागर
आणि मुंबईत मोठ्ठा महासागर आहे. त्यात अंगाला रंग फासून बिन्धास्त डुबक्या मारा. कोणी काही बोलणार नाही.
सकुरा, गुगल केले की सग्गळी
सकुरा, गुगल केले की सग्गळी माहिती मिळते की. डोळा मारा>> मग होळीची नाही मिळाली काय?
धुळवड!
धुळवड!
अकोल्यात पाणी अहे का?
अकोल्यात पाणी अहे का?
<<<इथे तर आतापासून भडका
<<<इथे तर आतापासून भडका उडालाय. दोन्हीकडून इतकी टोकाची विधाने होतायत. मला जास्त आश्चर्य वाटते ते स्युडो समानतावाद्यांचे. त्यांना नाही मग मला पण नाही ही भूमिका रंग खेळण्यासारख्या तुलनेने लहान किंवा निरुपद्रवी गोष्टीत घेणे एक. पण 'रंग खेळून चार बादल्या ओतून घेणारे जग बुडवतात' हे अवसान कशासाठी? जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे आपोआप निर्बंध येतील. तेही कुणी न लादता. घरात प्यायच्या पाण्याची चणचण असताना कशाला कोण धर्म आणि परंपरांचा विचार करणार आहे. पण ज्याच्याकडे आहे त्याने खेळायचे ठरवले तर ते त्याचे स्वातंत्र्य ठरावे.>>>
पाणी म्हणजे कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का मनाला येईल तशी उधळायला
आणि ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे ते जर वेळीच सावध झाले नाहीत तर त्यांच्यावरही पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण करायची वेळ येऊ शकते
खरय, सकाळी माझ्या मनात हाच
खरय, सकाळी माझ्या मनात हाच विचार आला की होता त्यानी समुद्राकडे ( चौपाटी) जावे दोन-चार रिकाम्या बादल्या घेऊन.त्यात बीटाचा नैसर्गील लाल कलर, पालकाचा/ मेथीचा हिरवा कलर घालावा आणी त्यात समुद्राचे पाणी भरुन एकमेकावर ओतत बसावे म्हणजे झाली होळी.:खोखो: म्हणजे मग केमिकल्सनी मासे आणी इतर जलचर पण धोक्यात येणार नाही.
रश्मी आयड्या आवडली.पब्लिक
रश्मी आयड्या आवडली.पब्लिक महाग पालक मेथी बीट 'पाण्यात' घालायला तयार होतील का हा वेगळा प्रश्न
अगदी बरोबर मुक्तेश्वर
अगदी बरोबर मुक्तेश्वर कुळकर्णी, जगात इतक्या सुधरणा घडायच्या बाकी असताना फक्त हिंदू चालीरीतींवरच आक्षेप का? आधी परदेशातली टोमॅटोची होळी बंद पाडली गेली पहीजे, मगच लोकांना इथल्या होळीबद्दल बोलायचा नैतिक अधिकार प्रप्त होतो.
नेमके हिंदू सणांच्या वेळेसच हे "अक्कलेचे डोस" पाजणे का होते? अन वर दहा चुकानंतरचि अकरावी चुक का करावि हा वैचारिक शिरजोर पणा का?
बाकीच्या दहा नै तर शंभर चुका होताहेत, त्या आधि बंद करा ... ! स्मित
निव्वळ "धार्मिक" बाबींवर हल्लाबोल करायची ही फ्याडे आता पब्लिकलाही कळू लागली आहेत.
जिथे "धंदा' होतोय, पैका मिळतोय, तिथे एक शब्द विरोधाचा नाही, उलट त्यातच सामिल. पण हिंदु धार्मिक बाब आलिरे आलि की गेली काही वर्षे सातत्याने त्यावर नकारात्मक टीका.. हे एकतर्फी फार काळ चालू शकत नाही.
वा ग बहाद्दरणी, ज्यांणा
वा ग बहाद्दरणी, ज्यांणा स्मुंदर, नदी, कालवा काहीच उपलब्द नाय त्यांनी होळी रोजच्या अंघोळीच्या पाण्यात सुध्दा करू नाय काय? :टडोपा:
जिथे "धंदा' होतोय, पैका
जिथे "धंदा' होतोय, पैका मिळतोय, तिथे एक शब्द विरोधाचा नाही >>>
टग्या काय झाड सोडत नाही.
टग्या काय झाड सोडत नाही.
लिंबाच झाड हे, असं कसं
लिंबाच झाड हे, असं कसं सुटंल??
पाणी म्हणजे कुणाची प्रायव्हेट
पाणी म्हणजे कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. पण योग्य वापर आणि उधळपट्टी यादेखील निश्चित कल्पना नाहीत. ते प्रत्येकाचे मत आहे. प्रत्येक घरात दोन बादल्या पाणी असताना एक जण अंघोळ राखून एक बादली पाणी बाल्कनीतल्या कुंड्याना घालत असेल तर त्याच्या दृष्टीने आनंद आणि शेजार्यासाठी उधळपट्टी असू शकतेच ना?
Pages