यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 March, 2016 - 16:43

विषय तसा नेहमीचाच आहे.

दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.

पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.

माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.

गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.

फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..

हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..

...............................................................

यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो, कुणाच्या पंखा वगैरे गोष्टींकरताच्या वीज वापराला "नासाडी" नाही म्हणली, तरी मुंबईच्या रस्त्यारस्त्यांवर लावलेल्या भिकार जाहिरातिम्च्या इलेक्ट्रिक होर्डिंगज वर किती वीजेची "नासाडी" होते तिचा विचार व्हावा..... कोण तरी फक्त पैका फेकु शकत म्हणून अशा प्रकारे वीज वापरावी?

रेव्यु | 22 March, 2016 - 09:55

For me this is the best post amongst all. Felt this is the most logical explanation.

रेव्यु | 22 March, 2016 - 09:55
For me this is the best post amongst all. Felt this is the most logical explanation.
>>>

+७८६

होळीचे हे एक स्वरुप काय म्हणने आहे या सभ्यते विषयी फोटो बद्दल कोणाला काही अप्पती असेल तर संपादित करण्यात येईल.

10399605_784779348319513_5604413788565679693_n[1].jpg12109189_784779431652838_1943060744212704146_n[1].jpg

सकुरा, हे फोटो इथे टाकून काय साधणार आहात? ज्यांचे फोटो इथे टाकलेत त्यांच्या आईवडिलांना प्रॉब्लेम नसावा आणि त्या मुलांनाही नसावा. जिकडे हे फोटो मिळाले तिकडे विचारा बरं हा प्रश्न आणि खडसवा चांगलं. कसे ऐकत नाहीत तेच बघू.

ज्यांचे फोटो इथे टाकलेत त्यांच्या आईवडिलांना प्रॉब्लेम नसावा आणि त्या मुलांनाही नसावा<<<<<<नक्किच नसावा आणि बघणार्‍यांना ही असु नये फक्त एक ? आहे.तो ज्याने त्याने स्वता:हा ला विचारायचा आहे.
मी कोणालाही खडसवनार नाही तुमच्या पुरते सांगा तुम्हाला हा फोटो इथे पहायला नको आहे का? का?

मला तुम्ही असे अनेक फोटो टाकलेत म्हणून काहीही फरक पडत नाही. पण हे फोटो टाकून तुम्ही काहीही प्रबोधन करत नाही आहात.

सायो,ओके हे सांगितल्या बद्द्ल धन्यवाद.
सनव, म्हणुनच म्हटलेल आहे आप्पती असेल तर संपादित करते हे मी फेबु वरुन घेतलेले आहेत.

रंगपंचमीला पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून इथे रंगपंचमी/धुळवडीची सोय केलीस का, ऋन्मेष?
८ पानं भरून जे काही चाललंय ते वाचता तुला विचारावंसं वाटलं की अश्या चर्चा व्हाव्यात म्हणून काढला होतास हा धागा?

सध्या जी सगळीकडे होळी खेळली जाते त्यावर हिंदी मालिका, चित्रपटांचाच मोठा प्रभाव आहे. त्यामुळे जे उद्या होळी खेळणार ते सगळे संस्कृतीरक्षक असे जे कुणी मानत असतील त्यांना माझा साष्टांग दंडवत....

ज्याप्रमाणे गणपतीच्या मिरवणूकीत, दहीहंडीला दारू पिऊन नाचणारे जसे संस्कृती रक्षण करत नाहीत त्याचप्रमाणे फॅशनेबल कपडे घालून पाणी वाया घालवणारे होळीची शतकांनुशतके चालत आलेली प्रथा पाळायची म्हणून करत नाहीत. त्यांच्यासाठी हा इव्हेंट आहे.
अॅमॅझॉनवर गेलात तर कळेल..उद्याच्या दिवसासाठी खास तेले, पोस्ट होली हेअर केअर, बाथ अँड शॉवर, सनस्क्रीम, मिठाया, थंडाई, नमकीन, झालंच तर पांढरे कुडते आणि अगदीच काय तर पाण्यात खेळण्यासाठी खास चपलाही विकायला आहेत.

http://www.amazon.in/b/ref=br_imp_ara-1?_encoding=UTF8&node=5788258031&p...

तेव्हा प्लिजच हा हिंदु सणांवरचा हल्ला आहे असे वाटत असेल त्यांनी कृपया दोन पळ्या पाणी डोक्यात घालून घ्या.

८ पानं भरून जे काही चाललंय ते वाचता तुला विचारावंसं वाटलं की अश्या चर्चा व्हाव्यात म्हणून काढला होतास हा धागा?
>>>

दिवसभर मी बिजी होतो. ८ पाने पुर्ण अजून मी सुद्धा वाचली नाहीत. नंतर फुरसतीने वाचेनच, पण तुर्तास लोकांनी लोकांचे मत जाणून घ्यायच्या सोयीसाठी म्हणून पोल काढलाय.

असो, चर्चा घडते तेव्हाच जागरुकता येते. लोकांना चर्चेतून एखादा नवीन द्रुष्टीकोण, नवा विचार मिळू शकतो, आणि ते तो विचार आपल्या आधीच्या विचारांशी पडताळून बघू शकतात. चर्चा वाया कधीच जात नाही. भले आतल्या आठ पानांवर कितीही का गदारोळ होईना, उद्या जे रंगपंचमी खेळतील त्यांच्या डोक्यात कुठेतरी ईथली चर्चा घोळत असेल आणि त्याचा परीणाम म्हणून पाण्याचा अपव्यय कमी होण्यास मदतच होईलच.

कन्स्ट्रक्टिव्ह की कशी हा नंतरचा मुद्दा झाला, पण कोणी मोबाईलवरून ओझरते धाग्याचे शीर्षक जरी आज घाईघाईत वाचले असेल तरी ते उद्या त्याला आठवू शकते आणि याचा परीणाम सकारात्मक होऊ शकतो. किंवा कमीतकमी नकारात्मक तरी नक्कीच होणार नाही. असो, यावर सविस्तर उद्या बोलूया, तुर्तास शुभरात्री Happy

धुळवड न खेळुन एक दिवसा करता का होई ना, पाणी वाचवायचा खारीचा वाटा महत्वाचा ठरेनच.
आणी यात संदेवनशीलता पण आहे. जिकडे दुष्काळ आहे त्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत अस संदेश जातो.

पण हे फक्त अस एकच दिवस करुन थांबाय्च का?

खालचा तक्ता पहा.
water-consumption.jpg

पाणी वाचवायसाठी मग या गोष्टीपण करायला पाहिजेल, ज्यानी आपला वाटा फक्त खारीचाच रहानार नाही तर अजुन मोठा होईल, दुष्काळ भागातपण (जिथे शेती / लाईव्ह्स्टोक होते) पाणी वाचवले जाईलः

१.हेम्बरगर, कोफी, एरेटेड शीतपेये टाळाणे, खुप कमी करणे
२. कपडे जपून वापरणे, आपल्याकडे आहे पैसा म्हणुन कपडे खरेदी करणे, कपाटे भरुन ठेवणे, हे करु नये.
३. चपला, बुट यांचा पण जपुन वापर करने, पैसे आहेत म्हणुन जोड भरुन ठेवु नये.
४. मद्यप्राशन टाळणे.

अजुन अशा खुप गोष्टी असतील.

१ बादलित पाणित गुलाल टाकुन मुलाना होलि खेलु द्यावि, २/३ तास मजा करतिल १ बादलीत. बिचार्‍या मुलान्ना दिवाळित फटाके नको, होळित पाणि नको, दसर्‍याला अपटयाचे पान नको. काहि सोशल सहभाग नको आणी नन्तर आपणच बोलनार मुल नुसति TV आणी COMPUTER खेलतात. बाकि आपण रोज खुप काटकसरि करु शकतो.

< TV आणी COMPUTER खेलतात >
----- त्यामुळे विजेचा अपव्यय होतो....

पर्यावरण वाचवण्यासाठी गरजा शक्य तितक्या किमान ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे... हे दर दिवशी करणे गरजेचे आहे.

>>>> त्यामुळे जे उद्या होळी खेळणार ते सगळे संस्कृतीरक्षक असे जे कुणी मानत असतील त्यांना माझा साष्टांग दंडवत.... <<<<
वुईथ ड्यू रिस्पेक्ट टू युवर ओपिनियन , आशू, हेच वाक्य मी थोड फिरवुन वापरु पहातो की....

त्यामुळे जे उद्या होळी खेळणार नाहीत ते सगळेच "पाणी वाचवण्यात सहभागी असणार" वा त्यामुळेच पाणी वाचेल असे कुणी मानत असतील त्यांना माझाही साष्टांग दंडवत....

बाकी पाणी वाचविलेच पाहिजे या गोष्टीशी मी नुसता सहमत नाही, तर सहभागि असतोच, ते देखिल वर्षाचे ३६५ दिवस.

पाणी वाचविण्याकरता मोजके होळी/हिंदू सण जरा बाजुला ठेवुन अन्य किती ठिकाणी पाणी वाचविले जाउ शकते याबाबत वरी माणकु यांनी दिलेली एक पोस्ट बराच प्रकाश टाकतेच.

>>>> पर्यावरण वाचवण्यासाठी शक्य तितक्या किमान गरजा ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. <<<< या गोष्टीशी १००% सहमत. Happy एकुणातीलच जीवनशैली बदलणे हाच एक उपाय, नाही की अमक्यातमक्या सणांच्या वेळेसच फक्त जागे होणे.

पाण्याची बचत नेहमीच करायला पाहिजे. पण म्हणजे नक्की काय करायचे हे पण जाणुन घ्यायला पाहिजे.
नाहीतर एकाबाजुला चार थेंब वाचवायचे अन दुसर्‍याबाजुला ५० थेंब घालवतो याची माहितीच नाहि असे होते.

पाणी वाचविण्याकरता मोजके होळी/हिंदू सण जरा बाजुला ठेवुन अन्य किती ठिकाणी पाणी वाचविले जाउ शकते याबाबत वरी माणकु यांनी दिलेली एक पोस्ट बराच प्रकाश टाकतेच.

>>>> पर्यावरण वाचवण्यासाठी शक्य तितक्या किमान गरजा ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. <<<< या गोष्टीशी १००% सहमत. एकुणातीलच जीवनशैली बदलणे हाच एक उपाय, नाही की अमक्यातमक्या सणांच्या वेळेसच फक्त जागे होणे.

>>>

सहमत

उद्या मी-
मुलांना मनसोक्त रंग खेळू देणार. त्यांना तीन ते चार बादल्या पाणी लागेल. आणि धुवून काढायला चार बादल्या.

हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये सगळा स्टाफ मिळून रंग खेळायचो ते खेळू देणार नाही.

सकुरा, तुम्ही टाकलेले फोटो नक्कि होळीचेच आहेत का?
बहुधा नसावेत कारण आपल्या 'महान' संस्कॄतीत असली थेरे चालत नाहीत.

बायदिवे, मला एक छान उपमा सुचली, म्हणजे माझ्यामते छान हं, बाकिच्यांनी जसे वाटेल तसे वाटुन घ्यावे.
माझा ब्लॉगबिग अस्ता तर तिथेच टाकली असती.....
तर काये की....
नेमक्या हिंदू सणांचे वेळेसचे उपदेशाचे डोस, उपाय यांची तुलना मला आता केवळ एकाच गोष्टीबरोबर करता येऊ शक्त्ये, ती म्हणजे....
जगातील हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रदुषण कमी व्हावे म्हणून प्रत्येकाने "श्वास रोखुन धरण्यास" (उच्छ्वास सोडू नये) सांगण्यासारखे आहे हे सर्व. Proud

अगदी बरोबर लिंबू, श्वास रोखुन धरणे आणि आपले हिंदु सण साजरे न करणे यात काहीही फरक नाहीच्चे.
आधी श्वास रोखुन धरा नाहीतर तुम्हाला हिंदु सणांवर टिका करायचा नैतिक अधिकारच नहिये.

नेमके हिंदू सणांच्या वेळेसच हे "अक्कलेचे डोस" पाजणे का होते? अन वर दहा चुकानंतरचि अकरावी चुक का करावि हा वैचारिक शिरजोर पणा का?
बाकीच्या दहा नै तर शंभर चुका होताहेत, त्या आधि बंद करा ... ! स्मित
निव्वळ "धार्मिक" बाबींवर हल्लाबोल करायची ही फ्याडे आता पब्लिकलाही कळू लागली आहेत.
जिथे "धंदा' होतोय, पैका मिळतोय, तिथे एक शब्द विरोधाचा नाही, उलट त्यातच सामिल. पण हिंदु धार्मिक बाब आलिरे आलि की गेली काही वर्षे सातत्याने त्यावर नकारात्मक टीका.. हे एकतर्फी फार काळ चालू शकत नाही.

Pages