यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 March, 2016 - 15:48

आजचीच ताजी घटना. संध्याकाळची वेळ. किंचित उशीराची. ट्रेनचा जेमतेम भरलेला डबा. सारे प्रवासी आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेले. काही पेपर वाचत होते, काही मोबाईलवर लागले होते, तर काही बस्स उगाचच टिवल्याबावल्या करत होते. सारेच गर्दीत हरवलेले चेहरे. बस्स एक मुलगा सोडून.

दोनतीन ज्युनियर कॉलेजवयीन मुलांचा छोटासा ग्रूप होता. दोन मित्र शांतपणे बसलेले. आणि त्या एका उभ्या असलेल्या मुलाची टकळी चालू होती. पोरगा मराठी होता. चुरूचुरू बोलत होता. त्याच्या बडबडीची भाषा ओळखीची वाटत होती. कॉलेजच्या गप्पा, पोरींचे विषय, सरांची मस्करी, क्रिकेटच्या चर्चा रंगल्या होत्या. नव्हे तो एकटाच बोलत होता.

अचानक माझ्या समोर बसलेल्या एका माणसाला अचानक काय झटका आला देवास ठाऊक. पण वळला आणि त्याच्या मागे असलेल्या त्या बडबड करणार्‍या मुलाकडे बघून किंचाळला, "डू यू हॅव अ‍ॅनी प्रॉब्लेम ???"

सौथेंडीयन अ‍ॅक्सेंट !

मुलगा कावरा बावरा ..

तसा तो माणूस थ्री ईडियट्समधील वायरसच्या आवेशात पुन्हा किंचाळला, "डू यू हॅव अ‍ॅनी प्रॉब्लेम?"

मुलगा पुन्हा कावरा बावरा ..

नो प्रॉब्लेम .. नो प्रॉब्लेम ..

त्याचेही ईंग्लिश माझ्यासारखेच धन्य आहे हे मला पहिल्याच फटक्यात समजले.

"व्हाई आर यू शाऊटींग ??"

शाऊटींगचा मला माहीत असलेला अर्थ कर्रेक्ट असेल तर त्यावेळी तो माणूसच शाऊटींग करत होता.

आणि राहीला प्रश्न त्या मुलाचा तर कुठल्याही अ‍ॅंगलने त्याचे बोलणे हा गोंगाट वाटत नव्हता.

तरीही, ओके ओके .. बोलत तो मुलगा शांत झाला. बिचारा !.

त्याच्या बरोबरचे मित्रही साधेच असावे. कोणीही उलटून नडला नाही. तो माणूस मोठ्या रुबाबात पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये बिजी झाला. टिंग टिंग, टिंग टिंग. कसलासा गेम खेळत होता. विथ म्युजिक. खरे तर मला असे साऊंड ऑन ठेवून गेम खेळणार्‍यांची प्रचंड चीड येते. एकवेळ मोबाईलवर मोठ्या आवाजात लावलेली गाणी परवडतात. पण या विडिओगेम्सचा आवाजाने एकदा इरिटेट व्हायला सुरुवात झाली की ईरीटेट होतच राहते.

असो, तर त्यानंतर मी त्या मुलाकडे पाहिले. त्याची माझी नजरानजर झाली आणि तो ओशाळत हसला. मी सुद्धा हसलो. आता मी त्या माणसाकडे पाहिले. त्याची आणि माझीही नजरानजर झाली. त्या मुलाचे ओशाळलेपण कमी व्हावे, त्या माणसाला त्याने काही तीर मारला नाही याची जाणीव करून द्यावी, किंवा जे काही झाले ते मला रुचले नाही किमान एवढे तरी त्याला समजावे या हेतूने मी त्याच्याकडे बघून हसलो. पण जरा कुत्सितपणेच. तसा तो मलाही म्हणाला, ""व्हाई आर यू स्माईलिंग ??"

मी पुन्हा हसलो. पण आता मात्र प्रसन्नपणे हसलो. एखाद्यावर हसण्यासारखे दुसरे चिडवणे नाही जगात.

"एनी प्रॉब्लेम?" त्याने वैतागत पुन्हा विचारले.

मी माझ्या चेहर्‍यावरचे हास्य तसेच कायम ठेवत म्हणालो.., यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट !

- ऋन्मेष ’ -

..................

बरेच दिवस मनात होते बोलावे कोणाला तरी , आज ओठांवर आले Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे काय.... शाळेचे नाव लिहिले आहे ना? आणि माबोवरील नाव आहे तेच शाळेत सुध्दा. मित्र ही भरपुर आहेत त्यातील काही नावं आज घराघरात माहित आहेत.

त्यांना माझे नाव आणि मी माहित आहे. Happy

रामदेव बाबा Proud

नरेश माने, शारदाश्रम मध्ये कधी दिसला नाहीत. ईंग्लिश मिडीयमला होता का?

बाकी आपण लोकमान्य टिळकांप्रमाणे बाकावर उभे राहायला बाणेदारपणे नकार द्यायला हवे होते.

ह्या ऋ च्या पोस्ट्स वाचून कधी कधी मला हा साईप्रसाद सारखा वाटतो .
( सन्दर्भ : का रे दूरावा आणि "तुम्ही न पाहिलेल्या माबोकरांच्या व्यक्तीमत्वाची तुमच्या मनातील प्रतिमा" )

ऑ? असं काही मला म्हणायचं नव्हतंं. पण हे ही खरंच आहे. Happy

मी फक्त वर तु 'ऋ च्या पोस्ट्स वाचून कधी कधी मला हा साईप्रसाद सारखा वाटतो .' असं लिहिलंयस त्याला +१ करुन अनुमोदन दिलंय.

बाकी "दोन मुलींच्या मध्ये बसायची" शिक्षा मी कधीच ऐकली / पाहिली नाही.साधारण कितवीच्या मुलांपर्यंत देतात ही शिक्षा >>>>> जो पर्यंत मुलांना २ मुलीं मधे बसणे अपमानास्पद आणि शिक्षा वाटते, तो पर्यंत. Lol

जेव्हा ही शिक्षा incentive वाटायला लागते, साधारण हायस्कुल मधे, तेव्हाच बंद होते

मने Lol

जेम्स बाँड, नशीब शिर्डीला नाही पोहोचलात. आणि तिथल्या साईचा प्रसाद नाही म्हणालात..
तरी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, दुनियादारीतील मी साई नाही तर रिशी पकूर आहे ,..

किस्सा आवडला.. पण एखादा माथेफिरू असता तर पुढच संभाषण किंवा वाद वाढला असता..

माझ्या बाबतीत थोड उलट घडल होत.. २-३ बायका जोरजोरात गप्पा मारत होत्या. त्यातली एक दुसर्याच कोपर्यात..या टोकापासून त्या टोकापर्यंत ... अगदी नॉन -स्टोप. त्या काही थांबणार नाहीत म्हणून मग मी.. "टीडिंग" असा काहीसा आवाज करणारा गेम चालू केला.. मुली खेळतात तेव्हा त्यांना मज्जा वाटते त्या आवाजाची, मला मात्र चीड येते तोच फोर्मुला यांना अप्लाय झाला. एकीने विनंती केली, "आवाज बंद कर डिस्टर्ब होतंय .." मी म्हटलं, "तुमच्या अखंड वार्तालापाने मीही अशीच डिस्टर्ब होतेय म्हणून माइंड फ्रेश होण्यासाठी खेळतेय" पुढच्या पाच मिनिटात त्यांची बडबड कमी झाली.

Pages