आजचीच ताजी घटना. संध्याकाळची वेळ. किंचित उशीराची. ट्रेनचा जेमतेम भरलेला डबा. सारे प्रवासी आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेले. काही पेपर वाचत होते, काही मोबाईलवर लागले होते, तर काही बस्स उगाचच टिवल्याबावल्या करत होते. सारेच गर्दीत हरवलेले चेहरे. बस्स एक मुलगा सोडून.
दोनतीन ज्युनियर कॉलेजवयीन मुलांचा छोटासा ग्रूप होता. दोन मित्र शांतपणे बसलेले. आणि त्या एका उभ्या असलेल्या मुलाची टकळी चालू होती. पोरगा मराठी होता. चुरूचुरू बोलत होता. त्याच्या बडबडीची भाषा ओळखीची वाटत होती. कॉलेजच्या गप्पा, पोरींचे विषय, सरांची मस्करी, क्रिकेटच्या चर्चा रंगल्या होत्या. नव्हे तो एकटाच बोलत होता.
अचानक माझ्या समोर बसलेल्या एका माणसाला अचानक काय झटका आला देवास ठाऊक. पण वळला आणि त्याच्या मागे असलेल्या त्या बडबड करणार्या मुलाकडे बघून किंचाळला, "डू यू हॅव अॅनी प्रॉब्लेम ???"
सौथेंडीयन अॅक्सेंट !
मुलगा कावरा बावरा ..
तसा तो माणूस थ्री ईडियट्समधील वायरसच्या आवेशात पुन्हा किंचाळला, "डू यू हॅव अॅनी प्रॉब्लेम?"
मुलगा पुन्हा कावरा बावरा ..
नो प्रॉब्लेम .. नो प्रॉब्लेम ..
त्याचेही ईंग्लिश माझ्यासारखेच धन्य आहे हे मला पहिल्याच फटक्यात समजले.
"व्हाई आर यू शाऊटींग ??"
शाऊटींगचा मला माहीत असलेला अर्थ कर्रेक्ट असेल तर त्यावेळी तो माणूसच शाऊटींग करत होता.
आणि राहीला प्रश्न त्या मुलाचा तर कुठल्याही अॅंगलने त्याचे बोलणे हा गोंगाट वाटत नव्हता.
तरीही, ओके ओके .. बोलत तो मुलगा शांत झाला. बिचारा !.
त्याच्या बरोबरचे मित्रही साधेच असावे. कोणीही उलटून नडला नाही. तो माणूस मोठ्या रुबाबात पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये बिजी झाला. टिंग टिंग, टिंग टिंग. कसलासा गेम खेळत होता. विथ म्युजिक. खरे तर मला असे साऊंड ऑन ठेवून गेम खेळणार्यांची प्रचंड चीड येते. एकवेळ मोबाईलवर मोठ्या आवाजात लावलेली गाणी परवडतात. पण या विडिओगेम्सचा आवाजाने एकदा इरिटेट व्हायला सुरुवात झाली की ईरीटेट होतच राहते.
असो, तर त्यानंतर मी त्या मुलाकडे पाहिले. त्याची माझी नजरानजर झाली आणि तो ओशाळत हसला. मी सुद्धा हसलो. आता मी त्या माणसाकडे पाहिले. त्याची आणि माझीही नजरानजर झाली. त्या मुलाचे ओशाळलेपण कमी व्हावे, त्या माणसाला त्याने काही तीर मारला नाही याची जाणीव करून द्यावी, किंवा जे काही झाले ते मला रुचले नाही किमान एवढे तरी त्याला समजावे या हेतूने मी त्याच्याकडे बघून हसलो. पण जरा कुत्सितपणेच. तसा तो मलाही म्हणाला, ""व्हाई आर यू स्माईलिंग ??"
मी पुन्हा हसलो. पण आता मात्र प्रसन्नपणे हसलो. एखाद्यावर हसण्यासारखे दुसरे चिडवणे नाही जगात.
"एनी प्रॉब्लेम?" त्याने वैतागत पुन्हा विचारले.
मी माझ्या चेहर्यावरचे हास्य तसेच कायम ठेवत म्हणालो.., यूह नीड ए सायकिअॅट्रीस्ट !
- ऋन्मेष ’ -
..................
बरेच दिवस मनात होते बोलावे कोणाला तरी , आज ओठांवर आले 
>>पॉलिटीशियन होशील
>>पॉलिटीशियन होशील बरं...वर्षू नील यांनी अगदी स्पेसिफीक प्रश्न विचारला - पब्लिक प्लेस मध्ये सीट वर पाय ठेवतोस ??? उत्तर सरळ टाळलेस की. कचराकुंडीचा, झोपडपट्टीचा आणि तू सीटवर पाय ठेवायचा संबंध तरी काय??>> सहमत.
>>जेव्हा ती राष्ट्रीय संपत्ती ट्रेन तेथील नागरीकांचा जीव घ्यायला सुरुवात करेन, तेव्हा त्यांचे आपल्या राष्ट्रीय संपत्तीवर किती प्रेम शिल्लक राहते हे समजेल..>> काहीही बोलायचं का रे? मुंबईतल्या लोकल्स वर पडत असलेला अतिरिक्त भार हा वेगळा चर्चेचा विषय आहे. पण लोकल ट्रेन मधे लटकून प्रवास करा / केला तरी चालेल असे भारतीय रेल्वे अजिबात म्हणत नाही. तेव्हा राष्ट्रीय संपत्ती नागरिकांचा जीव घेते वगैरे अतिरंजित बोलाययची काहीही गरज नाही.
पण लोकल ट्रेन मधे लटकून
पण लोकल ट्रेन मधे लटकून प्रवास करा / केला तरी चालेल असे भारतीय रेल्वे अजिबात म्हणत नाही. तेव्हा राष्ट्रीय संपत्ती नागरिकांचा जीव घेते वगैरे अतिरंजित बोलाययची काहीही गरज नाही.
>>>>
मी लोकांनी पाय सीटवर ठेवायचे समर्थन करत आहे आणि तुम्ही ट्रेनमधून पडून लोकं मरताहेत याबाबत सरकारचा काही दोष नाही याचे समर्थन करत आहात
मान्य असेल तर ठिक अन्यथा सविस्तर लिहितो. सध्या मोबाईलवरच असल्याने कमीत कमी लिहायचा प्रयत्न.
ट्रेन, बस वैगेरे पब्लिकप्लेस
ट्रेन, बस वैगेरे पब्लिकप्लेस मधे ऋ घरी करतो त्या काय काय गोष्टी करतोय हे इमॅजिन करुन लैच हसु आलं. >>>> सस्मित, इथे लिहायची काय गरज होती यार? आता मलाही इमॅजिन कराव लागणार ना कंपल्सरी..

अरे मुग्धटली तिने लिहिले तर
अरे मुग्धटली तिने लिहिले तर लिहिले पण तुम्ही कशाला रीपीट करत आहात.. आता मलाही इमॅजिन होऊ राहिलेय की मी ट्रेन मध्ये लेंगा बनियानवर बसून ब्रश करतोय, खिडकीतून डोकावून पचापच चुळा भरतोय, पाणी उडून मागे गेल्याने तिथून एक जण शिव्या घालतोय, आणि मी तोंडात पाण्याची चुळणी भरलेल्या अवस्थेतच त्याला ऊं ऊं करून हातानेच सॉरी बोलतोय.. डिजगस्टींग.. असा नाहीये मी

ए कायच्या काय
ए कायच्या काय
अरे मी लिहिलय ना कराव लागणार
अरे मी लिहिलय ना कराव लागणार ऑप्शनच नाही
अरेरे मी इथे फक्त वाचायचे,
अरेरे
मी इथे फक्त वाचायचे, प्रतिक्रिया द्यायची नाही ठरवलं होतं पण काही प्रतिसाद वाचून हसायला आले.
लेख मस्त. ऋन्मेष, हर्पेन यांनी अनवाणी शब्द वापर सांगितलं ते पटलं.
सीटवर पाय आणि computerच्या पंख्यांचा असा वापर करतोस हे काही पटलं नाही.
ऋन्मेष, तू नेमका कशकशाचा असा
ऋन्मेष, तू नेमका कशकशाचा असा लोकांच्या मते अतरंगी वापर करतोस ते लिहूनच टाक.

म्हणजे घाऊकमध्ये ईईईई करता येईल!
अंजू हो. ते अनवाणी योग्यच
अंजू हो. ते अनवाणी योग्यच आहे. पण तेवढेच जरा मला लिहिताना राजकुमारचा फील येतो, आप के नंगे पाव इस जमी पे मत रखिये. मैले हो जायेंगे. इसलिये सीट पे रखिये
एक प्रश्न विचारतो सर्वांना - आतापर्यंत या चर्चेत भाग घेतलेल्या सर्वांनी उत्तर द्या हं
लांबच्या पल्ल्याच्या गाड्या जिथे झोपायची सोय असते. तिथे पायांनी सीट खराब होत नाहीत का? वरच्या सीटवर जाणारे तर खालच्या सीटवर पाय देऊनच चढतात. तसेच झोपतानाही पाय सीटवर ठेवला जातोच. कोणी भिंतीला तंगड्या लावून नाही झोपत. मग अश्यावेळी काय ?
पुरता अपेक्षाभंग झाला. मला
पुरता अपेक्षाभंग झाला.
मला वाटले तुला तुझी गर्ल्फ्रेंडने बोलले असेल म्हणून.
असो.. तुझ्या शेवटच्या ओळीवरून तु कुठेतरी परतावा केल्याचे समाधान दिसून आले
ऋन्मेष...... यू नेव्हर स्टॉप
ऋन्मेष...... यू नेव्हर स्टॉप डिफेंडिंग युअरसेल्फ ना....
तू लोकल ट्रेन विषयी लिहिलं होतं , सर्व कमेंट्स त्या संदर्भात होत्या.. उगीच विषय बदलून तुझंच कसं बरोबरे असं सिद्ध करायचंय का तुला..
लहानपणी पाहिलेल्या ट्रेन्स मधे लांब पल्ल्याच्या ट्रेन्स मधे जिना/शिडी असते ना चढायला वरच्या बर्थ करता?? आणी लोकं बहुतेक त्यांच्याच चादरी किंवा काहीतरी अंथरून मग त्यावर पाय सरळ करून झोपतात ना?? का डायरेक्ट सीटवरच झोपतात??
तेंव्हा रेल्वे कडून गुबगुबीत स्वच्छ गादी, स्वच्छ ब्लँकेट्स वगैरे मिळायच्या.. म्हंजे थोडक्यात डायरेक्ट सीट्स् वर पाय ठेवलेले नाही बघितले..
वर्षू, अहो एसी
वर्षू, अहो एसी फर्स्टक्लासमध्ये असतात अंथरूण पांघरूण. नॉन एसी स्लीपरमध्ये नसतात. काहीवेळा पैसे देऊन मिळतात ती गोष्ट वेगळी. किंवा काही जण घरून घेऊन येतात. अन्यथा लोकं तश्याच तंगड्या पसरतात. आणि हो शिडी अशी नसते. साईडला दांड्या असतात ज्या फार कमी वापरल्या जातात. खालच्या सीटवर आपलाच माणूस असेल तर वापरल्याही जात नाहीत. थोडक्यात आपले घरच आहे अश्या पद्धतीनेच तेव्हा लोकांचा वावर असतो.
आणि हो, जनरलमध्ये तर विचारूच नका. तिथे वरच्या सीटवर कोणाचे झोपायचे रिझर्वेशन नसल्याने तिथे पाय ठेवूनच लोक बसलेले असतात
इथे माझे तेच खरे खोटे असे काही नाही. आपण विविध पैलूंवर चर्चा करत आहोत.
चांगले लिहिलय....
चांगले लिहिलय....
ऋ अरे, हे म्हणजे हा कचरा
ऋ अरे, हे म्हणजे हा कचरा टाकतोय रस्त्यात तर मी का नको असं झालय. प्रत्येकाने स्वतः पासून सुरवात केली पाहिजे. आत्ता पर्यंत तु तुला कोणी सांगितले तर घेतोसच ना खाली पाय आता सांगायची वाटच पाहू नकोस. खालीच ठेव म्हणजे प्रश्नच मिटला. पायांना आराम वैगेरे गोष्टी घरी जाऊन करायच्या.
पायांना आराम वैगेरे गोष्टी
पायांना आराम वैगेरे गोष्टी घरी जाऊन करायच्या. >>
स्वतःच्या लिही प्लीज. नायतर कधी आपल्याकडे गटगला आला तर टीपॉयवर तंगड्या पसरून बसायचा की आपल्यावर नौ नंबर का जूता शोधायची वेळ...

कठीण आहे ब्वा ऋन्मेष, तुला
कठीण आहे ब्वा ऋन्मेष, तुला चांगला सल्ला देणाऱ्यांचं ;). तू फिरून तुझंच कसं खरं ते सांगणार.
सीमंतीनी
सीमंतीनी
ऋ अरे, हे म्हणजे हा कचरा
ऋ अरे, हे म्हणजे हा कचरा टाकतोय रस्त्यात तर मी का नको असं झालय
>>>>>>
नाही मनीमोहोर. हे एक्चुअली तसे नाहीये. म्हणजे तो करतो तर मी का नाही असे नाही म्हणत आहे मी. .. तर तिथे चालते तर इथे का नाही असे म्हणत आहे. हा एक बघण्याचा द्रुष्टीकोण आहे. लोकल ट्रेन फक्त बसण्यासाठी असतात आणि तिथे झोपायची सोय नसते त्यामुळे तिथे पाय पसरणे आपण चुकीचे समजतो. पण तेच लांब पल्ल्याच्या ट्रेन झोपायसाठी असल्याने तिथे पाय पसरताना सीट खराब होईल का हा विचार मनात येतच नाही. जे साहजिकच आहे. पण प्रत्यक्षात तिथेही सीट तेवढीच खराब होते जेवढी लोकलमध्ये पाय पसरल्याने. पण ती तशी वापरली जाणारच हे सर्वांनीच गृहीत धरले असते.
इथे कोणाच्या दैवी भावना दुखवायचा हेतू नाही पण स्थळकाळानुसार आपले विचार कसे बदलतात याचे आणखी एक उदाहरण देतो. बरेच मंदीरात आपण पाहतो की दर्शनाला आलेले भाविक तिथे जमिनीवरच मांड्या वगैरे घालून बसतात. त्या जमिनीवर कित्येक जण अनवाणीच नाही तर मोजे घातलेले पायांनीही फिरत असतात. पण तेव्हा तो कुठलाही विचार न करता तिथे बसतातच लोकं
अजून एक गंमतीशीर उदाहरण म्हणजे मला शाळेत असताना बाईंनी कितीवेळा बाकावर उभे केले असेल याची गिणती नाही. मग चुकीची शिस्त शाळेतूनच लागली असे म्हणायचे का
काहीही काय! शाळेत बाईंनी तुला
काहीही काय! शाळेत बाईंनी तुला स्वतःच्या बाकावर उभे केले का दुसर्याच्या? तूच बसणार ना ज्या बाकावर उभे केले तिथे. स्वतःच्या पायाची घाण स्वतः साफ करावी लागली तर ठीकच आहे. चरणकमल धूल मागितली नसताना देणे हे तर प्रभू रामचंद्राने पण केले नाय.
जपून पाय ठेव बरं इथे तिथे एखादे दिवशी बाकातून एखादी अहिल्या निर्माण व्हायची.
जपून पाय ठेव बरं इथे तिथे
जपून पाय ठेव बरं इथे तिथे एखादे दिवशी बाकातून एखादी अहिल्या निर्माण व्हायची.
सीमंतिनी अपेक्षित शंका. मी
सीमंतिनी अपेक्षित शंका. मी आधीच्या पोस्टमध्येच सविस्तर लिहिणार होतो. पण शंकानिरसन करायचे समाधान/पुण्य मला गमवायचे नव्हते.
आमच्याकडे रोटेशन पॉलिसी होती. दररोज एकेक बाक पुढे सरकायचे. किंवा काही वेळा मागच्याला दिसणार नाही म्हणून मला सर्वात शेवटच्या बाकावर उभे केले जायचे आणि तेथील मुलाला माझ्या जागेवर तात्पुरते बसवले जायचे. पिरीअड संपला की तो आपल्या जागी परत जिथे मी चक्क अर्धा तास उभा असायचो. तसेच त्याला जागा साफ करून द्यावी अशीही काही तरतूद नसायची वा त्याचीही तशी काही मागणी नसायचीम् कारण लहानपणी आपली मनेच साफ असतात
अवांतर - तसेच आणखी एक गंमतीशीर नियम होता. एका बाकावर तीन जण बसायचे ते असे की दोन मुलांच्या मध्ये एक मुलगी आणि दोन मुलींच्या मध्ये एक मुलगा बसणार. त्यातही खोडकर आणि मस्तीखोर मुलगा दोन मुलींच्या मध्ये बसणार या उपनियमाला अनुसरून माझ्या बाजूला दोन मुली बसायच्या आणि मी कंबरेवर हात ठेवून मध्ये बाकावर उभा. शालेय जीवनाच्या आठवणीतील मनावर कोरले गेलेले एक स्वर्गीय अन विलोभनीय द्रुष्य
वाह क्या बात है ऋन्मेष,
वाह क्या बात है ऋन्मेष, दंडवत. आज मी इथे उंडारतेय. आता जाते दुसरीकडे वाचायला.
ही शेवटची पोस्ट मस्त आहे
ही शेवटची पोस्ट मस्त आहे ऋन्मेष!

बालिस्टर का नै झालारे?
बालिस्टर का नै झालारे?
चौथ्या इयत्तेत असताना मला अशी
चौथ्या इयत्तेत असताना मला अशी शिक्षा दिली होती "दोन मुलींच्या मध्ये बसायची."
ऋन्मेष माझाच ड्युआय आहे की काय अशी शंका आली कारण सातवीत संपुर्ण वर्ष गणिताच्या तासाला मागच्या बाकावर उभे राहण्याची शिक्षा भोगलेली आहे.
पण लोकलमध्ये बसण्याच्या जागेवर पाय ठेवण्याचे समर्थन मान्य नाही.
नरेश बाकावर पाय ठेउन उभे
नरेश बाकावर पाय ठेउन उभे होतात की कसे?

आता तिथे वर्षभर शिर्षासन
आता तिथे वर्षभर शिर्षासन घालायला मी काही रामदेवबाबा नाही.
(No subject)
बाकी "दोन मुलींच्या मध्ये
बाकी "दोन मुलींच्या मध्ये बसायची" शिक्षा मी कधीच ऐकली / पाहिली नाही.
साधारण कितवीच्या मुलांपर्यंत देतात ही शिक्षा
सस्मित, वर्गात जास्त मस्ती
सस्मित, वर्गात जास्त मस्ती करणार्या मुलांना ही शिक्षा सुनावण्यात येई, इयत्ता चौथी. शाळेचे नाव शारदाश्रम विद्यामंदिर, दादर, मराठी माध्यम. 1987 ची गोष्ट.
पाचवीपासून मुलांची आणि मुलींची शाळा वेगळी.
Pages