यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 March, 2016 - 15:48

आजचीच ताजी घटना. संध्याकाळची वेळ. किंचित उशीराची. ट्रेनचा जेमतेम भरलेला डबा. सारे प्रवासी आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेले. काही पेपर वाचत होते, काही मोबाईलवर लागले होते, तर काही बस्स उगाचच टिवल्याबावल्या करत होते. सारेच गर्दीत हरवलेले चेहरे. बस्स एक मुलगा सोडून.

दोनतीन ज्युनियर कॉलेजवयीन मुलांचा छोटासा ग्रूप होता. दोन मित्र शांतपणे बसलेले. आणि त्या एका उभ्या असलेल्या मुलाची टकळी चालू होती. पोरगा मराठी होता. चुरूचुरू बोलत होता. त्याच्या बडबडीची भाषा ओळखीची वाटत होती. कॉलेजच्या गप्पा, पोरींचे विषय, सरांची मस्करी, क्रिकेटच्या चर्चा रंगल्या होत्या. नव्हे तो एकटाच बोलत होता.

अचानक माझ्या समोर बसलेल्या एका माणसाला अचानक काय झटका आला देवास ठाऊक. पण वळला आणि त्याच्या मागे असलेल्या त्या बडबड करणार्‍या मुलाकडे बघून किंचाळला, "डू यू हॅव अ‍ॅनी प्रॉब्लेम ???"

सौथेंडीयन अ‍ॅक्सेंट !

मुलगा कावरा बावरा ..

तसा तो माणूस थ्री ईडियट्समधील वायरसच्या आवेशात पुन्हा किंचाळला, "डू यू हॅव अ‍ॅनी प्रॉब्लेम?"

मुलगा पुन्हा कावरा बावरा ..

नो प्रॉब्लेम .. नो प्रॉब्लेम ..

त्याचेही ईंग्लिश माझ्यासारखेच धन्य आहे हे मला पहिल्याच फटक्यात समजले.

"व्हाई आर यू शाऊटींग ??"

शाऊटींगचा मला माहीत असलेला अर्थ कर्रेक्ट असेल तर त्यावेळी तो माणूसच शाऊटींग करत होता.

आणि राहीला प्रश्न त्या मुलाचा तर कुठल्याही अ‍ॅंगलने त्याचे बोलणे हा गोंगाट वाटत नव्हता.

तरीही, ओके ओके .. बोलत तो मुलगा शांत झाला. बिचारा !.

त्याच्या बरोबरचे मित्रही साधेच असावे. कोणीही उलटून नडला नाही. तो माणूस मोठ्या रुबाबात पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये बिजी झाला. टिंग टिंग, टिंग टिंग. कसलासा गेम खेळत होता. विथ म्युजिक. खरे तर मला असे साऊंड ऑन ठेवून गेम खेळणार्‍यांची प्रचंड चीड येते. एकवेळ मोबाईलवर मोठ्या आवाजात लावलेली गाणी परवडतात. पण या विडिओगेम्सचा आवाजाने एकदा इरिटेट व्हायला सुरुवात झाली की ईरीटेट होतच राहते.

असो, तर त्यानंतर मी त्या मुलाकडे पाहिले. त्याची माझी नजरानजर झाली आणि तो ओशाळत हसला. मी सुद्धा हसलो. आता मी त्या माणसाकडे पाहिले. त्याची आणि माझीही नजरानजर झाली. त्या मुलाचे ओशाळलेपण कमी व्हावे, त्या माणसाला त्याने काही तीर मारला नाही याची जाणीव करून द्यावी, किंवा जे काही झाले ते मला रुचले नाही किमान एवढे तरी त्याला समजावे या हेतूने मी त्याच्याकडे बघून हसलो. पण जरा कुत्सितपणेच. तसा तो मलाही म्हणाला, ""व्हाई आर यू स्माईलिंग ??"

मी पुन्हा हसलो. पण आता मात्र प्रसन्नपणे हसलो. एखाद्यावर हसण्यासारखे दुसरे चिडवणे नाही जगात.

"एनी प्रॉब्लेम?" त्याने वैतागत पुन्हा विचारले.

मी माझ्या चेहर्‍यावरचे हास्य तसेच कायम ठेवत म्हणालो.., यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट !

- ऋन्मेष ’ -

..................

बरेच दिवस मनात होते बोलावे कोणाला तरी , आज ओठांवर आले Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विठठलजी घराच्या साफसफाईचे उदाहरण देताना गल्लत होतेय. ट्रेनमध्ये समोरची सीट साफ करणे हा आपला हेतू नसतो. तर कम्फर्ट मिळवणे हा हेतू असतो. त्यात ती सीट खराब होईलच असे नाही असे म्हणायचेय मला.

रुनम्या, ती जपानी कथा निट वाच रे बाबा. आपण सीट वर पाय ठेऊन इतरांचा अपमान करीत असतो.

या आपल्या धूळभरल्या देशात किती जणांचे पाय/चपला स्वच्छ असणार आहेत.

तो खास ऋन्मेऽऽष टच् आहे. उदा. हाल्फ असे लिहिणे. हल्ली हा टच् मायबोलीवर लोकप्रिय होऊ पाहतोय. रसप यांनी त्यांच्या आताच्या नीरजा या चित्रपटपरीक्षणाच्या लेखात चक्क लेंग्थ असा शब्द वापरलाय.>>>
असो माबो खुप सहिस्णु आहे Wink (हा शब्द मला माहिती व्ह्यायला २०१५ उजाडाव लागलं..;) )>>>>>

"We treat the government's property as our own

एक्झॅक्टली !
आपणही तेच करतो. घरी नाही का सोप्यावर बसताना समोरच्या टीपॉयवर तंगड्या पसरतो. बस्स तोच कम्फर्ट मिळवतो या धकाधकीच्या जीवनात.>>>>>

आवो मग तो टग्या पण त्याच्याच घरात बसल्यासारखा टींव टींव वाजवत (त्याच्याच) मोबाइलवर गेम खेळत होता ना. मग त्याला का ब्वॉ मनोविकारतज्ञाला भेटण्याचा सल्ला दिलात.(सल्लागार)
आणि तुम्ही असे पादकमल (हा आमचा अक्सेंट आहे, प्लिज नोट) ठेउन कंफर्ट घेत असलात आणि कोणी 'यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट !" म्हटलं तर काय वाटेल?

आवो मग तो टग्या पण त्याच्याच घरात बसल्यासारखा टींव टींव वाजवत (त्याच्याच) मोबाइलवर गेम खेळत होता ना. मग त्याला का ब्वॉ मनोविकारतज्ञाला भेटण्याचा सल्ला दिलात.(सल्लागार)
आणि तुम्ही असे पादकमल (हा आमचा अक्सेंट आहे, प्लेज नोट) ठेउन कंफर्ट घेत असलात आणि कोणी 'यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट !" म्हटलं तर काय वाटेल? Lol Lol Lol Lol

ऋ, मला पण नाही आवडत सीट वर पाय घेऊन बसलेलं कोणी. कहर म्हणजे जिथे सीट वर पाय घेऊन बसु नका असं लिहीलेलं असतं त्याच्याच खाली लोकं सीटवर पाय ठेवतात. ( स्मित)

अशी मानस दुसर्‍याचे निर्व्याज हसुन, बोलण पाहु शकत नाहित
मोठ्यांच्या धाकाणे लहानपणी ते अशा सुखापासुन वंचित राहिलेली असावीत म्हणुन ते असा दुसर्‍यांना धाक दाखवतात
खरेच यांना सायकिअ‍ॅट्रीस्टची गरज असते.

ऋ, मला पण नाही आवडत सीट वर पाय घेऊन बसलेलं कोणी. कहर म्हणजे जिथे सीट वर पाय घेऊन बसु नका असं लिहीलेलं असतं त्याच्याच खाली लोकं सीटवर ठेवतात.>>>>> मी सुध्दा हेच लिहायला आलो होतो. ट्रेन मध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेले असते कृपया बसण्याच्या जागेवर पाय ठेऊ नये. जर सुशिक्षित लोकांना हे वाचून सुध्दा त्याचे निलाजरे समर्थन करायचे असेल तर त्यांना खरंच मनोविकारतज्ञाची गरज आहे.

यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट ! हे धाग्याचे शिर्षक खरंतरं ऋन्मेष तुझ्याकरिताच आहे.

अशा प्रकारची भारतातील निवडक ,जबाबदार्,देशभक्त प्रजा असली तर "स्वच्छ भारत अभियान" ३००५ पर्यंत यशस्वी न होण्यास हरकत नाही

एकदा लिस्टच करा कोणाकोणाला न्यायचे ते दाक्तरांकडे.

पुर्वी गर्दी नसायची फर्स्टमध्ये तेव्हा लोकांचे चांगले बूट चोरीला गेलेत.
एकदा विरारला जाताना बोरिवलीला उठून उभ्या असलेल्या माणसास जागा दिली." नया है क्या?" तिकीटच काढून दाखवले तर जोरात हसला." सेंट्रल रेल्वेसारखे इकडे जागा देत नाहीत.!"

अवांतर (?):
तसं सायकीअ‍ॅट्रीस्ट कडे जाणे आपल्याकडे कमीपणाचं मानलं जातं. म्हणुनच यू निड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट असं म्हणणं अपमानकारक मानल्या जातं. त्यामुळे कदाचित कित्येक लोक छोटा मोठा प्रॉब्लेम असूनही सायकीअ‍ॅट्रीस्ट कडे जाणे टाळत असावेत.

याविषयावर वेगळा धागा होऊ शकेल - इच्छुकांनी नोंद घ्यावी.

याविषयावर वेगळा धागा होऊ शकेल - इच्छुकांनी नोंद घ्यावी.>>>
त्यांना अशा क्षुलक नोदींची गरज नसते, कळा सुरु झाल्या की धागा जन्मतो Wink

अग्नीपंख, काहीतरी गल्लत होतेय का?
तो माणूस ट्रेनमध्ये मोबाईलवर गेम खेळत होता म्हणून त्याला मी सायकिएट्रीस्टकडे पाठवत नाहीये. त्याचे कारण त्या मुलावर क्षुल्लक कारणासाठी किंवा कारण नसताना वाईट पद्धतीने डाफरण्याबाबत होते. त्या माणसाचा मोबाईलगेम छंदही कसा एखाद्याला इरीटेट करू शकतो हे विरोधाभास दाखवायला सांगितले.

याऊपर मी सीटवर पाय ठेवण्याचे स्पष्ट समर्थन कुठेही केले नाही. मी स्वता नंगे पाव सीटवर ठेवतो असे लिहिले आहे. मी जे करतो ते बरोबरच असा माझा अट्टाहास नाहीये. हवे तर यालाही माझ्या वाईट सवयी लेखमालेत घेतो. गूड आयडीया, सार्वजनिक जागी केलेले बेशिस्त वर्तन. मिळाला पुढचा लेख. असो. किंबहुना मी वरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की मला कोणी तसे पाय ठेवण्यावरून सुनावले वा विरोध केला तर मी प्रतिवाद न करता त्याचे ऐकतो.

मी स्वता नंगे पाव सीटवर ठेवतो असे लिहिले आहे
>>
अरे त्याला कोणीतरी भेटले असेल, "आपके पाव देखे. बहुत हसीन है. इन्हे झमीन पर मत उतारीयेगा. मैले हो जायेंगे" म्हणणारे! म्हणुन तो असे करत असेल!

एकदा विरारला जाताना बोरिवलीला उठून उभ्या असलेल्या माणसास जागा दिली." नया है क्या?" तिकीटच काढून दाखवले तर जोरात हसला." सेंट्रल रेल्वेसारखे इकडे जागा देत नाहीत.!"

>>

People do offer seat after bandra while travelling from virar to churchgate.

अग्नीपंख
ते मोजे मोजे वर अवलंबून आहे. एखाद्याचे पाय माझ्या मोज्यांपेक्षाही घाण असू शकतात.

शक्यतो माझे मोजे चांगलेच असतात. कारण रोज धुतो. ऑफिसला कमी गर्दीच्या ट्रेनने जातो. दिवसभर एमेनसीतल्या एसी मध्ये बसतो. त्यातही अध्येमध्ये बोअर झालो तर बूट काढतो, मोजे काढून सीपीयूच्या पंख्यावर लटकवतो, आणि मांडी घालून खुर्चीत बसतो. थोडक्यात कमीत कमी खराब होतात. अगदी एमर्जन्सीमध्ये माझ्या ब्रांडेड रुमालाने धोखा दिला तर त्याला पर्याय म्हणूनही मोजे वापरू शकतो ईतका विश्वास कमावलाय त्यांनी गेल्या काही वर्षांत..

आणि हो, त्यातूनही जेव्हा माझे मोजे थोडेफार खराब असतात तेव्हा त्यांचे प्रदर्शन मांडायला मी बूट पायातून काढतच नाही. त्यामुळे सीटवर बूटाचे पायही ठेवत नाही.

तसेही, जेव्हा चप्पल असते तेव्हाच पटकन पाय मोकळे करत सीटवर ठेवायचा मोह होतो. अन्यथा शूज काढायचा आळसच येतो..

मला पण नाही आवडत सीट वर पाय घेऊन बसलेलं कोणी. कहर म्हणजे जिथे सीट वर पाय घेऊन बसु नका असं लिहीलेलं असतं त्याच्याच खाली लोकं सीटवर पाय ठेवतात. >>>>>>+१.
ज्या जागेवर कोणी पाय ठेवले असतील तिथे बसायला घाणच वाटते.

ऋन्मेष, छान लिहिला आहेस लेख. असे बरेच नग बर्याच ठिकाणी भेटतात, ज्यांना सायकॅट्रीस्टची गरज आहे हे सांगावसं वाटतं.

>>त्यातही अध्येमध्ये बोअर झालो तर बूट काढतो, मोजे काढून सीपीयूच्या पंख्यावर लटकवतो, >> फोटो टाक ना रे ह्याचा. भर ऑफिसात कोणी मोजे सी पी यु वर टाकुन बसलाय ही कल्पनाच भारी आहे!

आणि रुमालाच्या ऐवजी मोजे!! मी नि:शब्द झालो..

>>मोजे काढून सीपीयूच्या पंख्यावर लटकवतो<<

चार्ल्स बॅबेज आज त्याच्या कबरीत वळवळला असेल...

राज, कोण आहे चार्लस बॅबेज?

चौकट राजा, मुख्यत्वे पावसाळ्यात मोजे भिजले, ओले झाले, त्यांच्यात दमटपणा घुसला तर तो काढायला सीपीयूच्या पंख्यावर टाकायचा जुगाड आहे तो. ईतरवेळी कधी काढले तरीही मग तीच जागा बेस्ट वाटते.

मला ते दिवसभर बूट घालायला बोर होते. आणि सॉक्सवर फिरले तर ते खराब होतात. त्यापेक्षा पुर्ण नंगे पाव व्हायचे. 10 मीटर परीघात नंगे पावच फिरायचे. त्या पलीकडे जावे लागले तर विदाऊट मोजे पटकन शूजं चढवून जायचे.

आणि हो, रुमालाच्या जागी मोजे म्हणजे नाकतोंड पुसायला नाही तर बसट्रेनमध्ये जागा अडवायला या अर्थाने घ्या.
याचा एक फायदा म्हणजे एकवेळ तुमचा रुमाल सरकावून कोणीतरी बसेल त्या जागी पण मोज्याच्या बाबतीत ते सहज शक्य नाही Happy

सनव, एवढासा तो किस्सा. त्यात काय काल्पनिक असणार.

Pages