पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by रंगासेठ on 25 February, 2016 - 02:45

नमस्कार

वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.

या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिटेनर लावले नाहीत तर घेतलेल्या ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही हे मात्र नक्की. तुमचे डॉक्टर सांगतीलच, पण स्वानुभव. अर्थात मला एकाच दातासाठी, माझी हौस म्हणून, फार गरज नसताना अक्कलखाती खर्च केला मी. म्हणजे रिटेन्शन क्लिप्स लावल्या, पण नंतर कंटाळा केला आणि मग तो दात पुन्हा पुढे आला. फार जाणवत नाही म्हणून मीपण नाद सोडला. वर्षभर सगळं सांभाळत होते, अजून ६ महिने करायला हवं होतं.

पिंची / पुणे मध्ये चांगला Pulmonologist सुचवू शकता का.
सासूबाईंना लंग कॅन्सर मुळे छातीमध्ये पाणी झाले आहे. Pleurodesis मुळे छातीत प्रचंड दुखत आहे. (मागील एक वर्षापासून anaplastic thyroid cancer होता) जो बराच कंट्रोल मध्ये आला पण छातीत metastatis मुळे आता हा त्रास चालू झाला आहे.

डॉक्टर लक्ष्मीकांत येंगे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे असतात. माझ्या आईवडीलांच्या बाबतीत खूप चांगले अनुभव आहेत.

Pages