पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by रंगासेठ on 25 February, 2016 - 02:45

नमस्कार

वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.

या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्हि किडनी मध्ये २-एम एम चे खडे अहेत .
त्यामुळे सल्ला घ्यायचा आहे. खडे ब्लॅडर मध्ये नसून किडनी मध्ये आहेत त्यमुळे काळजि वाटते

माझ्या नवर्‍याची मान भयंकर दुखते. कुठलेही निमित्त पुरतय हल्ली. बॅग, किराणा सामान उचलले, हेलमेट घातले, २ चाकी चालवली, उशी बदलली, झोपताना थोडी पोझिशन बदलली तरी मान खूप दुखते. रडवेला होतो इतकी. ना तो मान दुखताना जेऊ शकत ना रात्र रात्र झोपू शकत कोणत्या डॉक्टरलला दाखवू त्याचे दुखणे? आम्ही पुण्यात जाऊ गरज असल्यास.
आठवड्यात २ तरी पेनकिलर घ्यावी लागते

माझ्या नवर्‍याची मान भयंकर दुखते.आठवड्यात २ तरी पेनकिलर घ्यावी लागते >>> ऑर्थोकडे जा.पेनकिलरवर जास्त विसंबू नका.

चांगला माहितीतला एक्स्पर्ट फिजिओथेरपिस्ट असेल तर बघा मानेसाठी. पण डॉक्टरांना दाखवा अर्थात आधी. फिजिओथेरपी बराच काळ घ्यावी लागली तरी घ्या आणि त्यांनी सांगितलेले व्यायामही करायला हवेत.

डॉ. राजीव पटवर्धन, डॉ रत्नपारखी, डॉ. अविनाश काटे, जगताप डेअरी चौक या आर्थोपेडीक डॉक्टर पैकी कोणाचा आपल्या पैकी कोणाला काही वैयक्तीक अनुभव आहे का?

डॉ. राजीव पटवर्धन, डॉ रत्नपारखी, डॉ. अविनाश काटे, जगताप डेअरी चौक या आर्थोपेडीक डॉक्टर पैकी कोणाचा आपल्या पैकी कोणाला काही वैयक्तीक अनुभव आहे का?

डॉ.निर्मलकुमार ढेकणे आर्थोपेडीक सर्जनचा चांगला अनुभव आहे.२०११ साली आईचे नी रिप्लेसमेंट्चे ऑपरेशन त्यांनी केले होते.

नम्रता, डॉ शैलेश रत्नपारखी हे उत्तम ऑर्थ्रो आहेत. सेंट उर्सुला हायस्कुल समोर, निगडी इथे त्यांचा दवाखाना आहे. माझ्या सासर्‍यांना सायटीकाचा खूप त्रास होत होता. डॉ. रत्नपारखींनी गोळ्या कमी व व्यायाम जास्त सांगीतला, आता त्यांना अजीबात त्रास नाही, एकदम ओके आहेत.

नम्रता वर्मा डाॕ.आहेत भेळ चौक निगडी येथे,तसेच भेळ चौक येथे स्टर्लिंग हाॕस्पिटल येथे टोणपे डाॕ.आहेत भेटा त्यांना तज्ञ experts आहेत

कुलकर्णी डाॕ एकदम बकवास आहेत विवेक नगर आकुर्डी येथील चुकून ही जाऊ नये.मागील वर्षी २०१८ ला दिवाळीत माझा कान दुखायला लागला मी कुलकर्णी कडे गेलो त्यांनी कान तपासला व म्हणाले कान फुटलाय! मी चाट पडलो कान फुटलाय?????? मग वास कसा येत नाही पु का येत नाही तरी विचार केला असेल फुटला उपाय विचारला तर ३५०० रुपये खर्च सांगितला आणि टेस्ट चे२००० वेगळे!!!! मी भालेराव हाॕस्पिटल मधे गेलो डाॕ ने कान तपासला म्हणाले सुज आलीय मळाचे खडे झालेत २०० रुपयाचे २ ड्राॕप दिले एकाने सुज मी आणि कान दुखायचा थांबला दुसऱ्या ने मळ फुगून आला कान साफ करायचे ५० रु अन् fees १५०!४०० रुपयात बरा झालो

योगेश जंगम, आकुर्डी नाही पण भांडारकर रोड ला असणारे डॉ विनय थोरात बरेच प्रसिद्ध आहेत पोटासाठी . पण सकाळी लवकर नंबर लावायला जावं लागत तिथे. बरेच लांबून रुग्ण येतात तिथे

डॉ.निर्मलकुमार ढेकणे आर्थोपेडीक सर्जनचा चांगला अनुभव आहे.२०११ साली आईचे नी रिप्लेसमेंट्चे ऑपरेशन त्यांनी केले होते.

Submitted by देवकी on 27 March, 2019 - 23:10
>>>>क्षमस्व! ते डॉ.निर्मलकुमार ढुमणे असे वाचावे.

Gynecologist : डॉ. वैजयंती कामत, चापेकर चौक, चिंचवड.>>>
हो.त्यांचाच मुलगा,अमित कामत हे ही गायनॅकोलॉजिस्ट आहेत.>>>
अमित कामतांचा अनुभव चांगला नाहीये..
माझ्य मैत्रीणीला त्यांनी तु आई होउ शकणार नाही असे सांगितले होते.. एक शस्त्रक्रिया पण सांगितली होती.. ३ वर्‍श ती उपचार घेत होती काहीही फरक पडला नाही..
तीने दुसर्या डॉ कडे उपचार घेतले, केवळ औषध देउन तिचि समस्या नाहीशी झाली आणि तिला आता २ मुले आहेत
सगळ्यांची तब्येत उत्तम आहे

माझ्य मैत्रीणीला त्यांनी तु आई होउ शकणार नाही असे सांगितले होते.. एक शस्त्रक्रिया पण सांगितली होती.. >>> अरे बापरे! इतक्या ब्लंटली?मग शस्त्रक्रिया आणि उपचार कशासाठी? वाईट वाटले वाचून.तुमची मैत्रीण मनाने खंबीर राहिली म्हणून ठीक आहे,नाहीतर एखादीने प्रयत्न सोडले असते.

तिला आता २ मुले आहेत>>>> त्यानंतर तिने कामतांची भेट घ्यायला हवी होती आणि हे सांगायला हवे होते.

पिं ची मधे उत्तम बाळंतपणाचे हॉस्पिटल कोणते आहे ?
काहि कोम्प्लिकेशन्स झल्यास आय सी यू , बाळाची केयर युनिट सोबत असलेले उत्तम .
प्लीज सजेस्त

तीने दुसर्या डॉ कडे उपचार घेतले, केवळ औषध देउन तिचि समस्या नाहीशी झाली आणि तिला आता २ मुले आहेत
सगळ्यांची तब्येत उत्तम आहे>>त्या डॉक्टरांचे नाव सांगा ना

स्टर्लिंग कसे आहे>> चांगले आहे, माझ्या एका मैत्रीणीच्या जावेची झाली तिथे डीलीव्हरी

येथे डॉ रविन्द्र शेलमोहकर म्हणुन आहेत, ते चांगले आहेत
त्यांच निगडी ला खाजगी क्लिनिक आहे, 'रुजुला क्लिनिक'

पिं ची मधे उत्तम बाळंतपणाचे हॉस्पिटल कोणते आहे ?>> बिर्ला हॉस्पिटल, चिन्च्वड चे नाव ऐकले आहे, ओळखीत कुणाचा अनुभव नाही

बापरे बिर्ला??? शत्रूला सुध्दा सुचवू नये, भयंकर हॉस्पिटल आहे ते आणि बरेच कुप्रसिद्ध सुद्धा. कामत उत्तम आहे जुने जाणते आहे आणि चिंचवडात तरी दुसरा चांगला पर्याय नाही.

दोन जवळच्या मित्रांच्या पालकांबाबत वाईट अनुभव आलाय, खूप महाग आहेच पण योग्य निदान झालं नाही आणि दोघांनाही जीव गमवावा लागला. तिथे साधं बिल होतच नाही.. निरामय बरंच चांगलं आहे त्यापेक्षा.

बिर्ला हॉस्पिटलबद्दल जे लिहलयं ते पूर्ण खरं आहे. आमच्या एका वृद्ध नातेवाईकाला ब्रेनहॅमरेज झालं होतं. नुसतंच बिलं फाडत होते आणि नीट लक्ष सुद्धा दिलं जात नव्हतं. तिथल्या डॉक्टरांना काही चिंता नसते पेशण्टची.

Pages