पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by रंगासेठ on 25 February, 2016 - 02:45

नमस्कार

वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.

या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच चहाचे पाणी जादा पाणी मिक्स करुन उकळुन वापरता येईल. >>> ओके रश्मी. धन्यवाद .ट्रीटमेंट घेतली की चालू असेपर्यंत केसगळती गायब असते. बंद करून 2 महिने होतायत की परत सुरू. आता पहिले जाऊन शिकेकाई,रिठा पावडर आणणार आहे याच आठवड्यात. आवळे आलेत सिझनचे त्याचा किस शिजवून समोर दिसेल असा ठेवलाय रोज एक चमचा तरी खायला. आता ना दु आणि हे चहापाणी करून बघणार केसांसाठी.

वर्णिता, तू आवळ्याचे तेल घरी करुन बघ की. १ लिटर खोबरेल तेलात मोठा चमचाभर तीळाचे तेल घालायचे. त्या तेलात असतील तेवढे आवळे किसुन घालायचे. ( जर किस पिळुन घेता आला तर त्याचा रस त्या तेलात मिक्स कर, व उरलेला चोथा वाळवुन त्याची आवला सुपारी कर नाहीतर वाळवुन शिकेकाई मध्ये मिक्स कर ) त्यात थोड्या मेथी बिया व कढीपत्त्याची ( खायचा ) पाने मिक्स कर व तेल उकळवुन घे. तेल उकळत असतांना बुडबुडे येतात तेव्हा एक छोटा चमचाभर पाणी त्यात टाकायचे. जर तेल तडतडले ( आवाज आला ) तर तेल झाले आहे असे समजायचे. तुळशीबागेत माका व ब्राह्मी ताजी वनस्पती मिळत असेल तर ते पण त्या आवळ्या बरोबर शिजायला ठेव. मेथीने कोंडा जातो व कढीपत्त्याने केस काळे रहातात.

दुसरे म्हणजे अन्नातला कढीपत्ता फेकण्यापेक्षा तो थेंबभर तेलात भाजुन घ्यायचा. सुके खोबरे किस पण भाजायचे . दोन्हीची एकत्र पुड करुन भाज्या आमटीत वापरायची. कढीपत्ता व खोबरे दोन्ही केसांकरता चांगले. आम्ही असेच करुन ठेवतो.

डॉ.ताम्हाणे हे महाग असले तरि उत्तम आहेत , माझ्य आईचे १४ (दात + दाढा) इंप्लाट केले .
त्यांच्याकडे मशीन्स आणि तंत्रज्ञान अद्ययावत आहे , स्वतः सर अनुभवी आहेत

उपचार xरे सगळे मिळून 32000 पर दात पडल्याचे आठवते......... 2 implat चे फक्त 32000? लकी आहात.मला एका implantla 80000 खर्च आला होता.ते डॉकटर प्रचंड महाग आहेतच पण अनुभवी आहेत.

देवकी,
32000 पर दात
म्हणजे 2 चे 64000
पण खूप प्रोसेस असते, दात पाडा, मग नुसता स्क्रू चा भाग फिक्स करुन टाके, मग शेवटी त्यावर दर्शनी कॅप वगैरे
त्यापेक्षा ब्रिज सोपे वाटले.फक्त जिथे ब्रिज ला आधाराला आजूबाजूला 2 दातच नाहीत तिथे इंप्लान्ट बरे

म्हणजे 2 चे 64000
पण खूप प्रोसेस असते, दात पाडा, मग नुसता स्क्रू चा भाग फिक्स करुन टाके,>>>>>> तरीही छानच आहेत की८०,००० पर १ दात.

पण खूप प्रोसेस असते,... हो ना प्रचंड वेदनादायी!

वाकडजवळ कोणी चांगला एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहे का ? (बाणेर औंध पण चालेल). पार्क स्ट्रीट जवळ डॉक. हेमंत कुलकर्णी यांच्याकडे आई ला घेऊन गेलो होतो. थायरॉईड अँड गोएटेर चा प्रॉब्लेम आहे. त्यांनी शाश्त्रक्रिया सांगितली आहे पण अजून कोणाचा सल्ला घ्यावासा वाटतो.

कृपया पिंपरी-चिचवड किंवा पुण्यातील चांगले ऑन्कोलॉजिस्ट सुचवा. सासुबाईना अ‍ॅनाप्लास्टिक थायरॉईड कर्करोग झाला आहे. म्हणून काही निकड आहे. डॉ. कानिटकर अशी काही नावे आमच्याकडे आहेत. पण अजुन काही माहिती असेल तर कळवावी. (३-६ महिने आहेत असे सान्गितले आहे)

@टिनटिन डॉ कोप्पीकर आहेत जहांगीरला आणि एक डॉ हेगडे आहेत रुबीला. दोन्ही उत्तम आहेत असे कळले.

डॅा. कोप्पीकर खोटी आशा दाखवत नाहीत. स्पष्ट बोलतात.——
क्षमस्व, मला डॅा. कोप्पीकर महित नाहीत. मला डॅा. कसबेकरांविषयी हे म्हणायचे होते.

सध्या एम पी मध्ये असलेल्या आणि नेहमी हिंजवडीत रहायला असलेल्या एका कलिग ला बायकोच्या पहिल्या डिलीव्हरी साठी हिंजवडी किंवा वाकड मध्ये जवळ चांगले गायनॅक हवे आहेत. किंवा हिंजवडी रुबी मध्ये कोणी चांगल्या अनुभवी डोक्टर येत असल्यास.
कृपया नावे सुचवा.

अनु, पिंपळे सौदागरला फडणीस डॉक्टर म्हणून आहेत त्या गायनॅक म्हणून चांगल्या आहेत (पेडी म्हणून वाईट आहेत) ONP hospital मध्ये असतात.

धन्यवाद गं,त्या माणसाला हिंजवडी किंवा अगदी जवळ चे हवे आहेत.(शिवाय किंमत जास्त नको वगैरे असा आखूड शिंगी मामला आहे. बहुतेक इतकं करुन शेवटी आई बाबांच्या इथे एम पी लाच करतील.)
बर्‍याच जणांच्या रेफ वरुन डॉ सौम्या कुलकर्णी सुचवल्या मग शेवटी. तो सौम्या कुलकर्णी आणि भक्ती धामणगावकर बघतोय हिंजवडी च्या जवळ या दृष्टीने. सौदागर मध्ये प्रियंवदा शाह पण सुचवल्या होत्या मी.

अवांतरः फडणीस म्हणजे फेमस घोले रोड श्री फर्टीलिटी क्लिनिक आहे तिथल्याच का?

तू कोणत्या म्हणते आहेस ते माहीत नाही पण मी डॉ. अमिता फडणीस म्हणतेय.। मला त्यांच्या हॉस्पिटलचा रिदीतसाठी अनुभव फार वाईट होता पण डिलिव्हरीसाठी हॉस्पिटल चांगलं आहे.

Dr. शहा खरंच खूप चांगल्या आहेत.

भोसरी वाल्यांसाठी पिंसौ आणि वाकड जवळ जवळ तर आहे कॅटेगरी मध्ये येतं गं. हिंजवडीला जाताना पिंसौ पासून ट्राफिक मुळे जी वाट लागायला सुरुवात होते ती वाकड आणि पुढेही कॅन्टीन्यू होते त्यामुळे असावं बहुदा.

हो खरं आहे. ३० किलोमीटर प्रवास करायला नको म्हणून पिं सौ ला लोक राहतात, आणि त्यांना वाटेत वारेमाप सिग्नल आणि ट्रॅफिक असल्याने वारजे वाल्यांइतकीच मिनीटं लागतात पिक ट्रॅफिक च्या वेळांना. आणि एकदा कोकणे चौकातून हायवे ला लागलं की भुर्रकन भोसरी काय नि पिंपळे गुरव काय Happy
(माझा डॉ आणि मिसेस फडणीस आणि श्री क्लिनिक च्या एकंदर व्यवस्थेबद्दल अनुभव चांगला नाही, पण तो माझा बायस आहे. त्यांच्या गुणवत्तेबद्दल शंकाच नाही.
गोंधळाला ते कारणीभूत नसून त्यांच्या लोकप्रियतेमुळे होणारी प्रचंड गर्दी हे कारण आहे. गुंतागुंतीच्या नसलेल्या केसेस नी साध्याच क्लिनिक्स ना जावे असे वाटते.)

आकुर्डी निगडी भागात कोणी चांगले dentist माहित असतील तर सांगा प्लीज..ब्रेसेज किती काळा साठी लावाव्या लागतात?

तुरू, चिंचवड स्टेशन परिसरातील राका गॅस एजन्सीच्या मागे डाॅ. अभिमन्यू कोठारी आहेत. घरातील सर्वांच्या दातांबद्दल उत्तम अनुभव आहे. फी पण माफक आहे आणि उपचार करण्यापूर्वी खूप नीट समजावून सांगतात. Braces specialist बहुतेक वेगळे असतात.

जंगली महाराज रोड वर आहे एक सिद्धीविनायक डेंटल क्लिनिक. तेथे मुंबई हून एक ऑर्थोडेंन्टीस्ट येतात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी.
मिडिया हाऊस , Apple unicorn शॉप च्या मागे.
https://dentalcarejmroad.business.site

ब्रेसेज किती काळा साठी लावाव्या लागतात? >> ब्रेसेस लावण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो, पण चांगले परिणाम दिसण्याकरता १.५ ते २ वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर पण रिटनेर लावायला सांगतात काही महिने, बहुतेक फक्त रात्री.

Pages